केरळ मध्ये फिरण्यासंदर्भात माहिती हवी आहे

Submitted by सान्वी on 19 September, 2019 - 00:19

आम्ही डिसेंबर महिन्यात केरळ मध्ये मुन्नार व आलेपी येथे फिरायला जाण्याचे नियोजन केले आहे. खूप वर्षांपासून केरळ पाहण्याची इच्छा शेवटी पूर्ण होणार आहे. कुठल्या टूर कंपनी बरोबर नसून आम्ही आमचे प्रवास करणार आहोत. सोबत २ वर्षांचा मुलगा आहे.
मुन्नार येथे 4 दिवस आणि अलेपिला 2 दिवस मुक्काम आहे. कोणी जाऊन पाहिले असल्यास काय पाहावे हे सुचवतसेच तेथील वातावरणानुसार काय सोबत घेऊन जावे हेही सांगा.

Group content visibility: 
Use group defaults

व्वा खूप सुंदर लेख मनिमोहोरजी, आणि फोटो पण सुंदर छान ऐसपैस ट्रिप आखली होती तुम्ही त्यामुळे बऱ्याच गोष्टी बघता आल्या. आम्हाला बाळामुळे जरा restrictions आहेत.
आमचा मेन फोकस (आणि मुक्काम पण) मुन्नार आणि अलेप्पी असल्यामुळे तिथल्या जवळच्या परिघातल्या गोष्टी फक्त बघता येतील.

बादवे शॉपिंग काय करावे? मसाले आणि साड्या व्यतिरिक्त...
@अमर जी, ok बघते

आम्ही ३ मित्र केरळला जाऊन आलो. तो कार्यक्रम असा होता (६ दिवस, ५ रात्री). ग्रेट एस्केप या कंपनीने ड्रायव्हरसहित कार दिली आणि हॉटेल्स बुक केली. (हॉटेलची निवड मी केली होती, पण बुकिंग त्यांनी केले). एकूण खर्च ६८,९००/- + विमान प्रवास

मुन्नार २ रात्री (हॉटेल लीफ मुन्नार)
थेक्कडी २ रात्री (हॉटेल फॉरेस्ट कॅनपी)
अलेप्पी १ रात्र (हाऊसबोट)
१ दिवस कोचीन, संध्याकाळी परत.

मुन्नारच्या वाटेवर धबधबे दिसले. Cheeyappara Waterfalls आणि Vallara Waterfalls

मुन्नार मध्ये बघितलेली ठिकाणे
- Blossom park
- Rose Garden
- Hydel park
- Rajamalai Eravikulam National Park (इच्छा होती, पण जमले नाही)
- Mattupetty Lake & Dam
- Echo Point
- Spice garden

थेक्कडी
- पेरियारच्या जंगलात फॉरेस्ट ऑफिसर बरोबर ट्रेक
- पेरियार लेक वर दुपारी बोट राईड
- हत्तीवर सफारी आणि हत्तीला आंघोळ घालणे
- संध्याकाळी कथकली शो, Kalaripayattu शो, जादूचे प्रयोग पाहिले
- आयुर्वेदिक मसाज
- टी इस्टेटची सहल, म्युझियम
- वाटेत एक सुंदर चर्च बघितले

अलेप्पीत विशेष बघण्यासारखे नाही. आम्ही १ मोटरबोट (इंजिन असलेली), वल्हवायची नाही) भाड्याने घेतली आणि नावाड्याने सगळ्या कनाल्समधून २ तास फिरवून आणले. तो अनुभव छान होता. ती बोट कयाकसारखी अरुंद होती त्यामुळे सर्व ठिकाणी जाता आले, तशीच बोट घेऊन फिरा. वाटेत एके ठिकाणी नारळपाणी प्यायलो.
रात्री हाऊसबोटीत राहिलो.

