यूट्यूबवर विडिओ अपलोड करण्यास मदत हवी आहे. कृपया करावी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 December, 2019 - 14:56

ऑफिसच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मागच्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मी टाळ्यांच्या कडकडाटात आणि शिट्य्य्यांच्या गोंगाटात डान्स परफॉर्मन्स दिला. दोन गाण्यांवर नाचलो. दोन्ही गाणी बॉलीवूडची होती. अपेक्षेप्रमाणे ऑफिसच्या लोकांनी नाच डोक्यावर उचलून धरला. हे कौतुक सर्वदूरच्या मित्रांमध्येही व्हावे या हेतूने त्या नाचाचा विडिओ यूट्यूबवर टाकायचे ठरवले आणि ईथेच अडकलो. ज्याबाबत मला तांत्रिक मदत हवी आहे. शंकानिरासन करायचे आहे.

यूट्यूबवर विडिओ अपलोड तर होतोय. पण मी सोडून तो कोणीही बघू शकत नाहीये. कोणी मी पाठवलेल्या यूट्यूब लिंकवर क्लिक करताच खालीलप्रमाणे मेसेज येतोय -

This video contains content from Zee music company who has blocked it on copyright grounds

माझ्या आकलनाप्रमाणे मी निवडलेल्या गाण्यांपैकी एखादे झी म्युजिक कंपनीचे असावे. माझ्या विडिओतील ऑडीओट्रॅकवर त्यांना ऑब्जेक्शन असावे. त्यांच्या जागी ते बरोबरही असावेत. पण माझा तर पोपट झाला ना. गेल्यावेळीही मी नाचाचा विडिओ युट्यूबवर अपलोड केलेला. तेव्हा प्रॉब्लेम नव्हता आला. असा प्रॉब्लेम होऊ शकतो ही कल्पनाही नव्हती. पण आता झालाय तर यातून मार्ग कसा काढावा? माझ्या नाचाचा विडिओ त्यातल्या ऑडिओ साऊंडट्रॅकसह यूट्यूबवर टाकायचा काही ऊपाय आहे का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाफा यूट्यूबलाच तर होत नाहीये अपलोड

राजेशजी नाका गोळा व्हायचा डान्स बघायला ल्हानपणी नवरात्रीला.. पण तेव्हा मोबाईल विडिओचे ईतके फॅड नव्हते.. रेकॉर्ड झाले नाही.

Lol
नाही माझा नाही पण लोकांच्या सर्चबुद्धीची खरेच कमाल वाटली Happy

असो
उद्या सुट्टीचा फायदा उचलत लॅप्टॉपमध्ये मागच्या वर्षीचा विडिओ शोधतो आणि यावर्षीच्या विडिओआधी जोडून अपलोड करतो. मला वाटते हे काम करेल...

सर प्रश्न अपलोडचा नाही कॉपीराईटचा आहे..

बाई दवे या माबो ॲपमधून माझे प्रचिच अपलोड होत नाहीत... Sad

ब्राउजरचे पाय धरा.
प्रथम प्रचीला रिसाईज करून २ एमबीपेक्षा हलके करा मगच ते उचलले जाते. Important.

( नाहीतर सिलेक्ट ए फाईलचा बॉक्स वारंवार येत राहील. नो फाइल सिलेक्टेड दाखवेल.)

तुमच्या सर्व शंकाच निरसन झाले असेल तर धागा बंद करा.
मुलगी हरवली आहे माहिती देणाऱ्यास 2000 रुपये बक्षीस असा msg व्हॉटसअप वर वर्ष न वर्ष फिरतो.
त्या काळात मुलगी सापडलेली असते तिचे लग्न झालेलं असतं मुल पण झालेली असतात.

राजेश तसे मी करणारच आहे
पण् अजून विडिओ जोडायच प्रयोग शिल्लक आहे.
आता विकेण्डला करतो

रुणम्या, पोर्नहब वर अपलोड कर.

१. फुकट होईल.
१. कॉपीराईटची भानगड नाही.
१. नवा ऑडियन्स मिळेल.
१. माबोच्या डोक्याचा पीळ जरा कमी होईल.

पाफा सुट्टी वाया नाही घालवली.. ख्रिस्तमस्त साजरा केला. कॉलनीतल्या पोरांसाठी नाटकही बसवले होते. सांताक्लोजच्या नातवाचा रोल मला मिळाला होता.

आरारा... पॉर्नसाईट आहे का ती? तिथे जर हा विडिओ अपलोड केल्यानंतर पकडला गेला तर ते झी म्युजिकवाले अब्रूनुक्सानीच दावा नाही ना ठोकणार?

फोटो तर अपलोड होतोय
पण ईथे ॲड करायचे बटण नाही सापडतेय..
आधीचे अप्लोड फोटोही त्यामुळे टाकू शकत नाहीये

पण ईथे ॲड करायचे बटण नाही सापडतेय..

हो, ही त्रुटी मायबोली app मध्ये राहिली आहे. पण अपलोड केलेले फोटो लेखनात कसे आणायचे ते वर्णन/टिप्स मी परवाच माझ्या 'फोटो पिडीएफ apps' धाग्यात दिले आहे. फार सोपं आहे. एवढंच नाही तर या फोटोची इमेज लिंक वापरून दुसऱ्या साईटवरही फोटो देता येतात!

धन्यवाद...
ॲपवरून फोटो तर जमला फायनली Happy

मग बघता काय,
या जेवायला.....

फोटो काढताना फोटो हा स्पष्ट असावा.
फोटो च्या किनारी कोणत्याच व्यक्ती,वस्तू, अर्थवट दिसता कामा नयेत .
त्यामुळे फोटोत आहेत पण समजत नाही काय
आहे ते
त्या वस्तू/व्यक्ती संशय व्यक्त करतात.
ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवावी

येऊ देत की लोकांना संशय..
मी तर वाट बघतोय कोण त्याला दारूचा ग्लास म्हणत माझ्यावर बेवडा असल्याचा आरोप करतोय Happy

Pages