त्याग १०(अंतिम)

Submitted by Swamini Chougule on 8 December, 2019 - 08:47

ते दोघं रेल्वे स्टेशनवर गेले.तिकीट खिडकीत जाऊन अनिकेतने पहिल्यांदा पुण्याला जाणारी गाडी आहे का गेली याची चौकशी केली. त्याला समजले की पुण्याला जाणारी गाडी पाचच मिनिटात प्लॅट फॉर्म नंबर एक वर येणार आहे. अनिकेत प्लॅट फॉर्मवर धावतच सुटला .त्याची नजर अन्विकाला शोधत होती .त्याला एका बाकावर अन्विका बसलेली दिसली .तीच लक्ष अनिकेतकडे नव्हतं .अनिकेत तिच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला आणि तिच्या एक कानाखाली लावली .अन्विका जोरात बसलेल्या तडाख्याने एकदम भानावर आली तर समोर अनिकेत आणि मागे रुकसार धापा टाकत असलेली तिला दिसली .अनिकेत कडे न पाहता ती रुकसार कडे पाहत रागाने म्हणाली,

अन्विका , “ रुकसार तू का सांगीतलेस याला की मी इथे आहे ते ;तू मला वचन दिलतेस ना ?”

अनिकेत ,” तिला काय बोलतेस अन्विका ? मला विचार माज्याशी बोल !”

तो पर्यंत स्टेशनवरील लोक त्यांच्या भोवती गोळा झाले कारण अनिकेतने अन्विकाला मारलेले लोकांनी पाहीले होते.त्या घोळक्यातील एक अन्विकाला म्हणाल ,“हा माणूस तुम्हाला त्रास देतोय का ताई ? मी आत्ता रेल्वे पोलीसांना बोलावतो ”

अन्विका ,“ तस काही नाही भाऊ ;आमचं घरगुती भांडण आहे ”(अस बोलून ती अनिकेतचा हात धरून त्याला स्टेशग बाहेर घेऊन गेली व बोलू लागली.)

अन्विका ,“ तुला कळत कसं नाही अनिकेत ;तू निघून जा नागपूरला ”

अस म्हणून ती रडू लागली .रुकसार तिला शांत करत होती .

अनिकेत ,“ मी जाणार नाही; तुला काय वाटतंय ?तुला एड्स झाला असेल म्हणून मी तुला सोडून जाईन अजिबात नाही ”

तो तिच्याकडे एकटक पाहत बोलत होता.

अन्विका ,“ अनिकेत तुला माझी शपथ आहे तू जा कारण माझ्या कडून तुला बरबादी शिवाय काही मिळणार नाही ”

अनिकेत, “ तू तुझी ब्लड टेस्ट केली आहे का ?”

अन्विका ,“ नाही ”

अनिकेत ,“ मग तू कसं ठरवलंस की तुला एड्स आहे म्हणून ”

अन्विका ,“ तुला समजत कसं नाही अनिकेत ;बरं मी ब्लड टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली तर तू मला सोडून निघून जाशील आणि मला विसरून नवीन आयुष्य सुरू करशील !मला तस वचन दे .”

अनिकेत ,“ ठीक आहे.आपण ब्लड टेस्ट करून घेऊ तुझी आणि मग ठरवू .”

अन्विका ,“ ठीक आहे .”

अस म्हणून ते तिघं एका दवाखान्यात गेले.आता सकाळचे आठ वाजले होते .अजून डॉक्टर ही आले नव्हते. रात्रभर हा गोंधळ चालला होता. आजची सकाळ अनिकेत व अन्विकाच्या आयुष्यात एक तर आशा घेऊन येणार होती किंवा त्या दोघांना निराशेच्या गर्तेत ढकलणार होती.

डॉक्टर आले .अनिकेत व अन्विका त्यांच्या केबिन मध्ये गेले रुकसार बाहेरच थांबली होती .अन्विकाचे रक्त चेक करण्यास दिले गेले . रिपोर्ट दुपारी मिळणार होते . ते तिघे कुठेच न जाता , दवाखान्यातच बसून राहिले कारण त्यांच्या मनात विचारांची अनेक वादळे उठत होती .ते रिपोर्ट येई पर्यंत तसेच बसून होते .हे रिपोर्ट अनिकेत व अन्विकाच्या नात्याचे भविष्य ठरवणार होते .तीन वाजले रिपोर्ट आले व डॉक्टरांनी अनिकेत व अन्विकाला बोलवून घेतले . दोघे ही धडधडत्या छातीने आत गेले.

डॉक्टर ,“ तर तुमचे रिपोर्ट आत्ताच आलेत मिस अन्विका व चांगली गोष्ट ही आहे की ते निगेटिव्ह आहेत तुम्हाला एच .आय .व्ही वगैरे काही नाही. ”

हे ऐकून अनिकेतच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.अन्विकाला तर विश्वासच बसत नव्हता . तिने एक निश्वास सोडला ,सुटकेचा ;एका दुष्टचक्रातून सुटकेचा !

ते बाहेर आले रुकसारच्या गळ्यात पडून अन्विका रडू लागली. अनिकेतने रुकसारला रिपोर्ट निगेटिव्ह आले हे सांगीतले. रुकसारला ही हे ऐकून खूप आनंद झाला.

आज या घटनेला दोन वर्षे होऊन गेली होती. अनिकेत व अन्विकाचा संसार सुखात चालला होता.त्यांच्या संसार वेलीवर अनिका नावाच गोंडस फुल उमलले होते .हे सर्व पाहून अनिकेत व अन्विकाचे आई -बाबा भरून पावले होते .

अनिकेत आज तो काम करत असलेल्या कंपनीत उच्च पदावर पोहचला होता .अन्विका घर -संसार सांभाळून देह विक्रीच्या दलदलीत फसलेल्या मुलींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. थोडक्यात ती समाजसेवा करत होती. तिला आयुष्यातील मागील काही वर्षांनी खूप काही शिकवले होते .

अनिकेतने अन्विकाला आज पर्यंत कधीच तिने रेड लाईट एरिआ मध्ये काय-काय केले हा प्रश्न विचारला नव्हता.अनिकेतने अन्विकावर मनापासून प्रेम केले होते व ते निभावले ही होते .

त्याग ही अशी भावना आहे की जी माणसाला श्रेष्ठ बनवत असते पण अन्विका तिच्या एका भ्रमा पोटी अनिकेतचा त्याग करायला निघाली होती.

आपण आपल्या माणसांसाठी आयुष्यात खूप छोट्या मोठ्या गोष्टींचा त्याग करत असतो पण आपण जो त्याग करत असतो त्या त्यागाची खरच गरच असते का ?हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे .

मोहब्बत रूहों से क़ी जाती हैं जनाब

जिस्मों से तो बस खेला जाता हैं ।

समाप्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@Pravintherider
धन्यवाद मला खरंतर शोकांतिका लिहायची होती . मी
जेंव्हा एखादी कथा लिहिते तेंव्हा त्याचा शेवट ठरवलेला असतो पण या कथेच्या वेळी मला तो शेवट बदलावासा वाटला म्हणून हा शेवट गोड

कथा जर चांगली असेल तर मनात हुरहुर असते की शेवट काय होणार आणि शेवट जर शोकांतिका सारखा झाला तर एक दोन दिवस चुट्पुट लागते.... म्हणून कदाचित मला गोड शेवट वाचायला जास्त आवडतं.

@pravintherider
@मन्या s
धन्यवाद