अनंत प्रेमचक्र अर्थात The Infinite loop of love भाग 3

Submitted by शुभम् on 14 October, 2019 - 22:51

अनंत प्रेमचक्र अर्थात The Infinite loop of love भाग १

https://www.maayboli.com/node/71968
अनंत प्रेमचक्र अर्थात The Infinite loop of love भाग २

https://www.maayboli.com/node/71975

3

चौथी वेळ होती ही . तीन वेळा प्रीतीचा मृत्यू रवीने पाहिला होता . कसं सांगावं त्याला कळत नव्हतं . या वेळेला त्याने मनाशी निर्धार केला . ज्यावेळी त्याला जाग आली , तो पुन्हा एकदा प्रीती समोर होता ....
व ती त्याला त्याला I love you म्हणत होती ....
त्याने तिला तिथेच थांबवलं .
" I love you priti and I want to marry with you .... त्यावेळी त्याच्या मोबाइलची नोटिफिकेशन रिंग वाजली . त्याच्या मित्राचा मेसेज होता . त्याने त्याला लगेच माघारी फोन केला व बोलावून घेतले .
" कोणाला बोलवतोयस ... " प्रीती
" प्रीती मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे . आपल्यापुढे एक फार मोठी अडचण आहे . ती कशी सोडवायची हे मला कळत नाही .
" काय बोलतोयस काय...? एवढा कशाला घाबरतोयस.....? नक्की अडचण तरी काय आहे सांगशील का मला....? आधी मला सांगण्याच्या अगोदर कोणाला फोन करून बोलावून घेतलय....? "
तो अस्वस्थ होत होता. झालेल्या सर्व घटना ह्या दोघांनाही कशा सांगायच्या हा विचार त्याच्या मनात चालू होता . पुढे घडणाऱ्या घटनांमुळे त्याला घाम फुटला होता . अस्वस्थपणे तो इकडे तिकडे फेर्‍या मारत होता

" काय चाललय रवी तुझं ...? प्रती
" प्रीती तुला कसं सांगु हे कळत नाही , आणि तुला खरं वाटणार नाही . त्याच त्या घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत . आणि पुन्हा पुन्हा तुझा मृत्यू होत आहे...।
" काहीही काय बोलतोयस वेड्यासारखा....
काहीही नाही बोलत Time loop असतो ना त्या Time loop मध्ये आपण अडकलोय .
" काहीही काय बोलतोय हा काय hollywood चित्रपट आहे का. ...
" प्रीती मी खोटं कशाला बोलेन . तीन वेळा , तीन वेळा या सर्व घटना घडल्या आहेत . या वेळेला फक्त मी जरा वेगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत ....
" म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच त्या गोष्टी घडत आहेत . मग मला का काही आठवत नाही . फक्त तुझ्याच कसं लक्षात आहे सारकाही....?
" ते मलाही माहीत नाही पण मागच्या तिन्ही वेळेस , ज्यावेळी तुझा मृत्यू झाला त्या वेळी सर्व काही घटना पुन्हा सुरू झाल्या ....
" रवी काहीही बोलू नकोस बास झाली चेष्टा ....
" प्रीती मी खोटं का बोलू आणि तेही तुझ्या मृत्यूच्या बाबतीत .... तुला माहित आहे ना माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते....
" बरं , मला व्यवस्थितपणे सांग काय झालं ते...?

