त्याग भाग ४

Submitted by Swamini Chougule on 23 November, 2019 - 04:45

बाबा , " हे बघ अनु बेटा तो मुलगा तुझ्या लायकीचा नाही तू त्याला विसर आणि आज पासून तू त्याला भेटायचं देखील नाही "

अन्विका काही ही उत्तर न देता ऑफिसला निघून गेली .

ऑफिस मध्ये गेल्यावर बॉस ने अन्विकाला बोलवून घेतले व अचानक तिच्या हातात ट्रॅव्हलच एक तिकीट दिल व सांगितले कि तिला दोन वाजता नाशिक ला जायचे आहे तेथे एक सेमिनार आहे

तो अटेंड करण्यासाठी कंपनी ची रिप्रेसिनटेटिव्ह बनून जायचे आहे . खर तर ते स्वतः जाणार होते .पण त्यांच्या आईची तब्बेत अचानक बिघडली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचे होते म्हणून त्यांनी अन्विकाला पाठवायचे ठरवले होते .बहुदा तिला रिक्वेस्ट केली होती.

अन्विकाचा ना इलाज झाला. ती जायला तयार झाली नाशिकला . ती आता नाशिकला जाण्यासाठी तयारी करण्यासाठी घरी निघाली . तिने जाता जाता अनिकेतला

मेसेज टाकला कि आज भेटायला जमणार नाही आपण परवा भेटू मला अचानक कामा निमित्ताने नाशिकला जावं लागतय.

ती घरी गेली .तिने ब्याग पॅक केली.आईला सांगितले ती कामा निमित्ताने नाशिकला जातेय

आई , " अचानक अस नाशिकला जायला कसं सांगितलं तुला तू नाही का नाही म्हणालीस बॉसला तुझ्या?

अन्विका , " अग आई बॉस चा प्रॉब्लेम झालाय आणि चोवीस तासांचा तर प्रश्न आहे . तू बाबांना आल्यावर त्यांना ही सांग "

अन्विका बस स्टँड वर गेली आणि बस मध्ये जावून बसली. अन्विका निघाली होती नाशिकला पण नियतीने तिच्यासाठी भलतच ठिकाण योजल होत.

चार दिवस झाले तरी अन्विकाचा पत्ता नव्हता . ती नाशिक वरून परत आलीच नव्हती . अन्विकाचे
आई -बाबा काळजीत होते . तिच्या शोधात होते . तिच्या ऑफिस मध्ये गेल्यावर तिच्या बाबांना कळले की अन्विका सेमिनार मध्ये पोहचलीच नाही ,बरं तिचा फोन ही बंद होता. तिच्या बाबांनी व भावाने पोलीसात तक्रार केली .

जेंव्हा बाबांना कळले की ती सेमिनार मध्ये गेली नाही तेंव्हा ते मटकन खाली बसले . त्यांना वाटले की आपल्या लेकीने आपल्याला फसवले कदाचित ती त्या मुला बरोबर पळून गेली . या गोष्टीची खात्री करण्यासाठी त्यांनी अन्विकाची रूम तपासून पाहिले . त्यांना तेथे अनिकेतच्या घरचा पत्ता मिळाला . ते तडक पोलीस घेऊन अनिकेतच्या घरी गेले.

इकडे अनिकेत ही बेचैन होता . अनिकेतने तिचा मेसेज वाचून चार दिवस झाले होते.
अन्विकाचा फोन पण बंद होता. अनिकेत तिच्या ऑफिस मध्ये ही जाऊन आला होता पण जितकी माहिती तिच्या कुटुंबाला ऑफिस मधून मिळाली तितकीच अनिकेतला मिळाली होती . अनिकेतला हा प्रश्न पडला होता की ती नाशिकला नाही गेली तर कोठे गेली. या विचारात तो दोन रात्री नीट झोपला ही नव्हता . त्याने ऑफिस मधून सुट्टी घेतली होती . अनिकेत त्याच्या परीने अन्विकाला शोधण्याचा प्रयत्न करत होता . तो या सगळ्या विचारात असतानाच त्याच्या दारावरील बेल वाजली . अनिकेतने दार उघडले तर समोर पोलीस आणि अन्विकाचे बाबा व भाऊ उभे होते.

