दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास?
हे प्रकरण नक्की आहे तरी काय?
विकासाच्या नावाखाली आरे येथे मोठी वृक्षतोड होणार. मुंबईची फुंफ्फुसे निकामी करणार. त्याविरोधात चला पेटीशन साईन करूया म्हणून उत्साहात मी सुद्धा माझे वृक्षप्रेम आणि त्याहून कांकणभर जास्त असे मुंबईप्रेम दाखवत त्याला समर्थन दिले. माझ्यासोबत चार लोकांना जबरदस्ती द्यायला लावले.
पण आता आरेला कारे करत बातमीची दुसरी बाजू काही अभ्यासू लोकं समोर घेऊन येत आहेत. आरे वाचवा म्हणणारयांवर बेगडी पर्यावरणप्रेमीचा शिक्का मारला जात आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी वृक्षतोड किती गरजेची आहे हे सांगत आहेत.
त्यात आज सकाळीच एक बातमी कानावर आली की या विकांताला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबईतील उच्चशिक्षित विकासप्रिय नागरिक मेट्रो समर्थनासाठी जमणार आहेत.
बर्रं बातमीसोबत सोबत एक भावनिक आवाहन होते,
तुमचा एक तास वसई-कल्याण च्या लोकलमधून पडणाऱ्याचा जीव वाचवू शकतो.
एकंदरीत दोन्ही बाजूंनी मला भावनिक करून टाकले आहे.
यात माझे एक सूक्ष्म निरीक्षण असेही आहे की मित्रयादीतले भाजप समर्थक मेट्रो झिंदाबाद टीमकडून उतरले आहेत तर सरकार विरोधक आरे बचाव गटात सामील आहेत.
आणि जेव्हा असे एखाद्या विषयात राजकारण येते तेव्हा काय खरे आणि काय खोटे हे जाणून घेणे माझ्यासाठी अवघड होते.
मायबोलीचर्चेत नेहमीच चांगली आणि योग्य माहीती मिळते हा आजवरचा अनुभव म्हणून मुद्दाम ईथे हे विचारतोय.
माझे वैयक्तिक मत म्हणाल तर आपण विकासाच्या रस्त्याने विनाशाकडे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मी मेट्रोला वा विकासाला विरोध करतोय. विनाश असा ना तसा आज ना उद्या होणारच आहे. तर त्याआधी विकास उपभोगून घेतलेला काय वाईट
त्या मुळेच लोकांनी कोणत्या च
त्या मुळेच लोकांनी कोणत्या च राजकीय पक्षाच्या नादाला न लागता स्व त च्या बुध्दी नी विचार करणे गरजेचे आहे.
आपल्या देशात गैर राजकीय संघटना उभी राहण्याची खूप गरज .
आणि ती संघटना स्वतंत्र विचाराच्या लोकांनी चालवली पाहिजे .
तरच सरकार वर दबाव गट तयार होईल .
जण हिताच्या विषयात कोणत्याच राजकीय पक्षाचे समर्थन आंधळे पने करणे हे पाया वर
धोंडा मारून घेण्या सारखे आहे .
केजरीवाल राजकारणात गेला ,शिव सेना राजकारणात गेली .
आता जे ngo आहेत ते फंड देणाऱ्याचे गुलाम आहेत .
लोकांची संघटना कुठे आहे
>>>>>>खाजगी जमिनीवरील
>>>>>>खाजगी जमिनीवरील अतिक्रमणे अधिकृत करण्याचा निर्णय अगदी ताजा आहे. <<<<<<<<
सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे अधिकृत करण्याचा निर्णय सरकार करु शकते कारण ते त्याम्च्या अधिकारात अशु शकेल पण खाजगी जमिनीवरील अतिक्रमणे अधिकृत करण्याचा निर्णय सरकार कसा काय घेऊ शकते ?
काँग्रेसच्या काळात झाले असते
काँग्रेसच्या काळात झाले असते तर व्होट बॅंक , टेक्स पेअरचा पैसा वगैरे रडारड झाली असती
नाणार आणि नारायण यांचा
नाणार आणि नारायण यांचा बागुलबुवा शिवसेनेला जागावाटपात नमते घेण्यासाठी उभा केलेला आहे
हीरा, आरे तोडु नये हे तुमचे
हीरा, आरे तोडु नये हे तुमचे मत कळले तरी त्याचे दाखले देताना ‘ ब्रिटीशांनी जे केले नाही ते आता का करता ‘ अशी तुलना चुकीची. मुंबईत तेव्हा श्वास घ्यायला जागा होती, अवाढव्य लोकसंख्या नव्हती त्यांच्या काळात. (म्हणुन आरे तोडा असे म्हणायचे नाहीये).
