प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी

Submitted by पाषाणभेद on 21 December, 2019 - 00:24

मागे असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी माबोवर लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे.

तर आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो. तसेच तो प्रवास पायी, सायकलपासून ते थेट आगगाडी, बस, खाजगी कार, आगबोट इत्यादी विविध वाहनांमधूनही होत असतो. अशा प्रकारच्या प्रवासासाठी तयारीचा वेळ काही वेळा अगदी काही मिनिटांचाही असू शकतो. अशा कमी वेळात लगेचच तयारी करुन प्रवासाला निघणे होते. मग आहे ते सामान पिशवीत भरले जाते किंवा महत्वाची वस्तू राहून जाते. गेलेल्या ठिकाणी मग आपल्याला लागणारी वस्तू पुन्हा घ्यावी लागते.

प्रवासाच्या तयारीला काय काय गोष्टी लागू शकतात याची संभाव्य यादी कुणी केलीही असेल. मला आठवते की खूप पूर्वी मायक्रोसॉप्टच्या ऑफीससूटमध्ये एका अ‍ॅप्लीकेशनमध्ये अशी विस्कळीत यादीचे टेम्प्लेट होते. इंटरनेटवर शोध घेतांना अशा रितीची चेकलिस्ट भेटूही शकते पण ती इंग्रजीत आहे आणि ती आपल्या राहणीमानाप्रमाणे नसावी. अर्थातच अशी यादी परिपूर्ण असूच शकत नाही. कारण व्यक्तीपरत्वे गरजा भिन्न होत जातात. मला एखादी गोष्ट आवश्यक असेल ती दुसर्‍याला अवांतर वाटेल.

खाली अशा प्रवासाला लागणार्‍या किंवा प्रवासात उपयोगी पडणार्‍या वस्तूंची यादी दिलेली आहे. सदर यादी वस्तूंच्या कोणत्याही क्रमाने नाही. सदर यादीत एका ओळीत एकच वस्तू येईल अशी बनवली आहे जेणे करून याची प्रिंट घेवून प्रवासाला निघण्यापुर्वी टिकमार्क करत वस्तू गोळा करायला सोप्या व्हाव्यात.

आपण हि यादी नजरेखालून घाला. काय वस्तू असाव्यात, काय नसाव्यात ते येथे लिहा म्हणजे चर्चाही होईल अन यादीपण परिपुर्ण होत जाईल.

टूथ ब्रश
पेस्ट
दाढीचे सामान
कंगवा
सेफ्टी पीन्स
सौंदर्यप्रसाधने
अंडरपॅंट, बनीयन
टॉवेल
साबण
प्रवासात उलटी न होवू देणारी गोळी (अ‍ॅव्होमीन किंवा इतर)
रक्तदाब, मधूमेह किंवा नेहमी लागणारी औषधे, क्रिम
डोकेदूखीवरचा बाम, आयोडीन, अमृतांजन, झेंडू तत्सम
इस्त्री केलेले ड्रेस
एक्स्ट्रा पिशवी
प्लॅस्टीक कॅरी बॅग
एखादी स्लिपर, चप्पल
गरम कपडे, मफलर, टोपी
कानात घालायचा कापूस
नाईट पॅंट, रात्रीचे कपडे
चष्मा घर
उन्हाची टोपी, गॉगल
छत्री, रेनकोट (हवामानाप्रमाणे)
मोबाईल
चार्जर, पॉवरबँक
हेडफोन
सेल्फी स्टिक
कॅमेरा
चटई
फळे कापण्याचा चाकू
जूने वर्तमानपत्र
पैसे, सुट्टे पैसे
क्रेडीट, डेबीट, ट्राव्हल कार्ड
फास्टॅग रिचार्ज केले का?
लिहीण्यासाठी पेन
कागद
जेथे जायचे तेथले फोन क्रमांक (कागदावर लिहीलेला असावा. मोबाईल कधीही दगा देवू शकतो.)
महत्वाचे फोन क्रमांक लिहीलेला कागद
जाण्याचा रस्ता असलेला नकाशा, पत्ता इ.
वाहनासंदर्भात कागदपत्र जसे आर सी बूक, ड्रायव्हींग लायसन्स
पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड
आपल्या पत्याचे ओळखपत्र (आपल्याकडच्या बॅगांमध्ये असे ओळखपत्र टाकून ठेवावे. हरवल्यास बॅग परत मिळण्याची शक्यता वाढते. स्वानूभव आहे.)
जेवणाचा शिधा किंवा डबा
इतर वेळेचा खाऊ
बिस्कीट, मॅगी
लहान मूल असल्यास त्यांचा खाऊ, दूधाची सोय.
पाण्याच्या बाटल्या
फर्स्ट एड
स्वतःची गाडी असल्यास गाडीसाठीच्या वस्तू वाढतात त्या लक्षात ठेवणे. (जसे आरसी बूक, स्टेपनी, गाडीतले ऑईल, हवा, पाणी, पेट्रोल, लायसन्स इत्यादी.)
इतर सदस्य बरोबर असतील तर या यादीतील वस्तू त्यांच्या गरजेप्रमाणे परत वरतून चेक करत येणे.
ट्रेकींग, एखादी मोहीमेसाठी प्रवास असेल तर गरजेप्रमाणे पुन्हा या वस्तू वरतून चेक करत येणे.
अधिकच्या वस्तू.....
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी सर्वसमावेशक यादी तयार केली आहे तुम्ही. तरीही आठवलं नवं काही तर बघूया.
उदाहरणार्थ काडेपेटी व दोन तरी मेणबत्त्या