पोलीस , “ Mr . अनिकेत भोसले आपणच का ?”

अनिकेत ," हो मीच "

बाबा , “ माझी मुलगी अन्विका कुठे आहे ? ती तुझ्याकडेच आली आहे ना ? कुठे आहे ती बोलावं तिला"

अनिकेत , “ हे पहा अंकल अन्विका माझ्याकडे नाही आली . मी ही चार दिवसा पासून तिचाच शोध घेतोय "

बाबा , “ इंस्पेक्टर साहेब हा खोटे बोलतोय अटक करा याला; झडती घ्या याच्या घराची आणि तुमचा पोलीसी खाक्या दाखवा याला मग पटापट बोलेल हा , माझी मुलगी कुठे आहे ?"( अन्विकाचे बाबा त्वेषाने बोलत होते)

पोलीस , “ Mr मोहिते थांबा जरा ; घ्या रे याच्या घराची झडती .”

हवालदार , “ साहेब घरात कोणी नाही "

बाबा , “ बोल माझी मुलगी कुठ आहे ?”

अनिकेत , “ खरंच मला माहिती नाही .मला ही तिची काळजी वाटतेय अंकल”

पोलीस , “ Mr भोसले जो पर्यंत अन्विका मोहिते सापडत नाही तो पर्यंत तुम्ही हे शहर सोडू शकणार नाही .

बाबा , “ साहेब यानेच लपवलंय मा‍झ्या मुलीला “

पोलीस ," सध्या आपल्या कडे याच्या विरुद्ध काही पुरावा नाही. त्यामुळे आपण याला अटक करू शकत नाही "

बाबा ,"पण "

अद्वैत ( अन्विकाचा भाऊ) ,"बाबा चला , याला नाही माहिती अन्विका दि कोठे आहे ते "

अन्विकाचे बाबा , भाऊ व पोलीस अनिकेतच्या घरातून निघून गेले .पण अनिकेतला अन्विकाची खूप काळजी वाटत होती .

आता अन्विकाला गायब होऊन सहा महिने होत आले होते .पण पोलीसांना अन्विकाचा पत्ता लागत नव्हता . अन्विकाचे बाबा , भाऊ सारखे पोलीस ठाण्याच्या चकरा मारत होते . जस-जसे एक -एक दिवस जात होते तशी अन्विका विषयीची काळजी वाढत होती . अन्विकाची आई तिच्या काळजीने आजारी पडली होती .

अन्विका कुठे , कशी आणि का ? गायब झाली होती हे तर कोडेच होते
( कृपया काही शुद्ध लेखनाच्या चूक असतील तर सांगाचं पण कथा कशी वाटत आहे ते ही सांगा)

लिंक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चालु आहे कथा... हा पण भाग छान झाला आहे.
सवयीने शुद्धलेखन सुधरेलच पण तुम्ही प्रयत्न करत आहात हे ही नसे थोडके.
शुभेच्छा आणि पुढील भागाच्या प्रतिक्षेत

शुद्धलेखन सुधारणे ही काही फार मोठी बाब नाही आहे.
उकार, वेलांटी यांचा वापर करताना उडणाऱ्या गोंधळाबद्दल समजून घेता येईल पण वाक्य पूर्ण लिहून झाल्यानंतर तुम्हाला पूर्णविराम देता येत नसेल तर...
अवघड आहे!
कथा बरी चाललीय.

@हाडळीचा आशिक
धन्यवाद मी लक्षात ठेवेण पूर्ण विराम द्यायचा; कुठे कुठे राहिला आहे .