तोपर्यंत नेहमीप्रमाणे घडणाऱ्या न घटना घडतच होत्या . बाजूच्या खोलीत क्या हुआ तेरा वादा हे गाणं वाजून गेलो होतं . स्टडी रूम मधील खिडकीच दार जोरात आपटला होतं आणि आता दारावरती थाप पडली होती आणि पिझ्झा बॉय डिलीव्हरीसाठी आला होता . रवीने पिझ्झा घेतला व दार लावणार तेवढ्यातच संकेत त्या ठिकाणी आला . संकेतला आत घेत रवीने दार लावले . संकेतला पाहताच प्रीतीचा पारा वर चढला . ती रागाने पाय आपटत आतल्या खोलीत गेली . संकेत ओशाळून बाजूला होत बसला . रवी प्रतीची मनधरणी करायला तिच्या मागोमाग गेला . संकेतला बाहेरून त्यांचे संवाद तुटकपणे ऐकू येत होते....
" तो काय करतोय येथे , तू त्याला कशाला बोलावलं ....?
" तो माझा मित्र आहे आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे . तो आपल्याला मदत करू शकतो .
" पण तुला माहित आहे त्याने काय केलं होतं .... त्याला बघितलं की मला सारं काही आठवतं .... अजूनही मी त्या गोष्टी पूर्णपणे विसरू शकले नाही ....
" जुन्या गोष्टी आहेत त्या . आणि त्यामुळेच मी त्याला बोलावाले . काहीही केलं तरी त्याचं तुझ्यावरती प्रेम होतं , कधीकाळी . अजूनही तो माझा जवळचा मित्र आहे . माझं ऐक जुन्या गोष्टी विसरून जा आणि खरच मोठ्या अडचणीची वेळ आहे ....
अजूनही बऱ्याच वेळ ते दोघे काहीबाही बोलत होते . संकेत बाहेर बसून नाही ऐकण्याचा प्रयत्न करत होता . पुन्हा एकदा तो भूतकाळात जाऊन आला . भूतकाळात झालेल्या त्या जखमा अजूनही ताज्या होत्या . तिच्या बोलण्याने त्या जखमांवर मीठ चोळलं गेलं . नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याने ते हळूच टिपले . त्याने काही झालं नाही असं दर्शवत शांतपणे बसून . काही वेळानंतर ते दोघेही बाहेर आले . प्रीती त्याच्याकडे बघण्याचे टाळत होती . ज्यावेळी तिची नजर त्याच्यावरती पडली त्या नजरेतला तिरस्कार बघून त्याच्या काळजाचं पाणी झालं . तोही तिच्या नजरेला नजर देण्याचे टाळू लागला .
" ही चौथी वेळ आहे ...... रवी बोलू लागला . तो दोघांनाही सर्व काही समजावून सांगत होता .
" पहिल्या वेळेला ज्यावळ हे सर्व काही झालं , त्या वेळेसही प्रीतीचा मृत्यू झाला होता पण जोपर्यंत मी तिचं शव पाहिलं नाही तोपर्यंत हा घटनाक्रम पुन्हा सुरू झालं नाही . दुसऱ्या वेळेलाही तिचा मृत्यू झाला पण जोपर्यंत मी तिचं शव पाहिलं नाही तोपर्यंत हा घटनाक्रम पुन्हा सुरू झाला नाही . दोन्ही वेळेस मी तिच्याबरोबर नव्हतो मात्र तिसऱ्या वेळेस मी पूर्णवेळ तिच्याबरोबर होतो . आणि तिसऱ्या वेळेस ज्यावेळी तिचा मृत्यू झाला त्यावेळी मी तिच्याबरोबर होतो आणि त्यावेळी लगेच हा घटनाक्रम पुन्हा सुरू झाला ....
आणि रवीने घडलेल्या घटना संकेतला सांगितल्या त्यावर ती संकेत म्हणाला
" म्हणजे हा Time loop आहे आणि ज्या ज्या वेळेस तिचा मृत्यू होतो त्या वेळेस reset होतो ... Edge of tomorrow या चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे टॉम क्रूझच्या मृत्यूनंतर time loop reset होतो त्याप्रमाणे प्रीतीचा मृत्यूनंतर हा time loop रिसेट होत असावा ....
पण तू हे खरंच सांगतोय ना उगाच आमची चेष्टा करायचो म्हणून सांगतोय. ... " संकेत रवीला म्हणाला
" प्रीती शपथ नि तुझ्या शपथ ... तुमच्या दोघांची शपथ घेऊन सांगतो... मी खोटं का बोलेन....
" पण माझाच मृत्यू का होतोय ...? आणि माझ्याच मृत्यूनंतर टाईम लुप रिसेट का होतोय आणि बाकीचं कोणाला काही आठवत नाही , फक्त तुलाच का आठवत आहे....? " इतका वेळ शांत असलेली प्रीती म्हणाली .

