Facebook चे जग

Submitted by प्रिया खोत on 21 October, 2019 - 09:52

त्या दिवशी मला फेसबुक वरच्या कोणत्यातरी एका पेज वरची पोस्ट वाचण्यापेक्षा कंमेंट वाचण्यात जास्त इंटरेस्ट वाटत होता. पोस्ट आठवत नाही कोणती होती ते पण त्याच्यात कंमेंट होत्या त्या पोस्ट ला अनुसरून अजिबात न्हवत्या. कंमेंट वाचायला खूप मज्जा येत होती म्हणून मी दुसऱ्या दिवशी पण त्याच पेज वर गेली पुन्हा तसच पोस्ट ला अनुसरून कंमेंट न्हवत्याच.
२-३ दिवस कंमेंट वाचून मी ठरवल मी पण त्यात कंमेंट करिन रोज कंमेंट वाचून नाव ओळखीची झाली होती, जेव्हा मी कंमेंट दिली त्यावेळी इतक्या फास्ट कंमेंट येतं होत्या की रिप्लाय दिलेली कंमेंट खूप लांब निघुन जात होती...नवीन होती खूप गंमत वाटत होती अगदी मज्जाच चालू होती. मग हळू हळू रोजच त्या पेज वर जायचं आणि टाईमपास करायचा चालू झालं अगदी कॉलेज च lecture बंक करून तिकडे बोलणं चालू झालं.
जवळपास ६ महिने एकमेकांशी फॅक्ट पोस्ट वर बोलल्या नंतर एकमेकांना request पाठवून फ्रेन्ड लिस्ट मध्ये ऍड झालो. हळूहळू पोस्टवरच चॅट massage इन्बॉक्स मध्ये चालू झालं. २०-३० जणांचा एक ग्रुप बनला. फ़ोन नंबर दिले गेले. आता मेसेज इन्बॉक्स मधल बोलणं फोनवर तासंतास चालू असायचे. मित्र कोण कुठचे तर पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले. भेटणं शक्य न्हवतच पण तरी फोन वर बोलायचं.
मग भेटणं चालू झालं जवळपास चे मित्र मैत्रिणी भेटायचो. आधी फॅक्ट मुली भेटल्या मग लग्नासारखे फॅमिली फँकॅशन मध्ये आमंत्रण देणं लग्नांना जण चालू झाल.
आता फेसबुक वरची ओळख फेसबुकवर कमीच व्ह्यायला लागली आणि फोन वर व्हाट्सएपवर जास्त असायची. कधी हे अनोळखी मित्र आयुष्यातला एक भाग बनले समजलच नाही. अगदी काहीही आणि कसही बोलू शकतो असते मित्र.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users