ज्योतिष चंद्रयोग

Submitted by y2j on 13 November, 2019 - 03:46

चंद्रयोग
ज्योतिषशास्त्रात लग्नाला तनुस्थान असे म्हणतात या स्थानी उपस्थित अथवा दृष्टी टाकणारे ग्रह त्यांच्या गुणधर्मानुसार लग्नावर प्रभाव टाकतात.
मन आणि शरीर कारक चंद्र याला सुद्धा लग्नाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे चंद्रसोबत इतर ग्रहांचे योग व्यक्तीचे जातकाचे शारीरिक मानसिक स्वरूप ठरवतात.
चंद्राचे इतर ग्रहां सोबतचे अनेक योग होतात त्यांपैकी दोन योग हे महत्वाचे मानले जातात
युती योग आणि प्रतियुती योग , या दोन योगांची जवळपास सारखी फळे मिळतात.
चंद्रयोगाची फळे अभ्यासताना लग्न स्थानी होणारे ग्रहयोग ही पहावे लागतात. लग्न स्थान आणि चंद्र यांसोबत असणाऱ्या ग्रहांची एकत्रित फळे अभ्यासावी लागतात. तसेच ही युती कोणत्या राशीत व कोणत्या स्थानी होते हे पण पहावे लागते.

चंद्र गुरु युती योग- मनाला सकारात्मकता आणि शरीराला मजबुती देणारा हा योग आहे, हा योग असणाऱ्या व्यक्तीं नेहमी प्रसन्न असतात, संवाद कौशल्य उत्तम असते. गुरु या योगात चंद्रा सोबत असल्याने चांगलं वाईट ठरवण्याची उत्तम योग्यता देतो , समजदार वृत्ती असते, आलेल्या अडचणीवर सहज मार्ग काढतात, अध्ययन करण्याची आवड असल्याने विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करतात. या व्यक्ती समाजात उत्तम प्रतिष्ठा राखून असतात.
धनु, मीन आणि कर्क राशीत हा योग खासकरून उत्तम फळे देतो ,मजबूत व उंच शरीरयष्टी असते उठावदार व्यक्तिमत्व असते. वृषभ आणि तुळ राशीत ही युती असता शरीरात चरबी चे प्रमाण जास्त असते, लठ्ठपणा येतो गुरूची प्रभावी फळे या राशींमध्ये मिळत नाहीत. मिथुन राशीत बुद्धाच्या चंचल वृत्तीमुळे या योगाची अतिशय प्रतिकूल फळे मिळतात .
चंद्र मंगळ योग- आक्रमक मंगळ चांद्रसोबत या योगात असल्याने या व्यक्ती कठोर मनाच्या, हट्टी असतात , मनोधैर्य उत्तम असते . आवाज मोठा व बोलणे आक्रमक असते ,सतत कार्यक्षम व स्थिर न बसण्याच्या वृत्तीमळे यांना कधी धनाची कमी भासत नाही. सतत धुमसत राहणे व प्रत्येक कृती तीव्र प्रतिक्रिया देऊन करणे यामुळे या व्यक्तींना अपघात , शरीराला जखमा इजा होणे या गोष्टींना नेहमी सामोरे जावे लागते, 1,2,7,8 या स्थानी ही युती असल्यास लहानसहान अपघात नित्याचे असतात. गुरु , शुक्र असे शुभ ग्रह या योगात असल्यास रागावर नियंत्रण असते.
मेष , सिंह, वृश्चिक, मकर राशीत या योगाची अतिशय प्रभावी फळे मिळतात मिथुन आणि कन्या राशीत हा योग असणाऱ्या व्यक्ती टवाळखोर मस्करी करणारे आढळतात.
चंद्र शनि युती- पीडाकारक आणि संथ शनि या योगात चंद्रासोबत असल्याने मनावर नकारात्मकता हावी असते , हा योग असणाऱ्या बहुतेक व्यक्ती या वर्णाने काळ्या सावळ्या असतात, आळशी वृत्ती असते, विचारात संथपणा असतो असं असल तरी हा योग काही चांगली फळे ही देतो , या व्यक्ती जास्त भावनिक नसतात त्यामुळं हा योग एकप्रकारचा कोडगेपणा देतो, समोर काही घडलं की काहीही प्रतिक्रिया न देणे, लगेच व्यक्त न होणे यामुळं या व्यक्ती अहंकारी वाटू शकतात, हा योग व्यक्तीला अंतर्मुख बनवतो तसेच उदास वृत्तीमळे पारमार्थिक ज्ञान प्राप्त होते तसेच ध्यानधारणा , गुप्तविद्या अशा गूढ विषयांमध्ये रुची निर्माण होते.