" एक मिनिट , पहिल्या दोन वेळेस प्रीतीचा मृत्यू अगोदर झाला होता पण जोपर्यंत तू तिचं शव पाहिलं नाही तोपर्यंत टाईम लूप रीसेट झाला नाही , बरोबर...
संकेत विचार करत म्हणाला....
" बरोबर .... रवी म्हणाला
" म्हणजे जोपर्यंत तुला जाणवत नाही तिचा मृत्यू झाला तोपर्यंत हा time loop चालू राहील ... पण ज्यावेळी तुला जाणवेल त्यावेळी तो पुन्हा एकदा याठिकाणी चालू होईल ....
" पण मला एक कळत नाही प्रितीचाच का मृत्यु होतोय....? आणि प्रीतीच्या मृत्युनंतरच हा time loop का reset होतोय ....
" टाइम ट्रॅव्हल करण्याच्या बऱ्याच संकल्पना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत आणि त्याचे होणारे परिणाम आणि तयार होणारे paradox यांची ही बरीच वर्णने आहेत . आईन्स्टाईनच्या मतानुसार टाईम हे आपले फोर्थ डायमेन्शन आहे . आपण जसं लांबी रुंदी आणि उंची हे म्हणतो त्याप्रमाणे टाईम हे चौथे डायमेन्शन आहे जे फक्त एकाच दिशेने प्रवास करते ते म्हणजे भविष्याच्या .... पण टाइम ट्रॅव्हल जर शक्य असेल तर कोणीतरी भविष्याततून भूतकाळात किंवा भूतकाळातून भविष्यात जाऊ शकते . पण टाइम ट्रॅव्हल करणे हे वैश्विक शक्तीशी खेळण्यासारखे आहे .... संपूर्ण विश्व हे स्पेस आणि टाईम याभोवती केंद्रित आहे . स्पेस टाइम चा अभ्यास म्हणजे या विश्वाचा अभ्यास आहे ज्यावेळी आपण स्पेस टाईम मध्ये निपुन्य मिळवू त्यावेळी आपण विश्वातील प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करू शकतो....
" संकेत मला माहित आहे तुला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि म्हणूनच मी तुला बोलवल पण सरळ सरळ आणि साध्या सोप्या भाषेत सांग काय चाललं आहे ते...? रवी त्याच्या शास्त्रीय बोलण्याला वैतागून म्हणाला ...
" सांगतो सांगतो... अशी कल्पना कर की तुला टाइम ट्रॅव्हल करणे शक्य आहे , आणि तो भूतकाळात गेला . तुझ्या वडिलांचा जन्म होण्याअगोदर तू तुझ्या आजोबाला मारून टाकलं तर काय होईल....
रवी म्हणाला " मग माझे वडील जन्मणार नाहीत आणि वडील जर जन्मले नाहीत , तर मीही जमणार नाही आणि मी जर जन्मलो नाही तर मी भूतकाळात कसा जाईन ....
" तेच म्हणतोय मी . हाच grandfather paradox आहे आणि याची वेगवेगळी उत्तरे दिली जातात त्यातले एक उत्तर आपल्या सिच्युएशनला लागू पडतय .. ते उत्तर म्हणजे सेल्फ कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल ( self consistency principle ) . साध्या सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे ज्यावेळी तु भूतकाळात गेला आणि तू तुझ्या आजोबाला मारलं त्याअगोदरच तुझ्या वडिलांचा जन्म झाला असेल , किंवा तू आजोबा म्हणून दुसऱ्यालाच मारलं असेल किंवा अशी काहीतरी घटना घडेल की जेणेकरून तू तुझ्या खऱ्या अजोबाला मारूच शकणार नाही....
" म्हणजे नक्की काय म्हणाचय तुला... " रवी म्हणाला
" मला हेच म्हणायचं आहे की सेल्फ कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल मुळेच हा टाइम लूप वारंवार रिसेट होत आहे . तिच्या मृत्यूला कोणीतरी भविष्यातील व्यक्ती कारणीभूत असावी . नैसर्गिक रित्या प्रीतीच्या मृत्यूची अजून वेळ आली नसावी . त्यामुळे हा टाइम लूप प्रीतीच्या मृत्यूनंतर रिसेट होतोय जेणेकरून आपण त्या मारेकऱ्याला शोधू शकू व त्याला थांबवू शकू....
" मी काही टर्मिनेटर मधील सारा कॉर्नर नाही जिचा मुलगा जॉन कॉर्नर आहे व तो टर्मिनेटर विरुद्ध युद्ध लढत आहे . मला कोण येणार आहे भविष्याततून मारायला.... तुम्ही दोघेही वेढ्यासारखे बोलत आहात ....
त्याचवेळी दारातून एक गोळी सुसाट वेगात आलु व प्रीतीच्या मस्तकातुन बाहेर निघाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला . रवीला काही कळण्याअगोदर तो टाईम लूप पुन्हा एकदा सुरू झाला होता . त्याच्यासमोर प्रीती होती व ती I love you म्हणत होती ...

