लहान मुलांचा आई वडिलांशिवाय परदेशी प्रवास

Submitted by बुन्नु on 25 October, 2019 - 14:53

माझ्या ४ वर्षाच्या पुतणीला पुढच्या उंन्हाळी सुट्टीमध्ये अमेरिकेला बोलावत आहे. प्रवासात (येताना आणि जाताना) ती तिच्या आजी आजोबांबरोबर येणार आहे. तिचे आई वडील सोबत नसताना ती प्रवास करू शकते का आणि त्यासाठी काय नियम आहेत. कोणकोणत्या कागद पात्राची पूर्तता करावी लागेल?

आई वडिलांचा पापोर्ट नसल्यास व्हिजा साठी काय अडचणी येऊ शकतात. कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

४ वर्षांची म्हणजे खूपच लहान आहे एकटीने प्रवास करायला. माझं मूल असतं तर मी तरी नसतं पाठवलं. आणखी थोडं थांबल्यास तिला तिची ट्रिप, आठवणी लक्षात राहतील. सध्या तिच्या तिकीटाचा खर्च मला तरी ‘वेस्ट ऑफ मनी‘ वाटतोय स्पष्ट सांगायचं तर..

आजी आजोबांबरोबर ठिकाय की. सीटमध्ये तिच्या शेजारी कोणाला तरी म्हणजे आजी किंवा आजोबांना बसू द्यात. एकटीला परक्या व्यक्तीच्या शेजारी अजिबात बसवू नका. अजिबात!!

<<< सध्या तिच्या तिकीटाचा खर्च मला तरी ‘वेस्ट ऑफ मनी‘ वाटतोय स्पष्ट सांगायचं तर. >>>
हौसेला मोल नसतं.

हौसेला मोल नसतं. >> +1
आणि इथून २ मुलांना भारतात नेण्यापेक्षा एका मुलीला तिथून इथे आणायला पण परवडत की.. Happy

४ वर्षांची म्हणजे खूपच लहान आहे एकटीने प्रवास करायला. माझं मूल असतं तर मी तरी नसतं पाठवलं. आणखी थोडं थांबल्यास तिला तिची ट्रिप, आठवणी लक्षात राहतील. सध्या तिच्या तिकीटाचा खर्च मला तरी ‘वेस्ट ऑफ मनी‘ वाटतोय स्पष्ट सांगायचं तर..>> सल्ल्याबद्दल आभारी आहे. सायो आपल म्हणणं पटतंय पण तिचे आई वडील दोघेही नोकरी करतात आणि आजी आजोबांच्या गैरहजेरीत, मुलांना पाळणा घरात ठेवणे आमच्या घरात कुणालाच पसंत नाही. म्हणून थोडी हौस आणि थोडी सोय असा सगळा मामला आहे..

सामो, ती जाताना एकटी जा णार आहे आणि परतीचा प्रवास आजी आजोबांबरोबर असं बुन्नू यांच्या लिहिण्यावरुन वाटलं आहे.

सामो, ती जाताना एकटी जा णार आहे आणि परतीचा प्रवास आजी आजोबांबरोबर असं बुन्नू यांच्या लिहिण्यावरुन वाटलं आहे. >> दोन्ही प्रवासात आजी आजोबा सोबत असणार आहेत..

मी दोन वर्षांचा असताना एकट्याने मुंबई ते अमेरिका प्रवास केला होता. तिकडे व्यवस्थित फिरून वैगरे एकटा परत पण आलो होतो.

@बोकलत हो हो मला आठवते... तुम्हाला कडेवरच घेऊन हवाई सुंदरी विमानात सगळीकडे हिंडत होती.

नंतर भारतात आल्यावर तुम्ही तिला सोडतच नव्हता. तिच्याच घरी जाण्याचा हट्ट धरून बसला होता. संपूर्ण मुंबई विमानतळाचा स्टाफ तुमची समजूत काढत होता. त्याच गडबडीत दाऊद इब्राहीम दुबईला पळाला. नंतर ती हवाई सुंदरी नोकरी सोडून संन्याशिण झाल्याचे ऐकले होते.

