अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा तुम्ही मात कशी कराल?

Submitted by कॅपिटलिस्ट-बंड्या on 12 October, 2019 - 09:22

आजकाल अर्थव्यवस्था गाळात चालल्याच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येतायेत. लोक या बद्दल फार काही बोलताना दिसत नाही. टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रांवर भारतात आज काल बऱ्यापैकी सरकारचं नियंत्रण असल्यामुळे क्वचित कुठेतरी एखादी बातमी येते. मायबोलीवर समाजाच्या विविध स्तरांवर काम करणारे लोक आहेत. तुमचे या आर्थिक मंदीविषयी काय विचार आहे आणि ह्यातून बाहेर येण्यासाठी सरकारला काय करावे लागेल? आणि महत्वाचे म्हणजे वैयक्तिक रित्या या मंदीतून वाचण्यासाठी तुम्ही काय प्लांनिंग करत आहेत?

बाकी मंदीला काँग्रेस किंवा भाजप जबाबदार आहे ह्या छाप चर्चा होऊ नये अशी माफक अपेक्षा.

Group content visibility: 
Use group defaults

मला वाटतं ५ ट्रिलियन डॉलर चे ध्येय ठेवण्यापेक्षा आपण ५ ट्रिलियन रुपयांचे ध्येय ठेवले पाहिजे. लाल फडक्यात बजेट आणलं तसे डॉलर बदलून सगळीकडे रुपये केलं पाहिजे.
मला खात्री आहे ५ ट्रिलियन रुपये केलं की अचानक स्वदेशाभिमान जागृत होऊन ३ वर्षातच ध्येयपूर्ती होईल.

नक्षलवादाचा पण नायनाट झाला,
इतका नायनाट झाला की आता झारखंड मध्ये 100 सिट्सच्या विधानसभेचे शेड्युल 5 फेऱ्यांमध्ये आहे (कारण म्हणे ते जिल्हे नक्षलग्रस्त आहेत)

ट्रीकल डाऊन बद्दल काही ऐकलं नसेलच. बिल्डरला फायदा हा तद्दन मिडीयाचा साप साप करून जमीन धोपटण्याचा प्रकार आहे. बिल्डरला परवडलं की तो आपोआप ग्राहकांना परवडेल अशी घरे बांधेल.
हल्ली म्हणे घराच्या किमती कमी झाल्यात हे मीडिया गळे काढून सांगते. अहो तो मास्ट्रस्त्रोक आहे. सामान्यांना परवडेल अशा किमती ह्यात काय वाईट आहे??? काळया पैशाने तुंबाड भरलेले लोक हे! ह्यांना किंमत कमी झाली की वाईटच वाटणार.

>>> त्यामुळेच बहुतेक जय शहाच्या टक्कलावर केस आलेत. विकास! >>>

'टकलावर केस नाहीत म्हणून एखाद्याचं डोकं उडवायचं का?' असं लोकसभेत विचारल्यानंतर एका पंतप्रधानांना संताप अनावर झाला होता.

>>> Submitted by भरत. on 7 November, 2019 - 10:4३ >>>

बहुसंख्य जनतेला नोटाबंदीमुळे कणभरही त्रास झाला नाही व ते नोटबंदी केव्हाच विसरून गेले.

पण काही जणांना नोटाबंदीमुळे झालेलं भगेंद्र अजूनही बरं झालेलं नाही. बरे होण्यासाठी धनगराकडून औषध घ्यावे.

काळा पैसा फिरणारा व्यवसाय व लोक म्हणून तेंव्हा बिल्डर हाही एक रोषाचा टार्गेट होता ना ?

आज त्यांनाच मदत देणार ?

त्यांचा काळा पैसा कुजवला अन आता पांढऱ्या पैशातून त्यांच्या देवेंद्रा वर उपचार ?

इतकी positivity वाचायला किती छान वाटतं Happy मी रोज एकदा तरी ह्या धाग्यावर चक्कर टाकते, एकदम feel good!

नुसती चक्कर टाकू नका,
मंदी कशी नाहीये याचे पुरावे पण लिहीत चला, नाही तर हे मोदीद्वेषी लोक लोकांचे मंदी आहे मंदी आहे म्हणून ब्रेन वॉशिंग करतील,

अशावेळी त्यांचे म्हणणे खोटे आहे हे सिद्ध करणे (भले कितीही हास्यास्पद वाटणारे लॉजिक वापरायला लागले तरी) आपले कर्तव्य आहे.
जो पर्यंत आपला स्वतः चा जॉब जात नाही तो पर्यंत मंदी वगैरे सब झूट है

खरे तर मंदी चांगली आहे अर्थव्यवस्थेसाठी. त्यामुळे अर्थव्यवस्थेमधले बॅड ब्लड कमी होते.

