अभी न जाओ छोडकर..

Submitted by शुभांगी दिक्षीत on 4 November, 2019 - 02:38

आज सकाळी जाग आल्या आल्या पुन्हा तिने फेसबुक, व्हॉट्सअप चालू केलं. फेसबुकवर त्याचं नाव शोधलं पण ते दिसत नव्हतं म्हणजे अजूनही ब्लॉक लिस्ट मधेच आहे मी. तिने विचार केला आणि हसली मनात. काही मोठा इश्यू किंवा मोठं भांडण नव्हतं झालं. तरीपण त्याने तिला ब्लॉक केलं होतं. खुप रागवला होता तिच्यावर कारण पण तसंच होतं तिने मेसेज केला नव्हता त्याला. आता मेसेज नाही केला म्हणून इतकं काय रागवायचं?
इतकंच कारण होतं. पण त्याचा रागच असा होता. तिने त्याला खुपदा समजून सांगितलं की मोबाईल बिघडला होता. वरून पडून त्याचा डिस्प्ले गेला होता. खुप समजावून सांगितलं. मोबाईल नीट करून आणलेलं बीलही दाखवलं. त्याला पटलंच नाही. शेवटी ती ब्लॉक आणि तो रागवलेला. शेवटी ती गप्प झाली. मेसेज वगैरे सगळं बंद.
फोन करावा तर त्याने नंबर पण ब्लॉक करून ठेवला होता. वेडा. किती राग येतो याला पण प्रेम पण तितकंच जीवापाड आहे. मेसेज नाही बघून व्हॉट्सअप, फेसबुक पुन्हा बंद केलं. मलाच आठवण येते का?? त्याला नाही येत एकदापण?? साधा मेसेज नाही केला असं म्हणून तिने ऑफिसला जाण्याची तयारी केली. नऊ पाचची लोकल पकडायची होती तिला.
"आई जाते गं" म्हणत ती ऑफिसला निघाली. ऑफिसमध्ये तर तिचं लक्षही लागत नव्हतं. ऑफिसच्या फोनवरून पण तिने त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कॉल उचलला नाही. काही वेळाने प्रयत्न केला तर ब्लॉक. हा ही नंबर?? हद्द झाली. तिने साधे मेसेजही खुप केले पण त्याने बघितले पण नसतील. इतका कसला राग आला आहे त्याला? मंद. असं मनात म्हणून ती कामाला लागली.

असेच पाच दिवस गेले. तिने पुन्हा त्याला मेसेज कॉल केला नाही. काही दिवसांनी त्याने स्वतःहून कॉल केला.
"काय करतेस?" तो
"काही नाही. ट्रेनमध्ये आहे. गाणी ऐकतेय." ती
"कोणतं गाणं आहे?" तो
"अभी न जाओ छोडकर.." ती
"के दिल अभी भरा नही" तो
"हो तेच" ती
"मग नको जाऊस सोडून" तो
"नाहीच जाणार. तुच मला सोडून जातोस एकटं नेहमी." तिचा आवाज रडका झाला होता.
"सॉरी गं. मी असाच आहे. मी तरी काय करू?" तो
"बोलू नकोस माझ्याशी. मला एकटं सोडून गेलास. पाच दिवस झाले." आवाज अजूनही रडवेलाच होता.
"खरंच सॉरी. तु शिक्षा कर मला मग. सांग मी काय करू शिक्षा म्हणून" तो
"काही नको" ती
"मी रडवलं किती तुला. पण मी पण रडलो गं रोज रात्री. सांग मी स्वतःला काय शिक्षा करू?" तो
"काही करू नकोस. नीट घरी जा बस्स आणि धडपडू नकोस." ती
"तु सावरायला असताना मी बरा पडेन." तो
"पुरे. पुन्हा ब्लॉक कर तुझे दातच पाडते बघ." ती
"माते क्षमा असावी. रात्री बोलू मेसेजवर. टेक केअर, लव्ह यू गब्बू" तो
"लव्ह यू टू बबडु" ती
खुप छान वाटत होतं तिला त्याचा आवाज ऐकल्यानंतर. तीने पुन्हा तेच गाणं रिपीट केलं...
"अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नही.."

