अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा तुम्ही मात कशी कराल?

Submitted by कॅपिटलिस्ट-बंड्या on 12 October, 2019 - 09:22

आजकाल अर्थव्यवस्था गाळात चालल्याच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येतायेत. लोक या बद्दल फार काही बोलताना दिसत नाही. टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रांवर भारतात आज काल बऱ्यापैकी सरकारचं नियंत्रण असल्यामुळे क्वचित कुठेतरी एखादी बातमी येते. मायबोलीवर समाजाच्या विविध स्तरांवर काम करणारे लोक आहेत. तुमचे या आर्थिक मंदीविषयी काय विचार आहे आणि ह्यातून बाहेर येण्यासाठी सरकारला काय करावे लागेल? आणि महत्वाचे म्हणजे वैयक्तिक रित्या या मंदीतून वाचण्यासाठी तुम्ही काय प्लांनिंग करत आहेत?

बाकी मंदीला काँग्रेस किंवा भाजप जबाबदार आहे ह्या छाप चर्चा होऊ नये अशी माफक अपेक्षा.

Group content visibility: 
Use group defaults

{माझ्या मिंत्राच्या कार्टमध्ये खूप लिप्स्टीक्स होत्या पण गेल्या काही महिन्यात मला त्या घ्याव्याश्या वाटल्या नाहीत. तेव्हाच मी ओळखलं की मंदी इज हियर.}

सई, मंदीच्या दिवसात लिपस्टिक चा खप वाढतो. तुम्ही लिपस्टिक घेतल्या नाहीत याचा अर्थ मंदी इज नॉट हियर.

https://www.investopedia.com/terms/l/lipstick-effect.asp

>>>मोदीजींनी घरोघर एल इ डी बल्ब वाटले त्याचाच हा परिणाम. किती बचत झाली.
शिवाय सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणेही वापरात आलीत.>>>>>>

अगदी बरोबर भरत,
त्यात या वेळी पावसाळा लांबला, म्हणजे ऑक्टोबर हीट मुले जे Ac पँख्यांसाठी वीज लागायची तो वापर कमी झाला,

पावसामुळे ५-६ महिने शेती पंप बंद होते , शेतीचे आणि पंपांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने अजून एक दोन महिने शेतीसाठी वीज वापरली जाणार नाही.

Nsso हे असले रिपोर्ट देऊच कसे शकते? ते बंद करू शकत नाही का? 2-3 वर्षे रिपोर्ट थांबवून काही होणार नाही. घटनादुरुस्ती केली पाहिजे. टिक टॉक असताना उगाच कशाला डेटा पाहिजे लोकांना?

सई, मंदीच्या दिवसात लिपस्टिक चा खप वाढतो. तुम्ही लिपस्टिक घेतल्या नाहीत याचा अर्थ मंदी इज नॉट हियर.<<<
असे पाश्चात्य नियम लागू होत नाहीत. लिपस्टिक चा भारतीय संस्कृती शी काहीही संबंध नाही. ओठ रंगवण्यास पान खाल्ले जायचे. पानपट्टी च्यां दुकानांचा खप वाढला असेल तरच मंदी आहे असे म्हणता येईल

जगात १ नंबरवर जायचं असेल तर जीडीपी पण १ टक्क्यावर गेला पाहिजे असं कोणीतरी मोदीजींना सांगितलंय...

अर्थव्यवस्थेची घागर बुडायला लागली असताना कांग्रेस पार्टी गांधी फॅमिलीला एस पी जी द्यायला पाहिजे म्हणून गहिवर घालतेय.

चिडकू तुम्हाला मी मोदी भक्त समजत होतो तुम्ही तर द्वेष्टे निघालात. डोक्यावर झूल घेऊन आतला द्वेष समोर आलाच शेवटी. घागर बुडू लागली आहे म्हणे! उत्तम चालू आहे सगळं. अमेरिकेचा ग्रोथ रेट कधी बघितलाय का किती आहे ते! आपल्या निम्मा असेल जेमतेम..इतके दिवस काँग्रेसी चायनाशी तुलना करायला लावायचे. आपण अमेरिकेशी तुलना केली पाहिजे. नंबर एक शी तुलना केली की खरी प्रगती होईल.

