सरकारचे डोकं नक्की ठिकाणावर आहे काय ?

Submitted by सिद्धेश्वर विला... on 9 October, 2019 - 08:19

सरकारचे डोकं नक्की ठिकाणावर आहे काय ?

अरे देवेंद्रा , तुला झालंय तरी काय

चुलीत गेली प्रगती सारी

ठेव ती मेट्रो तुझ्याच दारी

मुक्यांचा जीव तुला खाऊ वाटला काय

सुधीर राव आहेत कुठं ? झोपलेयत कि काय ?

किती घरटी उखडली ते त्यांनाच ठाऊक नाय

रात्रीचा दिवस इथं पहिल्यांदाच उजाडलाय

सामान्यांच्या लढ्यास अशी किंमत ती काय ?

जास्त आवाज केला तर देतीलही तोंडावरच पाय

अरे देवेंद्रा ...

सरकारचं डोकं नक्की ठिकाणावर आहे काय ?

डोंगर पोखरून माती खाल्ली

माती खाऊन घरं विकली

पुढे जाऊन त्याच पैश्यातून

पुन्हा डोंगर उभाराल काय ?

हिरवाईच्या गप्पा फक्त मुलाखतीसाठीच कि काय

विज्ञानाच्या फुका करामती त्यात नवीन काहीच न्हाय

बघून बघून निसर्ग एकदाच हाणतो

त्सुनामी विसरलात कि काय ?

सरकारचं डोकं नक्की ठिकाणावर आहे काय ?

अरे देवेंद्रा , तुला झालंय तरी काय

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

तळ टीप : मीही उभा राहिलो आहे एकदा ,, आरेच्या आंदोलनासाठी .. प्रगती मलाही मान्य आहे पण निसर्गाची कत्तल करून नव्हे तर त्याच्या सोबत राहून .. इन्कलाब झिंदाबाद म्हणायची वेळ आली तर पुन्हा तेही करेन...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खरं आहे अगदी. चूक ह्यांची पण त्या चुकिची शिक्षा करायला निसर्ग येतो तेव्हा जीव मात्र सामान्यांचा जातो. आणि ह्या चुकीची फळं आपल्याला भोगायला लागणार हे निश्चीत.