कोकणात बॅचलर पार्टी

Submitted by अजिंक्यराव पाटील on 7 October, 2019 - 16:20

तर, आमच्या एका जिवलग मित्राचे नुकतेच लग्न ठरल्याने त्याला बॅचलर पार्टी देण्याचा मानस आहे. साधारण डिसेंम्बर महिन्यात पहिल्या 2 आठवड्यातले 4 दिवस प्लॅन करत असून शक्यतो bike ने जाण्याचा विचार आहे. आम्ही फक्त तीन जण असून अजून एखादा वाढू शकतो.

बॅचलर पार्टी म्हणजे आम्हाला दारू वगैरे प्यायची हे तर आलंच.. तर त्या हिशोबाने एखादं झकास ठिकाण सुचवा.. बजेट उणापुरा 10ते 15 हजार पर्यंत आहे, दारू वेगळी.
तुमच्यापैकी कुणी असं फिरायला गेलं आहे का?

कृपया मार्गदर्शन करा!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अलिबाग बरा पडतो... जवळ
चांगले नॉन व्हेज खायचे असेल तर गणपतीपुळे ....
दारू सगळीकडे मिळते..

नागाव. ( अलिबाग तालुकाच. ) हा आता अशा पर्यटकांस सरावला आहे. कोकणात इतर ठिकाणी नाही. पण डिसेंबरात रेट चढलेले असतात.

सध्याच्या मुक्कामीच कोकण प्रवास खर्च वाचलेल्या पैशातून थोडी जास्त दारु पिली तर कोकणच कशाला अगदी जागच्याजागीच कोस्टारिका काय नी बैंकॉक काय ... एकदा सर्वांची विमाने नीटपणे उडाली की सर्व फिरून सेलिब्रेशन होईल.

कर्नाट कात गोकर्ण आहे तिथे जा. नमस्ते कॅफे आहे तिथे बिर्याणी वगैरे मिळते. पण खरेच मुंबईत वगिअरे असाल तर हीच चांगली जागा आहे बॅचलर पार्टीसाठी. मुख्य म्हणजे बाइक वरून परत येताना दारू पिउन येउ नका. प्रेमळ सल्ला. पार्टी ऑन.

अलिबागला किंवा गणपती पुळे किंवा तारकर्लीपर्यंत जाणार असाल तर कळवा, प्रत्येक ठिकाणी रहाणे आणि खाणे ह्याची फक्कड ठिकाणे सांगू शकेन. ही तिन्ही ठिकाणी आप्तेष्टांची हाटेलं आहेत.

१५ हजारात पेट्रोल धरले आहे काय?

पिणं हा पेपर आपापला सोडवावा.

आम्ही पुण्याला असतो, तारकर्ली फार दूर होईल खरं तर, मी एका रात्रीतून दापोली आंजर्ले पर्यंत प्रवास केलेला आहे.. अलिबागचा किनारा मला फारसा आवडला नव्हता, याच्या अधले मधले काही ठिकाण असेल तर तेही सुचवा.. तारकर्ली जायचं झालं तर कारने जावं लागणार..

दिवे आगर जावा. झ्याक हाय. एक बिअर शॉपी पण हाय गावात.

बाकी राडे करू नका, लय मारत्येत लोकल पब्लिक आयुन आहे.

नॉर्मल लोणावळा वगैरेला दारू पिऊन चालणार नाही का?प्रवासाचे बरेच पैसे वाचतील
लोणावळा ला बंगले स्वस्त मिळतील नॉर्मल 3 किंवा 4 स्टार हॉटेल पेक्षा.

कोण मित्र असेल कोकणातला तर चांगलंच.
ज्याचे शेतात घर असावे गावा पासून लांब .
मस्त डोंगरावर जायचं ,सपाट जागा शोधायची .
चटई ,पाणी,ice, चकणा घेवून जायचं .
निसर्गाच्या सहवासात,मोकळ्या आकाशाखाली,थंड हवेत .
खूप मज्जा येते .
आणि त्या मध्ये सर्व मित्र बरोबर .
चांगला गप्पांचा फड रंगत.
झोपायला घरी जायचं .

