सहदेव आणि वचन - चतुर्थ

Submitted by अजय चव्हाण on 16 November, 2019 - 03:21

मिट्ट् आकाशातला तो काळा रंग हळूहळू धुसर होत होता. मध्येच लख्ख टिमटिमणार्या शुक्र चांदणीचा तो प्रकाश त्या धुसर रंगात विरत चाललाय.. गर्द हिरव्या झाडांवर सांडलेले ते दवबिंदू आणि त्याचखाली सांडलेल्या शुभ्र फुलांचा सडा हळूहळू स्पष्ट दिसतोय..
नदीपात्रात धुक्यांची छान गट्टी जमलीय आणि अस्पष्ट असलेल्या त्या नदीपात्रात अलगद डोकवत असलेल्या फांदीवरून कोकीळा "कुहू कुहू" अशी गोड साद घालतेय.. नदीचा मंद खळखळाट आणि कुहू कुहूच्या नादाने वातावरणात एक प्रकाचं चैतन्य जरी निर्माण होत असलं तरी पंडूच्या मनातलं मळभ काही दुर होईना.. तो तसाच त्या नदिकिनारी निश्चल पात्रात आपलं अस्पष्ट दिसणारं प्रतिबिंब एकटक पाहत उभा आहे.. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने प्रतिबिंब पुसायचं आणि पुन्हा उमटायचं.. जणू काही एक मूकसंदेश त्यात दडला होता.. कुठलंही प्रतिबिंब किंवा अस्तित्व हे शाश्वत नाही.. त्याने योजलेल्या दिशेने वाहायचं आणि सामिल व्हायचं ह्या न संपणार्या प्रवासात. जोपर्यंत त्याला अर्पण होत नाही तोपर्यंत हा प्रवास.. अनंताकडून अंताकडे आणि अंताकडून अनंताकडे..

ध्यानधारणामुळे आणि तपामुळे मन स्थिर होऊन अध्यात्मिक शक्ती जरी आत्मसात करता आली किंवा सार्या जीवनाचं सारं जरी कळत असलं तरी "मृत्यू" नावाचा राक्षस भिती घालतोच. कालचा स्वप्नातला दृष्टांत खरा होता. हे शरीर सोडण्यापूर्वी नियतीने दिलेली पूर्वसूचना होती ती..

बघता बघता दिवस सरला. फलाहार झाल्यावर ओसरीवर पंडू पुन्हा त्याच विचारात शून्यात नजर लाऊन बसला होता. इतक्यातच "पिताश्री" सहदेवाने मारलेल्या हाकेमुळे पंडू भानावर आला. एकवार प्रेमभरल्या नजरेने त्याने सहदेवाकडे पाहीलं आणि जवळ घेत त्याचे हलक्या हाताने खांदे थोपटत विचारलं..

"बाळा काय हवयं तुला?"

"होय पिताश्री! आपली अनुज्ञा असेल तर मी एक प्रश्न विचारू?" सहदेवाने अतिशय नम्रपणे अनुमती मांगितली.

"अवश्य!" पंडूने होकारार्थी मान हलवत अनुज्ञा दिली.

"पिताश्री काजव्यांना जसा स्वप्रकाश असतो तसा मानवाला का नाही?"

सहदेवाच्या हा प्रश्नाने पंडूला त्याचं कौतुक वाटलं आणि त्याच कौतुकभरल्या भावात पंडू उत्तरला..

"असतो बाळा..मानवाला देखिल स्वप्रकाश असतो..फक्त तो सहजासहजी मिळत नाही तर तो मिळवावा लागतो आणि हा प्रकाश म्हणजे ज्ञानाचा प्रकाश.. ज्यावेळी पूर्णतः ज्ञान प्राप्त होते त्यावेळी आपल्या अवतीभोवती ज्ञानाच्या प्रकाशाचे तेजोवलय निर्माण होते."

पंडूच्या उत्तराने सहदेव भारावून गेला. त्याने मनोमन ठरवून टाकलं की, आपण खुप खुप ज्ञान मिळवायचं..

इतक्यात युद्धीष्टर,भीम,अर्जुन, नकुल तिथे गोष्टी ऐकण्यासाठी आले.

आल्या आल्या नकुल सहदेवाच्या कानात कुरकुरला "आज तु लवकर कसा? सूर्य पश्चिमेला तर नाही उगवला ना?"

