एकटीच ... @ North-East India

Submitted by सुप्रिया राज जोशी on 27 December, 2019 - 03:13

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984

5th February 2019

प्रिय डायरी,

उद्या मी एकटीच प्रवासाला निघणार.

या प्रवासाच्या निमित्ताने माणसे नि मुखवटे यांच्या गोंगाटाहून दूर सटकायचे. इथे आपुलकीच्या आशेच्या कासेने जगत असतो तिथे आपले कुणी नाही, मग कसली आस नि कसली आसक्ती? अशाच वेळी स्वतः ला शोधता येते असा समज करून घेतला आहे. गैरसमज असला तरी माझ्या या प्रवासामागची प्रेरणा आहे ती.

डायरी, तुझ्या कोऱ्या पानावर शब्दामध्ये खरे काय ते खरडायची गरज खरंच आहे का? तुला सारे माहीत आहे. उद्याचे काय हा विचार जरी मनात आला तरी पोटात गोळा येतोय. असू दे. साहस म्हटले की तशी चलबिचल होतेच. त्याला भिति असे नाव दिले की मग मात्र त्याचीच भिती वाटू लागेल, असे मी मला बजावले आहे.

असा प्रवास पुन्हा होणे नाही हा विचार पुन्हा पुन्हा मनात रेंगाळतोय. तेच कारण असेल की अंगात ताप भरलाय तशातही खूप शक्ती संचारली आहे असं जे वाटतंय. एक शेवटचा जोर लावायची वेळ आली की कुठुनसं असंच बळ संचारतं. हेच बळ कुटुंबाच्या नाराजीलगत रेखलेल्या प्रवासाच्या वाटेवरचे इंजिन आहे.

अशा प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जणू काही तो आयुष्याचा शेवटचा दिवस जगत आहे अशा थाटात एक एक क्षण टिपून घ्यायचाय ... शब्दात, कॅमेरात आणि हृदयात.

पाठीवरची सॅक भरून झाली. तुला नाही भरली. कारण यंदा प्रथमच वास्तविक हितगूज थेट जगाशी करायचंय.

गुडबाय सुप्रिया

IMG_20190205_215446.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks मन्या , वेडोबा , सूर्यगंगा
रोज एक पत्र टाकायचा विचार आहे . ट्रीप फेब्रुवारीत झाली पण इथे अनुभव आता शेअर करीत आहे. एकेक पत्र असे करत भाग खूप होतील पण तसे लेखन दुसऱ्या कुठच्या सदराखाली लिहावे काही दिसले नाही. लेखनाचा धागा आणि वाहते पान यातील फरक अजून कळला नाही.
ॲमी तिथे कसे टाकायचे ते ही आज शोधेन.
शुभेच्छा.

वाहत्या पानावर ठराविक आकड्यापर्यंतच्याच प्रतिक्रिया दिसतात (बहुतेक २०) पुढची प्रतिक्रिया आली की पहिली दिसेनाशी होते. त्यामुळे तुम्ही लेखनाचा धागा सुरू करा.
छान लिहीताय.