भारत का दिल देखो : चाशनीवाले कंज अर्थात् पाकातली कमळे (पाककृती)

Submitted by मनिम्याऊ on 13 October, 2019 - 10:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

परत एकदा घेऊन आलेय कमळ फ़ूलाची पाककृती.

चाशनीवाले कंज . कंज म्हणजे स्थानिक भाषेत कमळ.

मागे एकदा लिहिल्याप्रमाणे मध्य भारतात कमळाची उपलब्धता भरपूर. आणि कमळ हे श्रीपुष्प ज्याच्या प्रत्येक भागाचा काहीना काही उपयोग होतो. आज सांगते ती पाककृती तशी करायाला एकदम सोप्पी आणि तितकीच चवदार. पुन्हा एकदा बालाघाट स्पे.

IMG_20191011_121624_0.JPG

कमळ फूल 1
तांदूळ पिठी 1 वाटी
बेसन 1 चमचा
विलायची 2-3
बडीशेप 1 लहान चमचा
कलमी ¹/² इंच
चवीपुरते मीठ
साखर अर्धी वाटी

क्रमवार पाककृती: 

नवरात्रात घरी उमललेले कमळ 3 दिवसांनंतर पाकळ्या गाळू लागले तशा त्या पाकळ्या काढून स्वच्छ धुवून घेतल्या
IMG_20191013_135208.JPG

विलायचीचे दाणे, कलमी आणि बडीशेप खलबत्यात घालून बारीक कुटून घेतली.
IMG_20191013_134953.JPG

एका वाडग्यात तांदूळ पिठी , बेसन, कुटलेला मसाला आणि चिमूट्भर मीठ घालून एकजीव करून घेतले. तांदूळ सुवासिक असल्यास उत्तम. मी चिन्नोर वापरला.
IMG_20191013_135129.JPG

थोडे थोडे पाणी घालत मिश्रण सैलसर भिजवून घेतले आणि 5 मिनिटे झाकून ठेवले.

एकीकडे साखरेचा पाक करून घेतला आणि तळणासाठी
तेल तापत ठेवले.

आता एक एक करून कमळ पाकळया मिश्रणात घोळवून घेतल्या आणि तेलात तळून घेतल्या
IMG_20191013_135111.JPG

थोडे थंड झाल्यावर पाकात सोडल्या. आणि थोड़े मुरताच गट्ट्म केल्या

IMG_20191013_135316.JPG

IMG_20191013_135031.JPG

वाढणी/प्रमाण: 
4
माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

कमळ फार सुंदर आहे.
आमच्याकडे गणपतीत 20 रु ला एक मिळतं,तेही इतकं सुंदर दिसत नाही.असं मस्त मिळालं तर भाजी करवणारच नाही.
पण पाककृती मस्त आणि हटके

सगळ्यांचे मनापासून आभार.
>>
हे पाहून लिझिकी च्या कमळाच्या फुलांच्या पाककृतीची आठवण झाली
Submitted by चिडकू on 13 October, 2019>>
हो. तो video बघितल्या पासून मलापण या पदार्थ पून्हा खायची जोरदार तल्लफ़ आली. म्हणून करून खाल्लाच Lol

कलमी म्हणजे काय? दालचिनी का?
Submitted by जिज्ञासा on 13 October, 2019 >>
हो. दालचिनीच

असं मस्त मिळालं तर भाजी करवणारच नाही.
Submitted by mi_anu on 13 October, >>
मुबलकता आहे म्हणून करतात इकडे. मी पण कधी विकत आणलेल्या कमळाची भाजी करणार नाही Happy

पाकृ गोडा ऐवजी नमकिन करता येईल का?
Submitted by पाथफाईंडर on 14 October, 2019>>
हो. भज्यांसारखे करता येते. बेसन जास्त घालायचे. तसंपण गोड तळण असेल तर तांदळाचे पीठ आणि नमकीन असेल तर बेसन वापरावे.

बळंच गोड काब्रे खाता. हटके आहे. आमच्याकडे फूल झाडावर आणि साखर दुकानात.
Submitted by अमा on 14 October, 2019>>
कधी कधी चालतं ना.. Lol Proud

काय सुरेख मांडणी केली आहे तुम्ही. ह्या प्रकाराबद्दल अजिबात माहित नव्हते. ओळख करूनदिल्याबद्दल आभआर.

छान पाकृ,
भजी प्रमाणे करून पाहीन कमळ फुलं इकडे मिळाली तर.