अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा तुम्ही मात कशी कराल?

Submitted by कॅपिटलिस्ट-बंड्या on 12 October, 2019 - 09:22

आजकाल अर्थव्यवस्था गाळात चालल्याच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येतायेत. लोक या बद्दल फार काही बोलताना दिसत नाही. टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रांवर भारतात आज काल बऱ्यापैकी सरकारचं नियंत्रण असल्यामुळे क्वचित कुठेतरी एखादी बातमी येते. मायबोलीवर समाजाच्या विविध स्तरांवर काम करणारे लोक आहेत. तुमचे या आर्थिक मंदीविषयी काय विचार आहे आणि ह्यातून बाहेर येण्यासाठी सरकारला काय करावे लागेल? आणि महत्वाचे म्हणजे वैयक्तिक रित्या या मंदीतून वाचण्यासाठी तुम्ही काय प्लांनिंग करत आहेत?

बाकी मंदीला काँग्रेस किंवा भाजप जबाबदार आहे ह्या छाप चर्चा होऊ नये अशी माफक अपेक्षा.

Group content visibility: 
Use group defaults

कोणाचाही जॉब गेला नाहीये. कोणाचीही बँक बुडाली नाहीये, कोणाला गाडी, घर विकावे लागले नाहीये, नुकतीच दिवाळीची खरेदी सगळ्यांनी भरभरून केली.
उगाच मंदी मंदी म्हणून ओरड करण्यात काही अर्थ नाही>> अहो ह्या सर्वांना सर्विस कर णारा पण एक कामगार वर्ग आहे वर लिहीले आहे तसे सिक्लिक ल व स्ट्रक्चरल कारणे आहेत. जग भर मंदी चालूच आहे खरेतर. काहीतरी ट्रिगर घटना घडल्यास ते वर येइल.

मेक इन इंडिया वगैरेचा काही फारसा परि णाम झालेला नाही.

कोणाचाही जॉब गेला नाहीये. कोणाचीही बँक बुडाली नाहीये, कोणाला गाडी, घर विकावे लागले नाहीये, नुकतीच दिवाळीची खरेदी सगळ्यांनी भरभरून केली.
उगाच मंदी मंदी म्हणून ओरड करण्यात काही अर्थ नाही>> अहो ह्या सर्वांना सर्विस कर णारा पण एक कामगार वर्ग आहे वर लिहीले आहे तसे सिक्लिक ल व स्ट्रक्चरल कारणे आहेत. जग भर मंदी चालूच आहे खरेतर. काहीतरी ट्रिगर घटना घडल्यास ते वर येइल.

मेक इन इंडिया वगैरेचा काही फारसा परि णाम झालेला नाही.

मंदी म्हणजे मागणी घटने का?
मोदी सरकारनी असे कोणते निर्णय घेतले त्या मुळे मागणी कमी झाली.
काँग्रेस सरकारच्या कोणत्या निर्णय मुळे मागणी भरमसाठ वाढली होती( म्हणजे तेव्हा मंदी नव्हती असं सांगतात काही जन )
बेरोजगारी आणि गरिबी भारताच्या पाचवीला पुजली आहे ती पहिली पण होती आणि आता पण आहे .
काय निर्णय घेतला तर जनता,उद्योगपती,शेतकरी,कामगार मालामाल होतील .
अर्थ विषयात जाणकार मंडळी व्यक्ती नुसार वेगवेगळे विचार मांडत आहे .
सामान्य माणसं ना फक्त पोटपुरते चार पैसे मिळावेत आणि शांतता असावी एवढीच माफक अपेक्षा असते .
आकड्यांच्या खेळातील त्याला काही समजत नाही आणि देणेघेणे सुध्दा नसतं .

