लसणाचे आक्षे आणि टोमॅटो-लसूण सार. अर्थात गार्लिक फेस्टिवल @होम

Submitted by मनिम्याऊ on 15 December, 2019 - 12:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आक्षांसाठी
ताजी कोवळी लसणीची पात 1 जुडी
नवीन तांदूळ २ वाट्या
मेथीदाणे 1 लहान चमचा
जीरे 1 लहान चमचा
हिरवी मिरची- 1
मीठ चवीपुरते

टोमॅटो-लसूण सार
पाती काढून घेतल्यावर उरलेले ओले लसूण
टोमॅटो -2
कांदा - 1 लहान
कढीपता 2 डहाळ्या
हिरव्या मिरच्या - 2
मिरे - 4,5
मोहरी
हिंग
मेथीदाणे 3-4
चिंच (कोळून)
रसम पावडर (ओँपशनल)
मीठ चवीनुसार
साखर चिमूट्भर

क्रमवार पाककृती: 

१. लसणाचे आक्षे
लसूण पात बारीक चिरून घ्या
तांदूळ स्वच्छ धुवून त्यात चिरलेली पात आणि मेथीदाणे घालून 4-5 तास भिजत ठेवा.
आता भिजलेले मिश्रण, हिरवी मिर्ची, जीरे, आणि मीठ हे सगळे मिक्सरमधे वाटून एकजीव करा. साधारण डोशाच्या बँटरएवढे गाढे (पातळ) असावे.

तव्यावर थोड़े तेल घालून त्यावर बँटर गोल घाला. फार जाड किंवा फार पातळही नको. पातळ असेल तर तव्याला चिकटेल आणि चिवट होइल. जाड झाले तर नीट शिजणार नाही.
तव्यावर झाकण ठेवा. मध्यम आचेवर साधारण 2-3 मिनिटांनी परत आक्ष्यावर थोड़े तेल सोडा व आक्षे उलटवा आणि अर्धा मिनिट खरपूस होऊ द्या.

IMG_20191215_203704.JPG

२.
टोमॅटो-लसूण सार
पाती काढून घेतल्यावर उरलेल्या ओल्या लसणाचे तुकडे करून घ्या. कांदा उभा चिरून घ्या. आता चिरलेला कांदा लसूण्, टोमॅटो (+ आकारात चिरा देऊन), कढीपत्ता आणि
हिरव्या मिरच्या 3 कप पाण्यात चांगले उकळून घ्या. रोळून घ्या. पाणी फ़ेकून देऊ नका. थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
एका पातेल्यात तेल/तूप/बटर (आवडीप्रमाणे) गरम करून त्यात मोहरी, हिंग, मीरे व मेथीदाण्याची फोडणी करून घ्या. त्यात वाटलेले मिश्रण घाला. चिंचेचा कोळ आणि मीठ, साखर घालून खमंग परतून घ्या. आवडत/अव्हेलेबल असल्यास रसम पावडर घाला (मी MTR रसम मसाला वापरला)
जरा तेल सुटू लागलं की भाज्या उकळलेले पाणी घालून मंद आचेवर 10 मिनिटे उकळा.
गरम गरम प्यायला घ्या Happy

IMG_20191215_203921.JPG

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

पूर्व विदर्भात या सिझनला घरोघरी केला जाणारा पदार्थ आहे.
आक्षे बनवण्यासाठी तांदूळ नवीनच वापरावा.

तांदूळ जर कमी झाले तर आक्षे तव्याला चिकटतात. तेव्हा आक्षे जमले नाहीत तर थोडे तांदळाचे पीठ घाला.

टोमॅटो-लसूण सार हे पारम्परिक रसम नाही पण चव अफलातून लागते. नक्की करून पहा.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आमचा इंद्रायणी तांदुळच सगळ्यात भारी.>>> >>अप्पा, आधीसारखी चव आणि वास दोन्ही नाहीये आता.. आई गावाकडुन दरवर्षी 50किलोच बाचकं आणते पण लहाणपणी भाताला असणारी तुपकट चव आणि वास आता जाणवत नाही..

शेफ विष्णू मनोहरांनी मायबोलीवर लसणीचे आक्षे ही पाककृती दिली आहे. खूप मस्त होतात, ह्या मोसमात लसूण पातीचा स्वाद छानच लागतो.

मनिम्याऊ, दोन्ही पदार्थांचे फोटो मस्त दिसत आहेत. ते सार तर लगेच बाऊल उचलून प्यावं असं दिसतंय.

Pages