आमची emergency मेडिसिन च वेगळं किट बरोबर ठेवतो - डोलो-650, ondem, sporlac, ओवा, मेथीदाणे, लवंग-वेलदोडा, volini ओइंटमेंट, अमृतांजन

हात पुसायला,
trash बॅग
पत्ते/board game/पुस्तकं

डेटॉलच्या लिक्वीड सोपचे छोटे पाऊच मिळतात आजकाल. ट्युबसारखे आहेत ते. ते फार उपयोगी पडतात. हँड सॅनिटायझरपेक्षा ते जास्त चांगले. १० रुपयाला आहे १ पाऊच.

Papersoap (very convenient to carry)
Tissue papers
Paper plates

विरंगुळा यादी:
सुडोकू कात्रण/application
शब्दकोडे कात्रण/application
Cows and Bulls game

प्रवासात माझं facewash tube ऑल purpose soap म्हणून वापरतो, सोयीस्कर पडतं.
वेगळी रिकामी घडी होते अशी बॅग बरोबर ठेवतो, शॉपिंग special Happy

माझी सेल्फमेड सर्व समावेशक यादी 
मोठी बॅग
 साबण / शॅंपू तेल ब्रश पेस्ट रीन पावडर दोरी / हॅंगर 
 कपडे, आतले कपडे टॉवेल सॉक्स / मफलर स्वेटर/ रेनकोट  रात्री चे शूज / स्लीपर 
हलकी चादर मच्छर रोधक
आयोडेक्स / कैलास जीवन / विक्स लागणारी औषधे,  
एक्सट्रा बॅग , कॅमेरा चार्जर,  मोबाईल  चार्जर 

हैन्ड बैग

पाणी बाटली सुका  खाऊ / गोळ्या  हैन्ड वाश, / नॅपकीन 
प्लास्टिक पिशवी - मुलीला कधी कधी गोळी देऊनही उलटी होते म्हणून Sad टिश्यू / न्यूज पेपर 
सुरी पेन , मोबाईल /पॉवर बँक,  हेड फोन्स हेअर बेल्ट / हैट / सन ग्लासेस / टोपी /स्कार्फ
 कोल्ड क्रीम, कापूस (मला कानामध्ये घालायला लागतो) , चिमटे,  सेफ्टी  पिन्स /सुई दोरा
क्रोसिन , डोलो गोळ्या , बी क्विनोल,  सॅनिटरी नॅपकीन बैंडएड
ए टी अेम कार्ड / ID कार्ड /टिकेटस
मीठ साखर ग्लुकॉन टॅब्लेट्स 

डॉक्युमेण्ट्स

टिकेटस / itinerary
पासपोर्ट / विसा / लायसन्स
ID कार्ड / PP फोटो
हॉटेल बुकिंग  डीटेल्स
कार / ट्रेन बुकिंग  डीटेल्स
जरुरी फोन नंबर्स
ए टी अेम कार्ड / क्रेडीट कार्ड
कॅश / सुट्टे पैसे

बिस्कीट / मॅगी ऐवजी सुका मेवा, चिकी घ्या. मजा येते. विकतचे खारे शेंगदाणे जास्तच खारट असतात. घरी शेंगदाणे भाजून घेऊन जायचे.