मला नाही वाटत त्या लहान मुलीला आई वडीलांशिवाय प्रवास करायचा व्हिसा मिळेल. जर आजी-आजोबांचं जाण नक्की असेल तर डेकेयर/ baby-sitting अश्या पर्यायांची आत्तापासून सवय आणि तयारी केलेली बरी. शिवाय कितीही मुलांना आजी-आजोबा/ सांभाळणारी बाई सवय असली तरी रोज आई-वडील यायच्या वेळेस मुलं वाट पाहतात. अमेरिकेत येणार म्हणजे कमीतकमी दोन महिने प्लॅन तरी असेल, इतके दिवस मूल आई- वडिलांशिवाय राहणे अवघड आहे. विचार जितका सोपा आहे, तितकं सोपं नाही. अर्थात मूल जर आई- वडिलांपासून वेगळे आजी-आजोबांबरोबर नेहमीच 24x7-365 राहत असेल आणि आईवडील वर्ष-सहा -तीन महिन्यातून एकदा भेटत असतील तर मग ठिक आहे.

Bunnu तुम्ही कायदेशीर बाबी/इमिग्रेशन याची पूर्ण माहिती घ्या. अमेरिकेत शिरताना इनिग्रेशन ऑफिसर कसून चौकशी करेल कारण एव्हडे लहान मूल आई वडिलांशिवाय येणार, चाईल्ड ट्रॅफिकिंग वगैरे अँगलने ते बघणार. तेव्हा सोबत काय काय कागदपत्रे हवीत याची नीट माहिती घ्या.

US CBP

कुठल्या देशातून प्रवास आहे ह्याचा पण विचार करायला लागेल. देशाप्रमाणे कायदे वेगळे आहेत. युरोपात वेगळे कायदे आहेत. माझी मुलगी १३ वर्षांची असताना शाळेच्या ग्रुपबरोबर फ्रान्स आणि इंग्लंडला गेली होती. तेव्हा आम्ही दोघांनी नोटरी केलेले कंसेंट लेटर, दोघांच्या पासपोर्ट कॉपिज, विसा कॉपीज पाठवल्या होत्या.

मी हे केलेलं आहे. माझ्या ४ वर्षाच्या भाच्याला घेऊन अमेरिकेतून पुण्याला गेले आहे. तेव्हा माझ्या बहीणीनी आणि मेव्हण्यानी एक जॉईंट अ‍ॅफीडेवीट बनवून दिले होते की ते दोघांच्या संमतीनी त्याला माझ्या बरोबर पाठवत आहेत वगैरे.

मुलं पळ्वून नेणे, ह्युमन ट्रॅफिकींग वगैरेच्या केसेस होतात त्यासाठी ही खबरदारी घ्यावी लागते.

गंमत म्हणजे माझ्या बहीणीला स्वतःच्या मुलाला घेऊन जाताना देखील असं अ‍ॅफीडेवीट घेऊन जावे लागायचे. कारण ती मराठी. पासपोर्ट तिच्या माहेरच्या नावाचा. नवरा कानडी. त्याला फॅमिली नेम नाही. मुलाच्या पासपोर्ट्वर त्याचं नाव आणि वडलांचं नाव. आई व मुलगा यांच्या नावात कुठलाही कॉमन धागा नाही. तेव्हा तिचाच मुलगा हे प्रूव्ह करणारा लेखी पुरावाच नाही.

तेव्हा वरील केसमधे आजी आजोबांबरोबर जरुर पाठवता येईल, खबरदारी म्हणून एक अ‍ॅफीडेवीट जवळ ठेवावे.