तुमच्याकडुन महाराष्ट्रात इतर कुठेकुठे पर्यावरणाचा नाश झालाय याबद्दल पण वाचायला आवडेल. तो नाश वाचवता आला असता का? आणि धारावी इतिहासाबद्दल पण काही माहिती असल्यास वाचायला आवडेल.
बाकी काही नाही तरी झाडं
बाकी काही नाही तरी झाडं तोडायच्या परवानगीची प्रक्रिया कशी राबवली गेली, ते पहा लोकहो.
सुनील बर्वे पहा काय
सुनील बर्वे पहा काय म्हणताहेत
https://www.facebook.com/100000662234714/posts/2681223721909676/?sfnsn=s...
व्हिडिओ पाहिला की आरे कॉलनी च्या वैभवाची झलक दिसेल, थोडीशी कल्पना येईल
मुंबईत अवाढव्य लोकसंख्या आहे
मुंबईत अवाढव्य लोकसंख्या आहे म्हणूनच इथे स्वच्छ हवेची आणि प्रदूषणरहित पर्यावरणाची निकडीची गरज आहे. लोकसंख्येच्य ह्या सागरात स्वच्छ हवेची, निसर्गसंपन्नतेची बेटे हवीतच. आणि आहेत तीच राखायची आहेत, नवी निर्माण करणं राहू देत.
मुंबईत अवाढव्य लोकसंख्या आहे
डु प्र का टा आ
हे शिवसेनावाले सत्तेत असून
हे शिवसेनावाले सत्तेत असून विरोधात आंदोलन कसकाय करू शकतात?
पण मी काय म्हणतो? जाऊ दे न
पण मी काय म्हणतो? जाऊ दे न आरे? मुंबईच वातावरण सहन नाही झालं म्हणून मुंबई सोडणारे सोडतील. ज्यांना रहायच ते राहतील.
आपल्याला काय?
काय गंमत आहे बघा. एकिकडे
काय गंमत आहे बघा. एकिकडे म्हणायचं आमचा विकासाला विरोध नाहि, आणि दुसरीकडुन पर्यावरणाचं कारण देउन विकासाला विरोध करायचा. म्हणजे बोलायचं प्रोग्रेसिव पण वागायचं रिग्रेसिव. हाहा...
जाउदे आता मुद्दे पण तेच तेच ब्रोकन रेकर्ड सारखे यायला लागलेत. विधानसभेच्या निवडणुका संपेस्तोवर वातावरण थोडं तापेल. बट राइट आफ्टर, एव्हरिथिंग विल फॉल इन लाइन...
शाश्वत विकास नावाचाही मार्ग
शाश्वत विकास नावाचाही मार्ग असतो
प्रश्न रस्त्याच्या दुतर्फा लावलेली काही हजार झाडं तोडायची असता तर गोष्ट वेगळी होती
शेकडो वर्षानंतर तयार झालेल्या एका जंगल परिसंस्थेला भगदाड पाडायची गोष्ट चालली आहे परिसंस्था म्हणजे फक्त काही झाडे नाहीत पक्षी प्राणी कृमी कीटक ऋतूनुसार त्यांचे स्थलांतर करण्याचे मार्ग अशा अनेक बाबींचा विचार करायला हवा
कायद्यातील पळवाटा काढून समजा कागदीपत्री पूर्तता केली तरी गुन्हा आहे हा पाप आहे
नैसर्गिक संसाधनांचा मुद्दा असेल तेव्हा (तरी) पैशातील नफा नुकसान, निवडणूका आणि पक्षीय अभिनिवेश ह्या पलीकडे जाऊन पहायची गरज आहे
" विधानसभेच्या निवडणुका
" विधानसभेच्या निवडणुका संपेस्तोवर वातावरण तापवायच " हेच कारण आहे. राजकारणाच्या पोळ्या शेकायच्या आहेत हे स्पष्ट आहे.
