फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्यायालयाने मुदत दिली का ते पुढे. एवढी कमी मुदत का मागितली केंद्र स्रकारने?

नवीन Submitted by भरत. on 25 November, 2019 - 19:49 >>>

ते तुम्ही केन्द्र सरकारलाच का विचारत नाही?

FB_IMG_1574693766029.jpg

भल्या पहाटे ४-५ तासांत राष्ट्रपती राजवट गुंडाळुन, शपथविधी उरकणार्‍यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायला राज्यपालांनी ३० नोव्हेंबर पर्यंतची मुदत का दिली? आणि भाजपाचे चाणक्य त्याला कबुल हि झाले. ताबडतोब (लोहा गरम है, हतोडा मार दो टाइप) फ्लोअर टेस्ट घेउन बहुमताचा प्रश्नच निकालात काढता आला असता, बावळट कुठले. त्यांचे वकिल हि तसलेच, सुप्रिम कोर्टात देखिल फ्लोअर टेस्ट्करता वेळ मागुन घेत होते. हा चांगुलपणा आहे कि निरागसतेची परिसीमा?..

फ्लोअरटेस्ट पुढच्या अर्ध्या तासात झाली तरी ती भाजपच जिंकणार अशी तजवीज ऑलरेडी झालेली आहे... ती आज-काल मध्ये नाही तर दोन आठवड्यांपासून झालेली आहे.
हा भन्साळी/गोवारीकरचाचाबाजीराव - मस्तानी किंवा पानिपत सिनेमा आहे (सिनेमा कर्मधर्म संयोगाने छत्रपती शिवाजी महारांजाचे पाईक म्हणवणार्‍या महाराष्ट्रातल्या मराठ्यां बद्दलचाच आहे) ... शेवट काय होणार असतो ते आपल्याला माहिती असते पण आपण फक्त शेवटाआधी भन्साळी मनोरंजन मूल्य वाढवण्यासाठी ईतिहासाची ऐशी तैशी करीत काय काय सिनेमॅटिक लिबर्टी घेतो ते बघायला जातो की नाही तसेच आहे हे. Lol

मला राहून राहून ताराबाई(ऊद्धव ठाकरे, शिवसेना) नानासाहेब पेशवे (मोदी) ह्यांच्यातला मामला आठवतो आहे. ताराबाईंनी एक बाळ राजाराम-दुसरा (सत्तेची खुर्ची) ह्यांस 'हाच खरा मी आजवर लपवून ठेवलेला छ्त्रपतींचा वंशज आणि माझा नातू' म्हणून निपुत्रिक छत्रपती शाहू महराजांना (महाराष्ट्रची जनता) दत्तक दिले. ह्या काळात शाहुंची मर्जी लाभलेले पेशवेच (भाजप) बलशाली झाल्याने तेच जणू गादीचे खरे मालक आणि वारसदार म्हणून राज्याचा गाडा हाकू लागले होते. जे ताराबाईला आजिबात आवडले नाही, पेशवे ताराबाईंच्या डोळ्यात खुपू लागले. पेशवेंचा अधिकार रद्द किंवा कमी करावा म्हणून त्यांनी शाहुंकडे लकडा लावला पण शाहुंनी दुर्लक्ष केले.
मग शाहू महाराज निवर्तल्यानंतर राजाराम-दुसरा छत्रपती झाले. ही संधी घ्यायचे ताराबाईंनी ठरवले, त्यांने आपणच दत्तक दिलेल्या आणि आता छत्रपती झालेल्या आपल्या नातवाला 'पेशव्यांचे अधिकार काढून घ्या त्यांना माझ्यासमोर मान झुकवायला लावा' म्हणून छत्रपतींना सांगितले. ह्यास राजाराम छत्रपतींनी साफ नकार दिला. मग ताराबाईंनी हा शिवाजी राजांचा वंश नाहीच हा तोतया आहे मी मुद्दाम एका गोंधळी बाईकडून त्याला घेऊन, दत्तक देऊन गादीवर बसवले असे सांगत राजाराम महाराजांविरूद्ध बंडाळी केली आणि महाराजांना कैदेत टाकले.
ह्यावेळी नानासाहेब पेशवे दूर ऊत्तर हिंदुस्थानात लढाईत गुंतलेले होते. ही संधी साधून ताराबाईंनी सचिव, पंत प्रतिनिधींना फितवून सगळ्यांना पेशव्यांविरूद्ध बंड करायला सांगितले. सगळ्यांना हे हवेच होते पण पेशव्यांची ताकद ओळखून त्यांनी नकार दिला.
मात्र जानोजी भोसले (काँग्रेस) ज्यांचा पेशवाईला पिढीगत विरोध होता त्यांनी ताराबाईंना हवी ती मदत पुरवण्याची तयारी दाखवली.