हो नोटाबंदी म्हणजे डार्विनच्या सिद्धांताचा अर्थशास्त्रातला प्रयोग असं ते जग्गीकाका म्हणाले होतेच.
जे काम जीडीपीत मोजता येत नाही, ज्यांच्यामुळे सरकारला कर मिळत नाही त्याची गरज नाही.

मंदी काय अधून मधून येत जात असते. काळा पैसा सगळा लपवून ठेवलेला असतो. नोटबंदीमुळे तो चलनात आला आणि मंदी कमी झाली. नाहीतर भारताचं काही खरं नव्हतं. बेकारांचे लोंढे माणसं मारत फिरले असते गावोगावी

Calling all arthshastris.

Kon Haay Ka

https://scroll.in/latest/943845/economy-is-doing-fine-as-people-are-gett...

लोक लग्न करतायत, विमानतळ भरून वाहातायत, कुठे आहे मंदी,??
असेच रोखठोक प्रश्न विचारायची गरज आहे आज.
नाहीतर अंतर्वस्त्रांच्या खप घटला, लिपस्टिक चा खप घटला म्हणजे मंदी आली हो!!! असा बोभाटा करण्यात लोक पुढे असतात हल्ली

कोणीतरी विजेचा खप घटला अशी आकडेवारी काढलीय.
मोदीजींनी घरोघर एल इ डी बल्ब वाटले त्याचाच हा परिणाम. किती बचत झाली.
शिवाय सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणेही वापरात आलीत.

मंदी नसून भरभराटी आहे खरं तर. सरकारकडे चिक्कार पैसा असल्याने कार्पोरेट टॅक्स घटवला आहे.
ओला उबर एवढे वाढले आहेत आणि त्यांचे ड्रॅयव्हर्स एवढे गब्बर झालेत की ते गाड्या सरळ इम्पोर्ट करतात. त्यामुळे भारतात कार विक्री कमी झाली.

NSSO बंद करून टाकायला हवं.
बेकारीचे फसवे आकडे गोळा करून यांचं समाधान झालं नाही. आता ग्रामीण भागात कन्झ्म्प्शन घटल्याचं आणि ४० वर्षं जुन्या लेव्हलला गेल्याचं सांगताहेत.
हे लोक स्वत.च्या मेथड्स अपडेट करत नाहीत, म्हणून असं होतं.

अगदी. ट्रेनची रिझर्वेशन फुल झाली, एअरपोर्टवर गर्दी असली आणि मॅरेज रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये किती गर्दी झाली सारखी एकदम देशी, सबळ आणि जनतेशी नाळ जुळलेली (किती नाळा कापल्या हे ही एक घ्यायला हरकत नसावी) स्टॅटिस्टिकल माहिती न घेता तद्दन विदेशी किती मोटारी विकल्या गेल्या, टूथपेस्ट आणि साबणाचा खप किती वाढला असल्या अभारतीय वस्तू खपाच्या आकड्यांवर भारतीय अर्थव्यवस्था मोजणे यासारखी विनोदी अक्कल कोणाला सुचली असेल कोण जाणे. यात नक्कीच बाह्यशक्तींचा/ बलाढ्य भांडवलशाहीचा हात आहे.
आपल्या बाराबलुतेदार पद्धतीत हे आकडे न वाढताही सगळे सुखी होते. गांधीजी ही म्हणाले होते, खेड्याकडे चला. आपण जागतिक अर्थव्यवस्थेशी काडीमोड घेऊन आपल्या स्वयंपूर्ण गाव अर्थव्यवस्थेकडे लवकरात लवकर जायची अत्यंत गरज आहे. त्यासाठी या जीडीपी सारख्या तकलादू निकशांचा त्याग करणे ही पहिली पायरी असणार आहे.

अफाट चाललाय हा धागा. टेक अ बाव अमित आणि सिम्बा!
माझ्या मिंत्राच्या कार्टमध्ये खूप लिप्स्टीक्स होत्या पण गेल्या काही महिन्यात मला त्या घ्याव्याश्या वाटल्या नाहीत. तेव्हाच मी ओळखलं की मंदी इज हियर.

आमच्या घरातल्या रद्दीचा भाव पाच रुपये किलो झाला. तीन वर्षांपूर्वी दहा अकरा रुपये होता.
(रद्दीवाला सांगत होता की आता परदेशातून रद्दी आणि मेटल भंगार फुकट येते. शिवाय ते तिथून उचलण्याचे पैसे मिळतात. त्यामुळे होलसेल रद्दीवाल्यांची सद्दी संपलीय. तो आणखी पण काहीबाही - म्हणजे कुणाकुणाची दिवाळी निघालीत, वडापाववाले कसे झोपलेत वगैरे)
ता. क. - ही खरी ऐकीव गोष्ट आहे.

Pages