माबोवर मिळालेल्या रेफरन्सवर कुडावले (दापोली) मध्ये 'कोकणस् प्राईड' नावाच्या रिसॉर्ट मध्ये राहिले होते. जेवण उच्च टेस्टी होतं, निसर्ग भरभरून होता, रूम्स खूप स्पेशिअस आणि अतिशय स्वच्छ जागा होती. तिथे खाल्लेले फिश, पालेभाजी आणि तांदूळ भाकरी मी जन्मात विसरणार नाही. हे सगळं अतिशय स्वस्त होतं कारण बीच 22 किमी दूर आहे. आंजर्लेला जावं लागतं. पण आम्हाला बीच पेक्षा निसर्ग, शांतता आणि स्वच्छता हवी होती. तुमचं बजेट कमी असेल तर ही जागा गुगल करा आणि बुकिंग करून टाका.

Submitted by मीरा.. on 8 October, 2019 - 23:00>>> हे सही वाटतंय

काहीतरी exciting हवं आहे खरं तर.. युनिक.. मी विचार केलेली भन्नाट पार्टी अशी की त्यात games असतील, अगदी znmd नाही, पण काहीतरी थ्रिल हवं. मला घोडेस्वारी आवडते, तर डेस्टिनेशनला पोचल्यानंतर पुढं त्या भागात घोड्यावरून फिरायचं. एखादा गेम असावा तिरंदाजी/ शूटिंग वगैरे type.. रात्री शेकोटी सोबत कोंबडी भाजत, गाणी ऐकत दारू. कोकणच नसेल तरी चालेल पण या गोष्टी असल्या पाहिजेत.. कुणाला आहे का कल्पना या बाबतीत.. तसं गेम्स ची सुविधा मी करू शकतो, decathlon मधून archery किट घेऊन टाकेन. पण घोडे मिळणं थोडं कठीण वाटतंय. शेकोटी वगैरे कोणत्याही रिसोर्टला होऊन जाईल.

त्यापेक्षा इथून पुण्यातूनच कोकणात घोड्यावरून जा ना Proud त्याएवढं exciting काहीच नसेल. बरं ठिकाणी पोचल्यावर सगळे एवढे दमलेले असाल की बाकी गेम्स प्लॅन करायचं झंझटच नाही.

पुण्यात घोडे मिळण्याचं ठिकाण - पेशवे पार्क, राणाप्रताप उद्यान, अजून कोणकोणत्या हॉर्स रायडिंग शिकवणाऱ्या संस्था.

हॉर्स रायडिंग आणि इतर प्राणी हवे असतील तर जपालुपी ला जा पुण्या जवळ
पण तिथे घोडे शिकायला इतकी चिंटी पिंटी येतात की तुमचे बॅचलर पार्टी चे इतर बेत पार पडतील का माहीत नाही
घोडे सोडलेत तर ब्लु मॉर्मन भीमाशंकर ला जाऊ शकता.

पाडस पुस्तकात एक मोठे वादळ येते व त्यानंतर ज्योडी, त्याचे बाबा व शेजारी फॉरेस्टर असे घोड्यावर्नं रानात तपासणी करायला जातात व रात्रीचा मुक्काम करतात त्याची आठवण आली ती मस्त पार्टी होती. आज जाउन वाचते परत. बजेट असेल तर फुके त का नाही जात. बेस्ट जागा पायातच बीच. बाकी सर्व आनंदी आनंद बाबी आहेत. घोडे मिळत असतील बीच वर. चारच तासाची फ्लाइट आहे. कोकणात तर मला बाई बोअर होते.

राखेचा २ थीम पार्टी करता येइल.

१) रत्नागिरीला सुद्धा आता स्कूबा डाइविंग सुरु झालंय त्यामुळे अगदी तारकर्ली गाठायलाच पाहिजे असे नाही.

२) आरे वारे ( गणपती पुळे कोस्टल हाइवे) येथे छान निसर्गरम्य घरगुती निवास उपलब्ध आहेत. स्वस्त आणि मस्त !

३) तीरंदाजी नेमबाजी इत्यादी हौशी क्रीड़ा प्रकार करायला इथे हॉटेल विवेक वगैरे सारखी काही ठिकाणे शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहेत.

