यूट्यूबवर विडिओ अपलोड करण्यास मदत हवी आहे. कृपया करावी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 December, 2019 - 14:56

ऑफिसच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मागच्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मी टाळ्यांच्या कडकडाटात आणि शिट्य्य्यांच्या गोंगाटात डान्स परफॉर्मन्स दिला. दोन गाण्यांवर नाचलो. दोन्ही गाणी बॉलीवूडची होती. अपेक्षेप्रमाणे ऑफिसच्या लोकांनी नाच डोक्यावर उचलून धरला. हे कौतुक सर्वदूरच्या मित्रांमध्येही व्हावे या हेतूने त्या नाचाचा विडिओ यूट्यूबवर टाकायचे ठरवले आणि ईथेच अडकलो. ज्याबाबत मला तांत्रिक मदत हवी आहे. शंकानिरासन करायचे आहे.

यूट्यूबवर विडिओ अपलोड तर होतोय. पण मी सोडून तो कोणीही बघू शकत नाहीये. कोणी मी पाठवलेल्या यूट्यूब लिंकवर क्लिक करताच खालीलप्रमाणे मेसेज येतोय -

This video contains content from Zee music company who has blocked it on copyright grounds

माझ्या आकलनाप्रमाणे मी निवडलेल्या गाण्यांपैकी एखादे झी म्युजिक कंपनीचे असावे. माझ्या विडिओतील ऑडीओट्रॅकवर त्यांना ऑब्जेक्शन असावे. त्यांच्या जागी ते बरोबरही असावेत. पण माझा तर पोपट झाला ना. गेल्यावेळीही मी नाचाचा विडिओ युट्यूबवर अपलोड केलेला. तेव्हा प्रॉब्लेम नव्हता आला. असा प्रॉब्लेम होऊ शकतो ही कल्पनाही नव्हती. पण आता झालाय तर यातून मार्ग कसा काढावा? माझ्या नाचाचा विडिओ त्यातल्या ऑडिओ साऊंडट्रॅकसह यूट्यूबवर टाकायचा काही ऊपाय आहे का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झी म्युजिक कंपनीची परवानगी घ्या. मग अपलोड करा.
नाहीतर तुमचा विडिओ साऊंडट्रॅक काढून अपडोल करा. त्याबरोबर खाली सूचना द्या कि अमुक-अमुक गाणे लावा आणि विडिओ बघा. Happy Light 1

साऊंडट्रॅक काढला वा बदलला की मजा जाईल सगळीच कारण त्यात टाळ्या आणि शिट्ट्याही रेकॉर्ड झाल्यात त्यामुळे भारी वाटतेय.

झी म्युजिक कपनीची खरेच परवानगी घेता येईल का?
फुकटात?
आणि दिली परवानगी तरी ते तांत्रिक प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार?

युट्युबवर विडिओ अपलोड करताना "डू नॉट अपलोड कॉपीराइटेड कंटेंट" या सूचनेकडे आपण दुर्लक्ष करत असतो.
आता तुमचा ओडिओ ट्र्याक लगेच ओळखला जात आहे गूगलकडून.

काही apps मध्ये विडिओ जोडता येतात. तर काही टाईमपास प्रेक्षकांचा विडिओ तुमच्या विडिओला सुरुवातीला जोडा.

आम्ही कोणत्याही समारंभाचे मोबाईल मधले काढलेले विडिओ ( हल्ली फारच छान येतात, स्लो मोशनही असतात) पाहून ज्याचा चांगला असेल तो तिथेच चारपाच जणांना वाइफाई ट्रान्सफर करून टाकतो. कारण ते पब्लिक इंटरेस्ट नसतात.
( एचडी १२० एमबी प्रती मिनिट, फुल एचडी १८० प्रती मिनिट हे फारच मोठे असतात आणि कम्प्रेस करून युट्युबवर टाकल्याने मजा जाते. )
ओफिसात आठ दहाना दिले की ते इतरांना देतात.

Pay for the song copyright fees to see music. Talk to them . Your red chilly people can help.

सस्मित, सोबत नाचणारया मैत्रीणीला वचन दिले आहे. ती यूट्यूब लिंकची वाट बघत आहे. थोडे कष्ट घेऊ शकतोच.

अमा, मी गरीबांचा रणबीर कपूर आहे हो. पैसे खर्च करून यूट्यूबवर विडिओ अपलोड करणे ईज टू मच फॉर मी

काही apps मध्ये विडिओ जोडता येतात. तर काही टाईमपास प्रेक्षकांचा विडिओ तुमच्या विडिओला सुरुवातीला जोडा.
>>>

विडिओ मर्जर ॲप आहे माझ्याकडे.
ही आयडीया काम करते का बघतो. ४-५ सेकंद एखादा दुसरा विडिओ जोडून बघतो.

बोकलत. व्हॉटसप स्टेटस ठेवेनच आज, काल फेसबूकवरही टाकून झालाय, पण गेल्यावेळी यूट्यूबवर टाकलेला तेव्हा एक भारी फिलिण्ग आलेली. शेअर करायलाही बरे पडते. कोणी लिंकवर क्लिक केले की बघते पटकन. त्यांनाही विडिओ डाऊनलोड करत मोबाईल मेमरी खायची गरज नाही.