ड्रायव्हिंग करत लांब (पाचशे किमी +) जात असाल तर:
चाक बदलायची सगळी टूल्स, जॅक सकट चेक करून घ्यावीत + २ फूट लांबीचा एक लिव्हर रॉड.
रस्त्यावर ठेवायची रिफ्लेक्टर किट.
एका कॅन मध्ये पाच लिटर पाणी आणि एक मग.
काच पुसायचे फडके.
हॅन्डग्लोव्ह्ज - चाक बदलताना, इंजिन भागात अजून काही चेक करताना अत्यंत उपयोगी.
किमान एक तरी टॉर्च. टोपीला लावायचा LED लाईट मिळतो, तो असला तर उत्तम.
गाडीत फर्स्ट एड किट लॉक न करता, पटकन हाताला येईल अशी ठेवावी.
वायपर पाण्याच्या टाकीत पाणी फुल करून घ्यावे.
गाडी टो करून न्यावी लागल्यास (इतर मदत करणाऱ्या वाहनाने) त्यासाठी लागणारा हुक आणि केबल / दोरी.

थर्मोसफ्लास्क + डिस्पोजेबल कागदी कप्स.

एक साधी पिशवी , त्यात 3 जोड कपडे , एक टॉवेल , ब्रश , पेस्ट , मोबाईल चार्जर

उरलेले आज सर्वत्र मिळते, ( हिमालयात किंवा ममी रिटर्न च्या गुहेत तर जाणार नाही ना ?)

इथे प्रवास म्हणजे, मजलदर मजल करीत विविध ठिकाणे पाहात, डोंगर दऱ्यातून फिरणार आहात असे गृहीत धरले आहे.

मी आजच हैद्राबादहून नागपूरला आलो, पॅकिंगला पाच मिनिटंही लागली नसतील.

List madhe 2machya family doctor cha number
Female asel tar Tempons
He pan include kara

१५ फूट दोरी!
अनेक कामांत उपयोगी येवू शकते...

१. भगवा रुमाल
२. भगवा कुर्ता
३. गांधी टोपी,
४. जाळीदार टोपी,
५. चौकडीचा रुमाल
६. गायत्री मंत्राचे पाठ किंवा जय श्रीराम चे पाठ
७. अल्ला हु अकबर किंवा तत्सम चे पाठांतर
८. तात्काळ पलटण्याचे सापासारखे ट्रेनिंग

वरील यादीत काही सामान तर काही वेळेवर उपयोगात येणार्या अंगभुत वळणाच्या बाबी आहेत. देशातील सद्य परिस्थितीनुसार व ओढवलेल्या वेळेनुसार आपापल्या विवेकान्वये उपयोग करावा.

आम्ही १२ जणांचं कुटुंब सिक्कीम वरून येताना लँड स्लाईड मुळे लहान मुलांसकट १४ तास अडकलो होतो . तेव्हा मेथी चे लाडू आणि शेंगदाणे खाऊन भूक भागवली होती ... इथे शहरात मेथी चे लाडू बघून मुलं ईईईक्स करतात Happy . तेव्हा जसा सनसेट झाला आणि थंडी वाढली तेव्हा एक्ष्त्र चादरी आणि आईंच्या शाली चे महत्व कळले

ओडोमॉस किंवा तत्सम मच्छर पळवणारे क्रीम, किंवा तो फास्ट जळणारा कागद किंवा कॉइल चा मोठा तुकडा.
ताप, सर्दी, खोकला इ. लागणारी व सर्वांना उपयोगात पडतील अशी औषधे.

फक्त कपडे (त्यात सगळे आले ),ब्रश, मोबाईल चार्जर इ.
खायला सुध्दा आम्ही काही नेत नाही सगळं बाहेरच खातो जास्त करून प्रवास ट्रेनचा ;त्यामुळे टूथपेस्ट पासून सगळे सहज उपलब्ध होते.
Wink

लहान मुलं सोबत असतील तर खूप बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो, त्यामुळे सामान वाढतं. लहान मुलं बरोबर असतील तर fastest mode of transport हवा.