मंदी म्हणजे उत्पादित मालाला उठाव नसणं. काळा पैसा जेवढा जास्त तेवढी मंदीची झळ कमी बसते. नोटबंदी मुळे काळ्या पैशावाल्यांनी गुंतवणुकीचे वेगळे पर्याय शोधून काढले. प्रॉपर्टी मार्केट सारख्या अनेक ठिकाणी पैसा गुंतवणं कमी झाले आहे. मोदी सरकारच्या काळात सगळ्यात हाल शेतकरी वर्गाला सहन करावे लागले आहेत.

सोमा
सहमत
ह्या angle नी कधी विचार केला नव्हता .
काळा पैसा मंदी ची झळ कमी करतो हे पटण्यासारखे आहे .
नोट बंदी ,आणि gst नी काळाबाजार नियंत्रणात
आणला .
नोट बंदी मुळे मंदी
आली हे आता व्यवस्थित समजले .
उघड कोण्ही बोलत नव्हतं .
आणि नोट बंदी मुळे .
जे उत्पादन सरकारच्या
नजरेत नव्हतं ते पण
रडार वर आले

५ रुपयाची थाली घेऊन १० रुपयाला विकावी
तीन लाख थाळ्या विकल्या की पंधरा लाख जमा

@सिम्बा तुमच्या वर्तुळामधले लोक खरंच सुदैवी आहेत. आणि दिवाळी हा महत्वाचा सण आहे. मुलांच्या आणि कुटुंबाच्या आनंदात कसर ठेवायची वेळ यावी अशी आर्थिक सुस्थिती तुमची आणि तुमच्या मित्रमंडळींची आहे हे चांगला आहे. बाकी मंदी चोरपावलाने येते, आणि आर्थिक कमकुवत लोकांना जाणवते. सध्या ग्राहक मूल्य निर्देशांक म्हणजे मराठीत कंझुमर प्राईस इंडेक्स हा होलसेल प्राईस इंडेक्स पेक्षा कमी आहे. याचा अर्थ महागाई नियंत्रणामध्ये आहे.
सध्या ऑईल ची किंमत कमी असल्याने २ लाख कोटी वर्षाला इतकी बचत होत आहे. परंतु ग्राहकांना हा फायदा मिळत नाहीये.
https://www.business-standard.com/article/economy-policy/india-to-save-r...
शेतमालाचे भाव विक्रमी कमी आहेत. वर कांद्यासारख्या वस्तू आयात करून सरकार कृत्रिम रित्या कमी ठेवतेय. त्यामुळे महागाई कमी आहे.
पण याचा अर्थ उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत उत्पन्न विकावा लागतंय. पण हे सगळं अतिशय गुंतागुंतीचे आणि मुख्यतः मनाला त्रासदायक आहे. त्यामुळे हे सगळं समजून त्रास होणार असेल तर त्यापासून दूर राहिलेले बरं. अज्ञानात जग सुखी असते आणि असा सुखी असणे चुकीचे नाहीये. बाकी ह्या सगळ्या माहितीचा उपयोग हा उद्योजक आणि बाकीच्यांना होऊ शकतो. त्यांनी समजून घेणे महत्वाचं आहे.

@हायझेनबर्ग गरीबी हटाव साठी फक्त अनुदाने देऊन फारसा फरक पडणार नाही. त्यासाठी बाकी इन्फ्रा देखील अनुकूल लागेल. शिक्षण वगैरे मध्ये अजून खूप पल्ला गाठायचा आहे. बाकी मंदीचा त्रास सर्वाना ह्या तुमच्या मताशी सहमत.

@राज इकॉनॉमी परत वर जाते पण गुंतवणुकीवरील परतावा कमी येतो. उदाहरणार्थ ५% व्याजाने पैसे घेतले असतील तर ५% परतावा एका वर्षात आला तर ० फायदा होईल आणि अर्थव्यवस्था जास्त काळ खाली राहिली तर हे व्याज वाढत जाते आणि परतावा कमी कमी होत जातो. आणि सायकल ने अर्थव्यवस्था जरी वर गेली आणि आपली अंतर्गत व्यवस्था सुधारली नाही तरी त्याचा हवा तितका फायदा होणार नाही. थोडी किचकट परिस्थिती आहे समजून घ्यायला.

