भाजप नेमक्या कोणत्या वाटेवर आहे?

Submitted by अजिंक्यराव पाटील on 23 October, 2019 - 13:14

आजच 2 व्हिडिओ बघण्यात आले. त्यातला पहिला व्हिडिओ tv9 मराठी या news channel चा असून, पुण्यात फिरत असणाऱ्या एका पत्रकाची त्यात बातमी होती. पत्रकातील मजकूर फार संतापजनक आहे. तो मजकूर मायबोलीवर प्रकाशित करण्यायोग्य आहे की नाही याबद्दल साशंक असल्याने इथे देणार नाही, परंतु सारांश सांगायचा झाल्यास त्या पत्रकातून जिजाऊ, शाहू महाराज आणि महात्मा फुलेंचा अपमान केला आहे. मराठा, बहुजन, व दलित समाजाची मक्तेदारी (?) पक्षी त्यांच्याच भाषेतील शिवशाही पुण्यातून उखडून टाकून पेशवाई पुन्हा आणणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

आणि दुसरा व्हिडिओ बघितला आपले राजमान्य खासदार रावसाहेब दानवेंचा. जालना जिल्ह्यातील कठोरा बाजार या मुस्लिमबहुल भागात प्रचारासाठी गेलेल्या दानवेंनी त्या भागात चालणारे अवैध धंदे, भ्रष्टाचार वगैरेंना आपला कसा पाठिंबा आहे ते तर जाहीर केलंच शिवाय "मी असेपर्यंत गोहत्या बंद होऊ देणार नाही" हे देखील आश्वासन दिलं.
आणि विशेष म्हणजे त्यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर घुमजाव केलं असलं तरी ते फक्त गो हत्येच्या संदर्भातील वाक्यावर केलं आहे, म्हणजे चंदनतोड आणि इतर अवैध धंदे गोहत्येपेक्षा किरकोळ आहेत का यांच्या लेखी?

भाजपाची ओळख हिंदुत्ववादी आणि मुस्लिमविरोधी होती आजवर, आता ती जातीयवादी- पक्षी ब्राम्हणवादी झाली आहे का? मुस्लिमांना जवळ करणं स्वागतार्ह असलं तरी भर सभेत गुन्ह्यांना पाठीशी घालणं हे कितपत योग्य आहे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पत्रक वगैरे काय भाजप न छापलं का? की कोणी छापलं?

तो दानवेंचा व्हिडिओ जरा उशिराच व्हायरल झाला नाही का??

जातीयवादी- पक्षी ब्राम्हणवादी झाली आहे का?
>> अय्यो? हे त्यात नवीन काय? स्थापनेपासूनच शेटजी भटजी लोकांचा पक्ष म्हणतात भाजपला ला? नै का??

>>> आजच 2 व्हिडिओ बघण्यात आले. त्यातला पहिला व्हिडिओ tv9 मराठी या news channel चा असून, पुण्यात फिरत असणाऱ्या एका पत्रकाची त्यात बातमी होती. पत्रकातील मजकूर फार संतापजनक आहे. तो मजकूर मायबोलीवर प्रकाशित करण्यायोग्य आहे की नाही याबद्दल साशंक असल्याने इथे देणार नाही, परंतु सारांश सांगायचा झाल्यास त्या पत्रकातून जिजाऊ, शाहू महाराज आणि महात्मा फुलेंचा अपमान केला आहे. मराठा, बहुजन, व दलित समाजाची मक्तेदारी (?) पक्षी त्यांच्याच भाषेतील शिवशाही पुण्यातून उखडून टाकून पेशवाई पुन्हा आणणार असल्याचे आश्वासन दिले आहे. >>>

असले कोणतेही पत्रक माझ्या ऐकण्यात/पाहण्यात नाही. फडणवीस सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्याची दाट शक्यता असल्याने संभाजी ब्रिगेडसारख्या विकृत जातीयवादी संघटनेला संताप अनावर झाला असावा व त्यांनीच ही अफवा पसरवलेली असावी. वातावरण गढूळ व्हावे हा यामागे उद्देश असणार.