चंद्र सूर्य युती- सूर्य ग्रह या योगात चंद्रसोबत असल्याने उग्र मुद्रा असते, तेजस्वी चेहरा असतो हा योग असलेल्या व्यक्ती करारी असतात बोलणे अधिकारवाणीचे असते , धारदार भारदस्त आवाज असतो या व्यक्तींकडे मनाची स्थिरता अधिक असल्यामुळे विषयभोगाकडे ओढा कमी असतो, अभिमानी वृत्तीमुळे इतरांशी लगेच जमवून घेणे यांना जमत नाही या व्यक्तीना चंचल स्वभाव , विनाकारण बडबड करणे असल्या स्वभावाची चीड असते. मेष , सिंह, वृश्चिक , धनु राशीत ही युती असल्यास दमदार व्यक्तिमत्व देतो.
चंद्र शुक्र युती- सौंदर्यकारक शुक्र ग्रह या योगात चांद्रासोबत असल्याने व्यक्ती आकर्षक स्वभावाच्या असतात , ह्या व्यक्ती सतत हसतमुख उत्साही असतात ,हा योग असणाऱ्या व्यक्ती गौर्वरणीय आणि सुंदर असतात , चेहरा रेखीव व मोहक असतो, आवाज काहीसा कोमल असतो, जीवनातील सगळी सुख भोगण्याकडे कल असतो , या व्यक्तींचे सौंदर्य शंभर जणांमधून उठून दिसणारे असते , वृषभ , तुळ , कर्क या राशीत ही युती असता व्यक्ती अतिशय गौर्वरणीय आणि सुंदर असते , स्त्रियांना खासकरून हा योग उत्तम लाभतो.
चंद्र बुध युती - बुध ग्रह या योगात चंद्रा सोबत असल्याने या व्यक्तीचे बोलणे चतुरस्र असते ,चौकस वृत्ती असते, बोलण्यात हजरजबाबी पणा असतो, हा योग असणाऱ्या व्यक्तीची निरीक्षण शक्ती उत्तम असते त्यामुळं दुसऱ्यांच्या सवयी , बोलण्याच्या लकबी लक्षात ठेऊन त्यांच्या नकला करण यांची आवड असते , बऱ्याच कॉमेडियन व्यक्तीच्या कुंडलीत हा योग आढळतो. मिथुन आणि कन्या राशीत या योगाची प्रभावी फळे मिळतात.
चंद्र राहू युती- पापी आणि दुःख पिडाकरक राहू या योगात चंद्रा सोबत असल्याने मन आणि शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम करतो हा योग असणाऱ्या व्यक्तीचे शरीर अक्रसल्यासारखे असते, मनाचे सत्व नष्ट झाल्यामुळे दीनवाणी मुद्रा असते , मानसिक विकार असतात , आवाज ओढून काढल्यासारखा बारीक असतो. पक्षाघात यासारखे आजार होऊ शकतात.
चंद्र केतू युती - कर्कश अनियंत्रित केतू या युतीत चंद्रा सोबत असल्याने हा व्यक्ती एक प्रकारच्या भ्रमात कृती करत असतात , बुद्धीला एक प्रकारची बधिरता येते , हा योग मनाची जाणीव दक्षता नष्ट करत असल्यामुळं मानसिक व शाीरिक व्याधी नित्याच्या असतात काही व्यक्तींच्या बाबतीत फिट येणे यासारखे प्रकार घडतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरदकाका, बरोबर आहे. मला माझ्या कामाचं मार्केटिंग जमत नाही आणि काहीतरी गैरसमज होतात.
मला समाजसेवा आवडते हेही खरे. पण पैशाशिवाय जगता नाही येत ना.
मी क्लासेस घेण्याचा किंवा एखाद्या मोठ्या क्लासेस मध्ये शिकवण्याचा विचार करते आहे. पण त्या ज्योतिषांनी सांगितले होते की विद्यार्थी नीट वागायचे नाहीत, तुमच्याबद्दल तक्रारी होतील.
असो. काहीतरी करून पैसे तर मिळवायलाच हवेत. अपमानच लिहिला असेल आयुष्यभर तर निदान पैसे मिळवून खाऊनपिऊन ताकद तर येईल सहन करण्याची.
मला अकाउंटिंग काहीच माहीत नाही. कॉम्प्युटर मधली डिग्री आहे.

