Submitted by मी मधुरा on 21 September, 2019 - 14:29
एक प्रकार मध्यंतरी ट्विटर वर फेमस झाला होता. #sixwordsstory नावाने. शशक मध्ये अनेकजण लिहिते झाले आणि उत्तमोत्तम कल्पना, कथाबिज केवळ शंभर शब्दात बसवण्याचं काम मस्त केलं.
आपण आता नविन प्रयत्न करू.
बघू जमतय का?
काही महत्त्वाचे म्हणजे, इतक्या कमी शब्दात बसवतानाही अर्थपुर्ण लिहावे लागते.
दहा शब्दांत कथा!
उदाहरणार्थ,
१. मी: 'हाय'. ती: 'बाय'. The end of short love story!
२. पिस्तूल प्रेताच्या उजव्या हाती होतं? पण तो तर डावखुरा होता!
३. त्याने तिकडे कळवल्याचे कळले. मी यांना कळवून त्याचा निकाल लावला.
टीप: पहिली कथा कुठलातरी सोशल मिडिया वरचा विनोद आठवल्याने त्यावर लिहिली आहे. जोक आठवला तर योगायोग समजू नये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय हिरो? काय करतोयस आजकाल ?
काय हिरो? काय करतोयस आजकाल ?
.
.
.
आय लव्ह यू
तुझं थोबाड बघितलंस का आरशात?
तुझं थोबाड बघितलंस का आरशात?
काय करू ग, दिसतच नाही....
मनातला सांगुन टाक अस तिला
मनातला सांगुन टाक अस तिला सांगितल
तर तिने माझ्या आईबापाला सांगितल
यतिन
यतिन
माझ्या लग्नाच्या पहिल्या
माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री
पलंग माझा बिन पायाचा दिसला
आता हे काय नविन मधुरा पण छानच
आता हे काय नविन मधुरा पण छानच वाटतेय दशक कथा.
...प्रतिसाद पण दशकातच लिहिला आहे बरं का
ट्राफिक मंदावला आहे आपल्या
ट्राफिक मंदावला आहे आपल्या सायिटचा ,
नविन दुआय्दी उघडू- रुन्मेश नाव कसे राहिल ?
"काय धुणे धूत बसलेत?"
"काय धुणे धूत बसलेत?"
"पडू नकोस त्यात, ट्रोलिंग म्हणतात त्याला."
तू 'करतेय' असं का म्हणालास?
तू 'करतेय' असं का म्हणालास?
शीट! स्रीआयडीने लॉगिन करायचं राहिलं!!!
भन्नाट अज्ञातवासी
भन्नाट अज्ञातवासी
मायबोली पाहून:
ये टिपापा टिपापा क्या है? ये टिपापा टिपापा?
अज्ञा
अज्ञा
स्लार्टीनी असा धागा पूर्वीच
स्लार्टीनी असा धागा पूर्वीच काढला आहे (अ.ल.क. - अति लघु कथा) . त्यावर खूप छान प्रतिसाद आहेत.
१. गाढवा तुझा किती सुरेल आवाज
१. गाढवा तुझा किती सुरेल आवाज, उंटा तुझा किती सुंदर चेहरा.
२. हे योग्य नाही हत्ती म्हणाला, कोल्हेकुई सुरू झाली ट्रोल ट्रोल!
दशक पहिल्यांदाच लिहितोय, जमल्यात का ते सांगा.
तो गेला.
तो गेला.
हाकलल त्याला.
मग आता बदला घे.
सुरुवात झालीये.
हर्पेन, दुसरी दशक कथा जबराट!
हर्पेन, दुसरी दशक कथा जबराट!
मस्त निलीमा.
२. हे योग्य नाही हत्ती
२. हे योग्य नाही हत्ती म्हणाला, कोल्हेकुई सुरू झाली ट्रोल ट्रोल!>>>>>हर्पेन, किती खोडसाळपणा
धन्यवाद मी_मधुरा, आणि सस्मित
धन्यवाद मी_मधुरा, आणि सस्मित , पहिलाच प्रयत्न आहे; काही चुकलं असेल तर माफ करा. फारतर खोडकरपणा म्हणा; हा खोडसाळपणा नक्कीच नाही.
ओह! खोडसाळपणा शब्दाला काही
ओह! खोडसाळपणा शब्दाला काही वेगळा अर्थ आहे का?
खोडकरपणा बरोबर
कोल्हेकुई हा शब्द चपखल बसलाय
कोल्हेकुई हा शब्द चपखल बसलाय हर्पेन.
खोडकरपणा निष्पाप निरागस
खोडकरपणा निष्पाप निरागस निर्हेतुक असतो.
खोडसाळपणा बहुतेक वेळा त्रास द्यायच्या हेतूने असतो.
बहुतेक असंच काहीतरी असावे.
ओके.
ओके.
हर्पेन,
हर्पेन,
चूक काय त्यात? ज्यांचे खरे ट्रोलिंग झाले नाही त्यांच्यावर हे तू लिहिलेले असणार असे गृहीत धरले आहे मी.
बाकी खरे काय झाले ते ज्याचे त्याला माहित आहेच.
एक दशक-
काही लांडगे काही कोल्हे काही कुत्रेसुद्धा होते, कळप मात्र मेंढरांचा!
एक दशक!
एक दशक!
मी शब्द चालवले, तिने अश्रू,
अश्रू जिंकले, शब्द चालवणारी गेली.
कोणीतरी आले ट्रोलिंग म्हणले,
कोणीतरी आले ट्रोलिंग म्हणले, विषय वाढला.....
वाढतच गेला.... वाढतच गेला.....
तिसरा दोघांच्या भांडणात पडला.
शेवटी भांडणच काय नाते पण संपवले.
चिखलात दगड फेकला तर चिखल
चिखलात दगड फेकला तर चिखल उडतोच, स्वतःवर आणि दुसर्यावर ही.
जमली आहे ना.
जमली आहे सिद्धी.
जमली आहे सिद्धी.
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा
कधी ही कधी ती ट्रोलिंगचा वायदा
Dirt is in your mind,
Dirt is in your mind,
Not on your own cloths.
Dirt is in your mind,
Dirt is in your mind,
Not on your own cloths.
ट्रोलवरच करायची आहेत का दशकं?
ट्रोलवरच करायची आहेत का दशकं???
मग उगाच डोक लावत बसलेले..
Pages