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता हे वागणं लय गोड गोड वाटतंय पण पुढे जाउन ह्या सायको वागण्यामुळे लय मनस्ताप होणारे गब्बूला Lol

सस्मित +१
विषारी व्यक्ती, नाते अलर्ट!!

आता हे वागणं लय गोड गोड वाटतंय पण पुढे जाउन ह्या सायको वागण्यामुळे लय मनस्ताप होणारे गब्बूला +१

आता हे वागणं लय गोड गोड वाटतंय पण पुढे जाउन ह्या सायको वागण्यामुळे लय मनस्ताप होणारे गब्बूला >>> +११११

खरेतर अश्यांना लगेच ऊलट ब्लॉक करुन, आयुष्यातुन शिफ्ट डिलीट करायला हवे पण प्रेमात अंधळ्या मुलींना हे समजतच नाही Angry

Block नाही निदान दुर्लक्ष तरी करता यायला हवं. पण प्रेमात हळवे असतात सगळे. ब्लॉक तर ब्लॉक गेलास उडत नाहीतर गेलीस उडत..हे प्रेमात पडलेल्यांना जमत नाही.

ब्लॉक तर ब्लॉक गेलास उडत नाहीतर गेलीस उडत..हे प्रेमात पडलेल्यांना जमत नाही.>>>>>>
त्याचं वागणं जास्तच रुड आहे. पाच - दहा दिवस ब्लॉक करणं, न बोलणं हे पण प्रेमात पडलेल्यांना जमत नाही

पाटीलबुवा तुमची कथा फारच वास्तवाला धरुन आहे ब्वॉ! Lol
अगोदर ती वाचली आणि मग ही वाचणात आल्यावर संदर्भ लागला.

ही एक काल्पनिक कथा आहे. आवडली नसेल तर ठीक आहे. कमेंट नाही केली तरी चालेल कोणाच्याही लेखनाची मस्करी करू नका. मला योग्य भाषेत लिहायला जितकं जमेल तितकं लिहलं आहे.
काय लिहावं या पेक्षा काय लिहू नये हे ज्याला समजतं तो खरा लेखक असं मला वाटतं. स्वतःची कथा वेगळी लिहा माझ्या कथेला जोडून लिहायची गरज नाही तसंच कथा वाचायचीही गरज नाही. आणि स्त्रियांबद्दल जरा शब्द नीट लिहा. नाहीतर मला मायबोली ॲडमिन ना सांगावं लागेल.

शुभांगी दीक्षित: पुढील प्रतिसाद वाचून नाउमेद होऊ नका, प्रयत्न करा आणि अजून छान लिहायचा प्रयत्न करा.

१. काल्पनिक कथा: सदर लिखाणाला कथा का म्हणावे इथून प्रश्न सुरू होतो. कथा ऐवजी कोतबो धागा वाटतोय. कथावस्तू ३ वाक्यात संपते. एक जोडपे असते. ते विनाकारण भांडतात. त्यांचं विनाकारण पॅच अप होतं. वाचन वाढवा. इथे मायबोलीवर अनेक कथा आहेत त्या वाचा, मी स्वतः 7 व्या इयत्तेत असल्यापासून लिखाण करतोय तरी आजवर स्वतंत्र कथा पोस्ट करण्याइतका आत्मविश्वास आलेला नाही. असो, इथे अनेक जिलब्या असतात त्यांचं विडंबन मात्र इमानेइतबारे करतो.

२. मस्करी: मी के लिहिलंय त्याला विडंबन म्हणतात. तुमची हरकत असेल तर कळवा. मुद्दा क्रमांक ५ पूर्ण झाल्यावर धागा उडवण्यात येईल.

