मी : मम्मी मला पेट हवं
कधी घेऊया??
आई: आता नाही..
दहावी महत्त्वाची आहे.
अडीच वर्षांनंतर
मी : आई आता तर माझी बारावी पण झाली..
आता तरी एक पेट घेऊया ना ग..
आई : काही गरज नाही..
स्वतःच्या पायावर उभी रहा आणि मग घे..
अशा प्रकारे कितीवेळा तरी पेट साठी आईकडून नकारघंटा मिळाल्यानंतर माझ्या आयुष्यात ती आली..
मार्च मध्ये तिने पहिल्यांदा घरात पाऊल ठेवलं..
आणि पेट पाळण्याचं स्वप्न चांगलच पूर्ण झालं.
माझे आईवडील आणि भाऊ सगळेच प्राणीप्रेमी..
पण मम्मी घरात प्राणी पाळायच्या तीव्र विरोधात.
तिचं म्हणणं चुकीचं नव्हत,
माझे वडील सरकारी नोकरी करतात.
म्हणून आम्ही Government स्टाफ क्वॉर्टरमध्ये राहतो.
जरी ही बिल्डिंग असली तरी एवढ्याशा रूममध्ये प्राणी पाळणं तस कठीणच...
गेल्या काही वर्षांपासून आम्ही कित्येक प्राण्यांना जेवण घालतो..
पण ते घराबाहेरच..
अशातच आमच्या बिल्डिंगच्या रहिवासींनी एका मांजरीला आसरा दिला.
तिला जेवायला द्यायला लागले.
हळूहळू ती पण इथे रमायला लागली.
माझी मम्मीपण कधीतरी खाली गेल्यावर ती दिसली आणि मम्मीकडे मासे असले की तिला द्यायला लागली.
मांजर हा प्राणी आळशी आणि विश्वास न ठेवण्यासारखा नाही असा माझा समज होता म्हणून मी सहसा तिला बघत सुध्दा नव्हती..
भावाने तिच नामकरण कोको म्हणून केलं.
ती प्रेग्नंट झाली.. मग हळूहळू तेच रहिवासी तिला मारायला आणि हाकलवयाला लागले..
तिने रात्री पावसात ५ पिल्लं दिली..
कोणीच तिथे फिरकलं नाही..
शेवटी भाऊ जाऊन त्यांना घरी घेऊन आला.
पिल्लं आईच्या दूधावरच होती.
एक महिना झाला आणि मग या मॅडम घरातून बाहेर पडल्या.
तेव्हापासून ती आमच्या घरी फक्त जेवायला यायला लागली.
पिल्लं आमच्याकडे होती.
पाच पिल्लं जवळपास ४ महिने आमच्या कडे आहेत.
दसर्याच्या दिवशी डोंबिवली मधील मांजरेकर घरी आले आणि एका पिल्लाला दत्तक घेतले.
बाकी ४ पिल्लं आमच्या घरी, मस्त मजेत आहेत.
सकाळी उठल्यावर प्रेमाने जवळ येणं, कॉलेजमधून घरी आल्यावर अंगावर उडी मारून हक्क दाखवणे..
त्यांच्या या छोट्या छोट्या गोष्टी भारी वाटतात.
कोको आणि पिल्लांबद्दल ही फक्त प्रस्तावना आहे अस समजा
त्यांचे हे काही फोटो
ही कोको
मस्त , छान
मस्त , छान
Mast
Mast
मझ्याकडे मांजर आहे तिची अशीच
मझ्याकडे मांजर आहे तिची अशीच काहीशी कहाणी आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे नाव तेच आहे "कोको"
छान!! क्युट आहेत एकदम मस्त!!
छान!! क्युट आहेत एकदम मस्त!!
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/38734
तुमच्या लेखावरुन एक गोष्ट
तुमच्या लेखावरुन एक गोष्ट स्पष्ट झाली! सगळ्या आया(आई) सारखीच कारण देतात.
पण वरचे डायलॉग ऐकायला लागतात.
मलाही घरात लॅब पाळायचाय.
मांजर नको वाटत. खुप चिपकु असतं ते! (अनुभवाचे बोल!)
Mazya kade 7-8 manjra hoti,
Mazya kade 7-8 manjra hoti, rather me manjranchya gharat rent ne rahat hote mhanla tari vavga tharnar nahi! me tyanchi balantpana pan barich keli ahet. Pillankade baghtana apla stress kadhi nahisa hoto kalat nahi! Ata sasri manjra nahit, far chuklya sarkha hota. tumche mau ani pillanche photo pahun khup chan watla! Manjra farach gamtishir ani premal astat!
puleshu!