अंजू, एकटा चंद्र चांगला असतो. पण पाप ग्रहाच्या युतीत अथवा पाप ग्रहाच्या दृष्टीत असेल तर त्रासदायक होतो. संतती बद्दल गुरुकडुनही बघतात. म्हणजे गुरुच्या पंचमात कोणता ग्रह आहे हे पण बघतात.

माझ्या पत्रिकेत पंचमात नीचीचा चंद्र म्हणून पहीला मुलगा झाला तर चांगलं नाही असं आहे. नवऱ्याचे नक्की कोणते ग्रह नाही लक्षात माझ्या पण माझ्या पत्रिकेतला चंद्रच.

मी फार सौम्य लिहिलंय. तो चंद्र काय करतो पहिल्या मुलाबाबत हे फार टोकाचे वाचलंय.

जाऊदे जे झालं ते झालं, आता काही अर्थ नाही. त्यानंतर अनेक उपाय केले वेगवेगळ्या ज्योतिष्यांच्या मार्गदर्शनावरुन, अर्थात लेकाचे औषधोपचार, डॉक्टर पहिले सुरु केलं. आता औषधोपचार, प्रार्थना सोडून बाकीचं मी माझ्याकडून सर्व बंद केलं.

पत्रिका जुळली नाही किंवा जुळते का बरोबर बघितलं नाही हे सोडून देणे. कारण फक्त एकाच्या कुंडलीप्रमाणेच गोष्टी होतात. प्रेमविवाह किंवा अजिबात पत्रिका न बघताही फरक पडायला नको. संततीचा आणि चंद्राचा काही संबंध नसून फक्त सुखाचा कारक आहे , चौथ्या स्थानाचा नैसर्गिक कारक. इतर कुंडल्यांत आणखी एक ग्रह असतो. तो कधी मदत करतो.
सुखामध्ये कमतरता नक्की कशामुळे येते ? तर त्यास बरेच पर्याय असतात. अमुक एकच नाही. पण येते नक्की.
त्यामुळे अमक्याने जागे केले नाही, वॉर्निंग दिली नाही हा विचार बाद करणे.

वृश्चिक रास, कर्क लग्न. पंचमात चंद्र, प्रथम संतती मुलासाठी कारक (म्हणायचं का तारक) नाही, मुलीसाठी माहिती नाही पण नसेल दोषास्पद. मुलासाठी दोषास्पदच. मी स्वत: एका मोठ्या ज्योतिषाच्या पुस्तकात पण हे वाचलं आहे. काही जणांनी सांगितलही आहे, माझी पत्रिका बघून.

बाकी दोघांच्या पत्रिका बघून एकानी गावाला, प्रथम संतती बाबत दोषास्पद ग्रह आहेत दोघांच्या पत्रिकेत, दोघांना माझ्याकडे पाठवा, हा दोष टाळण्याचे उपाय आहेत असं सांगितलं होतं, हा निरोप आम्हाला दिला गेला नाही. नवऱ्याबाबत मी चंद्र म्हणत नाहीये, माझ्याबाबतीत चंद्र हे मी सांगू शकते.

असो मी माझ्याकडून वैयक्तिक चर्चा थांबवते, हे माझं फार पर्सनल होतंय.