4

त्याने डोळे उघडले. त्याच्यासमोर प्रीती होती . ही पाचवी वेळ होती . मागच्या चारही वेळेस त्याने प्रयत्न करूनही त्याला यश आले नव्हते . चौथ्या वेळेस त्याला आशा होती , मात्र चौथ्या वेळेस प्रीतीचा सरळ सोट खून झाला होता . ते सर्वजण बेसावध असताना येऊन लागलेल्या गोळी मुळे प्रीतीचा मृत्यू झाला होता . आता त्याला कल्पना आली होती , कोणीतरी नक्कीच प्रीतीचा जीव घेण्यासाठी उतावळं होतं . आता बेसावध राहून चालणार नव्हतं . आतापर्यंत हा टाईम लूप रिसेट होत होता . पण कधीपर्यंत होईल आणि कधीपर्यंत त्याला घडलेल्या गोष्टी आठवत राहतीलल हे काही सांगता येत नव्हतं . त्याने लगेच फोन करून संकेतला सांगितले . मागच्यावेळी प्रीतीचा अचानक झालेला खून आठवला . त्यामुळे अधिक सुरक्षा म्हणून ते दोघेही संकेतच्या खोली वरती गेले. दोघांनीही मागच्या वेळेस सारख्याच प्रतिक्रिया दिल्या . प्रीती रागाने रुसून आत गेली . रवीने तिला समजावून बाहेर आणलं . दोघांचा संवाद ऐकून संकेतला वाईट वाटले . नकळत त्याचे अश्रू पुन्हा एकदा टपकले . .पुन्हा एकदा रवीने दोघांना घडलेल्या सर्व घटना सांगितल्या . मागच्या वेळेस संकेतने सांगितलेली स्पष्टीकरणे व टाईम लूप रिसेट होण्यामागची कारणे रवीने पुन्हा एकदा सांगितली . सारं काही ऐकून झाल्यावरती संकेत बोलू लागला ..
" तुझ्या म्हणण्याप्रमाणे मागच्या वेळेस तुमच्या खोली वरती तिचा खून झाला होता म्हणजे जो कोणी खूनी आहे त्याला तुमच्या बाबतीत सारी माहिती आहे याचा अर्थ त्याला हे घर ही माहित असणार . त्यामुळे ही जागा ही सुरक्षित नाही . आपल्याला अशी जागा हवी आहे जी अजून आपल्यालाही माहीत नाही त्यामुळे जो कोणी कोणी असेल त्यालाही ती कधी सापडणार नाही . बाकीच्या गोष्टींची चर्चा आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर करूया , आणि जर खून करणारा भविष्यातून येत असेल तर त्याला घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी माहीत असतील , त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट विचार करून करावी लागेल . आणखी एक गोष्ट म्हणजे जर सेल्फ कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल मुळे हा लुप रिसेट होत असेल तर जो कोणी प्रीतीला मारायला भविष्यातून आलाय त्याच्या बाबतीतही हा लूप रिसेट होतच असणार . ज्यावेळी तो भविष्यतून आपल्या वेळेत येतोय आणि प्रीतीला मारण्याची वेळ , यामध्ये जेवढा कालावधी आहे तेवढ्याच कालावधी साठी हा लूप रिसेट होतेय . ज्या वेळी तुमच्या दोघांचा संवाद चालू होता त्यावेळी पहिल्यांदा तो भविष्यातून आला . पहिल्यांदा भविष्यातून आल्यानंतर त्याने प्रीतीला मारण्याचे प्रयत्न चालू केले . पहिल्या दोन्ही वेळेस तो यशस्वी झाला पण लगेच लूप रिसेट झाला नाही कारण रवीला प्रीतीच्या मृत्यूची जाणीव नव्हती . याचा अर्थ मृत्यू थांबवण्यासाठी कोणीच नव्हते . पण ज्यावेळी रवीला कळले की प्रीतीचा मृत्यू झाला आहे त्यावेळी तो मृत्यू टाळता यावा यासाठी हा टाईम लूप रिसेट झाला . या साऱ्यातून एक गोष्ट नक्की जो कोणी आहे तो प्रीतीला मारण्यासाठी येत आहे आणि जोपर्यंत त्या मारेकऱ्याला आपण मारत नाही किंवा थांबवत नाही तोपर्यंत हा टाईम लूप रिसेट होतच राहणार . त्यामुळे तर आपल्याला हा टाईम लूप थांबवायचा असेल तर त्या मारेकऱ्याला शोधून त्याचा निकाल लावणे आवश्यक आहे ....