४) समुद्र किनारा नको आणि अगदी गर्द जंगल हवे तर आंबा घाट येथे स्वस्त रिसोर्ट आणि घरगुती निवास आहेत. एडवेंचर करायला जवळ विशालगढ़ आहेच.

>>त्यापेक्षा इथून पुण्यातूनच कोकणात घोड्यावरून जा ना<< खोटं वाटेल, पण खरंच माझी इच्छा आहे अशी.. फक्त हा एक प्रवास नव्हे तर एखादा पूर्ण महिना सुट्टी घेऊन, होईल तेवढा महाराष्ट्र फिरायचा आहे.. त्या प्रवासात youtube व्हिडिओ बनवायचे.. पण घोड्याची उस्तवारी करण्याएवढा वेळ, पैसा, आणि जागा देखील नाही.. अर्थात हे विमान ढगात गेल्यावरचे प्रामाणिक विचार असल्याने त्यावर हसू येतेच!

>>बेवड्यांना कशाला हवी एवढी उस्तपास्त. रस्त्याकडेला झाडीत बसून ढोसायची की वाटेल तेवढी.<< तुमच्या मताशी मी सहमत आहे.. बेवड्यांना ठिकाणाची/ कारणांची/ परिणामांची फारशी अडचण/ काळजी नसतेच. झालं असेल तर झाडीतून निघा आता!

फक्त हा एक प्रवास नव्हे तर एखादा पूर्ण महिना सुट्टी घेऊन, होईल तेवढा महाराष्ट्र फिरायचा आहे. >>> मी खूप लहान होते, म्हणून अंधुक आठवतं आहे, पण बाबासाहेब पुरंदरे अशा घोड्यावरून किल्ल्यापर्यंतच्या ट्रिप्स न्यायचे. (ट्रिप्स शब्द बरोबर नाही, पण मोहिम म्हणावं का खात्री नाही) माझ्या सोसायटीतुन एक ताई गेली होती. अगदी नऊवारी साड्या नेसून आणि मुलांनी मावळ्यांचे ड्रेस घालून कोणत्या तरी किल्ल्यावर गेले होते. त्यांचा घोड्यांचा तबेला पर्वती पायथ्याशी कुठे तरी होता.
तुमचं खरोखरच स्वप्न असेल तर एखाद्या हॉर्स रायडिंग इन्स्टिट्यूटला गाठून त्यांच्या काही ट्रिप्स आहेत का याची चौकशी करा. महिनाभर नाही पण 2-3 दिवसाची घोड्यावरून सफर करून याल.

सध्या तरी महाबळेश्वरला रिसॉर्ट करून राहायचा विचार आहे, तिथे वेण्णा लेक पाशी घोडेस्वारी पण करता येईल. नाही तर अलिबाग आहेच

अजिंक्‍यराव , महाबळेश्वर हा अतिशय उत्तम पर्याय आहे. पाचगणीलाही घोडेसवारी मिळेल. महाबळेश्वर मार्केट मधे गेम्स मिळतील.
खूप रिसोर्ट्समधे गाणी , डांसफलोर मिळेल.
आणि निसर्ग तर आहेच चहूबाजूला.

मीरा , बाबासाहेबांच्या वाड्यातच तबेला होता. स्वत: बाबासाहेब घोडेसवारी करत रोज. जाणता राजाच्या तालमी व्हायच्या. आता सारे इतिहासजमा झाले.

बॅचलर पार्टी म्हणजे
भारतात आणि इतर देशांत काय फरक असू शकतो??
नवरा/बायको होणे या बेडीत अडकण्या अगोदरची भन्नाट इच्छापूर्ती?

मला पनवेल चं काही कळलं नाही.जाऊदे.
बॅचलर पार्टी च्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असू शकतात.आजची जेनरेशन Z पाहता मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करायला बॅचलर पार्टी ची वाट पाहत राहणार नाहीत असा अंदाज आणि अशी आशा आहे.(आम्ही 'केळवणाला पावभाजी' म्हणजे समाजातला सर्वात मोठा प्रक्षोभक टाईप्स कम्युनिटी मधले असल्याने यावर फार ज्ञान पाजळण्यात अर्थ नाही)

Pages