@अनुरिका,
पोटापाण्याचं काही प्रत्येकाला पाहायचंच आहे. पण नोकरीत फक्त अपेक्षित अंमलबजावणी करणे उत्तम. स्वत:च्या विचाराने काही केल्यास त्याच्या परिणामांची जबाबदारी तुमच्यावर पडते. आणि ते फेल जाते. ओफिसरशिप फेल जाईल. फक्त बॉसकडून आलेल्या आदेशाचं पालन करून गप्प बसणे. मग फारसा त्रास होणार नाही.

अजून या गोष्टीला वेळ कसेल पण सावधानता म्हणजे पंचावन वयाच्या थोडे अगोदर शक्यतो जे काही डबोलं मिळेल ते घेऊन बाहेर पडणे. ५८-६० पर्यंत नोकरी आहे तिकडे दुर्लक्ष करून.

@अन्जू, आता परिस्थितीला सामोरे जाऊन ठामपणे उभे राहतो याचे एक उदाहरण जगासमोर ठेवत असतो. यातून इतरही जण आपापल्या अडचणी आणि त्रास विसरून आनंदाने जगायला शिकण्याचा हुरूप मिळवतात हे काय कमी आहे? तुमचं पर्सनल नाही, तो एक लढण्याचा आदर्श ठरतो.
सोनी (हिंदी) वरचे इंडिअन आइडलमधले स्पर्धक पाहिल्यावर कळतं की आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे.

आम्ही दोघेही परिस्थितीला सामोरे जात, मुलाला आनंद द्यायचा प्रयत्न करतो, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा प्रयत्न करतो. पण कधी कधी हतबलता येते. मला नशीब, नियती जास्त powerful असं सांगायचं होतं त्यातून एकेक विषय निघत गेला पण कोणाही बाबतीत असं घडू नये वाटतं. पूर्ण आयुष्य पणाला लागतं.

मी एकदा लिहून डिलीट केले तरी परत लिहावेसे वाटले म्हणून...

कोणी सांगितले असते तर आम्ही काळजी घेतली असती वगैरे काही खरे नाही, व्हायचे ते होतेच. मला ऑफिसच्या एका कलीगने सांगितले होते की अमुक एक निर्णय अमुक महिन्याआधी घेतलास तर पुढे त्रास काढावा लागेल, त्यामुळे नंतर निर्णय घे. खूप अस्वस्थ होऊन मी हे एका दुसऱ्या कलीगच्या कानावर घातले. ती म्हणाली की या माणसाच्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे झालेय, तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केलाय; हा स्वतःच्या चुकीमुळे नोकरी गमावताना मॅनेजमेंट कृपेने वाचला व इथे डिमोशन घेऊन आलाय. ज्याला स्वतःचे व मुलीचे भविष्य दिसले नाही तो तुझे सांगणार आणि तू ऐकणार? मग मीही डोक्यातून त्याचे बोलणे काढून टाकले.
पुढे घटना अशा घडत गेल्या की त्याने सांगीतलेल्या वेळेआधीच मी निर्णय घेतले किंवा घ्यावे लागले, परिणामी मोठ्या खड्ड्यात जाऊन पडायला मिळाले व प्रचंड त्रास सहन करायला मिळाला Happy Happy . तेव्हा कधी कधी वाटायचे, त्याचे मानले असते तर आयुष्य वेगळे झाले असते का..... पण ह्या जरतरला काही अर्थ नाही. माझें पूर्वसंचित इतके चांगले नव्हते की सूचना मिळून मी सावध होऊ शकेन. माझा राशीधिपती चंद्र असल्याने तो कधीकधी मला निराशेच्या गर्तेत लोटतो, मूड स्विंग होतात पण ते तितक्यापुरतेच. माझें पूर्वसंचित इतकेही वाईट नसल्यामुळे आज झाले गेले विसरून तिकडे पाठ फिरवून मी स्वतःला आनंदी ठेऊ शकते.

माझी पत्रिका बनवणाऱ्या ज्योतिष्यानेही आईवडिलांना माझ्या बाबतीत धोक्याचा इशारा देऊन काय करायला हवे हे सांगितले होते, पण योग्य वेळी तेही विसरले Happy Happy

साधना, बरोबर आहे.

