रंगीत पेन्सिल्स - पर्पल/ब्ल्यू आयरीस

Submitted by वर्षा on 30 November, 2019 - 15:07

पर्पल्/ब्ल्यू आयरीस
माध्यमः कलर्ड पेन्सिल्स
फॅबर कॅसल पेन्सिल्स. नवनीतचे युवा स्केचबुक. मस्त आहे.

या पेन्सिल्स आर्टीस्ट ग्रेडच्या नव्हत्या, म्हणून त्यावर शेडची नावे नव्हती. मी ४ हिरव्या, ४ निळ्या-जांभळ्या, २ ब्राऊन, २ पिवळ्या, ग्रे व काळी पेन्सिल्स वापरल्या.
हे करताना बायोच्या डायग्राम्सची फार आठवण झाली Proud माझा आवडता विषय तो.
सो, तुम्हीही बायोलॉजीच्या आकृत्या चांगल्या काढत असाल/होतात, तर हे जमण्यासारखे आहे. करुन पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच झाले आहे अगदी.
मला वाटले की वॉटर कलरमधे पान बुडवून त्याचा छाप उमटवला आहे की काय कागदावर पण हे तर कलर पेन्सिल वर्क आहे.
ब्राऊन, ग्रिन कलरने बॅकग्राऊंडवर थोडे काम केले तर चित्राला छान डेप्थ येईल असे मला वाटते.

शपथ ___/\___
पाकळ्यांचा अलवारपणा, पारदर्शकता कसली जमवली आहेस, फारच सुरेख

अरे वा! खूपच छान! हो बर्‍याचदा स्टुडंट क्वालिटी रंगही छान काम करतात. पाकळ्यांवरच्या शीरा खूप सुंदर काढल्याहेत तुम्ही! Happy

छान

khup sunder. vatat nhi pencil ne kadhal asel.

ऋतुराज, बुन्नू, सामो, मोद, मामी, अ‍ॅमी, हरिहर, अवल, मिकी, अमित, मयुरी, जाई, मनीमोहोर, मानव पृथ्वीकर, माधव, भाऊ नमसकर, प्राजक्ता धन्यवाद!
@हरिहर, हो नोटेड. Happy
@मिकी, हो अगदी स्टुडंट ग्रेड पुरेशा असतात बर्‍याचदा.

Pages