मी पण मांजर प्रेमी आहे माझी
मी पण मांजर प्रेमी आहे माझी ही चार मांजर आहेत त्यातली चार महिन्यांची हि दोन पिल्लं आहे
गोड पिल्लं..
गोड पिल्लं..
मलाही मांजरी खूप आवडतात पण
मलाही मांजरी खूप आवडतात पण पेट म्हणून पाळायला नको वाटत.
त्यांचं शी -शू, खाणं, पिणं हे सगळं बघणं म्हणजे ऍडिशनल काम आलं.
कोको आणि ज्युनिअर कोकुटली
कोको आणि ज्युनिअर कोकुटली सुंदर आहेत.
If its possible plz consider
If its possible plz consider neutering that cat as its always hard to find good homes for those kittens. We have rescued few such kittens abandoned and mostly in bad shape
हाउ स्वीट. मस्त नाव, कोको.
हाउ स्वीट. मस्त नाव, कोको.
कपकेक
कपकेक
पिल्लं चार महिन्यांची आहेत.
त्यामुळे एवढ्यात त्यांना Sterilize करू शकत नाही.
त्यामुळे थांबलो आहोत.
कोको ला या महिन्याच्या ending पर्यंत spay करणार.
Chaan
Chaan
क्षमा असावी ,
क्षमा असावी ,
कदाचित मी चुकीचा धागा निवडला असेल .
माझ्याकडे एक टर्किश अंगोरा जातीची मांजर आहे . पांढरीशुभ्र , एक वर्षाची .
तिला कोणी ऍडॉप्ट करू शकेल का ? विशेषतः ज्यांच्याकडे बोका असेल ?
कळावे
आभार
त्यांचं शी -शू, खाणं, पिणं हे
त्यांचं शी -शू, खाणं, पिणं हे सगळं बघणं म्हणजे ऍडिशनल काम आलं.
>>> ?????
मांजरीला शी शु करायचे कसले काम? एक लिटर बॉक्स ठेवला की झाले...
बिपिन जी मांजरप्रेमी फेसबुक
बिपिन जी मांजरप्रेमी फेसबुक ग्रुप वर Adoption Post टाकून बघा. Or IG वर बरेच Adoption related Pages आहेत जे तुमची मदत करू शकतात.
मांजरीला शी शु करायचे कसले
मांजरीला शी शु करायचे कसले काम? एक लिटर बॉक्स ठेवला की झाले...>> मी ज्यांना ज्यांना विचारलंय त्यांनी सांगितलं की एका प्लास्टिक मोठया घामेल्यात माती भरून ठेवावी लागते आणि
तीत मांजरीला शी शु करावयाला सांगावे लागते.
त्या मातीची विल्हेवाट लावायचं अडिशल काम आलंच.
तसंही मला तो ओव्हरहेड वाटला म्हणून मी तसं लिहिलं.
तुम्हाला नसेल वाटतं तर १० काय शंभर मांजरी पाळत बसा.
मला कशाला विचारत बसलाय ह्याचा काय त्रास अन त्याचा काय त्रास.?
काय एक एक लोग आहेत इकडे
काय एक एक लोग आहेत इकडे
तीत मांजरीला शी शु करावयाला सांगावे लागते.
>>> गुड जोक... असे मांजरीला सांगावे लागत नाही.. इनबिल्ट आहे त्यांच्यात... मांजर शिकारी प्राणी आहे... शी आणि सु जमिनीत खड्डा करून ( इथे लिटर बॉक्स/ घमेले) करणे कारण इतर प्राण्यांना त्यांचा वास येऊ नये हे त्यांच्या dna मध्ये आहे...
कुत्रे टोळीने शिकार करतात, त्यामुळे त्यांना शी शु लपवायची गरज नसते.. त्यामुळे ते कुठेही शी शु करतात.. शु करण्यामागे तेरितोरी मार्क करण्याचे आणखी एक कारण आहेच...
काय एक एक लोग आहेत इकडे
>>> + 1
काही नाही
काही नाही
आमच्या इथल्या मांजरी थेट टाईल वर शी करतात
अजिबात खड्डे खणून वर माती वगैरे टाकण्याचे कष्ट घेत नाहीत.उंदीर खात नाहीत.एक नंबरच्या स्नॉब आहेत.
माझा समस्त मांजरजातीच्या सूज्ञपणावरून विश्वास उडालाय.
Mi अनु,तुला अनुमोदन.
Mi अनु,तुला अनुमोदन.
शहाणी मांजरे,घमेल्यातल्या वाळूत शी शू करीत.द्वाड होती ती गॅसच्या शेगडीखली करीत.
प्राणी माणसाळले की बरेच
प्राणी माणसाळले की बरेच इन्स्टीक्ट्स बोथट होतात.