पूर्वी कुठेतरी वाटत राहायचं जास्त असं असते तर असं झालं असत पण सर्व accept केल्यावर की हे आपल्या नशिबात होतंच, त्रागा कमी झाला पण मुलाला जो त्रास होतो त्यावेळी जास्त अपराधी वाटतं की आपण सेवा करू शकतो, त्रास नाही घेऊ शकत. हे टाळू शकलो असतो का हे मनात येतंच.

कर्क लग्न माझं त्यामुळे मी इमोशनल आहे.

सर्वांना धन्यवाद. सहज विषय निघाला आणि इतकं लिहिलं, हे मी शक्यतो टाळत असते.

धन्यवाद. सर्व आईवडील आपल्या मुलांसाठी झटतात आपापल्या लेवलवर, त्यामुळे काही तसं फार विशेष करतोय असं वाटत नाही.

पण ह्या जरतरला काही अर्थ नाही }}अनुमोदन
मोघम लिहितात तेव्हा तर समजत नाही नक्की काय म्ह्टले आहे.
पत्रिकेतील "पुत्रसंतती कडून सुख कमी" अशा वाक्यामुळे काही काळ मी खूप घाबरले होते. नंतर एकाने सांगितले की तसा काही धोका नाही.

अंजू, नक्की काय आहे ते मला माहीत नाही किंवा कळले नाही. असो, कारण तू पुष्कळ उलगडुन लिहीले असले तरी जास्त खोलात जाणे मला आवडणार नाही. पण एक आहे, बाकी सगळे देव जाऊ दे, पण तुझ्या माहेरची व सासरची अशा दोन्ही कुलदैवतांचे / देवीचे करत रहा. कुलदैवत हे आपली आई समान असते, त्यामुळे ती नक्कीच कृपा करते.

साधना म्हणतेय ते पण खरे आहे. जे होणार आहे ते टाळले जात नाहीच. माझ्या ओळखीत एक घटना घडली. त्या मुलीला, तिच्या वडलांनी प्रेम विवाह करु नकोस, फसशील, घटस्फोट होईल असे स्पष्ट सांगीतले होते ( मुलीचे वडील ज्योतिष्यी होते, ते आता नाहीत ) . सेम तसेच झाले. ते म्हणाले होते की घडणारी घटना नशीबात असेल तर टाळता येत नाही. पण प्रयत्न करुन बघावा.

साधना, त्या माणसाला ( तुझे कलिग ) आधी स्वतःलाच काही अनूभव आल्याने ते तुला सावध करु पहात असतील. काय होतं की बर्‍याच जणांचा यावर विश्वास नसतो, पण अनूभव आल्यावर काही जण नुसते भविष्य पहायला सुरुवात करतात तर काही अभ्यास करायला सुरुवात करतात. तुझ्या त्या कलिगने मुलीच्या अनूभवानंतर अभ्यास करायला सुरुवात केली असेल किंवा मुलीच्या बाबतीत तसे घडेल हे माहीत असुनही ते टाळु शकले नसतील ही शक्यता वाटते.

अन्जूताई , तुमची हिंमत बघून आणि अशा परिस्थितीत
ज्या शांतपणे वागता ते पाहून हुरुप येतो.
प्रत्येकाला काही ना काही त्रास असतोच हेच खरं.
शरदकाका, 56-57 ला माझी केतू महादशा सुरू होणार आहे. मी तुमचा सल्ला लक्षात ठेवेन.
मी परिस्थितीमुळे हतबल होऊन याचा थोडा अभ्यास केला होता. मला वरवरचंच माहीत आहे, तरी शंका आहेत.
१. सर्व ग्रहांपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. नवपंचम योग होईल का? काही उपयोग?
२. १०व्या पासून रवी पराक्रम स्थानावर आहे, त्याचा काही उपयोग?
३. नीचभंग आहे का?

एकूण अनुभवांवरून माझेही हेच मत झालेय की ज्योतिषी अचूक अंदाज सांगू शकतो पण घडणारी घटना बदलू शकत नाही. फारतर त्याचे परिणाम कमी होतील, तेही संचितकर्म किती आहे त्यावर अवलंबून.

कलीगच्या मुलीचा प्रेमविवाह होता, बाबाला टाळता आला नसावा. त्याने स्वतःच्या बाबतीत जे केले ते विनाशकाळे विपरीत बुद्धी... टाळता आले असते पण नाही झाले.

