मध्य प्रदेश

Submitted by webmaster on 20 April, 2009 - 00:16

मध्यप्रदेशातल्या मायबोलीकरांचं हितगुज

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हलो,भरत्,वर्षू नील,अक्षरी जबलपुर ला जात येत असतो कामा नी नेहमीच, माझा आते भाउ राहायचा तिथे,
उतरलो कि पहीले पोहा जिलेबी मग सगळं,माझी आत्या रहायची सतन्या ला,लहान पणी जबलपुर सतना शटल नी पुष्कळदा प्रवास केलाय्,मजा यायची खुप्,अन अजुनही एम्.पी.म्हटलं की,जालीम लोशन गुडाखु,अन युग निर्माण योजने च्या भिंती वर लिहिलेल्या जाहीराती आठवतात्.पण सगळं एम्.पी.खुप आवडतं.

वर्षु नील गुलाबजाम खाण्याची पैज इतर दोघांमधे लागली होती, मी फक्त कोण किती खातोय ते मोजत होतो. गोडाचे पदार्थ मोजक्याच प्रमाणात खाल्ले तरी आइस्क्रीमला कोणत्याही वेळी आणि कोणत्याही मोसमात ना नसते. आणि आमच्या ऑफिसच्या समोर एक आइस़क्रीमचे दुकान होते तिथे इतक्या व्हरायटीज मिळायच्या...बघायला आणि खायला पण सुंदर. आणि मस्त रेस्टॉरंटमधे जेवण झाल्यावर (फेव्हरिट हॉटेलचे नाव विसरलो) की मीठा पान हवेच. गुलकंद आणि काय काय असायचे त्यात.

नमस्कार,
मला म.प्र. मधील महाराष्ट्र मंडळांबद्दल माहिती हवी आहे.. कोणी सांगु शकेल का? भोपाळ, इंदुर आणि ग्वाल्हेर मधील महाराष्ट्र मंडळांचे फोन नंब्रऱ, किवा ही माहिती आंतरजालावर कुठे उपलब्ध आहे हे कोणी सांगु शकेल का?

श्रद्धा.

मी मध्यप्रदेशातल्या बैतूलला रहाते.गाव लहान आहे.पण लोक खूप छान आहेत.रस्त्याच्या दोन्ही कडेला आंब्याची झाडे आहेत्.खूप हिरवळ आहे.कृषीप्रधान गाव आहे.

समई,
माझे मामा डॉ. चंद्रशेखर दिवाण, गेले वीस वर्षे बैतूल येथे वास्तव्य करून आहेत.
तुम्ही त्यांना ओळखता का?

नमस्कार मध्यप्रदेश. माझी मावशी मध्यप्रदेशमधे राहते, सध्या ती इंदोर- राजेद्रनगर इथे राहते. पूर्वी बिर्लाग्राम नागदा येथे रहायची, तेव्हा मी गेले होते नागद्याला,तिथले बिर्लामंदिर खूप सुंदर आहे आणि दाल-बाटी,शेव ह्या गोष्टी खूप आवडल्या.

जाहीर सूचना

आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्‍यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्‍यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्‍यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.

लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.

सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्‍या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत. लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.

लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.

१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.

२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.

३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी. या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.

वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.

वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.

नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg