तुमची मुलं व्हिडिओ गेम्स खेळतात का?

Submitted by वावे on 20 November, 2019 - 04:31

अजून तरी माझ्या मुलांना व्हिडिओ गेम्सची सवय नाही. आमच्या दोघांच्याही मोबाईलवर गेम्स नाहीत. आजी आजोबांच्या मोबाईलवर थोडेफार गेम्स आहेत. आजीआजोबा भेटले की त्यांना लाडीगोडी लावून अर्धाएक तास गेम खेळतात. पण हे सगळं सुट्टीला आम्ही तिकडे गेलो किंवा ते इकडे आले तरच. म्हणजे खूपच लिमिटेड काळासाठी. इतके दिवस असं सुरळीत चालू होतं.
आता असं झालंय की खाली खेळायला गेल्यावर मोठ्या लेकाच्या मित्रांबरोबर ज्या गप्पा होतात त्यात मित्र त्याला गेम्समधल्या गमतीजमती सांगतात किंवा इतर मित्र एकमेकांशी गेम्सबद्दल बोलत असतात त्यामुळे हा त्या गप्पांमध्ये एकटा पडतो. सोसायटीत १२/१३ वर्षांच्या एका मुलाला स्वतःचा मोबाईल मिळाला आहे. अजून एकाकडे स्मार्टवॉच आहे. अशी उदाहरणं आजूबाजूला दिसत असताना आपल्याला व्हिडिओ गेम खेळायला मिळत नाही याचं दुःख त्याला होणं साहजिक आहे . त्यामुळे त्याला हल्ली खूप वाटायला लागलंय की आपणही व्हिडिओ गेम्स खेळावेत. त्याला आम्ही त्याचे दुष्परिणाम समजावून सांगतो. त्याऐवजी आपण कसे शनिवार-रविवारी कधी टेकडीवर जातो, कधी पार्कमध्ये स्केटिंग/ सायकलिंग / बॅडमिंटन खेळतो, त्यात कशी मज्जा येते हेही सांगतो. त्याला ते पटतंय अजून तरी, किंवा तो तसं दाखवतोय.

एखादी गोष्ट अजिबात वर्ज्य केली तर त्याबद्दल जास्त ओढ निर्माण होते हेही खरं. किंवा लगेच अगदी सवय लागेल असंही नाही. पण म्हणून त्याला व्हिडिओ गेम्स आपणहून खेळायला द्यायचे हेही अजून पटत नाही. त्यात धाकटा मुलगा जरा नादिष्ट प्रकारातला आहे. एखादा खेळ आवडला की तोच खेळत बसणाऱ्यांपैकी. त्याला गेम्सचं लवकर व्यसन लागेल की काय अशीही धास्ती वाटते.

सुट्टीच्या दिवशी दोघेही तास दोन तास टीव्ही पाहतात. धाकटा मुख्यतः कार्टून पाहतो. पण मोठ्याला आता सिनेमे आवडायला लागले आहेत. दंगल, चक दे इंडिया, इकबाल, तारे जमीं पर, छोटा चेतन, होम अलोन, ज्युरासिक पार्क, बेबीज डे आऊट असे काही चित्रपट आम्ही आवर्जून त्याला दाखवले आहेत. अजूनही अनेक चित्रपट दाखवायचे आहेत. सांगायचा मुद्दा असा की स्क्रीन टाईम देत नाही असं नाही. पण गेम्स खेळून करमणुकीशिवाय फारसं काही मिळतं का याची आम्हाला खात्री नाही. त्यामुळे शक्य तितके दिवस हा प्रकार आपल्यापासून लांबच ठेवलेला बरा असं वाटतंय.

तुमचे काय अनुभव? तुमची मुलं व्हिडिओ गेम्स खेळतात का? किती वेळ खेळतात? त्याचे बरेवाईट काय परिणाम तुम्हाला दिसतात? त्यावर नियंत्रण कसं ठेवता?
खेळत नसतील तर कसं समजावून सांगता? पर्यायी करमणूक काय देता?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपणही थोडे जास्त लाड करतो धाकट्यांचे.>>>>> खरंय. Happy
फ्रेंड्स बघतात का सर्रास या वयातली मुलं?>>>>> काय माहित. ती बघतेय. कंटेंट काय आहे ते मलाही माहित नाहीये. म्हणजे काही अ‍ॅडल्ट जोक्स वैगेरे. कॉमेडी आहे एवढं माहितीये. १४+ आहे तर चालतंय तेवढं असं मला वाटलं.
नाहीतरी बॉलीवुड बरंच काय काय शिकवतंच. Happy

खरं म्हणजे अमेरिकन age standards आपल्या कडे लागू होत नाहीत. मला तिथले 7+ प्रोग्राम पण माझ्या टीनेजर साठी आक्षेपार्ह वाटतात. तिथले 13/14+ बघू द्यायला नको, आपल्या कडे 18+ झाल्याशिवाय. वर्गातील मुली greys anatomy बघतात. कुठे आणि काय पुरे पडायचं. शाळेच्या corridors (8 ते 10 सगळेजण एकाच मजल्यावर) मध्ये जे सध्या त्याला शिक्षण मिळतंय ते इतर कोणीही देऊ शकणार नाही आणि त्या शिक्षणावर कोणाचाही control नाहीये.

खरं म्हणजे अमेरिकन age standards आपल्या कडे लागू होत नाहीत. >> +१
माझीही २-३ याच वयातली भाचरं फ्रेंड्स बघतात. मी अगदी सगळे नाही पण बरेच एपिसोड्स पाहिले आहेत. अ‍ॅडल्ट जोक्सचं प्रमाण भरपूर आहे. मला तरी पटत नाही आपल्याकडच्या हायस्कूलच्या मुलांनी ते पाहिलेलं. पण राजसी म्हणाली तेच.. कुठे आणि काय पुरे पडणार. पण काही भलत्याच कल्पना त्यांच्या डोक्यात निर्माण होत नसतील अशी आशा आहे.
असो.

ओके.
पण काही भलत्याच कल्पना त्यांच्या डोक्यात निर्माण होत नसतील अशी आशा आहे.>>>> +१

Pages