३. काय लिहावं या पेक्षा काय लिहू नये हे ज्याला समजतं तो खरा लेखक असं मला वाटतं. >> हे वाक्य आणि तुमचा हा धागा परस्परविरोधी आहेत. आपल्या भारतीय चित्रपटातुन आणि मालिकांमधून वगैरे हिरो कसाही असला तरी "मेरा पती / प्रियकर मेरा देवता" टाईप फालतू संदेश कायम दिला जातोच आहे. त्यात असलं toxic relation दाखवणारं लिखाण भर घालतंय. पराकोटीचा फेमिनिस्ट किंवा समानतावादी असल्याकारणाने हे असलं लिखाण वाचल्यावर तिळपापड होतो. राहिला प्रश्न माझ्या लिखाणाचा, तर मी जे पाहिलंय, तेच लिहितो. दु:खद असले तरी सत्य हेच की जे विडंबनात लिहिलंय ते आज समाजात घडत आहे, आणि ते घडता कामा नये या मताचा मी आहे.

४. स्वतःची कथा वेगळी लिहा माझ्या कथेला जोडून लिहायची गरज नाही>> मुद्दा क्रमांक ३ पुन्हा वाचा.

५. तसंच कथा वाचायचीही गरज नाही.>> मग पोस्ट तरी का करायचं?

६. आणि स्त्रियांबद्दल जरा शब्द नीट लिहा. नाहीतर मला मायबोली ॲडमिन ना सांगावं लागेल.>> माझ्या आजवरच्या संपूर्ण लिखाणात, मी मायबोलीवर कुठेही दिलेल्या प्रतिसादात स्त्रियांबद्दल एकही वाईट शब्द आढळला असेल तर इथेच कळवा. मजकूर पोस्ट करा आणि त्या मूळ पोस्टची लिंक द्या, सापडले तर मी तुमची आणि समस्त मायबोलीची माफी मागून मायबोली सोडेन, आणि तसे सापडले नाही तर माझी इथेच माफी मागा. मंजूर?

७. नाहीतर मला मायबोली ॲडमिन ना सांगावं लागेल.>> जर माझे लिखाण आक्षेपार्ह सापडले नाही तर मी माझ्यावर खोटे आरोप लावल्याची तक्रार मायबोली admin ला करू शकतो का?

उत्तराच्या प्रतीक्षेत,
राव पाटील!

मला वाद घालायचा नाहीए आणि मला गरजही नाहीए वाद घालण्याची. कथा फक्त वास्तववादीच नसतात काल्पनिकही असतात. हे तर तुम्हाला माहित आहेच ना. निदान कोणाचा आत्मविश्वास हिरावून तरी घेऊ नका. विडंबन करा पण का विडंबन करतोय हे ही सांगा. विडंबन हा प्रकार मलाही समजतो. पण कथेशी जोडून करायची गरज नव्हती आणि तसं असेल तर स्पष्ट लिहावं की हे विडंबन आहे आणि हो लिंक टाकायची गरजही नव्हती. मी जर असं केलं असतं तर तुम्हाला चाललं असतं का? नाही. कसं चालणार. तुम्ही मुद्देसूद लिहून वाद घातलाच असतात ना. लिंकवर तुम्ही लिहलेली कथा तुम्हीच एकदा त्रयस्थ होऊन वाचा मग समजेल मी असं का म्हणाले ते??
आणि पुन्हा इथे लिहणार नाही ही माझी शेवटची कथा. आपल्याला आत्मविश्वास मिळत नाही म्हणून कोणाच्या मेहनतीने लिहलेल्या कथेच्या चिंध्या करावयाची गरज नाही. विडबंन हे वास्तविक आहेच. पण ते योग्य शब्दात असावं असं मला वाटतं. मी वास्तव नाकारलं नाहीए. तुमच्यासारखी पट्टीची लिहणारी नसले तरी मला चांगलं वाईट कळतं काय योग्य काय अयोग्य. निदान यापुढे कोणाचं लेखन असं चिंध्या करू नका. त्याने लेखकाचा आत्मविश्वास कमी होतो. तुमचा वाढत असेल कदाचित. तुम्ही नका सोडू मायबोली मीच सोडतेय. सातव्या इयत्ते पासून लिहीत आहात. लिहा.
गुडबाय मायबोली!!!

असं नका ना करू.
तुमच्यासारख्या लेखकांची मायबोलीला खूप प्रचंड अतिशय गरज आहे.
प्लीज इथे लिहीत रहा.
लवकर पुढली कथा टाका.
अभी चं काय कभीभी न जाओ छोडकर