झाडे तोडणाऱ्यांनो
**************
झाडे तोडणाऱ्यांनो
तुम्हाला क्षमा नाही
कदापी नाही
तुमच्या पिढीला ही
अन् तुमच्या पुढच्या पिढीलाही
तुमच्या पापाचे कर्ज
फेडावे लागेल त्यांनाही
लाज नसलेली
तुमची वक्तव्य
अवतरणे उदाहरणे
कायद्यातील पळवाटा शोधणे
राजकारणी कारणे
छी छी
किती घाणरडे !
होय
तुम्ही जिंकलात
कत्तलीची संमती घेत
चौकटीत अडकलेल्या
कायद्याकडून
अन
आंधळ्या न्यायाची
परवानगी घेवून
पण तुमच्या या पापाला
क्षमा नाही
या गुन्ह्याला माफी नाही
पडणाऱ्या प्रत्येक झाडाचे आक्रंदन
प्रत्येक फांदीचा शाप
निर्वंश करील तुमचा
उगवून विनाशाची बीज
तुमच्या छातीत
तडफड कराल तुम्ही
प्राणवायुसाठी
तेव्हा हसतील
या झाडांचे अतृप्त आत्मे
तोवर हसून घ्या
जिंकल्याबद्दल
हि लढाई
पण त्या न्यायालयात
क्षमा नसते
कुठल्याही गुन्ह्याला
एवढे मात्र ध्यानात ठेवा.
**
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
आज सकाळीच आमच्या कॉलनीत 2
आज सकाळीच आमच्या कॉलनीत 2 चांगली निलगिरीची झाडं होती ती कापली.. कापलेल्या फांद्या बघुन अगदी कसतरी झालं..

शब्द प्रहार... खूप छान कविता.
शब्द प्रहार... खूप छान कविता.. अगदी वास्तव मांडलेत तुम्ही
@मन्या
@मन्या


आमच्या कडे पुण्यात तर हलकट लोकं झाडाची साल काढत मग ते झाड मरत असे , नंतर तिथे इमारत उभारीत
म्हणजे कायद्याच्या कचाट्यातून सुटका
मेट्रो सिटीमध्ये राहून सर्व
मेट्रो सिटीमध्ये राहून सर्व अत्यानुधिक सूखे उपभोगणाऱ्या वृक्ष प्रेमीं लोकहो तुम्ही झाडांच्या कत्तलीचा (आणि त्यामुळे होणाऱ्या विकासाचा) निषेध किमान सलग वर्षभर मेट्रोचा प्रवास नाकारून करू शकणार आहेत का ?? जसे मोहनदास गांधींनी असहकार आंदोलन पुकारले आणि प्रत्यक्ष कृतिने सिद्ध करून दाखवले ...
सामो मी पण पुण्यातच राहते..
सामो मी पण पुण्यातच राहते.. आज गुलमोहर बाकी होता त्याच्याही फांद्या विनाकारण तोडल्यात..आज पुर्ण ट्रक भरलेला लाकडांनी. चांगली बहरलेली झाडं तोडलीयेत जिमच्या पार्किंग एरीयात कचरा होतो म्हणुन..

अगं पण फक्त फांद्या तोडल्यात
अगं पण फक्त फांद्या तोडल्यात की पूर्ण झाड उखडलं आहे? फक्त फांद्या असतील येइल परत.
पण पूर्ण झाडच ....
निलगिरीची 2 पुर्ण झाड.. आणि
निलगिरीची 2 पुर्ण झाड.. आणि गुलमोहराच्या फांद्या..
आई ग्ग!!
आई ग्ग!!
खरेच किती वाईट आहे सारे !अन
खरेच किती वाईट आहे सारे !अन हे अरण्य रुदन हि व्यर्थच.