@अमा मेक इन इंडिया मुख्यत्वे इन्फ्रा च्या अभावाने चालत नाहीये. उदाहरणार्थ एक स्पॅनिश कंपनी पुणे ते बंगलोर पार्टस रस्त्याने पाठवणे खर्चिक असल्याने (याला बरीच कारणे आहेत) इथला व्यवसाय बंद करून परत गेली.

@राजेश१८८ आणि सोमा मंदी म्हणजे उत्पन्न कमी होणे. यात कच्च्या मालाचे उत्पन्न कमी करावे लागणे (किंवा भाव न मिळणे ), कच्च्या मालाचे पक्क्या मालात कमी रूपांतर होणे आणि सर्वात शेवटी ग्राहकांनी तो माल घेणं या चक्रात कमी ट्रान्झेक्शन होतात. आणि सर्व संस्था आणि घटक एकमेकांशी जोडलेले असल्याने हि साथ पसरत जाते. चुकीची धोरणे हे सर्व घडवून आणण्यात उत्प्रेरक म्हणून काम करतात. नोटबंदी मुळे काळा पैसा कमी झाला आणि मंदी आली हे चुकीचे आहे.

@ऋन्मेष शिवसेनेचा हाच प्लॅन दिसतोय.

भावा तेच म्हटलं मी तयार मालाला उठाव नसणं. तयार माल कोणी घेत नसेल/ मागणी खूप कमी असेल तर कच्चा माल पडून राहील. कामगार कपात करावी लागेल. खर्च भागविण्यासाठी काटकसर करावी लागेल आणि तेही शक्य झाले नाही की टाळाबंदी.
काळा पैसा अर्थव्यवस्थेला बुस्टरचं काम करतो. क्रयशक्ती वाढून चलन फिरत राहते. इन्कमटॅक्स बंद केला तर अर्थव्यवस्था जोरात धावेल हेमावैम आहे.

राजा बोला रात है
राणी बोली रात है
मंत्री बोला रात है
संत्री बोला रात है
यह सुबह सुबह कि बात है

बरं, काय ठरले? मंदी आहे की नाही?
एका दिवसात 600 मर्सिडीजची विक्री झाल्याची बातमी वाचली, झालंच तर कित्येक टन सोने विक्री झाली वगैरे, सेन्सेक्स रेकॉर्ड हाय ला, तरी अजून मंदी मंदी म्हणून रडणे चालूच आहे का?

लोक किलो किलो ने सोने विकत घेत आहेत, आणि हे चड्ड्या विकल्या जात नाहीत म्हणून रडत आहेत,

अहो साधी गोष्ट आहे,
टेक्स्टाईल मिनिस्ट्री ने खादी चा इतका प्रचार प्रसार केला आहे की बरेच लोक भारतीय इनरवेअर असणाऱ्या लंगोट, कच्च्छे आदि कपड्यांकडे परत वळले आहेत,
हे सगळे नॉन ऑर्गनाईझड सेक्टर मधून येते. त्यामुळे कुठे रेकॉर्ड होत नाहीत हे आकडे.

ही भारतीय लोकांनी विदेशी ब्रॅण्डस ला दिलेली सणसणीत चपराक आहे.
म्हणूनच विदेशी कम्पान्यांनी मंदी चे ढोल वाजवायला सुरवात केली.

भरत मग हा विदेशी ब्रॅण्ड कडून स्वदेशी लंगोटीकडे झालेले स्थलांतर कसे लक्षात आले?

सिम्बा दुसरा मुद्दा सोने आणि अर्थव्यवस्था एकमेकांना व्यस्त प्रमाणामध्ये चालतात. सोने खरेदी जेंव्हा उद्योगांमधून फायदा होण्याची शक्यता कमी होते तेंव्हा वाढते. अर्थशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असेल तर हे सहज लक्षात शकते. तुमचे बाकीचे मुद्देही थोड्या फार प्रमाणामध्ये असेच आहेत. थोडाफार अभ्यास करून मुद्दे मांडत जा राव.