मी गेले तेव्हा माझ्याबरोबर माझी दोघं मुलं पण होती. आमच्या तिघांचं एकच फॅमिली नेम आणि या भाच्याचं पूर्ण वेगळं. तेव्हा लॉस अ‍ॅजेलिसच्या पासपोर्ट चेकींगवाल्याला मी आपणहूनच हे अ‍ॅफिडेवीट दाखवून केस जस्टीफाय केली होती. ही घटना १४ वर्षांपूर्वीची आहे.
भारतात कुणीही कसलीही चौकशी केली नाही.

आई वडिलांचा पापोर्ट नसल्यास व्हिजा साठी काय अडचणी येऊ शकतात. >>जजमेंटल वाटल्यास माफ करा, पण आपले मूल जिथे जात आहे तिथे आजारपण/ अपघात असा कठीण प्रसंग ओढवल्यास आपण अनेक दिवस आपल्या मुलापर्यंत पोहोचू शकणार नाही असा प्रश्न पडला नाही का?

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. दोन वर्षांपूर्वी माझी बायको आणि मुलगी येथून भारतात गेल्या होत्या, त्यावेळी मी सोबत नव्हतो पण खबरदारी म्हणून मी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, नोटरी करून दिले होते. आतार्यंतच्या काढलेल्या माहितीनुसार फक्त हेच डॉक्युमेंट लागेल असे दिसते. आजी आजोबा आणि तिचे आडनाव सारखेच असल्याने जास्त प्रश्न उद्भवणार नाही असे वाटते. पण या बाबती त कुणाला अनुभव असल्यास विचारावे म्हणून हा धागा काढण्याचा विचार आला.
आता राहिला भावनिक मुद्दा, आई वडिलाच्या शिवाय २ महिने राहू शकेल का? आजारी पडली तर किंवा कधी आई वडिलांची खूप आठवण आली तर काय? या सगळ्या मुद्द्यांवअर विचार सुरू आहेच. यावर उत्तर सापडणे सोप्पे नाही हे खरं. पण ती दिवसभर ती आजी आजोबा यांच्या बरोबर राहतं असल्याने आणि माझ्या मुली तिच्या वयाच्या असल्या कारणाने जास्त त्रास होणार नाही अशी आशा आहे. पण पूर्ण आत्मविश्वास आल्या शिवाय तिकीट काढणार नाहीच.

बाकी हा मुद्धा पण लक्षात आणून दिल्ाबद्दल पुनश्च आभार.

हाब +१
बुन्नू,
हाबनी मांडलेला मुद्दा खूप महत्वाचा आहे. तसेही एवढ्या लहान मुलीला आईवडीलांशिवाय अमेरीकेचा विसा मिळणे कठीण आहे. इथल्या कायद्याच्या दृष्टीने आई-वडील-मूल हे एक कुटुंब. तुमची पुतणी जरी एकत्र कुटुंबात आजी आजोबांसोबत रहात असली, आजी -आजोबा बघत असले तरी ते मुलीचे मुख्य पालक नाहीत. त्यामुळे विसासाठी अर्ज करताना मुलीचे आईवडील आणि मुलगी असा अर्ज करावा.

हायझेन्बर्ग, स्वाती २ यांना +१११
आपलेच अपत्य असल्याने वेळप्रसंगी अमेरिकेत लगेच जाता यावे यासाठी आईवडीलांनीही तातडीने पासपोर्ट व व्हिसा करावा. त्याशिवाय खरे म्हणजे मुलाला/मुलीला सोबत आजीआजोबा असले, अमेरिकेत काका-मावश्या असल्या तरीही पाठवू नये असं मला वाटतं.

पण तिचे आई वडील दोघेही नोकरी करतात आणि आजी आजोबांच्या गैरहजेरीत, मुलांना पाळणा घरात ठेवणे आमच्या घरात कुणालाच पसंत नाही. म्हणून थोडी हौस आणि थोडी सोय असा सगळा मामला आहे..>>>
आई वडीलांना एक एक महिना रजा टाकता येणार नाही का ? आणि एक महिना आईचे आई वडील राहू शकतील का येवून. तीन महिने अशा प्रकारे निघून जातील.
माफ करा मला कल्पना आहे हे सगळीकडे शक्य नाही. पण थोडीशी अशी अ‍ॅरेजमेंट आम्ही करून सासु सासर्‍यांना इकडे अडीच महिन्यासाठी बोलावल. म्हणुन सुचवलं. छोट गाव असल्याने डे केअरचा ऑपशन नव्हता आणि सासु /सासर्‍याना मग येताच येत नव्हत इकडे. म्हणुन अशी काहीशी अ‍ॅडजस्टमेंट केलेली.