मग शिवसेनेसारख्याच पेटलेल्या ताराबाई जानिजी भोसल्यांपेक्षा मोठे वतन आणि फौज बाळगून असलेल्या ऊमाबाई दाभाडेंकडे (शरद पवार, राष्ट्रवादी) गेल्या आणि पेशव्यांनी जेरीस आणल्याने त्यांच्यावर सतत खार खाऊन असलेल्या ऊमाबाईंनी तात्काळ ताराबाईंना मदत म्हणून दमाजी गायकवाडांच्या (अजित पवार, राष्ट्रवादी) नेतृत्वाखाली मोठी फौज पाठवली. पेशव्यांंना हे कळाल्यावरचे त्यांचे जे सरदार पुण्यात होते त्रिबकराव पुरंदरे (देवेंद्र फडणवीस) ते ताबडतोब दमाजी गायकवाडांशी दोन हात करायला निघाले. पण गायकवाड हुशार निघाले त्यांनी त्या फौजेला धोबीपछाड घालत थेट पुण्याच्या दिशेने रोख वळवला. ह्यामुळे एवढी भिती पसरली की पेशवाईण काशीबाई आणि राधाबाईंना शनिवारवाड्यातल्या ताटावरून ऊठून सिंहगडावर आसरा घ्यावा लागला.

ही बातमी कळाल्यावर नानासाहेब पेशवे एवढे चिडले की ते ४०० मैल १४ दिवसात कापून मोठी फौज घेऊन दमाजी गायकवाडांच्या मागावर आले. शेवटी त्यांनी दमाजी गायकवाडांना कैद करून जान बक्षण्याच्या बदल्यात त्यांच्याकडे असलेल्या फौजा आणि गायकवाडांच्या गुजरातेतल्या वतनातून येणारा मोठा मोबदला मागितला. गायकवाड म्हणाले 'मी साधा सरदार आहे' तुम्ही ऊमाबाईंना (शरद पवारांना मागा). पण पेशव्यांनी गायकवाडांकडून त्यांना ऊमाबाईंनी दिलेले गुजरातेतली जहागिरी, वतन वगैरे हवे ते ताकदीच्या जोरावर मिळवलेच.

मग पेशव्यांनी ताराबाईंच्या सगळ्या फौजेला जबरदस्त मारले आणि ताराबाईंना समर्पण करण्यास भाग पाडले. ... ताराबाईकडून 'तुम्हीच खरे पेशवे आणि छत्रपतींचे पंतप्रधान' आणि ' मी पुन्हा असला ऊद्दामपणा करणार नाही' असे वदवून घेऊन त्यांना जिवंत सोडून दिले.
ताराबाईंनी शेवटचे ईमोशनल ब्लॅकमेल म्हणून "तुम्ही ज्यांना छत्रपती समजता आहात, त्यांची चाकरी करता आहात ते मुळात शिवाजी राजांचे वंशज नाहीच' हे पुन्हा ठणकाऊन सांगितले. पेशव्यांनी त्याकडे लक्ष न देता, राजाराम महाराजांना पुन्हा गादीवर बसवले.... छत्रपती आणि गादीची चाकरी चालूच ठेवली.

पण ह्या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट पेशव्यांनी केली.... ताराबाईला हे कारस्थान करण्यास भरीला घालणार्‍या बाबुराव जाधव (संजय राऊत) ह्यांची सगळी मालमत्ता जप्त करून त्यांची वाताहत होईल ह्याची तजवीज ताराबाईंकडून करून घेतली.

हुश्श!! Proud

बरं हयाट हॉटेल बोगस शपथविधी समारंभात पक्षनेते सोडून सगळ्यांनी शपथ घेतलेली दिसते! Happy

मुकुल रोहटगी म्हणतात, इतक्याच काळात विश्वासदर्शक मतं घेतलं पाहिजे असा काही नियम घटनेत नाही.

तेच म्हणालेत अजित पवारांनी पाठिंब्याचे स्वत.चं पत्र दिलंय, त्यासोबत समर्थांची यादी आहे.
म्हणजे सह्या पत्रावर नाहीत,.

https://www.loksatta.com/mumbai-news/this-is-not-goa-this-is-maharashtra...

शरद पवार काय म्हणाले?
‘महाराष्ट्राच्या हिताचा संकल्प आपण सर्वांनी केला. केंद्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांनी काही राज्यात बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली. कर्नाटक, गोवा आणि मणिपुरातही तेच केलं. संसदीय बाबी ज्या आपण करतो त्या सर्वांना हरताळ फासला जात आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे होत आहे. चुकीच्या पद्धतीने सत्ता स्थापन केली, त्या ठिकाणी काही कोर्टाच्या केसेस चालू आहेत. तर काहींचे निकाल लागले आहेत. सुप्रीम कोर्टाचा ज्या दिवशी आदेश येईल त्या दिवशी आपली बहुमत सिद्ध करण्याची तयारी असेल. आम्ही एक महिन्यापूर्वीच गटनेते पदाची निवड केली, पण अजित पवार तिकडे गेले. त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना व्हिपचा अधिकार आहे, याची भीती नवीन सदस्यांना दाखवली जात आहे. आदेश देण्याचा अधिकार निलंबित केलेल्या नेत्याला नसतो. ज्याला सदस्यत्व जाण्याची भीती आहे, त्यांची मी स्वतः जबाबदारी घेतो. कुणीही संभ्रमात पडू नये. हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. इथे काहीही खपवून घेतलं जात नाही. आपण योग्यला योग्य म्हणतो, जे योग्य नसताना लादण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला धडा शिकवण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे. आता आपल्यासोबत शिवसेना आहे, त्यामुळे धडा शिकवण्याबाबत जास्त बोलण्याची गरज नाही,’ असं शरद पवार म्हणाले

भाजपाप्रणीत नोटबंदीच्या रांगेत उभे रहायच्या स्कीम मधे घाउकरीत्या 'देशभक्त' असे बिरूद प्राप्त करणारे, येथे भाजपाच्या कृत्यांचे समर्थन प्राणपणाने करुन परमवीर चक्र मिळवणार बहूतेक... Rofl

आज हयात हाॅटेलवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात आमदारांनी शपथ घेतली मात्र मुख्यमंत्री म्हणून उठाने शपथ काय घेतली नाही. बहुतेक उठाचा अजून पवारांवर विश्वास नाही.

शपथा निवडून आलेल्या आमदारांनी घेतल्या.

https://www.bbc.com/marathi/india-50549485
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'त्या' ४ आमदारांची हरियाणातून कशी झाली सुटका

हे आता अविश्वसनीयतेच्या पलीकडे पोचलंय.

एक आऊट ऑफ बॉक्स शक्यता:
काँग्रेस आमदार फुटतील. कोणत्याही बड्या नेत्याशिवाय ते निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपा बरोबर गेले तरी आपला मतदारसंघ टिकण्याची त्यांची खात्री असेल. काँग्रेसला बांधून ठेवणारा मोठा नेता महाराष्ट्रात नाही. फुटण्याची शक्यता त्यांचीच वाट्ते मला तरी

युति तोडुन हिन्दुत्ववादी मतांचे विभाजन करुन आघाडी ला जिन्कवुन देण्याचे स्वप्न बघाणारे आता भाजपच्या वळचणीला गेलेत ! आणि समर्थक त्या गोष्टीला काकांचे डावपेच म्हणत आहेत !

@ पुरोगामी, आता अजित पवारांच्या समर्थनाने सरकार तरले , तर २०२४ च्या निवड्णुकांत कोणता पक्ष बहुमत मिळवेल ?

While NCP was creating an alliance with Cong and SS, NCP formed Government with BJP. But NCP claims that they were not aware and NCP cheated NCP; however NCP is not angry against NCP and will take any action against NCP, but wants NCP to come back. So they are challenging Supreme court to disallow NCP to form Government and allow NCP to form Government.

If you have understood, stop discussing politics. If not, politics was never your game!

< आता अजित पवारांच्या समर्थनाने सरकार तरले , तर २०२४ च्या निवड्णुकांत कोणता पक्ष बहुमत मिळवेल ?>

महाभरतीमुळे भाजपच्या जागा घटल्या या निष्कर्षाचं काय झालं मंडळी? अर्थात फडणवीस त्यांच्या त्रिवार वक्तव्यावरून पलटले तर तुम्हाला पलटायला काय जातंय?

माझं मत - भाजप विरोधी पक्षात बसला असता तर त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता अधिक होती. शिवाय तीन पक्षांचं सरकार पाच वर्षं पूर्ण करण्याची शक्यता कमीच होती. त्यातही भाजपचाच हात असता.

एकच डाव प्रत्येक ठिकाणी खेळायला लागलात तर विरोधी खेळाडू प्रत्येक वेळी गारद होईल का? तोही शिकेलच काही ना काही.

फडणवीसांना सत्ता सोडण्यात काहीतरी भयंकर नुकसान, भीती आहे, असंही दिसतंय. पराकोटीचं डेस्परेशन आहे.