कोणे एके काळी इथे ग्राफ बिफ टाकून, मोठी मोठी पुस्तके, लेखक, मासिके यांचे दाखले देत यूपीए सरकार ने अर्थकारणाची कशी वाट लावली आहे ह्यावर महिना महिना संतुलित चर्चा करणारे एक परदेशस्थ काका होते, ते परत खऱ्या नावाने दिसले का कुणाला?

@सिम्बा मर्सिडीझ च्या विक्रीमध्ये या वर्षात १६% घट झाली आहे. तसेच सोन्याच्या किमतीत वाढ आणि किरकोळ विक्रीमध्ये घट झाली आहे. खादीचा भारतातील कपडे उद्योगात वाटा नगण्य आहे. खादी महामंडळ म्हणून एक वेगळे महामंडळ आहे. त्याची गेल्या ७० वर्षांची कामगिरी पाहता ते बंद केले पाहिजे. अंतर्वस्त्रांमधील सर्वात मोठा ब्रँड जॉकी हा सुंदर जेनोमल ह्या भारतीय माणसाच्या मालकीचा आहे. त्यापलीकडे विदेशी कंपनी ला चपराक वगैरे शुद्ध मूर्खपणा आहे. ह्या सगळ्या कंपन्यांचे उत्पादन भारतात होते. वाहतूक खर्च करून बाहेरून तयार कपडे आणणे कोणालाही परवडत नाही. अनऑर्गनाईझ्ड सेक्टर मधून खादी ची लंगोट वगैरे मूर्खपणा आहे. तुमचे सर्वच प्रतिसाद अतिशय चुकीच्या माहितीवर आधारित आहेत.

@भरत ज्ञानाच्या बाबतीत देशी विदेशी करण्याइतके दुर्दैव काही नाही.

हे सगळे पाश्चिमात्य अर्थ शास्त्राचे नियम आणि ठोकताळे आहेत. ते भारतात चालत नाहीत. >> त्याला पाश्चिमात्य देशात market anomaly म्हणतात भारतात काय म्हणतात demonetization ? Wink

मला एक सांगा
1) या कालावधीत तुमची किंवा तुमच्या प्रत्यक्ष ओळखीत कोणाची नोकरी गेली/सक्तीची सुट्टी घ्यावी लागली असा प्रकार झाला आहे का?
2) तुम्हाला किंवा प्रत्यक्ष ओळखीत कोणाला शेअर मार्केट मध्ये तोटा झाला आहे का?
3) तुम्ही किंवा प्रत्यक्ष ओळखीत कोणी नोकरीची अस्थिरता आहे म्हणून मोठी खरेदी लांबणीवर टाकली आहे का?

जर या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर मंदी आहेच असे का म्हणता?

जर शेअर मार्केट नावे उच्चंक पार करत असेल तर सोने खरेदी आणि अर्थव्यवस्था यांचे व्यस्त प्रमाण कसे दाखवाल?

एखाद्याच्या व्यक्तिगत अनुभवांवरून देशाची आर्थिक स्थिती मोजली जात नाही. त्याकरता सरकार स्वतः किंवा बाकी व्यावसायिक संस्थांमार्फत देशभरात सर्वे करून विविध प्रकारची माहिती गोळा करते. उदा बेरोजगारीचा दर NSSO गोळा करते.

शेयर मार्केट, सोने आणि अर्थव्यवस्था फार किचकट विषय आहे. अर्थशास्त्राची काही पुस्तके वाचली किंवा यूट्यूब वर काही व्हिडियो पहिले तर थोडीफार कल्पना येईल. त्याची लिंक इथे दिली तरी चालेल.