आजी आजोबा शाररिकदृष्ट्या सक्षम आहेत का? अमेरिकेपर्यंतच्या पूर्ण प्रवासात किमान १६ ते २४ तास मुलीची काळजी घ्यायला? मुलं आल्या नंतर आजी आजोबांची तब्येत बरी नसली तर तुम्ही त्या मुलाला वेळ देऊ शकणार का? तुम्हाला त्या मुलाचा आणि त्या मुलाला तुमचा लळा आहे का?

ह्या प्रश्णांचे उत्तर होय असेल तर आई वडिलांचे एफिडेव्हीट लागते. तुम्ही इन्वाईट करणार तर तिला आम्ही परत सोडू आणि त्याची जबाबदारी आमची असे लेटर लागते तुमच्यकडून, त्यात ख्रिस्मससाठी, वाढदिवसासाठी किंवा इतर साजेश्या प्रसंगासाठी येतेय वै लिहू शकता. अमेरिकेच्या इन्श्युरन्स बद्दल महीत नाही, युरोपात मी प्रायव्हेट इन्श्युरन्स काढा असे सजेस्ट केलं असतं. आजारपणात त्या मुलाला व्हिजीट विसावर काय सेवा उपलब्ध असतील ह्याचा अंदाज घ्या.

तिसरा ऑप्शन म्हणजे तिच्या आई वडिलांपैकी कोणी सुट्टी घेऊन ८ - १५ दिवस येऊ शकणार असेल तर यावं मुलीला सेटल करून जावं.

दुसरा ऑप्शन म्हणजे एकट्या मुलाला आणू नये.

आई वडीलांना एक एक महिना रजा टाकता येणार नाही का ? आणि एक महिना आईचे आई वडील राहू शकतील का येवून. तीन महिने अशा प्रकारे निघून जातील.>> हा छान उपाय सुचवला आपण

जाईजुई >> प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
तुम्हाला त्या मुलाचा आणि त्या मुलाला तुमचा लळा आहे का? हो. वर म्ह्टल्याप्रामाणे माझ्या दोन मुली पण त्याच वयाच्या आहेत. तो एक कंफोर्ट फॅक्टर आहे.

ह्या प्रश्णांचे उत्तर होय असेल तर आई वडिलांचे एफिडेव्हीट लागते. तुम्ही इन्वाईट करणार तर तिला आम्ही परत सोडू आणि त्याची जबाबदारी आमची असे लेटर लागते तुमच्यकडून, त्यात ख्रिस्मससाठी, वाढदिवसासाठी किंवा इतर साजेश्या प्रसंगासाठी येतेय वै लिहू शकता. अमेरिकेच्या इन्श्युरन्स बद्दल महीत नाही, युरोपात मी प्रायव्हेट इन्श्युरन्स काढा असे सजेस्ट केलं असतं. >> उन्हाळी सुटीसाठी बोलावत आहोत असे लिहिणार आहे. इन्शुरन्स नक्की घेणार आहे.

आजारपणात त्या मुलाला व्हिजीट विसावर काय सेवा उपलब्ध असतील ह्याचा अंदाज घ्या.>> ह्याची माहिती काढतो

तिसरा ऑप्शन म्हणजे तिच्या आई वडिलांपैकी कोणी सुट्टी घेऊन ८ - १५ दिवस येऊ शकणार असेल तर यावं मुलीला सेटल करून जावं. >> हा पण चांगला उपाय आहे पण अंतर आणि खर्च लक्षात घेता कठीण दिसतंय, तरी विचार करतो.