यूट्यूबवर विडिओ अपलोड करण्यास मदत हवी आहे. कृपया करावी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 December, 2019 - 14:56

ऑफिसच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मागच्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मी टाळ्यांच्या कडकडाटात आणि शिट्य्य्यांच्या गोंगाटात डान्स परफॉर्मन्स दिला. दोन गाण्यांवर नाचलो. दोन्ही गाणी बॉलीवूडची होती. अपेक्षेप्रमाणे ऑफिसच्या लोकांनी नाच डोक्यावर उचलून धरला. हे कौतुक सर्वदूरच्या मित्रांमध्येही व्हावे या हेतूने त्या नाचाचा विडिओ यूट्यूबवर टाकायचे ठरवले आणि ईथेच अडकलो. ज्याबाबत मला तांत्रिक मदत हवी आहे. शंकानिरासन करायचे आहे.

यूट्यूबवर विडिओ अपलोड तर होतोय. पण मी सोडून तो कोणीही बघू शकत नाहीये. कोणी मी पाठवलेल्या यूट्यूब लिंकवर क्लिक करताच खालीलप्रमाणे मेसेज येतोय -

This video contains content from Zee music company who has blocked it on copyright grounds

माझ्या आकलनाप्रमाणे मी निवडलेल्या गाण्यांपैकी एखादे झी म्युजिक कंपनीचे असावे. माझ्या विडिओतील ऑडीओट्रॅकवर त्यांना ऑब्जेक्शन असावे. त्यांच्या जागी ते बरोबरही असावेत. पण माझा तर पोपट झाला ना. गेल्यावेळीही मी नाचाचा विडिओ युट्यूबवर अपलोड केलेला. तेव्हा प्रॉब्लेम नव्हता आला. असा प्रॉब्लेम होऊ शकतो ही कल्पनाही नव्हती. पण आता झालाय तर यातून मार्ग कसा काढावा? माझ्या नाचाचा विडिओ त्यातल्या ऑडिओ साऊंडट्रॅकसह यूट्यूबवर टाकायचा काही ऊपाय आहे का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिपीनजी, तसे असल्यास मागे नवरात्रीला ग्ल्लीत सलमानच्या आ ओ जाने जाना गाण्यावर फाटकी जीन्स घालून उघडा नाचलेलो.. तो विडिओ आधी जोडता येईल

फोटो काढताना फोटो हा स्पष्ट असावा.
फोटो च्या किनारी कोणत्याच व्यक्ती,वस्तू, अर्थवट दिसता कामा नयेत .
त्यामुळे फोटोत आहेत पण समजत नाही काय
आहे ते
त्या वस्तू/व्यक्ती संशय व्यक्त करतात.
ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवावी

Submitted by Rajesh188 on 29 December, 2019 - 11:05
>>>>>
त्याला सवय आहे. असे फुटकळ मुद्दे प्रतिसाद संख्या वाढवतात. अन तो एन्जाॅय करतो.
आठवा: GST फ्रिज धागा
ऋ साहेब मला अनुमोदन द्याल का? Wink

पाफा, जेव्हा प्रश्न विश्वासाचा असतो तेव्हा तो मुद्दा फुटकळ नसतो.
मी माबोवर दारूविरोधात बरेच लिहितो. जर माझ्या घरच्या फोटोतील तेलाची बरणी कोणाला दारूचा ग्लास वाटत असेल तर मला तो गैरसमज दूर करायलाच हवे..

_/\_

रुणम्या, तुझ्या घरातली तेलाची "बरणी" सुरमईच्या तुकडीपेक्षा छोटी आहे. साईज ग्लासाइतका आहे.
तेलाचा रंगही रम्य दिलकश आहे.
तुला आम्ही अजिब्बात दारूडा म्हणणार नाही आहोत.
फक्त तेलुडा म्हणू. चालेल का?

Jumpshare dot com siteवर विडिओ अपलोड होतो का पाहिले का?
तिथून मिडिया डाउनलोडचा पर्यायही आहे इतरांसाठी. ( रेजिस्ट्रेशन न करता)

Srd आधी लॉग ईन आय मीन लगीन यूट्यूबचे Happy
असे नवीन साईटवर चटकन विश्वास ठेऊन पर्सनल विडिओ अपलोड करायला भितीही वाटते आणि त्यात काही शानही नाही असा मध्यमवर्गीय विचार मनात येतो. त्यामुळे युट्यूब नाही कामी आले तर आपले फेसबूकच झिण्दाबाद !

तेलाचा ब्राण्ड आईलाच ठाव
लहानपणी घाण्यावरचे तेल आणायला किटली घेऊन जायचो. हल्ली ब्रांड वगैरे आलेत तेलाला त्याची कलपना नाय.
पतनजली तेल विकत असेल तर त्यांचे असू शकते. आमच्याकडे उद्योजकांमधील शाहरूख खान म्हणून ओळखले जाणारे बाबा रामदेव हिट आहेत.

राजेश, हो. यूट्यूबरवरच तर टाकायचा आहे.
आता उद्या एकची सुट्टी आणि मुहुर्त सत्कारणी लावतो. दोन डान्स विडिओ एकत्र करतो.

तेलाचा ब्राण्ड आईलाच ठाव
लहानपणी घाण्यावरचे तेल आणायला किटली घेऊन जायचो. हल्ली ब्रांड वगैरे आलेत तेलाला त्याची कलपना नाय.
पतनजली तेल विकत असेल तर त्यांचे असू शकते. आमच्याकडे उद्योजकांमधील शाहरूख खान म्हणून ओळखले जाणारे बाबा रामदेव हिट आहेत.

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 31 December, 2019 - 09:33
>>>
डोकावला शाखा एकदाचा. मी मिसत होतो. Wink

Srd कसला धोका? तसा विडिओ काही पर्सनल प्राईव्हेट नाही. ते युट्यूबवर टाकणारही नाही. नाचाच्या विडिओला काही मिसयुजची भिती नसावी...

पाफा, ऋन्मेष हे नाव वाचताच जर तुमच्या डोळ्यासमोर शाहरूख तरळत नसेल तर मी अजून कुठेतरी कमी पडतोय.. बाकी माझ्या उपमा उदाहरणात तो डोकावतोच. ओढून ताणून कधी आणत नाही.

_/\_

सोनी चानेल इंडिअन आइडॉलवरची एक जुगलबंदी - त्याचा विडिओ मी Jumpshare च्या माझ्या अकाउंटला अपलोड करून पाहिला. (५० एमबी, दहा मिनिटे) लिंक देता येते.

म्हणजे गाणं/धून ओळखायचा अल्गोरिदम किंवा लायब्री त्यांची पक्की दिसतेय. दुसऱ्या साईटस ट्राय करणे बाकी.

Pages