>>> जालना जिल्ह्यातील कठोरा बाजार या मुस्लिमबहुल भागात प्रचारासाठी गेलेल्या दानवेंनी त्या भागात चालणारे अवैध धंदे, भ्रष्टाचार वगैरेंना आपला कसा पाठिंबा आहे ते तर जाहीर केलंच शिवाय "मी असेपर्यंत गोहत्या बंद होऊ देणार नाही" हे देखील आश्वासन दिलं.
आणि विशेष म्हणजे त्यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर घुमजाव केलं असलं तरी ते फक्त गो हत्येच्या संदर्भातील वाक्यावर केलं आहे, म्हणजे चंदनतोड आणि इतर अवैध धंदे गोहत्येपेक्षा किरकोळ आहेत का यांच्या लेखी? >>>

दानवे हा गावठी वाचाळ असून भाजपत सुद्धा त्यांला कोणीही गांभिर्याने घेत नाही.

दानवे हा गावठी वाचाळ असून भाजपत सुद्धा त्यांला कोणीही गांभिर्याने घेत नाही. >> गावठी शब्द वापरण्याचे कारण?? ते ग्रामिण भागातून अले अहेत म्हणुन?? त्यांना फडण्२०/गडकरी यांच्या प्रमाणे शुद्ध प्रमाण भाषेत बोलत नाहीत म्हणुन की त्यांच्यावर 'संघसंस्कार' झाले नाहीत म्हणुन??

भाजप नेमक्या कोणत्या वाटेवर आहे तर विजयपथावर
आपल्यापैकी कोणाला कितीही वाईट वाटले तरी आजच्या घडीला ह्या क्षणाला देखिल भाजप सत्तेच्या वाटेवर आहे आणि तसे असल्यानेच बहुतेक सगळे मावळे आणि दस्तूरखुद्द छत्रपती देखिल भाजपाच्या गोटात आहेत.

पत्रकातील मजकूर फार संतापजनक आहे. तो मजकूर मायबोलीवर प्रकाशित करण्यायोग्य आहे की नाही याबद्दल साशंक असल्याने इथे देणार नाही, परंतु सारांश सांगायचा झाल्यास त्या पत्रकातून जिजाऊ, शाहू महाराज आणि महात्मा फुलेंचा अपमान केला आहे. >>>

काही भाजपीय लोकांकडे असलेले किमान सांसदीय शब्दात कमाल अपमान करण्याचे कसब पाहता ते मायबोलीवर प्रकाशित करण्यायोग्य नसलेले पत्रक ' त्या काही' जणांचे नसावे असा तर्क सर्वसामान्य नागरिकास देखिल नक्कीच करता येईल आणि ते पत्रक कोणाचे असावे हा ही.

>>> गावठी शब्द वापरण्याचे कारण?? ते ग्रामिण भागातून अले अहेत म्हणुन?? त्यांना फडण्२०/गडकरी यांच्या प्रमाणे शुद्ध प्रमाण भाषेत बोलत नाहीत म्हणुन की त्यांच्यावर 'संघसंस्कार' झाले नाहीत म्हणुन?? >>>

कोणतेही कारण समजावे.

सब चंगासी
सब अच्छा है
सर्व छान चालेल आहे
सगळे लय भारी आहे
सगळे मस्त मस्त सुरू आहे

मायबोलीवर प्रकाशित करण्यायोग्य नसलेले पत्रक ' त्या काही' जणांचे नसावे असा तर्क सर्वसामान्य नागरिकास देखिल नक्कीच करता येईल आणि ते पत्रक कोणाचे असावे हा ही.

नवीन Submitted by हर्पेन +७८६

>>>> ह्याह अ‍ॅटीट्युड ने भाजपची घसरगुंडी झाली >>>

चौथ्या क्रमांकावर जाऊन सुद्धा "पडलो तरी नाक वर" अशी कॉंग्रेसींची मानसिकता आहे.

कोणतेही कारण समजावे. >> ह्याह अ‍ॅटीट्युड ने भाजपची घसरगुंडी झाली

Submitted by चिवट on 24 October, 2019 - 16:10. >>>

च्यामारी, हे तर असं लिहायला लागलंय जणू अशोक चव्हाण मुख्यमंत्री नी राज ठाकरे उपमुख्यमंत्री बनणार.