शिवसेना व भाजपा मध्ये सीटचे ,वाटप अजुन ठरलेल नाही. भाजपाला विजयाची खात्री आहे त्यामुळे भाजपा निवडणुकीत शिवसेनेला ५०% जागा द्यायला तयार नाही.
हर्पेन, अनेक वेळा सहमत.
हर्पेन, अनेक वेळा सहमत. नेमका मुद्दा. परिसंस्था, अधिवास एका बाजूला आणि रस्त्यांचे सुशोभितीकरण दुसऱ्या बाजूला. अगदीच वेगळ्या संकल्पना आहेत ह्या. सुट्या सुट्या झाडांची चांगली परिसंस्था बनत नाही. तिथे प्राण्यांसाठी अधिवास तयार होत नाही.
25 वर्ग किलोमीटर मधील झाडे
25 वर्ग किलोमीटर मधील झाडे तोडली तर तापमान 2 c वाढते .
झाडे आहेत म्हणून माणूस आहे हे संशोधक सांगून थकले तरी काही लोकांचे डोळे उघडत नाहीत .
झाडे कार्बन उस्तर्जन सुधा रोखतात .
झाडे नसतील तर कार्बन चा समतोल राखण्यासाठी खरबो रुपये खर्च करावे लागतील .
झाडे जमिनितल पाणी शोषून ते सूर्य ची ऊर्जा वापरून हवेत सोडतात त्या मुळे तापमान नियंत्रित राहते .
तापमान वाढले तर नवं ,नवीन रोग ह्या पृथ्वी वर अवतरतील .
म्हणून सर्वांनीच शक्य होईल तेवढे पर्यावरणाचे रक्षण केलेच पाहिजे
झाडे कार्बन उस्तर्जन सुधा
झाडे कार्बन उस्तर्जन सुधा रोखतात . >> कुठनं होणारं कार्बन उत्सर्जन रोखतात? कारखान्यातून?
झाडे नसतील तर कार्बन चा समतोल राखण्यासाठी खरबो रुपये खर्च करावे लागतील . >> खरबो खर्च करुन कार्बनचा समतोल कसा साधेल?
झाडे जमिनितल पाणी शोषून ते सूर्य ची ऊर्जा वापरून हवेत सोडतात त्या मुळे तापमान नियंत्रित राहते . >>
तापमान वाढले तर नवं ,नवीन रोग ह्या पृथ्वी वर अवतरतील . >> कुठले रोग तापमानवाढीने होतात? काहीही!
हीरा, हर्पेन सर्व पोस्ट्सशी सहमत.
हीरा, तुम्हाला माझा मुद्दा
हीरा, तुम्हाला माझा मुद्दा समजला नाही. ‘ब्रिटिशानी केले नाही तर आता का ?‘ ही तुलना पटली नव्हती. झाडे तोडणे वाईट हा मुद्दा चुक असे म्हणायचे नाही. तेचतेच लिहिताय. असो. थांबते.
हा मार्ग समजा होऊ शकला नाही तर आधी झालेल्या कामाचा दुसर्या कशाला वापर करता येईल का?
अमितव, साधा diseases caused
अमितव, साधा diseases caused by global warming असा गुगल सर्च केलास तरी लक्षात येईल की तापमानवाढीचे काय दुष्परिणाम होतात माणसांच्या आरोग्यावर.
भारतातल्या कोणालाही विचार.. फुफ्फुसाचे आजार, दम्याचे, कर्करोगाचे, डेंग्यू चिकनगुनिया अशा साथीच्या आजारांचे प्रमाण कसे वाढले आहे ते. लहान मुलांची फुफ्फुसं निकामी होत आहेत. परवा पुण्यात माझ्या परीचयाची एक २५ वर्षांची मुलगी डेंग्यू होऊन गेली. हा समाजाने आणि शासनाने मिळून केलेला खून आहे.
ध्रुवीय बर्फ वितळले की कोणते महाभयानक रोग पसरू शकतील याची शास्त्रज्ञांना अजून कल्पना नाही. अनेक मुद्दे आहेत. पण विकासाची संकुचित व्याख्या डोळ्यासमोर ठेवून बघायचे ठरवले तर हे काहीच दिसणार नाही. जेव्हा दिसेल त्या वेळी फार उशीर झाला असेल.
https://www.bobhata.com
https://www.bobhata.com/lifestyle/artist-transplants-300-trees-football-...