"वस्तू आणि सेवा कर संकलनातील तूट म्हणून केंद्र सरकारकडून अपेक्षित भरपाई मिळणे राज्यांना दुरापास्त होणार आहे. गेल्या काही महिन्यांतील अशी कोणतीही भरपाई देण्याबाबत वस्तू आणि सेवा कर परिषदेने असमर्थता दर्शविली आहे.
केंद्राने अद्यापही ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अप्रत्यक्ष कर संकलनातील तूट म्हणून विविध राज्यांना भरपाई दिलेली नाही. याबाबत केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली, राजस्थान, पंजाब या बिगरभाजपप्रणित राज्यांनी गेल्याच महिन्यात परिषदेकडे प्रश्न उपस्थित केला होता. या राज्यांतील करसंकलनाचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरत असल्याने या राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी केंद्राकडून भरपाई रुपात अर्थसहाय्य मागितले आहे."

याचा अर्थ काय लावायचा ते मला कळत नाहीए. यावरून मंदी नाही हे कसं सिद्ध करता येईल?

अमितव चुकून झाला. मला म्हणायचे होते अर्थव्यवस्थेच डंका त्रिभुवनात वाजू लागल्यामुळे कांग्रेस पार्टी गांधी फॅमिलीला एस पी जी द्यायला पाहिजे म्हणून गहिवर घालतेय.

रियल इस्टेटचे भाव अवाच्या सव्वा वाढले होते, फक्त गुंतवणूक म्हणून जो तो रियल इस्टेटच्या मागे लागला होता. आर्थिक दृष्ट्या रियल इस्टेट च्या मंदीचे स्वागत केले पाहिजे. कार्स चा खप गरज, रस्ते, पार्किंग नसताना खूप झाला तो आता थंडावला आहे. IBC मूळे बँकांच्या जीवावर चालणारी कार्पोरेट सेक्टरची चैन थांबली आहे. त्यात चीन व अमेरिकेचा आर्थिक तणाव भर घालत आहे. IT सेक्टर मध्ये खुप मोठे बदल होत आहेत. सर्व गोष्टीचा विचार केल्यास आपण फारच चांगल्या परिस्थितीत आहोत असे वाटते. महागाई दर आटोक्यात आहे, इंधनाच्या किमती आटोक्यात आहेत. NPA चा भस्मासुर पूर्वीपेक्षा बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. जोवर जागतिक प्रश्नांची सोडवणूक होईल तोपर्यंत भारतातहि बरेच चांगले बदल झाले असतील. पायाभूत प्रकल्पांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्या ह्या मंदीचे संधीत रूपांतर होऊ शकेल. खेळखंडोबा बद्दल बोलायचे तर जरा २०१४ आधीचे दिवस आठवून बघा.

मी वरची चर्चा वाचली नाही पण IT मध्ये जॉब चेंज करायचं असेल तर खूप वाईट परिस्थिती आहे का?
नवऱ्याला हाफिसात भयंकर मानसिक त्रास होतोय इतका की त्याच वजन कमी झालंय 5 एक किलोंनी.
त्यावर जॉब चेंज एवढा एकच उपाय दिसतोय.
पण नवरा म्हणतोय मार्केट खराब आहे जॉब मिळणार नाही.
त्याचा 15 वर्ष अनुभव आहे. He is into senior management.
कुणी ह्यावर प्रकाश टाकेल का?
जॉब पुण्यात हवाय.

भयंकर मानसिक त्रास होतोय तर मॅनेजमेंट सोडून प्रोग्रामिंग करायची तयारी आहे का?
दुसरा जॉब मिळणार नाही याचे कारण मुळात भारतात आय.टी. क्षेत्रात जे अव्वाच्या सव्वा पैसे मिळतात ते आर्थिकदृष्ट्या sustainable आहेत का? (आजच पेपरात वाचले की आय.आय.टीच्या ५ मुलांना १ करोड+ सुरुवातीचा पगार मिळाला.)

त्रास होत असेल तर थोडा फार कमी पगार असलेला जॉब देखील घेता येईल. आणि स्किल असतील आणि काम करायची तयारी असेल तर आयटी मध्ये कधीही जॉब मिळू शकतो.

थोडा फार कमी पगार असलेला जॉब देखील घेता येईल. >>प्रॉब्लेम पे पॅकेज चा नाहीय त्याच्या years of experience ला बाहेर किती opportunities आहेत ह्या बद्दल आम्ही साशंक आहोत.
आणि तो आता टोटल managerial rôle मध्ये आहे गेल्या 5 वर्षांपासून. टेक्निकल पेक्षा मॅनेजर रोल साठी opportunities कमी असतात हे वास्तव आहे. तो हिंजवडी स्थित MNC मध्ये आहे.
काय होतय बघू..

देशाच्या आजच्या मजबूत आर्थिक स्थितीचे श्रेय कुठल्या चाणक्याला द्यायचे? नाव फिक्स झाले की लगेच नोबेल किंवा भारतरत्न ची मागणी केली पाहिजे.

Pages