NSSO च्या आकड्यांवर सरकारचा विश्वास नाही.
सुरजीत भल्ला आणि इतर अनेकांच्या मते भरपूर आणि चांगल्या दर्जाचा रोजगार निर्माण झालाय

कोणे एके काळी इथे ग्राफ बिफ टाकून, मोठी मोठी पुस्तके, लेखक, मासिके यांचे दाखले देत यूपीए सरकार ने अर्थकारणाची कशी वाट लावली आहे ह्यावर महिना महिना संतुलित चर्चा करणारे एक परदेशस्थ काका होते, ते परत खऱ्या नावाने दिसले का कुणाला?

ते नंतर आले की नाही माहित नाही, पण त्यांचा शेवटचा लेख कैलाश मानसरोवर यात्रेचा होता.

. खादी महामंडळ म्हणून एक वेगळे महामंडळ आहे. त्याची गेल्या ७० वर्षांची कामगिरी पाहता ते बंद केले पाहिजे.>>>>>>>>>
सिरिअसली???

https://www.google.com/amp/s/www.financialexpress.com/industry/khadi-ind...

5 वर्षात 127% वाढ

Going by annual revenue in 2018-19, KVIC would compare with the top 25 listed Indian companies with sales a little lower than Bharti Aritel’s Rs 81,000 crore but a shade higher than Grasim Industries’ Rs 72,970 crore.>>>>

तुमचे सल्ले मानले तर अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा व्हायला वेळ लागणार नाही

As many as 375 new Khadi institutions were established after 2015 in some two-odd years, whereas the number of new Khadi institutions established in 10 years' period between 2004 and 2014 was only 110, the KVIC said.>>>>>

माननीय स्मृतिजी इराणीजींना या खात्याचा पदभार देऊन मोदींजींनी त्यांच्या कर्तृत्वाला मोकळे आकाश उपलब्ध करून दिले आहे.

तर मुद्द्यावर परत येताना ही एकंदर खादी प्रॉडक्ट्स च्या वाढीची आकडेवारी आहे, त्यातले प्रॉडक्ट्ववैज सेगमेन्टेशन माझ्याकडे नाही,
येणाऱ्या फॅशन लाटेचा परिणाम कँपन्यांवर होतोच,
आता लोकांना खादी प्रोडक्ट आवडायला लागली म्हणून जॉकी ची विक्री कमी झाली
लोकांमध्ये दाढी वाढवायची फॅशन आली म्हणून जिलेट ची वाढ केवळ 1%झाली याचा अर्थ मंदी आली असा थोडाच होतो?

एकदम बरोबर बोलताय सिम्बा. टोपाझ ब्लेड पाच रुपया. टोपाझ ब्लेड पाच रुपया असं ओरडणारा विक्रेता ठाण्याच्या प्लॅटफॉर्म वर मी गेली २० वर्ष बघतोय. कसली महागाई आणि कसली मंदी!
कार्सची विक्री कमी कारण लोकं उबर वापरु लागली आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अर्थात... प्राचिन भारतीय जीवनशैली जगू लागल्येत.
एफएमसीजी उत्पादने अर्थात बिस्कुट, डिटर्जंट, नूडल्स चा खप कमी होतोय. हे आपण परकीय कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढण्यात उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. गाईचे दूध, भाकरी, खाकरे, ठेपले, इडल्या, पोहे, उपमा, मोड आलेली कडधान्ये याची विक्रमी विक्री होत्येय हे तुम्हाला कोणी कोणी सांगणार नाही. तुम्हाला घाबरवुन सोडतील, पण खरं सांगणार नाहीत असा विकाऊ मिडिआ आहे हा! फेक न्यूज!
हल्ली संकरित नाही... अगदी मूळ भारतीय असलेल्या आणि गवत आणि चारा खाऊ घातलेल्या गाईच्या शेणाच्या गोवर्‍या तुमच्या अ‍ॅमेझॉनवर मिळतात तिकडे आम्रविकेत. आपल्याकडचे लोक आधी नाकं मुरडायचे. आता अमेरिकन लोकांनाही पटलंय की गाईच्या शेणाच्या गोवर्‍या जाळल्या की ऑक्सिजन बाहेर पडतो. हे कसं होतं हे भल्या भल्या शास्त्रज्ञांना न उमजलेले कोडे आहे. त्यावर संशोधन करुन ते नोबेल मिळवतील पण आपली विकाऊ मिडिआ शेण घ्या सांगणार नाही.
तुमच्या पोस्ट मला आवडतात. अगदी साधकबाधक विचार करून मोजक्या शब्दात विचारप्रवर्तक असतात.