सहदेवाने हलकेच स्मित केले आणि खाली मांडी घालून बसला.

पंडूने आपला घसा खाकरला.. खरंतरं कसाबसा आवंढा गिळला त्याने.. स्वतःला सावरत त्याने सांगायला सुरूवात केली..

"तर पुत्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे.. एका अभागी राजाची गोष्ट" इतकं बोलून त्याने पुत्रांकडे एक कटाक्ष टाकला आणि थोडं थांबून पुन्हा सांगायला सुरूवात केली.

पंडूने मग आपलीच शाप मिळेपर्यंतची गोष्ट सांगितली.. पांडवाच्या जन्माची गोष्ट सांगताना त्याचे डोळे भरून आले.. दाराआडून कुंती आणि माद्री ऐकत होत्या आणि त्यांचेही डोळे भरून आलेले..

सगळी सत्यघटना सांगून झाल्यावर.. सगळ्याच पांडवाना अतिव दुःख झाले व ते देखिल आपल्या पिताश्रींना बिलगून रडू लागले.

कसंबसं स्वतःला सावरत पंडूने पुढे सांगायला सुरूवात केली..

"पुत्रांनो, जरी मी तुमचा जन्मदाता नसलो तरी.. तुम्ही माझेच पुत्र आहात.. हस्तिनापूरचे युवराज आहात आणि तुम्हाला वारसाहक्काने सारं काही मिळायला हवं.. इथे काही वर्षे तप आणि ध्यानामुळे काही ज्ञान मी प्राप्त केले आहे आणि ते तुम्हाला मिळो असं मला मनापासून वाटतं.. माझ्या हाडामांसापासून बनलेल्या विर्यापासून जरी तुमचा जन्म झाला नसला तरी तुम्ही राजपुत्र आहात.. एका पित्याकडून पुत्राला आपसूकच पित्यातले काही गुण, काही खुबी आपसूकच अवगत होतात.. आता जे काही गुण आणि जे ज्ञान मी कमावलं आहे ते तुम्हाला मिळावं म्हणून तुम्ही मी मेल्यानंतर माझ थोडं मांस ग्रहण करावं अशी माझी आंतरीक इच्छा आहे..."

"पिताश्री!" सगळेच एकसाथ ओरडले आणि आणखीनच पंडूला बिलगून रडू लागले...

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

I am new here where i can find previous part?

प्राजक्ता मायबोलीवर स्वागत आहे..
आधीच्या भागांची इथे लिंक देतोय..

पहिला भाग - https://www.maayboli.com/node/71790

दुसरा भाग - https://www.maayboli.com/node/71846

तिसरा भाग - https://www.maayboli.com/node/71949

Thanks! Sagle bhg vachle.
Khup chan lihtos tu ani lihat raha...

@आसा, महाभारताच्या अनेक आख्यायिका आहेत. त्यातली हे कथानक wikipedia वर आहे. पण मुळ प्रतित (माझ्या माहितीप्रमाणे) सदर कथानक नाही.

@अजय: किती वर्णन सुंदर रेखाटतोस रे प्रसंग! Happy

धन्यवाद अजित, आसा, मधुरा,मन्या धांग्या..

हे मांसाचं काल्पनिक आहे कि ??>>>>>

महाभारताच्या अनेक आख्ययिका आहेत..आता खरं की, काल्पनिक माहित नाही. पण ही आख्ययिका तेलगू भाषेतल्या महाभारताच्या आवृतीमध्ये सहज सांगितली जाते..
अर्जुन,भीम, युध्दीष्टर इतकचं कशाला कर्ण, अश्वत्थामा, दुर्योधन, आणि प्रत्यक्ष भगवान कृष्ण यांच्या प्रसिध्दीच्या झगमगाटात नकुल आणि सहदेवाबद्दल फारस ऐकिवात नाही...नाममात्र पांडव किंवा साईड हिरोज कॅटेगिरीत त्यांना गणलं जातं..म्हणून उत्सुकता होती सहदेवाबद्दल आणि वाचनातूनच ही कथामालिका लिहण्याची प्रेरणा मिळाली..

खाली तेलगू भाषेतल्या (इंग्रजी भाषांतरीत) Addition ची लिंक देतोय..

http://nirc.nanzan-u.ac.jp/nfile/1118