काळबोकोबा तुम्ही शेवटी कुठे जाणार आहात? जन्नत मध्ये? अप्सरांसोबत रोमान्स करायला?

तर्र्र्र्र्र्र्र्र्ब, रतळ्याचं मताधिक्य कमी झालं ते दिस्लं नै का?

नवीन Submitted by चिवट on 25 October, 2019 - 11:20 >>>

चिवट , शेवटी दुसर्याचे आडनाव विक्रुत करण्याचे विक्रुत रक्तातले गुणधर्म दाखवलेच तु ! किती असंस्क्रुत आईबाप असतात चिवट लोकांना !

हिंदूच्या देवांचा राजा

उशिरा समजले
Lol

जन्नत मध्ये?

नुसते जन्नत नाही , जन्नत उल फिरदोस

जिन्ना (की जिन्न) ज्या मतदार सन्घात जिन्कायचा तिथे शिवसेना जिन्कली अशी बातमी आहे. ते हाय ते गझवा त्याचें काय होणार ?

>>> बिन लग्नाचे , बिन संसारी लोक शेवटी खड्ड्यात नैतर नदीत नैतर हिमालयात जातात, त्या दिशेने >>>

तो ५० वर्षांचा विदूषक रताळ्या कुठे जाऊन पडला ते समजलं.

इतरांना मंदबुद्दी म्हणायला शिक्वलं तेव्हा आपल्या आईबापांचे संस्कार आठवले नाइ का?

Submitted by चिवट on 25 October, 2019 - 14:15 >>>

कोणाला मन्दबुद्धी म्हटले ? तुला ?

हा हा हा, कशाला बॅकफूटवर जातोस यार. माझं नाव काय आहे ते माझ्या प्रोफाईल मध्ये आधीच लिहिलेलं आहे.

हिंदू च्या देव देवतावर टीका करणाऱ्या नी एक गोष्ट लक्ष्यात ठेवावी .
हिंदू धर्म मध्ये योग विद्या पासून काम विद्या पर्यंत सर्व आहे .
बाकी धर्म हिंदू धर्माच्या आसपास पण नाहीत .
सभ्यता सोडून आम्ही बाकी धर्माच्या देवाच्या दूता वर टीका केली तर तोंड लपवायला सुद्धा जागा राहणार नाही .
ह्यात मुस्लिम हे दिलदार
शत्रू आहेत .
पण नाव आणि आडनाव ९६ कुळी हिंदू चे घेवून फालतू कमेंट देत असेल तर उत्तर ऐकण्याची तयारी ठेवा .
नंतर अन्याय अन्याय म्हणून बोंब मारू नका.
पण नाव आणि आडनाव हिंदू चे घेवून हिंदू धर्मावर टीका करत असाल तर आम्ही सुधा सर्व सभ्यता सोडून तुमच्या वर टीका करू
तेव्हा अन्याय अन्याय म्हणून बोंब मारू नका

भाजपा बोकीलच्या 2000 च्या मार्गावर आहे,
2000 बायपास होता म्हणे आणि बंद होणार होता म्हणे, आता 2000 च मुख्य मार्ग झालाय

तसा मेगा भरती , जुमला, खोटारडेपणा हा बायपास म्हणता म्हणता मुख्य मार्ग झालाय,

नोव्हेम्बर आला, काळजी घ्या, 2000 च्या नोटा जास्त ठेवू नका, बोकील कधी बोकाळेल ह्याचा नेम नाही

Proud

नंतर अन्याय अन्याय म्हणून बोंब मारू नका.

करा करा,

फक्त सुरतेतुन मिठाईचा डबा आला तर तो तेवढा घेऊ नका, नैतर आमची करमणूक कोण करणार ?