इथे 44 आणि 54 जागा जिंकलेल्याना सत्ता हवीय आणि 105 ( खरं म्हणजे 161 जागा,मला तरी वाटतं सगळ्यांना भाजपालाच मत द्यायची होती जिथे भाजपा उभेच नव्हते तिथे युतीला मतं देण्याशिवाय पर्याय नव्हता) जागा जिंकलेल्यानी मात्र सत्ता सोडा सल्ला! Happy

रा कॉ शी युती करण्यापेक्षा सत्तेशिवाय राहू असं फडणवीसांचं त्रिवार वचन आहे हो.
--
सगळ्यांना भाजपलाच मतं द्यायची हो ती त्यामुळे स्वतः त्रिवार फडणवीसांचं मताधिक्य कमी झालं.
--
शिवसेना फुटली याला कारण भाजपचा माज आहे. हे लोक दोन वर्षं खिश्यात राजीनामे घेऊन फिरत होते. त्यांना भीक घातली नाही. राज्यकारभारात त्यांना कायम डावललं. थोडक्या त काय तर भारतीय पुरुष बायकोला वागवतात तसंच वागवलं.
गेल्या टर्ममध्ये शिवसेनाच फोडायची यांची तयारी होती.
--
भाजपचा आणि विशेषतः फडणवीसांचा हा माज उतरवणं या क्षणी भारतीय लोकशाही टिकण्यासाठी अगदी जीवनमरणाचा प्रश्न आहे. कोणत्याही पक्षाचे आमदार फुटून ते सरकार टिकणं अत्यंत वाईट आहे.
---
भाजपला बहुमत सिद्ध करता आलं नाही ,तर महाराष्ट्राला घरबसल्या ३७० पश्चात काश्मीर अनुभवता येईल अशी चिन्ह मात्र दिसताहेत.

फडणवीसांना माज आहे असं काही मला वाटतं नाही, स्वतः काम करुन वर आल्याचा, कित्येक वर्षे ज्या राज्यात कोणी पूर्ण कार्यकाळ स्थिर सरकार देऊ शकले नाही तिथे नीट राज्य चालवण्याचा सार्थ स्वाभिमान आहे. अर्थात सतत इतरांची चापलूसी करत पुढे जाणाऱ्या आणि जी जी मिंधेपणा करणाऱ्या पक्षनेत्यांना 'स्व' वगैरे गोष्टी कशाशी खातात माहीत नसणे आणि त्यामुळे आत्मविश्वासाची गल्लत माजाशी होऊ शकते. मी समजू शकते.

पण अजून किती दिवस चालणार हे नाटक?

काही असो. बाजीराव-मस्तानीच्या जोडीला सामानसुमानासकट घराबाहेर झालेलं मला बघायचं आहे. लई नाचगाणं केलं ५ वर्ष, बास आता.

जेव्हा अजित पवारांना गटनेते केल होत तेव्हा फक्त मिडीया मध्ये पब्लीश झाल होत ते विधिमंडळाच्या रेकॉर्ड वर घेण्यात आल नव्हत ....काल जेव्हा जयंत पाटील यांची गटनेते म्हणून निवड झाली ती अधिकृतरित्या राज्यपाल सचिव व विधिमंडळाच्या रेकॉर्ड वर घेण्यात आल आहे त्यामुळे अधिकृतरित्या गटनेते जयंत पाटीलच आहेत. अजित दादांना आता कोणताही व्हीप काढता येणार नाही ....आता बसा वाजवत बीप

व्हॉटसपवरून

*मा.शरद पवार साहेबांची नवीन खेळी*

*कोर्टाने आणि राज्यपालांनी अजित पवार यांनाच गटनेता म्हणून अधिकार ठेवले आणि अजित पवार यांनी व्हिप जारी केला तर अशी असेल शरद पवार साहेबांची नवीन खेळी*
शरद पवार बरोबर असलेल्या सर्व आमदारांनी NCP सोडायची व स्वतंत्र गट स्थापून महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा. 36 पेक्षा जास्त आमदार बाहेर पडल्यामुळे ते disqualify होणार नाहीत. ते पार्टी मेंबर नसल्यामुळे अजित पवारांचा व्हिप त्यांच्यावर बंधनकारक राहणार नाही. नंतर भाजपचे सरकार पडल्यावर पुन्हा NCP मध्ये घर वापसी करायची.... How's that ?

नागरिक शास्त्र भाजपचे तथाकथित चाणक्याने फक्त वाचलंय... पवार साहेब ते उकळून पिलेत.

*म्हणून पवार साहेबांना मुरब्बी राजकारणी म्हणतात*

*अब खेल में मजा आयगा*

व्हॉटसपवरून याच्याच पुढचे

राष्ट्रवादीने विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचं पत्र काल (सोमवार 25 नोव्हेंबर) दिलं.
त्यानुसार जयंत पाटीलच राष्ट्रवादीचे गटनेते असतील.
त्यामुळे जयंत पाटील किंवा त्यांनी प्रतोद म्हणून निवड केली असेल त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत असेल.
- राजेंद्र भागवत, विधिमंडळ सचिव

Pages