मित्रा,
तुझा डांन्स युट्युब ऐवजी "टिकटॉक अ‍ॅपवर" अपलोड कर तिथे कसलेही कॉपीराईट बंधन नाही. याने होईल काय की तू, तुझ्या मित्रमंडळींबरोबरच, संपूर्ण देशभर फेमस होशील.

व्हाट्सएपवर?? तो नंबर देत नसणार!!

४-५ सेकंद नाही ४५ सेकंदाचा टाका. म्यझिक ओळखणारे एप तेवढा वेळ तपासत असेल.

त्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती देणारी स्वताच्या आवाजातील ऑडियो क्लिप सुरुवातीस जोडली की ही ४५ सेकंदवाली आइडिया पण चालेल आणि अक्खा वीडियो सुसंगत सुद्धा वाटेल.

व्हाट्सएपवर?? तो नंबर देत नसणार!! >
म्हणजे ऑफिसच्या वार्षिक संमेलनात नाचला, आणि ऑफिसच्या कोणाला नंबर देत नसणार?

क्लिप जोडायची आयड्या करून बघतो आणि कळवतो
गेल्यावेळचा नाचाचाही जोडता येईल. कम्बाईन विडिओ होईल.

@ मानवमामा, बहुधा त्यांना फेसबूक माबो वा तत्सम सोशलसाईटवर नंबर शेअर न करण्याबाबत म्हणायचे असेल जे योग्यच आहे. आधीही मी नंबर मिसयुजचा त्रास भोगला आहे. स्पेशली काही मुलींकडून. स्वतंत्र धग्याचा विषय होईल हा... काढला तर त्यातच लिहितो..

तू तुझ्या माहीतीतल्या फक्त दोन चार व्यक्तींनाच शेअर करायचा ज्यांचाकडे तुझा नंबर आहेच. पुढे ते व्हिडीओ जगभरात व्हायरल करतील, तुझा नंबर कुणाला कळणार नाही.

ऋन्मेष, बरोबर. नंबर देण्यात आपण किंवा इतर स्त्रीवर्ग घाबरतो. यासाठीच युट्यबचा आग्रह चालला आहे.

२) दुसरी एक एचटीटीपीएस साईट आहे मिडिया शेअरिंगची। ती मी वापरली आहे. jumpshare dot com. रेजिस्ट्रेशन करून, फोटो, विडिओ, ओडिओ, पिडीएफ अपलोड करून त्याची फक्त छोटीशी लिंक इतरांना द्यायची. सक्सेस आहे. पण किती मोठे (एमबी) विडिओ घेतात ते तपासले नाहीत.
करून पाहा. मोबाईलमधून अपलोड करताना ब्राउजरचे डेस्कटॉप पेज वापरावे लागेल. २ जीबी स्टोरेज फ्री वर्शनला आहे.
३) तिसरा एक सेफ प्रकार गूगल ड्राईवचा. एक महिन्याने विडिओ काढून टाकायचा कारण आपली १५ जीबी फ्री स्टोरेजमधली पाचशे एमबी वगैरे जागा कमी होते.
----------
सूचना एका खोट्या अकाऊंट (गूगलचे)मधून प्रयत्न करावा. कारण पुन: पुन: कॉपीराइटेड माल अपलोड करण्याचे मोजले गेले तर ते अकाउंट ब्लॉक होऊ शकते. आणि सध्याच या सर्वावर सुंदर पिचाई यांची नेमणूक झाली आहे. Sad

Srd धन्यवाद
छान उपयुक्त माहिती. वापर करतो.

यूट्यूब अपलोडचा आणखी एक फायदा म्हणजे यंदाच्या डान्सपूर्वी जेव्हा लोकांना माझ्या गेल्यावर्षीच्या डान्सची आठवण काढली तेव्हा या वर्षभरात जॉईन झालेल्यांना लगेच यूट्यूबवर तो विडिओ दाखवता आला...

तुमचा व्हिडीओ स्वानंदासाठी आहे, कमर्शियल युज साठी नाही, तसे खाली लिहून विनंती केलीत की काम भागू शकेल

इंग्रजी वाक्य आहे बघा ते लांब , this vedi is for ..... and not for ..... असे कायतरी

In its most general sense, a fair use is any copying of copyrighted material done for a limited and “transformative” purpose, such as to comment upon, criticize, or parody a copyrighted work. Such uses can be done without permission from the copyright owner.

अमा, मी गरीबांचा रणबीर कपूर आहे हो. पैसे खर्च करून यूट्यूबवर विडिओ अपलोड करणे ईज टू मच फॉर मी

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 21 December, 2019 - 10:52
>>
राजे, तो शाखा रागवेल ना? मधेच रणबीर कुठून आला?

गाणे रणबीरचे होते आणि माझी नाचाची स्टाईलही रणबीरसारखी आहे म्हणून रणबीर कपूर.. .. बाकी आयुष्यात शाहरूखच

नंतर व्हिडीओ काढून टाकण्यासाठी पुन्हा धागा नको प्लीज. सचिन पिळगावकर यांचे मार्गदर्शन घ्यावे.

Pages