Proud

ब्लॅक कॅट
तू संकरित आहेस .
नक्की तुझी जात कोणती हे तरी माहीत आहे का

माझी जात नन्तर बघ,

इतिहासात फक्त संकरितच टिकले आहेत, ब्राह्मण ब्राह्मण , मराठे मराठे लग्नाळलेले सगळे राजवंश निस्तेज व निर्वंन्श झाले, पेशव्याचा ब्राह्मण वंश बुडाला, तुमचे अनेक लाडके लोक बिन लग्न, बिन संसारी , उदा नथुराम , तेही तसेच गेलेत

संकरित मात्र टिकले, मोघल पुरुष व राजपूत स्त्रिया ह्यांच्यातुन आलेले वंश टिकले व दिर्घआयुषी झाले, मस्तानीचा वंश टिकला

गियाजुद्दीन गाझी उर्फ गंगाधर नेहरूंच्या वंशात तर किती भेसळ , जात , धर्म , गोत्र, देश , आगागागा !! लोक आजही नावे लिहून रंगीबेरंगी रेषा ओढून जात अन धर्म अन नागरिकत्व हुडकत असतात . Proud आता प्रियंकाचा मुलगा लंडनला शिकतो म्हणे.

संघ दीपस्तंभ हिटलर हाही स्वतः मिश्र संतती होता,

आणि महाभारतात , क्षत्रिय कुल संपले तर पोर काढायला व्यास आले तेही कोळ्याची मुलगी व ब्राह्मण ऋषी ह्यातून उपजले होते,

कोळीस्त्री ने भले भले व्यास जन्माला घातले आहेत , अनेक ब्रह्मर्षी , 100 कुळी अन गुजरातीही नतमस्तक होतात.
Proud

मी असे अन तसे जीवशास्त्राचाच विद्यार्थी आहे, 'संकरित' ही मला शिवी वाटायचे कारण नाही.

मित्रानो क्रुपया राजकीय वादात जातीवर जाऊ नका.

त्याशिवाय जो जुना धर्म तुम्ही आधी सोडून नवा धरलाय त्या जुन्या धर्माच्या उठाठेवी विनाकारण करण्याच्या फंदात पडू नका.

ती स्टोरी अशी आहे

Reportedly there was famous exchange between the prominent playwright George Bernard Shaw and the glamorous dancer Isadora Duncan on the topic of producing a child together. Duncan stated that Shaw had a magnificent brain and she had a glorious beauty; the combination would yield a remarkable child. Shaw replied with regret that he feared the result would embody his beauty and her brains.

https://quoteinvestigator.com/2013/04/19/brains-beauty/

पण बहुतेक काल्पनिक आहे,

ते नाव मला निंफदोरा टोंक सारखे वाटले,
यु नो हू देखील हायब्रीड होता

पैसा खाणाऱ्या लोकांचा पक्ष अशी कॉंग्रेस ची बदनामी करुन भाजप त्याच वाटेवर चालला आहे.

मी असे अन तसे जीवशास्त्राचाच विद्यार्थी आहे, 'संकरित' ही मला शिवी वाटायचे कारण नाही.

ना घर का ना घाट का
असे मला म्हणायचे आहे.

आणि ते समोरच्या ला सुद्धा माहीत आहे पण वेड घेवून पेडगाव ला चाललंय

जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली आहे. धक्कादायक म्हणजे यातील एका चालकाने पोलिसांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भाजप नगरसेवक व ठेकेदार कुलभूषण पाटील यांच्यावर संघटित गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवताना वाळू वाहतूक करणारे पाच डंपरदेखील पकडण्यात आले आहेत. ( Girna River Illegal Sand Mining Latest News Updates )

https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/illegal-sand-minin...

SAVE_20201127_204853.jpeg

वाटचाल

गेल्या २९ डिसेंबर रोजी रात्री यासंदर्भात पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात राजेश काळे यांच्याविरोधात फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर मंगळवारी सकाळी राजेश काळे सोलापूरहून पुण्याला जात असताना वाटेत टेंभुर्णीजवळ शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना सोलापुरात आणल्यानंतर अटकेची कारवाई पूर्ण झाली.

उपमहापौर काळे हे आपल्या संवैधानिकपदाचा गैरवापर करून बेकायदा कामे करण्यासाठी पालिका प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करीत आहेत. तसेच ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करून बदली करण्याचीही धमकी देत असल्याचे उपायुक्त पांडे फिर्यादीत म्हटले होते. भाजपाचे मजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे कट्टर अनुयायी समजले जाणारे उपमहापौर काळे यांनी गेल्या आठवड्यात जुळे सोलापुरात एका सामूहिक विवाह सोहळ्यासाठी महापालिकेचे साहित्य वापरण्यास पालिका परिमंडळ अधिकाऱ्यांना फर्मावले. परंतु हे काम बेकायदा असून करता येत नाही म्हणून समजावून सांगितले असता संबंधित अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याच संदर्भात थेट पालिका आयुक्त शिवशंकर यांनाही काळे यांनी अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर उपायुक्त धनराज पांडे यांना त्यांच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधित बेकायदा कामे करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. पांडे यांना त्यांच्या बदलीसाठी पाच लाखांची खंडणीही मागितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

https://www.loksatta.com/maharashtra-news/solapur-bjp-deputy-mayor-rajes...

SAVE_20210105_203622.jpeg

सु. स्वामी शिवसेनेतर्फे राज्यसभेवर कधी जाताहेत याची वाट पहातेय मी.

मला मोदी एकाच गोष्टीसाठी आवडतात - त्यांनी अरूण शौरी आणि स्वामींना मंत्रीमंडळाच्या बाहेर ठेवलं.

कर्नाटकचा लक्ष्मन सवादी हा भाजप आमदार विधानसभेत अश्लील चित्र पहाताना सापडला

पुढच्या निवडणुकीत तो पडला

मग भाजपने त्याला विधानपरिषदेत पाठवला , ह्या नव्या आमदारकीत तो सरकारी डिझेल चोरून स्वतःच्या गाडीत भरताना सापडला

स्वछ भारत अभियान

<< मला मोदी एकाच गोष्टीसाठी आवडतात - त्यांनी अरूण शौरी आणि स्वामींना मंत्रीमंडळाच्या बाहेर ठेवलं. >>

-------- मला मोदी आवडतात कारणा त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांना सक्तीची निवृत्ती दिली. Happy

अडवाणी यांनी मोदींना २००२ मधे वाचविले... पुढे मोदीं यांनी अमितजी शहा, अजय कुमार भिस्त किंवा सर्वांचे लाडके योगी, देशभक्त प्रज्ञासिंह ठाकूर असे एकसे एक महारथी आणि कर्तुत्वसंपन्न लोकांना पक्षात स्थान दिले.

सामान्य भारतीय माणसाची आणि शेतकर्‍यांची फरफट होत असली तरी आज पक्षाची भरभराट आहे.

So true

आपला पक्ष म्हणजे संपूर्ण मराठी समाज, चार राजकीय विरोधक आणि मोदीजींनी योग्य जागी बूच लावल्यामुळे ज्यांचे काळे धंदे बंद झालेत ते म्हणजे सामान्य भारतीय, आलिशान गाड्यातून येवून दोन दोन महीने स्वताच्याच शेतीकडे न फिरकले तरी चालणारे काही सधन शेतकरी आणि अडते म्हणजे फरफट होत असलेले शेतकरी अशी ज्यांची लबाड समजूत आहे त्यांना खरीखुरी जनता निवडणुकीतुन बरोबर त्यांची जागा दाखवत असते. Proud

<< लबाड समजूत आहे त्यांना खरीखुरी जनता निवडणुकीतुन बरोबर त्यांची जागा दाखवत असते. >>

----------- सहमत, निवडणूकीत जनता दाखवते. पण पुलवामा सारख्या घटना घडवल्या जातात. सगळे स्क्रिप्ट आधी तयारच असते. हजारोंच्या संख्येने आय टी सेल कार्य करते आहे.... खोट्या प्रचाराचे कार्य अहोरात्र करत आहे हेच सर्व काही सांगते.

या शेतकर्‍यांना दिल्ली मधे येण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाय योजले. आपल्याच लोकांवर लाठी हल्ला, वॉटर कॅनन चा वापर, रस्ते खोदणे... खंदक... आदी उपाय. असा कठोरपणा चीनसमोर दाखवला असता तर ? पण नाही गलवान क्षेत्री कुणी घुसले नाही असेच शिफारस पत्र चीनला दिले.

Happy

Pages