तुम्ही दमा कसा कंट्रोल केलात ?

Submitted by दिपक_१० on 20 September, 2019 - 01:06

तुम्ही स्वतः ज्या गोष्टी केल्यात आणि ज्याचा फायदा झाला अशा गोष्टी share कराल का

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

दमा नाहीए पण श्वास लागतो बर्याचदा. डायफ्रॅमिक ब्रिदींग करतो,श्वास खोल आत घेण्याबरोबरच उच्छ्वासही पुर्ण करतो total expulsion of air out of lungs. श्वास लागल्यानंतर बसावे ,झोपू नये. इनहेलर जवळ बाळगावा,ॲलर्जीक ट्रिगर्स टाळावेत ,थंडीत विशेष काळजी घ्या कारण फुफ्फूसाच्या नळ्या गार हवेने आकुंचन पावतात व दम्याचा ॲटॅक सिव्हीयर येतो.

हो, मी केला होता प्राणायाम. सलग 3 ते 4 महिने अनुलोम विलोम 15 मिनिटे आणि दीर्घ श्वसन 15 मिनिटे केलं तर दम लागणे हा प्रकार कमी होतो. पंप दिवसातून 2 वेला असेल तर फक्त एकदा घेतला तरी बास होतो. पहाटे त्रास होत असेल तर तो होत नाही. पण हे सगळं रोज अर्धा तास प्राणायाम निष्ठेने केला तरच फायदा होतो तो ही काही महिन्यानंतर. एकदा त्रास कमी झाला की आपण पण आळशी होतो आणि प्राणायाम कमी करत हळूहळू बंद पडतो. परत ये रे माझ्या मागल्या.

मिपावरील डॉक्टर श्रीहास हे दमा आजाराचे स्पेशालिस्ट आहेत. त्यांची माझ्या रुग्णांविषयी अशी काहीतरी लेखमालिका आहे. खूप रुग्ण त्यांना देवासारखे मानतात.

सर्वांना धन्यवाद !

अमर - मी तो लेख वाचला , दम्यावर दोनच लेख आहेत , बाकीची मालिका हि त्यांना भेटलेले रुग्ण ह्यावर आहे
आवर्जून लिंक पाठवल्या बद्दल धन्यवाद !

ह्या धाग्यावर अजून काही टिप्स येतील आणि बाकीच्या लोकांना पण फायदा होईल अशी अपेक्षा करतो