लहान मुले बरोबर असतील तर
वय 0-2-3 वर्ष
डायपर
बेबी वाईप्स, पेपर सोप, शी चे डायपर गुंडाळायला काळी पिशवी (3-4)
पावडर, काजळ
सॉक्स, शूज,रूमाल, नॅपकिन
कपडे आणि टोपडे, औषधे
मऊ दुपटे किंवा उबदार साडी( घडी करून बाळाच्या अंगावर घ्यायला).
वाटी, चमचा, छोटी प्लेट, डबी मधे सर्फ पावडर (खरकटी भांडी घासायला)
पेज करायची पावडर, बिस्किटे, पिवळी शेव, मुरमुरा चिवडा
बाळाची आवडती खेळणी

मी छोटे पातेले,चिमटा , छोट्या छोट्या डबी मधे मोहरी, हिंग, मेतकूट, कोरडा भाजलेला रवा, पेज करायची पावडर, मिठ, साखर घेऊन गोवा आणि तुळजापूर प्रवास केला आहे.
छोट्या टपरीवर मी बाळासाठी पेज, उपमा केला आहे.
मोठ्या हॉटेल मध्ये एकवेळ नाही म्हणतील पण टपरीवर खूप छान वागणूक मिळते. मी 10/- रूपये द्यायचे त्याचे.

आता बाळ वर्षाचे झाले आहे तर
बटर, जॅम, सॉस, मेयोनिज, घरगुती चटणी चे छोटे पाकिट घेतणार आहे कारण छोट्या बरोबर मोठ्या सात वर्षाच्या मुलाला पण उपयोग होतो.

आणि मिठ, देवाचा अंगारा, बाळाच्या पोटदुखी वर हिंग विसरु नका

कोणे एके काळी (म्हणजे पाच-सात वर्षांपूर्वी) प्रवासासाठी घ्यावयाच्या वस्तूंची मी केलेली यादी खाली देत आहे, या यादीतील वस्तूंमध्ये खालील कारणांमुळे बदल / वाढ / घट होऊ शकते -

  • प्रवासाचा काळ :- एक-दोन दिवस / एक आठवडा / एका आठवड्याहून अधिक
  • प्रवासाचा प्रकार :- विमान / रेल्वे / बस / कार / बाईक / सायकल
  • प्रवासी - तरुण पुरुष / स्त्री- पुरुष जोडी / पती पत्नी मुले / कुटुंब इ.
  • इतर निकष :-

प्रवासासाठी घ्यावयाच्या वस्तूंची यादी -

खाद्यपदार्थ :-
सातूचे पीठ, बत्ताशे, पिठीसाखर, पोहे, चिवडा, लाडू, मेतकुट, बिस्किटे, चॉकलेट्स इ.

इतर सामग्री: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे)
आरसा, कंगवा, साबण, टूथ-पेस्ट, ब्रश शाम्पू, पेपर-सोप, खोबरेल, टिश्यू-पेपर, टूथपिक्स, इअर-बड्स

औषधी: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे)
बीपीच्या गोळ्या, डायबेटिकच्या गोळ्या, डोळ्यांचे ड्रॉप्स
इनो, झंडूबाम, ओडोमॉस, सर्दी-ताप-अंगदुखीच्या गोळ्या, स्ट्रेपसील, ग्लुकॉन-डी

प्राथमोपचाराचे साहित्य: (औषधांच्या पाउचमध्ये ठेवणे )
बँड-एडच्या पट्ट्या, पांढरे बँडेज, क्रेप बँडेज (गुलाबी), कापूस, कात्री, आयोडीन/मलम/ पावडर, डेटॉल,

कपडे व इतर वस्तू:
शर्ट, टी शर्ट्स, पँट्स, साड्या व इतर कपडे, टॉवेल/पंचा, स्कार्फ, रुमाल, शाल, बेडशीट, इ.
चप्पल, बूट, सॉक्स,

उपयुक्त वस्तू: (लगेच सापडतील अश्या ठिकाणी, उदा, बॅगेच्या बाहेरील खिश्यात ठेवणे)
साखळी, कुलूप-चावी, बॅग, खांद्यावरची पर्स, औषधे ठेवण्याची पाउच, चिल्लर पैसे/नोटा ठेवण्यासाठी लहान पाउच,
लहानसहान वस्तू ठेवण्यासाठी लहान पिशवी/ पाउच, कॅरीबॅग, इ.
नायलॉनची दोरी, सुई-दोरा, सेफ्टी-पिना, आगपेटी व मेणबत्ती, बॅटरी, इ.
नेल-कटर, कात्री, छोटा चाकू, छोटा स्टीलचा ग्लास, चमचा, हवेची उशी, इ.
मोबाइल, चार्जर, इअर फोन, पॉवर बँक, कॅमेरा, घड्याळ, चष्मा, गॉगल इ.

महत्वाचे साहित्य: (खांद्यावरील पर्समध्ये ठेवणे)
ओळखपत्र, फोटो, रोख रक्कम, एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड, तिकिटे, कोरे कागद, डायरी, पेन, पोथ्या, इ.