धन्यवाद अमित,
मर्सिडीज च्या विक्रीत 16% घट आवर्जून सांगतील,
पण इंडिगो ने 300 विमानांची ऑर्डर नोंदवली हे कुणी सांगणार नाही,

इतक्या मोठ्या कम्पणीत फॉरकास्टिंग फनक्शन तर असेल??
मंदी आहे, आणि राहणार आहे असे जर दिसत असते तर इंडिगो आपली क्षमता 100% वाढवायच्या मागे का लागेल?

परत एकदा विचारतो,
जर खरेच मंदी आहे, लोक रोजगार गमावत आहेत असे चित्र असेल तर कशाच्या जोरावर भाजप या विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला?

आजकाल फ्रेशर मुलं गाड्या विकत घेत नाहीत uber/कंपनी ट्रान्सपोर्ट/सेल्फ driven कार्स वापरतात. 25 च package असणारे समजा 100 फ्रेशर्स नी गाड्या न घेता uber वापरली तरी 100 कार्स चा खप कमी झाला. (उदाहरण आहे, actual नंबर गुणिले no ऑफ कोस)

आम्ही सुद्धा 11 वर्षे जुनी इंडिका वापरतोय. सगळीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेट्रो ची काम सुरू आहेत की कुठून कुठे कोणत्याही वारी गाडी बाहेर काढायची सोय राहिलेली नाही. कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तर कॅब भाड्याने घेतो, ती माणसाबरोबर येते. ऑफिसजवळ राहायला जायचं आणि चालत ऑफिस. शाळेच्या बसेस सकाळ- संध्याकाळ ट्रॅफिक च्या आधी असतात. पुढच्या वर्षीपासून शाळेचं timing अर्धा तास आधी केलंय,ट्रॅफिकमुळे. गाडी चालवायचा आनंद मिळणार नसेल तर कोण गाडी घेईल.
सगळ्या गोष्टींच्या होम डिलिव्हरी घरात येतात. एक एक्सत्र-curricular activity चा क्लास लावलाय वीकएंड ला, चांगला क्लास जवळ नाहीये म्हणून फक्त गाडी लागते आणि PTM ला जाण्यासाठी. ह्यावेळेस तासभर शाळेच्या रोडवर अडकायला झालं होतं त्यामुळे पुढच्या वेळेस ptm bunk करायचा विचार आहे.

बरोबर मिलेनियल्स कार्स विकत न घेता ओला उबरने प्रवास करतात हे तर माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनीच सांगितलं आहे. त्यांच्याकडे तशी आकडेवारी असेलच.
तसंच सगळ्या मेट्रो सिटीजमध्ये आता मेट्रो येत असल्याने लोकांना कारसाठी एक पर्याय उपलब्ध होणार / होतोआहे. मुंबईत तर एसी लोकल सुरू झाल्यात.
तसंच मोदी सरकारने गेल्या साडेपाच वर्षांत राष्ट्रीय महामार्ग अधिक लांब रुंद केले, त्यांचा दर्जाही उत्तम आहे. त्यामुळे ट्रक्सची लोड कपॅसिटी त वाढवून दिली त्यामुळे ट्रक्स च्या फेर्‍या वाढल्या. त्यातच जीएसटीमुळे ऑक्ट्रॉय गेल्याने प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला. निम्मा झाला म्हणाना. त्यामुळे ट्रक्सची विक्री घटली आहे.

झीरो बजेट शेतीमुळे ट्रॅक्टर्सची विक्री घटली आहे.

Pages