एक गाव असही: भाग 2

Submitted by प्रिया खोत on 27 October, 2019 - 22:44

ज्योती जवळपास तासभर चालतच होती, दोन्ही बाजूने जंगल आणि त्यात अंधारलेलला रस्ता ती पूर्ण घाबरली होती. मनात फक्त देवाचं नाव घेणचं चालू होत ती मनोमन देवाला सांगते पोहोचव एकदाच घरी बहुतेक देवाने पण तिची हाक ऐकली असावी थोड्याच वेळात गाव दिसायला लागत. ती थोडं सामान मोठ्या मामाकडे देते आणि बारक्या मामांकडे जाते तिकडे सामान ठेवते आणि गप्प झोपते कोणाशी काही बोलत नाही की काहो खात-पित नाही.
कधीच इतका उशीर न झोपलेली मुलगी अजून उठली नाही म्हणून बारकी मामी तिला उठवायला जाते तर ती थंडीने कुडकुडत असते मामी तिला हाथ लावून बघायला जाते तर तिला एक झटका मिळतो.
तिची मामी बुआ वैगरे काही नसते पण तिला असल्या गोष्टी समजत होत्या. तिला कालचा घडला प्रकार पूर्ण समजला नसला तरी 'ज्योती कुठे तरी घाबरली आहे तिची नको असलेल्या कोणाबरोबर तरी भेट झाली आहे' हे मामीच्या लक्षात आलं होतं. मामी लगेच तिच्यावरून मंतरलेला लिंबू उतरवून टाकते आणि देवाचा अंगारा लावते. थोड्या वेळात ज्योती उठते मामी ज्योतीला काळ काय झालं ते विचारते पण तिला काहीच माहीत नसतं ती बाजूच्या गावातून चालत जात 'हाल' ला येत असते इतकंच तिला आठवत असत.

------------**********-------------

हालच्या गावातला अजून एक किस्सा आहे थोडा गमतीदार पण भयंकर.
त्या गावात एक खाडी आहे असं मी मागच्या भागात सांगितलं होतच, मासेमारी हा तिकडच्या लोकांचा छंदआणि जोडधंदा पण. तिकडे गावकरी दिवसा तर मासेमारी साठी जायचेच पण कित्येकदा रात्रीच्या वेळेत जायचे खेकडी पकडायला ( बत्तीवर).
बत्तीवर म्हणजे ते टॉर्च घेऊन न जाता, कंदीलच घेऊन जायचे म्हणून बत्ती म्हणतात. जाताना सोबत कोयती घेऊन जायचे.
कितीजण बत्तीवर जात आहेत ते थोड्या- थोड्या वेळाने मोजायचे त्याला एक विशेष कारण होत.
कधीतरी एकाच ठिकाणी त्यांना खूप खेकडी मिळायची इतकी की त्यांनी आणलेल्या पिशव्या भरून जायच्या. बत्तीवर जाणारे हे अनुभवी असल्याने पुन्हा कितीजण आहेत ते मोजायचे आणि त्यांच्यात तेव्हा एक जण वाढलेला असायचा. कोण असायचा ते माहीत नसायचं मग अश्या वेळी घाबरल की संपलं. म्हणूनच ते खुप शिव्या घालायचे आणि एखाद्या खेकड्यावर कोयतीनें मारायचे.
खेकड्यावर मारलं की सर्व खेकडी आणि तो अनोळखी माणूस सर्वच गायब.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users