त्यानंतर संकेतने त्याच्या दोन-तीन मित्रांना फोन केले . आणि एक नवीन जागा शोधून काढली . तिघेही गपचूप त्या जागेकडे निघाले . ते तिघेही त्या ठिकाणी पोहोचले . एक छोटीशी रूम होती . रूम मध्ये गेल्या गेल्या संकेतने दार लावून घेतले .
" आपल्याला जर त्या व्यक्तीला पकडायचं असेल तर आपल्याला ती व्यक्ती माहीत असणं गरजेचे आहे . प्रीतीला भविष्यतून मारायला कोण येऊ शकतो याचा विचार करणे आवश्यक आहे ....
" तूच आला असशील भविष्यातून मला मारण्यासाठी , तसेही मला मारण्यासाठी तुझ्याकडे भरपूर कारणे आहेत...
" प्रीती काहीही काय बोलतेस तो मदत करतोय आपली ....
" It's ok ravi , बोलू दे तिला तुला दुखावण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता पण तुला वाईट वाटलं असेल तर मी काय करू ... आणि तू काहीही केलं तरी तुझ्या सुखाची अपेक्षा करणारा मी माणूस आहे . तू सुखी राहावं हेच मला वाटतं . तू रवी बरोबर आनंदी होतेस हे जेव्हा मला कळले तेव्हा मी आनंदाने रवीला परवानगी दिली....
" तू कोण रवीला परवानगी देणारा .... प्रीती पुढे काहीतरी बोलणार होती पण रवीने तिला शांत करत एका बाजूला बसवले ....
" असं कोणी आहे का ज्याला प्रीतीचा खरंच राग आला असावा आणि तो इतका हुशार असावा की तो टाईम मशीन बनवू शकत असावा किंवा इतका चतुरा असावा बनवलेले टाईम मशीन वापरू शकत असावा.....
संकेत विचार करत म्हणाला .
" तूच आठव यार , तुम्ही दोघे लहानपणापासून सोबत आहात . तुला माहित असेल कोणाबरोबर तिचे भांडण वगैरे झाले आणि इतका हुशार कोण आहे...