शेवटचा दिवस कोचीनमध्ये घालवला. तिथे बघितलेली ठिकाणे:
· Mattancherry Palace
· Synagogue
· St. Francis Church
· Fort Kochi Beach
· Chinese Fishing nets
· Marine Drive (Rainbow Bridge)
बायकोसाठी साडी साड्या खरेदी + केळ्याचे वेफर्स खरेदी

एकंदरीत केरळ खूप सुंदर आहे, तुम्हाला नक्की आवडेल असे आहे.

तेथील वातावरणानुसार काय सोबत घेऊन जावे हेही सांगा. >>>>>. मुनारला डिसेंबर मध्ये प्रचंड थंडी असणार. सगळ्यांचे भरपूर वॉर्म कपडे घेऊन जा. सोबत छोटं मूल आहे त्यामुळे त्याच्यासाठी स्वेटर्स व्यतिरिक्त gloves, स्कार्फ, कानटोपी इ सुद्धा लागेल. आम्ही गेलो तेव्हा 7-8 डिग्री होतं. जंगल ट्रिप्स करताना शूज सगळेच घालतात, पण मी फॅन्सी शूज घातले होते, कम्फर्टेबल पण पीप-टोज. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा जळू पाहायला मिळाली. नुसती नाही तर स्वतःच्या बोटांना लागलेली. भयानक अनुभव होता. तेव्हा tripसाठी दणकट स्पोर्ट्स शुजच वापरा.

केरळ मध्ये मुन्नार सर्वात सुंदर आहे. मात्र डिसेंबर म्हणजे थंडी कडाक्याची असेल
आणि सिझन म्हणजे गर्दी पण.
उत्तम दाक्षिणात्य पदार्थ खायचे असतील तर हॉटेल सर्वाना मध्ये अवश्य जा
अगदी मार्केट मध्ये आहे. गर्दी असते.
टी फॅक्टरी आहॆ तिथे चहाच्या मळ्यावर छोटी फिल्म पण दाखवतात
चहाचे भरपूर फ्लेवर्स तिथे विकायला असतात आणि चहाची चव पण घेता येते
मुन्नार मध्ये भरपूर छोटे मोठे सुंदर गार्डन्स आहेत तिथे संध्याकाळी निवांत वेळ घालवता येतो.
मसाला गार्डनचा अनुभव फ्रेश करणारा आहे एव्हडी विविध झाडे बघून मन हिरव होऊन जात Happy
मसाले मात्र महाग आहेत
अलेप्पीला हाऊसबोट मध्ये राहण्याचा पर्याय मात्र मला महाग आणि ओव्हररेटेड वाटला
त्याऐवजी भरपूर बोट राइड करण्यात वेळ मस्त जाऊ शकतो

चहाच्या मळ्यात तिथल्या चहाची चव घेऊन अजिबात चहा पावडर विकत घेऊ नका, फसवतात. मसाले खरंच छान असतात. Roll-ऑन अत्तर मिळतात ते नक्की घ्या, खूप सुंदर सुगंध असतो. निलगिरी चं तेल पण घ्या, खूप छान वास असतो. मेडिकल स्टोरमधले निलगिरी तेल तितके छान नसते. सर्दीला खूपच उपयोगी पडते. केळी, फणस काप घ्या, नॉन-मल्लू साठी साध्या तेलात तळलेले पण मिळतात. सर्वणा भवन म्हणजे तामिळनाडू, केरळात कधी पाहिल्याचे आठवत नाही.

थेकडीवरून येताना जमल्यास परूनथुंपाराला जाऊन या. थेकडी पासून ३० किमी आहे.
दरीतून ढग वरती येताना दिसतात. अंधार पडायच्या निदान तासभर आधी तरी पोचायला हवे तिथे तरच जायचं नाही तर व्यर्थ आहे.
या व्हिडिओत अगदी शेवटी बघा.

सरावना भवन आहे मुनारला.
तसेच दक्षिणीचा कंटाळा आला तर (चार दिवसात यायला नको खरं तर) पुरोहीत रेस्टॉरंट आणि श्रीकृष्ण मारवाडी रेस्टॉरंट आहे मुनार मध्येच. आणि हे श्रीकृष्ण थेकडी गावात सुद्धा आहे, बस स्टँड पासून जवळपास.