त्याग भाग ८

Submitted by Swamini Chougule on 6 December, 2019 - 08:44

अन्विका त्याच्यावर रागवत होती पण मनोमन ती सुखावली होती ;की कदाचित अनिकेत आपली या नरकातून करेल.

( आता पुढे )

अनिकेत अन्विकाला भेटायला कोठ्यावर आला होता .त्याच्या जवळ आज कसली तरी पिशवी होती .तो अन्विकाला बोलायचं थांबवून तो बोलू लागला.

अनिकेत , “ शू sss ऐक ही घे पिशवी यात एक बुरखा आहे .उद्या तुमच्या कोठ्यावर रेड पडली की मी तुला येथून घेऊन

जाईन आणि रेडच्या धावपळीत आपल्याकडे कोणाचे लक्ष पण नाही जाणार आणि हो पोलीस

इथल्या सगळ्या मुलींना सोडवणार आहे .”

अन्विका , “ काय ? खरं बोलतोयस तू ”

अनिकेत , “ हो इथे रेड घालण्यासाठी कमिशनरची परवानगी हवी होती आणि चांगला प्लॅन करायला आठ दिवस लागले ,तू

उद्या तयार रहा ”

अन्विकाने मानेनेच त्याला होकार दिला .अम्माला वेगळं काही वाटू नये आणि संशय येऊ नये . म्हणून अनिकेत अन्विका बरोबर रूम मध्ये बराच वेळ बसून राहिला आणि त्या नंतर निघून गेला . अनिकेत निघून गेल्यावर अन्विका रूम उघडून पुन्हा बाहेर येऊन उभारली .ती मनातून खूपच खुष होती पण ती चेहर्‍यावर तो आनंद दाखवून शकत नव्हती .इतक्यात रुकसारच्या रूम मधून महेशचा मित्र बाहेर निघला . तो पायऱ्या उतरून निघून गेला . अन्विका तशीच रूमच्या दारात उभी होती .रुकसार तीचं आवरून अन्विकाच्या रूमकडे आली . रुकसारचा चेहरा उतरलेला दिसत होता. ती अन्विकाला घेऊन अन्विकाच्या रूम मध्ये शिरली . आज गिर्‍हाईकं जास्त नव्हते त्यामुळे रुकसार मोकळीच होती .अन्विका तिला काहीच बोलली नाही कारण ती महेश बद्दल विसरून गेली होती . ती आता वेगळ्याच विचारात होती .

रुकसारने अन्विकाचा हात हातात घेतला व ती बोलू लागली .

रुकसार ,” अन्विका तू मला महेश बद्दल त्याच्या मित्राला विचारायला सांगीतले होतेस ना ! मी आज त्याला विचारले महेश हे जग सोडून दोन आठवड्या पूर्वीच गेला . ”

अन्विका , “ काय ? काय बोलतेस तू रुकसार ! ”

अन्विकाला हे ऐकून धक्काच बसला कारण महेश अजून तरुण होता . रुकसार पुढे बोलू लागली .

रुकसार , “ अन्विका हे खरे आहे .महेश गेला म्हणूनच त्याचा मित्रही दोन आठवडे झाले आला नव्हता ,आज आला .पुढचं ऐकशील तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल ,मन घट्ट करून ऐक ” असे म्हणून रुकसारने तिचा हात आणखिन घट्ट पकडला .

अन्विका , ” पण महेश असा अचानक कशाने गेला ?”

रुकसार , ” अचानक नाही अन्विका महेशला एच .आय . व्ही . झाला होता .हे जेंव्हा त्याच्या बायकोला समजले तेंव्हा तिने

रक्ताची चाचणी करून घेतली .ती एच .आय .व्ही . निगेटिव्ह निघाली मग काय तिने महेशला सोडले आणि ती तिच्या माहेरी गेली .

ती तिच्या माहेरी निघून गेली .महेश एकटाच राहत होता पण स्वतः ची वासना शमवायल तो तुझ्याकडे येत होता .नालायक माणूस त्याने हा विचार नाही केला की तुला ही एच . आय .व्ही . होऊ शकतो .माणसं किती स्वार्थी असतात ना त्यांना स्वतःच्या सुखा पुढे काही दिसत नाही .मला वाटतंय तू तुझ्या रक्ताची चाचणी करून घ्यावी .”