" तसे एक किस्सा लक्षात राहण्यासारखा आहे . अजूनही माझ्या लक्षात आहे . तो किस्सा आठवला की अजूनही मी हसत सुटतो . आम्ही बहुतेक तिसरीला असू , लहानपणी प्रीती खूप जाड होती . तिला बरेच जण चिडवायचे आणि रागीटही फार होती आताही आहेच म्हणा . पण त्यावेळी तर फारच रागीट होती . पण तिला कोणी चिडवले की त्याच्या अंगावर धावून जायची . त्यावर्षी सातवीत असताना एक नवीन मुलगा आमच्या शाळेत आला होता . त्याला फारसं काही महत्त्व माहीत नव्हतं . पण बाकीच्या मित्राने त्याला फुस घातली . त्यामुळे तो प्रीतीला चिडवून गेला . प्रीती त्याच्या अंगावर धावून गेली आणि त्याला चांगलाच मार दिला . त्याची तब्येत फारशी नव्हती . तब्येतीने साधाच होता . त्यामुळे त्याने तिच्या हातचा मार खाल्ला . त्याची शाळेत भलतीच नाचक्की झाली . तो हुशारही होता भरपूर पण एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी तो असं काही करेल असं वाटत नाही . ....
" नाव काय त्याच तो सध्या काय करतो ....
" मला माहित नाही त्याचा संपर्क राहिला नाही त्याचं नाव काहीतरी होत वेगळंच , मला काही नाव आठवत नाही . प्रीतीला आठवत असेल एखाद्यावेळेस...
रवीने प्रीतीला विचारलं की तिने त्याचं नाव सांगितलं ...
" महेंद्र स्वामीनाथन ... त्याचे वडील सरकारी कामगार त्यावर्षी बदली होऊन नवीनच आले होते . त्यामुळे तो आमच्या शाळेत आला होता . नंतर तो निघूनही गेला....
रवी ने लगेच मोबाईल काढला फेसबुक वरती त्याचं नाव सर्च केलं . नेहमीप्रमाणे फेसबुक वरती हजारो नावे आली . त्यातून पाहिजे त्या महेंद्र स्वामीनाथ शला शोधणं सोपं नव्हतं . इकडे संकेतने गुगल वर ती त्याचं नाव सर्च केलं आणि पहिल्याच सर्च रिझल्टला त्याचा फोटो झळकला . संकेत ने त्याला बरोबर ओळखलं .
तो मोठ्याने वाचू लागला ...
" Mahendra Swaminathan is youngest person in the world to become CEO of company like Futuristic Technology pvt .. आणखीही बरंच काही वाचल्यानंतर शेवटी तो म्हणाला ...
" महेंद्रने कंपनीचा सीईओ झाल्यानंतर बोललेले वाक्य
' I have faced humiliation in my whole life but now I can answer those losers with my success....
" म्हणजे तो विसरणारा नाही हे मात्र आपल्याला कळलेले आहे... रवी म्हणाला .
संकेत मात्र काहीतरी वाचण्यात गुंग होता .
" अरे ही फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी कंपनी ही काही शुल्लक नाही . जगभरात त्यांच्या ब्रांच आहेत आणि हो हा त्या कंपनीचा सीईओ आहे म्हटल्यानंतर त्याला काहीही शक्य . भविष्यात या कंपनीला काहीही शक्य आहे आत्ताच जगातील सर्वात प्रॉडक्टिव कंपनी म्हणून तिची नोंद आहे .... पण एवढ्या शुल्लक कारणासाठी तो प्रीतीच्या मागं लागेल हे काही पटत नाही ...
संकेत म्हणाला .
" अरे लहानपणाच्या गोष्टी लोक खुप लावून धरतात . काही काही महाभाग असतात असे ..