जेव्हा अटळ योग दिसतात तेव्हा "व्यवहार आणि परिस्थिती पाहून" निर्णय घ्या एवढेच सांगून घाबरवणे टाळले जाते.
ज्योतिष विचारायला जाताना फक्त भाकित /सल्ला जाणून घ्यावा, कोणत्या ग्रहामुळे काय झाले इत्यादी खोलात जाण्याचे टाळावे. जास्ती ज्योतिष कळल्याने ज्योतिषी जाणणाऱ्यांनाही मनस्ताप होत असतोच.
----------
@अनुरिका, नोकरीत मागचे लोकही पुढे जातील.
गुण द्यायचे झाल्यास
समाजकार्य - दहापैकी नऊ.
नोकरी - दहापैकी चार.

नमस्कार
मला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला आहे. मुलगी अपंग आहे severely..normal intellectually ....wheelchair bound. . Something like in the movie zero..so please let me know if there is happiness ever खरच। ...फार त्रास होतो आहे... ही माझीच कुंडली आहे...मला कळवा...sorry not used to typing .....in Reading mode from long time. Even my son was extremely premature had many many issues and now when he is ok my daughter is severely disabled . Financially also dependent ...out of India no friends no family only. शुश्रुषा....almost 15 years ...moved time to time so had to leave the friends and now no one. Birth details 26 June 1981 birth time 9.15 am...I really want to know because I really have an abnormal life.image_2.jpg
Thank you...

अरे एवढे थोर्थोर ज्योतिषी आहेत इथे, मग कोण मुमं होणार कोण उमुमं होणार ते का कोणी सांगत नाय्ये??>>>>>

कोणाची पत्रिका बघून सांगणार? तुमची माझी पत्रिका बघून तुमच्या माझ्या नशिबी अमुक मुम आहे हे सांगता येत नाही ना....

@सामो, प्रश्न बरोबर आहे पण मुमंत्रि/ पंप्रइच्छुक उमेदवारांच्या कुंडल्या पाहून काही राजकीय ज्योतिषांनी मागे ( सोनिया गांधी होणार होत्या तेव्हा) भविष्य वर्तवले होते ते खरे निघाले होते. ती भाकितं कुंडल्यांसह एका इंग्रजी पेप्रात आली होती. बहुतेक फ्री प्रेस पेप्रात. सोनिया आणि राहुलला योग नव्हता हे लिहिलेले खरे वाटले नव्हते.
तर हे एक पद असल्याने शेवटी रवि विचार येतो. पदासाठी रवि अनुकुल लागतो. दामटून धोरण राबवण्यासाठी परंतू धोरण ठरवण्यात कुचकामी. परंतू राजा ( हल्लीचे राज्यकर्ते म्हणा) बनवण्याचे काम फक्त शनि(दीर्घकाळपर्यंत), मंगळ (सेनानी थोड्या काळाचा उदय आणि नंतर अस्त), चंद्र (कमी वयाचा युवराज, राजकारण न कळणारा) हे तीनच ग्रह करू शकतात.
काहींना छत्रचामर योग असतो. तो मुख्यमंत्री/पंतप्रधान असेल असं नाही, मठाधिपतीही असतो.

आता एखादा झाला आणि रिमोट (दोन/तीन!!) दुसरीकडेच असला तर ??

आदिश्री तुम्ही ज्या परिस्थितीतून जाताय ती बरीचशी वेगळ्याप्रकारे रिलेट करू शकते, त्यामुळे तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करेन. तुमच्या सर्व अडचणी दूर होऊदेत आणि चांगलं घडूदे.

आदिश्री तुम्ही ज्या परिस्थितीतून जाताय ती कठीणच आहे आणि ज्योतिषाच्या दृष्टीने अभ्यास एवढेच शिल्लक राहिले आहे. कारण प्रसंग घडून समोर उभे आहेत. काही मार्ग निघून त्रास कमी व्हावा हीच इच्छा.
मात्र काही गूढ , मंत्र तंत्र तोडगे करण्याचा कल टाळावा लागेल. रीतसर वैद्यकीय उपचारच करत राहा.

Pages