वाचा ही बातमी
काही दिवसांपूर्वी फुटबॉलचे मैदान असलेल्या जागेत आता जंगल दिसत. क्लॉस यांनी त्या मैदानात जगभरातील वेगवेगळी झाडे आणून लावली आहेत. क्लॉस म्हणतात की जगाचे लक्ष हवामान बदलसारख्या महत्वाच्या विषयाकडे ओढले जावे म्हणून त्यांनी हा प्रयोग केला आहे. हवामानातील हे बदल जर असेच सुरु राहिले तर एके दिवशी झाडे फक्त शोसाठी कुंडीत लावलेली दिसतील.
कुठनं होणारं कार्बन उत्सर्जन
कुठनं होणारं कार्बन उत्सर्जन रोखतात?
झाडे कार्बन डायॉक्साईड शोषतात आणि oxygen हवेत सोडतात हे सर्व मान्य आहे .
ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे पृथ्वी चे तापमान वाढले आहे .आणि ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये कार्बन डाय ऑक्साईड हा एक महत्त्वाचा गॅस आहे .
आणि माणसा मुळे त्याचे प्रमाण वाढले आहे .( विविध कारखाने,वाहने etc ह्या कारणाने )
झाडे तापमान कसे नियंत्रित ठेवतात .
एक तर कार्बन डाय ऑक्साईड चे शोषण करून.
दुसरे सावली देवून,
आणि जमिनीतील पाणी शोषण करून सूर्य chya उष्णतेने त्याचे बाष्प मध्ये रुपांतर झाडेच करतात (हे काही ही नाही खरे आहे )
झाडे नष्ट झाली की जमिनीचा उपयोग बदलतो (बिल्डिंग,रस्ते इत्यादी कामासाठी होतो).
तापमानात होणाऱ्या चढ उतार मुळे माणसं च नाही तर झाडे सुद्धा आजारी पडतात ह्या साठी तुम्हीच निरीक्षण करा लक्षात येईल.
<< शाश्वत विकास नावाचाही
<< शाश्वत विकास नावाचाही मार्ग असतो
प्रश्न रस्त्याच्या दुतर्फा लावलेली काही हजार झाडं तोडायची असता तर गोष्ट वेगळी होती
शेकडो वर्षानंतर तयार झालेल्या एका जंगल परिसंस्थेला भगदाड पाडायची गोष्ट चालली आहे परिसंस्था म्हणजे फक्त काही झाडे नाहीत पक्षी प्राणी कृमी कीटक ऋतूनुसार त्यांचे स्थलांतर करण्याचे मार्ग अशा अनेक बाबींचा विचार करायला हवा
कायद्यातील पळवाटा काढून समजा कागदीपत्री पूर्तता केली तरी गुन्हा आहे हा पाप आहे
नैसर्गिक संसाधनांचा मुद्दा असेल तेव्हा (तरी) पैशातील नफा नुकसान, निवडणूका आणि पक्षीय अभिनिवेश ह्या पलीकडे जाऊन पहायची गरज आहे >>
------- सहमत.
मायबोलीवर आल्यावर काही तरी शिकायला मिळते हे हिरा आणि हर्पेन यांच्या पोस्ट वाचल्यावर पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्ञानात अनमोल भर घातली त्याबद्दल धन्यवाद.
आजोबा, इथे फक्त शिवसेनाच
आजोबा, इथे फक्त शिवसेनाच विरोधात सक्रिय आहे. तो विरोधी पक्ष आहे की नाही हे तुम्ही ठरवा.>>>
गेली पाच वर्षे खुद्द शिवसेनेलाच हे ठरवता आलेले नाही तर सामान्य लोक कसे काय ठरवू शकतील.
असो, विषयांतर झाले.
आता फिल्मस्टार्सकरवी मेट्रोचं
आता फिल्मस्टार्सकरवी मेट्रोचं गुणगान करवून घेतलं जातंय. बच्चन झाले, एकविसाव्या शतभातला भारतकुमार झाला. पुढला कोण असेल पाहू.
@ सेना, युती आहे म्हणून
@ सेना, युती आहे म्हणून प्रत्तेक गोष्टीत पप्प्या घेणे गरजेचे आहे का? जे पटेल त्याला समर्थन, न पटल्यास विरोध.
@ सेना, युती आहे म्हणून
@ सेना, युती आहे म्हणून प्रत्तेक गोष्टीत पप्प्या घेणे गरजेचे आहे का? जे पटेल त्याला समर्थन, न पटल्यास विरोध.