हे ऐकून अन्विका सुन्न झाली तिच्या डोळ्यांतून अश्रु वाहू लागले .तिला महेशचे वागणे आठवत होते तो कायम स्वतः बरोबर वापरण्यासाठी प्रोटेक्शन घेऊन येत असे . तो तिज्याशी प्रोटेक्शन शिवाय संग करत नसे पण तिला आता वाटत होतं की तिला ही आता लागण झाली असणार बरं तिच्याकडे टेस्ट करायला वेळ ही नव्हता कारण रात्री अनिकेत पोलीस घेऊन येणार होता . व अम्मा खूपच सिरिअस असल्या शिवाय दवाखान्यात सोडत नसे .

तिला झालेला येथून बाहेर पडण्याचा आनंद कुठल्या कुठे विरुण गेला होता . तिचे भविष्य तिला अंधारात दिसत होते .रुकसार तिला धीर देण्याचा प्रयत्न करीत होती पण त्याचा काही परिणाम अन्विकावर झाला नाही .रुकसार निघून गेली .अन्विका रात्र भर रडत राहिली . रडता रडता केंव्हा झोप लागली तिचे तिला ही कळले नाही .

दारावर कोणी तरी थाप मारली आणि अन्विका जागी झाली .तिने घाईने दार उघडलं तर समोर रुकसार होती .

रुकसार ,” अन्विका अजून उठली नाहीस ! अंग घड्याळ बघ दहा वाजले .मी तुला नाष्टा करायला बोलवायला आले .चल

लवकर फ्रेश हो आणि खाली ये मी तुझी वाट पाहते .”

अन्विकाने मानेनेच होकार दिला .रुकसार निघून गेली आणि अन्विकाने दार लावून घेतले .ती फ्रेश झाली .तिला माहिती होत की आज कोठ्यावर आजची रात्र ही तिची आणि तिथल्या सर्व मुलींची शेवटची रात्र होती . अन्विकाला आता कोणतीच इच्छा उरली नव्हती ; ना जगण्याची ना काही करण्याची पण एक मात्र निश्चित होत . तिला या नरकातून बाहेर पडायचे होत पण ती आता अनिकेतचे आयुष्य बरबाद करू इच्छित नव्हती म्हणून तिने काही तरी मनात ठरवले होते .कोणाला संशय येऊ नये म्हणून ती रोजच्या सारखंच वागत होती .पण तिने रुकसारला विश्वासात घेऊन सगळे सांगीतले होते . कारण तिने जे ठरवले होते ती ते रुकसारच्याच मदतीने साध्य करू शकणार होती . रुकसारला ही त्या नरकातून बाहेर पडायचेच होते म्हणून तिने अन्विकाला साथ द्यायचे ठरवले होते .

( अनिकेत ठरल्या प्रमाणे अन्विका व इतर मुलींना त्या नरकातून बाहेर काढण्यात यशस्वी होऊ शकेल का ? अन्विकाने नेमके काय ठरवले होते )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लेख लिहित आहात तुम्ही या लेखात एक नवीन ट्विस्ट आणला आहे तुम्ही अंविक आला म्हणजेच आताच्या अनविला एच आय व्ही असण्याची शक्यता आहे आता वाचण्यास मजा येईल की पुढे काय होईल काही प्रश्न आहेत ती पुढे मांडतो.
काय पोलिसांची रेड यशस्वी ठरेल का? की कोठे वाले आपला वशीला चालवून पोलिसांची रेड यशस्वी करतील? आणविक आला एच आय व्ही असण्याची कितपत शक्यता आहे? जरं विकाल चावी असल्याचे कळले तर काय होईल?

@Pravintherider
@सामो
@धमाल धवल
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद , धमाल धवल तुमच्या प्रश्नांची उत्तरे लवकरच तुम्हाला कथेतून मिळतील