कालीचा अवतार

Submitted by Asu on 29 September, 2019 - 05:24

स्त्री ही अबला नसून प्रसंगी कालीचा अवतार धारण करू शकते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अशी ताकीद देणारी कविता-

*कालीचा अवतार*

उपमा सीता सावित्रीच्या
आम्हांस तू देऊ नकोस
जुन्या झाल्या त्या प्रतिमा
पुन्हा पुन्हा फसवू नकोस

देऊन दागिना लज्जेचा
निर्लज्ज होऊन लुटू नकोस
मायावी तू वस्त्रे पांघरून
निर्वस्त्र करून भोगू नकोस

मायबहिणींची अब्रू लुटुनि
बेअब्रू पावित्र्यां करू नकोस
सबला आहोत आता आम्ही
अबला आम्हां समजू नकोस

रुद्र रूप धारण करण्यां
आम्हां भाग पाडू नकोस
कालीचा अवतार आम्ही
आता तू विसरू नकोस

प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सर्व रसिकांना मनःपूर्वक धन्यवाद! आपल्याला माझ्या कविता आवडत असतील तर माझ्या इतर कविता वाचण्यासाठी 'असुच्या कविता' हे माझे एफबी पेज लाईक करा.