" तरीही ती काही फार मोठी गोष्ट नव्हती रे , तिच्या गोष्टीसाठी त्यांना टाईम मशीन चा शोध लावा आणि प्रीतीला मारायला माघारी याव तेही या वेळेला न की बालपणी.....
" मग तो आला नसेल तर दुसरं कोणीतरी आला असेल आणि त्याची मदत त्याने घेतली असेल..... आठवण प्रीती तुझ्या हातून कोणाचा चुकून अपमान वगैरे झाला असेल तर केव्हा इतर काही गोष्टी झाल्या असतील तर.....
" माझ्याकडून सगळ्यात जास्त अपमान तर फक्त संकेतचा झाला आहे .... झाला आहे म्हणण्यापेक्षा सगळ्यात जास्त तापमान तर मी फक्त संकेतच केला आहे ... मला तर अजूनही वाटते की त्यानेच हे षडयंत्र रचलं असावा . आपल्या दोघांचं लग्न करायचं ठरलं होतं आणि आपलं भविष्यात लग्न झाला असेल आपण दोघे सुखाने राहत असणार . आपल्या दोघा विषयी इतकी माहिती इतर कोणाला माहित आहे ...? त्यामुळेच भविष्यातला संकेत नेमका याच वेळी भूतकाळात आला असावा , ज्यावेळी आपल्या दोघांची लग्नाविषयी चर्चा चालू आहे .....
प्रीतीच ऐकून रवीही संकेतकडे संशयाच्या नजरेने पाहू लागला . त्याचवेळी खोलीच्या दारावर ती जोरजोरात थापा पडू लागल्या एक जोरात हिसका बसून धार मागे तूटून पडले . दारातून एक तोंडावरती रुमाल बांधलेली व्यक्ती आत आली .
संकेत कडे पाहत ती म्हणाली ...
" Thanx for your help ...
तो आवाज मानवी नव्हता . कोणत्यातरी रोबोटने बोलल्याप्रमाणे येत होता . त्यामुळे तो आवाज पुरुषाचा आहे की स्त्रीचा हे ओळखणे अवघड होते . त्याने बंदूक काढत प्रीतीवरती निशाणा धरला . रवी वाटेत आढावा येण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याने रवीला लाथाडत मागे ढकलून दिलं व प्रीतीवरती गोळ्या झाडल्या ....
Time loop पुन्हा एकदा रिसेट झाला होता . मात्र या वेळेस फक्त रवीच नाही तर अजून एकालाही मागील time loop मधील गोष्टी आठवत होत्या ...
क्रमःश

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे! उत्कंठा अजून वाढलीये.

बाकी edge of tomorrow सिनेमा पाहिला पाहिजे आता. कारण टाईम लूप / टाईम ट्रॅव्हल माझाही आवडता विषय आहे. Happy

जबरदस्त!!
तुमचा आज एक चाहता वाढला..
@शुभम, कृपया विचारपुस बघा.

सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद .....
Time loop चे बरेच चित्रपट आहेत काही comedy आहेत काही थ्रिलर आहेत
, death punch , happy death day ......
time loop movies search kara google varti ,
Time loop comedy movies पण भारी आसतात

तर केव्हा इतर काही गोष्टी झाल्या असतील तर.....
" माझ्याकडून सगळ्यात जास्त अपमान तर फक्त संकेतचा झाला आहे .... झाला आहे म्हणण्यापेक्षा सगळ्यात जास्त तापमान तर मी फक्त संकेतच केला आहे ..>>>>>> इथे थोड लक्ष द्या........ बाकी कथेला तोड नाही... येऊद्यात पुढील भाग लवकर.... पू. ले. शू