याशिवाय लागणाऱ्या इतर वस्तू :-

प्रवासाचा मार्ग, उद्देश व काळ यावर यादी अवलंबून असते. वर मानव यांनी लिहिल्याप्रमाणे दर आठवड्या महिन्याला प्रवास करणाऱ्याची यादी तयार असते डोक्यात व बॅग भरायला 5 मिनिटे लागतात.

Tripit सारखे app तुमची सगळी itinerary व त्यासंदर्भातली आरक्षणे एकत्र एका जागी आणते. जर सर्व आरक्षणे ऑनलाईन केली असतील तर हे app उपयोगी आहे. उदा विमानाची तिकीटे , ऑनलाईन चेकिंन केल्यावर येणारा बोर्डिंग पास, रेंटल कारचे रिझर्वेशन, हॉटेल हे सर्व एकाच ठिकाणी पाहायला व वापरायला मिळते. अर्थात तुम्ही नेहेमीच एकाच कंपनीचे सर्विसेस वापरत असाल तर याचीही गरज पडत नाही. जसे बोर्डिंग पास तुमच्या एअर लाईनच्या app मध्ये असते, रेंटल कार घेऊन बाहेर पडताना लायसन्स दिला की बाकी काही द्यायला लागत नाही. हॉटेलात पण नाव सांगितले की पुरे होते.

Packpoint सारखे app सामानाची यादी करायला, सामान यादीनुसार भरले आहे की नाही याची खात्री करायला उपयोगी पडते

युनिवर्सल ट्रॅवल अ‍ॅडाप्टर सारखीच अजुन एक वस्तु माझ्या बॅगेत असते, ती म्हणजे पोर्टेबल वाय-फाय राउटर. या दोन्हि वस्तुंची साइझ (शर्टाच्या वरच्या खिशात मावेल एव्हढि) अगदि लहान असल्याने टेक पाउच मध्ये आरामात बसतात. बर्‍याच हॉटेलात वाय-फाय सिग्नल कायम वीक असतो, कनेक्शन स्पॉटि असतं वगैरे, यावर बेस्ट उपाय म्हणजे स्वतःचं व्हिपिएन या राउटर द्वारे वापरणं. रुममध्ये नेटवर्क ड्रॉप असतोच, त्याला हा राउटर जोडुन व्हिपिएन लाँच करता येतं. मल्टिपल युझर्स (फॅमिली बरोबर असेल तर), मल्टिपल डिवायसेस हे नेटवर्क शेअर करु शकतात. शिवाय बोनस म्हणजे एक अ‍ॅडिशनल सिक्युरिटी लेयर आपोआप मिळतो...

रोड वॉरियर्सच्या बाबतीत या दोन वस्तु लाइफ सेवर्स आहेत हि अतिशयोक्ति ठरणार नाहि... Happy

(क्लायंट्सच्या ऑफिसमधे देखील जिथे नेटवर्क ड्रॉप्स कमी, माणसं जास्त, स्पॉटि वाय-फाय अशी परिस्थिती असेल तिथे नेटवर्क अ‍ॅडमिन च्या परवानगीने हा राउटर वापरला जाउ शकतो... )

पोर्टेबल वाय-फाय राउटर
>>>
अरे हे फारच उपयोगाचे दिसतंय. धन्यवाद! ब्रँड, फिचर्स कुठले असावेत हे सांगू शकाल का?

jio

प्रवासात सिक्स पॉकेट पॅण्ट घालाव्यात. त्यातल्या मोठाल्या खिशात बरेच छोट्यामोठ्या गोष्टी राहतात. मी साधे गार्डनला फिरयला गेले तरी तेच घालतो.
पाण्याची छोटी बॉटल, बिस्कीटचा वा भेळेचा पुडा, चुईंगम वा चॉकलेट, मोबाईल, पैश्याचे पाकिट, एक्स्ट्रा रुमाल अन नॅपकीन, टिश्यू पेपर, रिकामी पिशवी, गॉगल तसेच डोक्यावरची टोपी आणि गरजेचे असल्यास पेनपेन्सिल ईतक्या सारया वस्तू एकाच वेळी सहा खिसे मिळून मावतात.

>>फिचर्स कुठले असावेत हे सांगू शकाल का?<<
माझ्याकडचा जुना (७+ इयर्स) आहे झाय्क्सेल ब्रँड, चायना मेड पण स्टिल गोइंग स्ट्राँग. आता नविन नेटवर्किंग स्टँडर्ड्स्/प्रोटोकॉलचे बाजारात आहेत...