ती भरत यांनी टाकलेली
ती भरत यांनी टाकलेली पुण्यातील आमदाराने गुजरातीत होर्डिंग लावलं ती न्यूज वाचली. लांडगे नावाचे हे महाशय मूळचे राष्ट्रवादीचे असून भाजप च्या फ्री इन्कमिंग ऑफरचा लाभ घेऊन भाजपमध्ये आले. त्यांनी केवळ गुजरातीच नाही तर २३ भारतीय भाषांत सेम फलक लावला आहे. पिंपरी भागातील त्यांच्या मतदार संघात २५ टक्केच्या आसपास अमराठी मतदार आहेत. मावळ ते पिंपरी चिंचवड हिंजवडी ते हडपसर मांजरी या सर्व भागात शेतजमीन डेव्हलप करून गुंठा मंत्री १९९९ नंतर कोणी निर्माण केले? इथे इतक्या परप्रांतीयांना रेड कार्पेट कोणी घातले? त्याने पर्यावरणाचा समतोल सुधारला का? लोणावळा लवासा Amby valley पलावा सिटी यांना १९९९ ते २०१३ या काळात पटापट अप्रुव्हल मिळून हे प्रकल्प उभे राहिले, त्याने पर्यावरण समतोल वाढला का? आज मेट्रोला विरोध करणारे तेव्हा गप्प का बसले होते? माझा आरे शेडबद्दल अभ्यास नाही त्यामुळे त्याबद्दल काही ओपिनियन नाही पण पुणे कोकण या भागात एकूण फार वाट लागली आहे आणि ती लावणाऱ्यांचे कट्टर समर्थक आता पर्यावरण वगैरे बोलू लागले आहेत हे विनोदी आहे. सौ चुहे खाके...
<आज मेट्रोला विरोध करणारे
<आज मेट्रोला विरोध करणारे तेव्हा गप्प का बसले होते? >
मेट्रोला विरोध? नेहमीप्रमाणे फिरवाफिरवी.र्तेव्हा गप्प होतो का ते टाइम मशीनमधून मागे जाऊन पहा.
राष्ट्रवादीचा आमदार भाजपत आला की त्याच्या गुणांचे श्रेय भाजपचे, दोषांचे राष्ट्रवादीचे. अन्य पक्षातील लोकांना घेऊ नका, असा आवाज भाजप सम र्थक उठवतात की त्याचे समर्थन , कौतुक करतात? ज्यांच्या नावाने खडे फोडलेत ती कृपाशंकर सिंग, ना रायण राणे यांच्यासारखी मंडळी पावन होऊन भाजपच्या मांडवात येताहेत.
व्हॉट अबाउट्रीच्या पलीकडे प्रतिसाद लिहि ता यायला भाजपवाल्यांना अजून किती वर्षे लागतील?
काँग्रेसने पर्यावरणाची वाट लावली म्हणून भाजपलाही तो हक्क मिळतो, असे आहे का? (इथे पर्यावरणाच्या जागी अनेक गोष्टी घालता येतील.)
नवीन बांधकामे फक्त
नवीन बांधकामे फक्त परप्रांतीयच करतात का ? लोकल लोक आईबापांच्या घरात रहातात म्हणून प्रमाण कमी असते, जॉब सेटल झाला की नवा मनुष्य घर बांधतो, उदा लाल किल्ला
लोकल लोकांनी त्यांच्या आई आज्जीला विचारले की तेही हेच बोलतील, तेही असेच फिरत आले होते अन मग घर बांधले
मी तिकडे आरे कॉलनीच्या आतमधे
मी तिकडे आरे कॉलनीच्या आतमधे एकदाच गेलो आहे. मॅरॅथॉन होती त्याकरता आणि भर मुंबईत हे असे घनदाट जंगल म्हणता येईल अशी जागा ही आहे असे पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. मुंबईत आरे कॉलनीच्या आसपास राहणारे कोणी असतील तर किंवा इतर कोणालाही शक्य होणार असेल तर तिथला एखादा व्हिडियो काढून इकडे टाकता येईल का? गेलाबाजार फोटोही चालतील.
काय नष्ट होणार आहे ह्याबाबत ज्यांना माहित नाहीये त्यांना नीट कळेल
Pages