मागील पानावरुन

Submitted by अजिंक्यराव पाटील on 7 November, 2019 - 13:16

प्रेरणा:
https://www.maayboli.com/node/72206

मागील पानावरुन पुढे चालू..

रात्री त्याचा मेसेज आला पुन्हा (इथून पुढे chat आहे, समजून उमजून वाचा, तो आणि ती लिहीत बसणार नाही मी).
"ताय तलतेय मादी दब्बू?" (काय करतेय माझी गब्बू?)

"दब्बू शिशी कलतीये, वास आला ता तुला बबदू?"

"हादायला दाताना कताला नेला फोन दब्बू?"

"मला वाटलं तुदा कॉल येनाल म्हणून फोन देतला तोबत.."

"मग आता फोन आणलाच आहे तर.."

"हो पाठवते."
खिचिक

"अग घाणेरडे, पाणी सोड आधी, मी याचा नाही फोटो मागितला तुला"

"ओह सॉरी हा थांब"
खिचिक
.
"मी ओयो बुक करतोय, 2000 आहे लोणावळ्याला, शुक्रवारी ऑफिस सुटल्यावर निघू"

"Ok बबडू! लव यु शोनुल्या"

"लव यु टू गब्बूल्या!"

तर अशी ही गब्बू आणि बबडूची बडबडगीते टाईप लव्हस्टोरी सुरू होती.

अशीच एक संध्याकाळ.. टाईमपास म्हणून गब्बू tiktok विडिओ बनवत आणि बघत होती, आणि तिला एका व्हीडिओ मध्ये बबडू दिसला.. लोणावळ्याच्या त्याच रूम मध्ये एका मुलीसोबत एक डायलॉग टाईप ऍक्ट होता तो.. साधारण डायलॉग पुढीलप्रमाणे:

तो "सुनो ना डार्लिंग, अगर कोई लाल कपडे पेहना, लंबी दाढीवाला बुढा तुम्हे किडनॅप करे, तो डरना मत."

ती "क्यूँ बेबी??"

तो, "ख्रिसमस में इसबार सांतासे तुम्हे मांगा है"

डायलॉग झाल्यावर बबडू तोंडावर दोन बोटे ठेवून "केसर का दम" वाली पिचकारी मारतो आणि केसातून (स्वतःच्या) हात फिरवतो.

इकडं व्हीडिओ पाहून गब्बू चे गाल गुबरे होतात, ती कॉल करणार पण मग बबडू चिडला तर परत ब्लॉक करेल असा विचार करून फक्त hiiii असा मेसेज पाठवते. बबडूचा रिप्लाय येत नाही,

"रिप्लाय का देत नाहीस?"
--
रागावलास का तुझ्या गब्बूवर?
--
बिझी आहेस का?
--
माझं काही चुकलं का?
--
आणि इतर बरेच मेसेज....

दुसऱ्या दिवशी त्याचा मेसेज, "4 वाजता आपल्या नेहमीच्या जागी ये.. "

छान तयार होऊन गब्बू पोचते, नेहमीप्रमाणे 3.45 ला, आणि बबडू येतो, नेहमीप्रमाणे 4.50 ला.

"येडी झालीस काय तू? इतके मेसेज?"

ती: (चाचरत) संताकडे काय मागितलं माझ्यासाठी?
खाssड
तो: आपला सण नाही तो आ#*@%. उगा परदेशी थेरं नाही करायची.
ती: (लाल झालेला गाल चोळत) सॉरी. पण तू दिसला मला व्हीडिओ मध्ये..
खाssड.
"माझ्यावर लक्ष ठेवतेस #@*? मर तिकडेच.."
.
.
ती दुसरा गाल चोळत जाणाऱ्या बबडूकडे पाहत राहिली..

घरी गेल्यावर तिने त्याला कॉल केला, ब्लॉक.. dp दिसत नव्हता म्हणजे तिथेही ब्लॉक. साधे मेसेज केले, पण रिप्लाय नाही..

असेच पाच दिवस गेले. तिने पुन्हा त्याला मेसेज कॉल केला नाही. काही दिवसांनी त्याने स्वतःहून कॉल केला.
"काय करतेस?" तो...

समाप्त.
अजिंक्यराव पाटील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults