दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास? हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2019 - 15:57

दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास?

हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

विकासाच्या नावाखाली आरे येथे मोठी वृक्षतोड होणार. मुंबईची फुंफ्फुसे निकामी करणार. त्याविरोधात चला पेटीशन साईन करूया म्हणून उत्साहात मी सुद्धा माझे वृक्षप्रेम आणि त्याहून कांकणभर जास्त असे मुंबईप्रेम दाखवत त्याला समर्थन दिले. माझ्यासोबत चार लोकांना जबरदस्ती द्यायला लावले.

पण आता आरेला कारे करत बातमीची दुसरी बाजू काही अभ्यासू लोकं समोर घेऊन येत आहेत. आरे वाचवा म्हणणारयांवर बेगडी पर्यावरणप्रेमीचा शिक्का मारला जात आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी वृक्षतोड किती गरजेची आहे हे सांगत आहेत.
त्यात आज सकाळीच एक बातमी कानावर आली की या विकांताला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबईतील उच्चशिक्षित विकासप्रिय नागरिक मेट्रो समर्थनासाठी जमणार आहेत.
बर्रं बातमीसोबत सोबत एक भावनिक आवाहन होते,
तुमचा एक तास वसई-कल्याण च्या लोकलमधून पडणाऱ्याचा जीव वाचवू शकतो.

एकंदरीत दोन्ही बाजूंनी मला भावनिक करून टाकले आहे.

यात माझे एक सूक्ष्म निरीक्षण असेही आहे की मित्रयादीतले भाजप समर्थक मेट्रो झिंदाबाद टीमकडून उतरले आहेत तर सरकार विरोधक आरे बचाव गटात सामील आहेत.
आणि जेव्हा असे एखाद्या विषयात राजकारण येते तेव्हा काय खरे आणि काय खोटे हे जाणून घेणे माझ्यासाठी अवघड होते.

मायबोलीचर्चेत नेहमीच चांगली आणि योग्य माहीती मिळते हा आजवरचा अनुभव म्हणून मुद्दाम ईथे हे विचारतोय.

माझे वैयक्तिक मत म्हणाल तर आपण विकासाच्या रस्त्याने विनाशाकडे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मी मेट्रोला वा विकासाला विरोध करतोय. विनाश असा ना तसा आज ना उद्या होणारच आहे. तर त्याआधी विकास उपभोगून घेतलेला काय वाईट Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजकीय विरोध करणारे हपता घेण्यासाठी सारे करताहेत , हे उघड आहेत, अन्यथा मुंबईवर 3 पिढ्या ह्यांचेच राज्य आहे , विरोध करून काम बंद पडले की कंत्राटदार पेढे घेऊन भेटायला जाईल,

तुमच्या खारी अन फुलपाखरांची पोटे भरावीत म्हणून ते लढत नाहीत

गुजरात मॉडेल महाराष्ट्रात - स्वानुभव

IIM अहमदाबादमध्ये 2011-13 साली शिकत असताना व्यवसाय आणि उद्योगधंद्याचे समाजावर होणारे परिणाम शिकवणारा एक कोर्स होता. त्या कोर्ससाठी प्रत्यक्ष काही जागांना भेटी देऊन त्यावर आम्हाला रिपोर्ट लिहावा लागायचा. माझ्या ग्रुपला साबरमती रिव्हर फ्रंटच्या नियोजित जागेला भेट द्यायची, तिथल्या लोकांशी बोलायची संधी मिळाली. त्यातुन जे गवसलं ते विदारक होतं, आणि काल रात्री आरेच्या जंगलात झालेल्या झाडांच्या कत्तलीसारखंच हादरवून टाकणारं होतं.

अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या दोन्ही तटांवरची कष्टकरी लोकांची हजारो घरे River Front बनवण्यासाठी 2011 साली अशीच जमीनदोस्त करण्यात आली होती. त्यातले कित्येक लोक तिथे शंभरेक वर्षांपासून राहत होते आणि त्यांच्या नावावर घराचे सगळे कागदपत्रे होती. न्यायालयात लढाई चालू होती. हायकोर्टाने सरकारच्या बाजूने आदेश दिला आणि मग असेच शनिवारी कसलीही पूर्वसूचना न देता अचानक तिथल्या साऱ्या घरांवर बुलडोझर फिरला. शनिवार मुद्दाम निवडला गेला जेणेकरून कोर्ट बंद असतं आणि स्टे ऑर्डर आणता येत नाही.

तिथल्या विस्थापित लोकांपैकी निम्म्याअर्ध्या लोकांना तिथून 20 किलोमीटर दूर सरकारी घरं दिली गेली, ज्यांचं बांधकाम अत्यंत निकृष्ट होतं. तिथलं पिण्याचं पाणीही इतकं खराब होत की बहुतांश लोक वेगवेगळ्या आजारांनी बाधित होत होते. कुणालाही रोजगार मिळायची शक्यता नव्हती, कारण सगळ्या लोकांचे आधीचे रोजगार शहरात होते आणि नवीन घराच्या आसपास लोकवस्ती नव्हती, ना येऊन-जाऊन कुठला छोटा रोजगार करणे शक्य होते. या सरकारी वसाहतीत घरे वाटताना मात्र हिंदू आणि मुसलमानांना वेगवेगळ्या बिल्डिंग दिल्या गेल्या होत्या. एक लहान हिंदू मुलगा त्याच्या शेजारच्या बिल्डिंगला पाकिस्तान म्हणत होता तेव्हा हे कळलं. जगण्याची सोय नव्हती, पण धार्मिक विद्वेषाची पूर्ण सोय सरकारने करून ठेवली होती.

ही सरकारी घरे सर्वांना मिळाली नव्हती. बऱ्याच लोकांना सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन ही घरे मिळाली. ज्या निम्म्याअर्ध्या लोकांना ही घरं मिळाली नाहीत त्यांना अहमदाबादच्या कचऱ्याच्या डंपिंग ग्राऊंडशेजारी हलवण्यात आले होते. वरून जाणाऱ्या high tension च्या विजेच्या तारा, शेजारी कचऱ्याचा डोंगर अशा ठिकाणी हजारो लोक बांबूवर साड्या, ताडपत्री पांघरून आडोसा करून राहत होते. पिण्याला पाणी नाही, स्वच्छ हवा नाही, साप वगैरेंच्या दंशाची भीती अशा अवस्थेत त्या लोकांना राहताना पाहून आपण खरंच लोकशाही देश आहोत का? आपल्याकडे मानवी आयुष्याला काही किंमत आहे का? अशा प्रश्नांचं काहूर माजलं होतं.

तिथल्या विस्थापित लोकांचे चेहरे, शब्द, दुःख काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हते. त्या कोर्सचा रिपोर्ट लिहिताना आणि वर्गात प्रेझेंट करताना आम्हा प्रत्येकाला स्वतःची लाज वाटत होती कारण या व्यवस्थेला कुठेतरी आम्हीही जबाबदार होतो. जेव्हा ती रिव्हर फ्रंट बांधली गेली तेव्हा माझा एक डॉक्टर मित्र तिच्याबद्दल खूप कौतुकाने बोलायचा आणि मला फक्त त्याची दया यायची, कारण त्याने तिथले लोक कुठं गेले याचा कधी विचारच केला नव्हता. राज ठाकरेही जेव्हा रिव्हर फ्रंटला गेले तेव्हा महाराष्ट्रात परत आल्यावर मोदींचे आणि गुजरात मॉडेलचे गुणगान गात राहिले, त्यांनीही कधी हा विचार केलाच नसेल की इथले लोक कुठे गेले?

रिव्हर फ्रंटसाठीच्या demolition बद्दल तुम्हाला गुगल करून काहीही मोठी माहिती मिळणार नाही, कारण त्यावेळी गुजरातमधला मीडिया विकासाच्या सरकार प्रायोजित नशेत होता. आणि विरोधी पक्ष काँग्रेस तर स्वतःची काही जबाबदारी आहे हे विसरून निवांत होता. जी अवस्था रिव्हर फ्रंटची, तीच सरदार पुतळ्याची. किती गावं पाण्यात बुडाली, किती लोकांचे विस्थापन झाले आणि हे सगळे कशासाठी केले यावर ना मीडिया बोलला, ना विरोधी पक्ष! या देशातले प्रशासन तर स्वतःच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर निघू नयेत, नोकरी वाचावी आणि नको तिथे बदली होऊ नये यासाठी नेहमीच सरकारच्या ताटाखालचे मांजर बनून जगत आलेले आहे.

काल रात्री आरेत महाराष्ट्र सरकारने मोदींच्या गुजरात मॉडेलची हुबेहूब नक्कल केली. कोर्टाची लढाई अजून संपलीही नाही तोवर प्रशासनाला हाताशी धरून शिस्तीत आरेतलं जंगल भुईसपाट केलं. हे इतकं मोठं ऑपरेशन होतं असताना मीडियाला पूर्ण माहिती असताना मीडिया शांत बसून राहिला. एकाही पत्रकारात सरकारला जाब विचारण्याची हिंमत नव्हती, ना आहे. आणि विरोधी पक्ष तर नेहमीप्रमाणे झोपी गेलेले. गुजरात मॉडेल आता फडणवीसांनी महाराष्ट्रात व्यवस्थितरित्या आणलेलं आहे. वैयक्तिक माझ्या मनातून फडणवीस आता कायमचे उतरले आहेत, आणि मीडिया व विरोधी पक्ष इतका लाचार आहे की त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. ही महाराष्ट्राच्या अधोगतीची, महाराष्ट्राचा गुजरात बनण्याची सुरुवात आहे.

आपण एक देश म्हणून आधुनिक लोकशाही, कायद्याचं राज्य आणि संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांपासून आणि त्यात दिलेल्या मूलभूत हक्कांपासून आता बरेच दूर निघून आलोय. या देशाच्या होणाऱ्या विनाशाला माझी पिढी जबाबदार आहे याची लाज मनात ठेवून शेवटचा श्वास घ्यावा लागणार आहे हे दुःख भयानक असणार आहे.

- डॉ. विनय काटे

विरोधी आणि सत्ताधारी असा भेदभाव करून अशा पोजेक्ट ला पाठिंबा किंवा विरोध करायचा नसतो तर त्याचे फायदे तोटे बघून निर्णय घ्यायचा असतो हे जनतेला कधी कळणार .
आपण आपलीच कबर खोदत आहे हे पण आपल्याला समजू नये.
Car शेड हा फक्त मुलामा आहे खरा हेतू वेगळाच आहे .

आता निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फजिती झालीय .
ज्या नेत्यांसाठी विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यां ना शिव्या दिल्या तेच नेते विरोधी पक्षात गेले .
कोण विचारतोय कार्यकर्त्यांना

मुंबई व पुणे, दोन्ही बाजूनी वस्ती संपतच नाही, तिकडून पुणे व इकडून मुंबई वाढत वाढत जाऊन एकमेकांना चिकटणार असे वाटतेय. 2004-05 मध्ये तिथे हिरवे जंगल होते , आता सिमेंटचे जंगल उगवले आहे. तिथे गेल्या 15 वर्षात किती झाडे कापली गेली याचा हिशोब कोणी ठेवला आहे का? आपला सगळा विरोध कायम सिलेक्टिव्ह का असतो?

Submitted by साधना on 5 October, 2019 - 03:27

>>>

तुम्ही स्वत:ही तिथेही केला नव्हता विरोध आणि आताही जे ईथे विरोध करत आहेत त्यांनाही अडवत आहात.

जेव्हा सतीची प्रथा, बालविवाह, विधवांचे केस कापणे ईत्यादी प्रथांना पहिल्यांदा कोणी विरोध केला असेल तेव्हाही काही लोकं अशीच अंगावर धावून आली असणार.. अरे काल परवा ती अमुकतमुक सती गेली तेव्हा तुम्ही नाही आलात, तुमच्या आजांच्या काळापासून ही प्रथा चालू आहे पण तुमच्या वडीलांनी कधी त्याला विरोध केला नाही तर तुम्ही आज कुठून आलात??
पण अश्यांना जुमानून तेव्हाचे सुधारक मागे हटले असते ना तर आजही! .. आजही स्त्रिया सती जातच राहिल्या असत्या..

आपण काय विरोध करतोय, कोणाला विरोध करतोय, तुमच्या सरकारने केले तर आता आमचेही सरकार करणार... कसली ही हट्टी भुमिका? सर्वांनीच चष्मे काढायची आणि खांद्यावर घेऊन नाचवत असलेले राजकीय झेंडे आता खाली ठेवायची वेळ झाली आहे..

भले काही विरोधी पक्ष रजकारणासाठी आरे वाचवा ओरडत असतील.. पण आपल्याला त्यांच्याशी काय घेणेदेणे. आपल्याला देवाने आपले डोके दिलेय ते वापरून विचार करूया ना काय चूक काय बरोबर?
काय तर म्हणे पर्यावरणवादींना पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारले तर त्यांना माहीती नाही. अरे शाळेत्ल्या मुलांनाही झाडे ऑक्सिजन फळ फुले सावली देतात जमिनीची झीज वाचवतात पाऊस पडतात अन्नसाखळी अन संस्था शाबूत ठेवतात हे समजते ईतके पुरेसे नाही का? आणि त्यापलीकडे तुम्हाला जास्तीचे ज्ञान आहे चला.. तरी काय फायदा त्या ज्ञानाचा. ते तर आज वाया चाललेय.. अत्यंत निराश झालोय ईथली चर्चा वाचून. वरची एक पोस्ट कोट केली असली तरी माझी पोस्ट असा विचार करणारया सर्वांसाठीच आहे.

आणि हो, मला आजवर झाडे तोडणारया बिल्डर्सकडून एक पैश्यांचेही कमिशन मिळाले नाही जे मी त्यांना तेव्हा पाठीशी घातले आणि त्यांच्या बिल्डींग होऊ दिल्या.
जाऊ दे.. मी तरी कश्याला सांगतोय हे... मलाच माहीत नाही माझे घर बांधायला किती झाडे पाडली.. जाळून टाका पुर्ण आरे जंगल.. माझी फुल्ल परमिशन

दिल्ली असू ध्या नाही तर मुंबई .
आर्थिक क्षेत्र एकच ठिकाणी एकवटल्या मुळे नोकऱ्यांच्या संध्या सुद्धा एकाच ठिकाणी एकवटल्या आणि सर्व समस्या चे कारण हेच आहे .
विकेंद्रीकरण करा .
राजस्थान चे वाळवंट निर्मनुष्य पडलाय जावू ध्या सर्व रासायनिक कारखाने तिथे .
पाहिजे तर महाराष्ट्र मधून पाणी ,वीज न्या जे वाया जात आहे ते .
रेल्वे नी फुकट वाहतूक करा .शेवटी देश एकाच आहे .
पण लोकसंख्या एकच ठिकाणी एकवटून देवू नका धोका आहे .
मार्ग च काढायचे तर खूप पर्याय असतात .
पण सर्वांना शॉर्ट कट पाहिजे .
गुन्हेगार नाही मिळाला तर गरीब माणसाला आतमध्ये घ्या हा शॉर्ट फॉर्म पोलिस वापरतात च ना

>>>>सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी नेहमीप्रमाणे या प्रकरणाला धार्मिक रंग द्यायला सुरुवात केली आहे.<<<<<<
Get Well Soon !!!

>>>>झाडे कापली जात असल्याची बातमी कळताच अनेक लोक निषेध नोंदवण्यासाठी तिथे पोचले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय.
आता कलम १४४ लागू झालंय.
३८ लोकां च्या विरोधात एफ आय आर दाखल झालेत. <<<<<<<<<
फक्त ३८ लोक विरोध करायला पोहोचले ! आणि हे म्हणत आहेत अनेक लोक निषेध करत होते !!!
Biggrin

ते कुठे गेले ?

परदेशात 1 फूल उचलणारे? 400 झाडे कापली तरी गप्प?

।>>>>>परदेशात 1 फूल उचलणारे? 400 झाडे कापली तरी गप्प? <<<<<<
६५ वर्षे गुलामीत घालवुन वर त्या मालकाचे गुणगान करणार्यांना काय कळणार विकास कसा होतो ??

आरे मधे चालवलेल्या वृक्षतोडी मुळे यातना झाल्या. अत्यंत घिसाडघाईने वृक्षतोडीचा निर्णय अमलांत अणण्याचा प्रकार धक्कादायक आहे. संपुर्ण जग जेव्हा climate change वर गांभिर्याने विचार करत आहे त्याचवेळी वृक्षांच्या कत्तलीचे प्रकार होणे हे अनाकलनीय आहे. पृथ्वीच्या जन्मानंतर आतापर्यंत ९९ % प्रजाती नष्ट/नामशेष झालेल्या आहेत आणि नामशेषाची प्रक्रिया पुढेही सुरु रहाणार आहे. वनांचे रक्षण आणि संवर्धन केले नाही तर मानवाचा विनाशकाळ वेगाने जवळ येतो आहे.

३०० वर्षांपुर्वी संत तुकाराम महाराजांनी रचलेला आणि निसर्गाप्रती आत्मियता दर्शवणारा कर्णमधुर अभंग,
https://www.youtube.com/watch?v=Yi50TNtYkzw

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।

येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ।।

आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ।।

कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ।।

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ।।

तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ।।

----- संत तुकाराम

ही बाब नुसत्या वृक्षतोडीची नाही,
आरे मधे आहे ते एक परिपूर्ण इको सिस्टीम असलेलं जंगल.
मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावाकाठचं
ह्याचा लचका तोडल्याचा परिणाम भोगावाच लागेल.
येणाऱ्या काळात मुंबईला पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वाढली आहे

हर्पेन - सहमत... पण आज निशब्द केले आहे. कधी परतणे शक्य नसते अशा वळणावर आपण आलो आहोत.

ट्विटरवर जोरात हवा हाय ... चर्च ची क्रबस्तानची जमीन मेट्रोवाळ्यानी ढापली !! >>> मी ट्विटरवर वाचलं की "चर्चला जागा दिली होती पण वापर न केला गेल्याने परत घेतली गेली आणि मेट्रोला गरज निर्माण झाल्यावर मेट्रोला दिली गेली. चर्चला दिली तेव्हा कुणी आंदोलन नाही केले मग मेट्रोला दिल्यावर का विरोध करता."

आपण काय विरोध करतोय, कोणाला विरोध करतोय, तुमच्या सरकारने केले तर आता आमचेही सरकार करणार... कसली ही हट्टी भुमिका?>>>

मी कुठे लिहिलेय का की सरकार भाजपशिवसेनेचे आहे म्हणून सगळ्यांनी सपोर्ट करा?

मी आरेला विरोध करणाऱ्यांना विरोध करतेय ते मला झाडे नकोयत म्हणून नाही तर मुंबईत प्रवास करण्याचा प्रश्न इतका गंभीर झालाय की आता पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे विरोध करून उपयोग नाही. विरोध करायचाच तर 25 वर्षापूर्वी रस्त्यावर येऊन 'आधी इन्फ्रास्ट्रक्चर बनवा, मग नवे लोंढे आत येऊ द्या' ही भूमिका घ्यायला हवी होती. उगीच सती बीती वगैरे चुकीच्या तुलना कशाला करताय. हास्यास्पद तुलना आहे.

जिथे अवैध जंगलतोड होतेय तिथे कोणी बघतही नाही. ज्यांना खरेच कळकळ आहे त्यांना करा की देशव्यापी आंदोलने जंगलातली खासगी हॉटेले, रिसॉर्ट, घरे वगैरेसाठी झाडे न तोडण्यासाठी. ग्लॅमर आहे तिथे सगळे धावताहेत.

आणि विरोध इतक्या आंधळा की त्यापुढे कोर्ट बिर्ट, त्यांचे निकाल याला काहीही महत्व नाही, हे म्हणतील तोच निकाल. त्यात आता निवडणुका म्हटल्यावर सगळे मतांवर डोळा ठेऊन उड्या मारताहेत.

म्हणून अशा आंदोलनांना जनतेचा पाठिंबा मिळत नाही.

चर्चला दिली तेव्हा कुणी आंदोलन नाही केले मग मेट्रोला दिल्यावर का विरोध करता>>>

सगळे सिलेक्टिव्ह.

आता म्हणतील, तेव्हा आम्ही झोपलो म्हणून आता उठुच नये का?

खरा मुद्दा तेव्हा झोपलो म्हणून आता उठू नये हा नसून, आम्हाला सोयीचे तेव्हा आम्ही उठणार, एरवी झोपून राहणार हा आहे.

>>>>>म्हणून अशा आंदोलनांना जनतेचा पाठिंबा मिळत नाही. <<<<<
म्हणुनच फक्त ३६ (काही लोकांच्या मते अनेक) लोक आरेत विरोध करायला जमले होते . ते पण शुक्रवारी संध्याकाळी. सोईच्या वेळी !! सोमवारी कामावर जायला मोकळे !!

मुंबईत फ्लॅयओव्हर बांधणारे सुद्धा भाजपा सेना सरकारच !! आताच्या आंदोलनात शिवसेना आपली पोळी भाजुन घेण्याचा प्रयत्न करत आहे. युती तुटली मग लक्षात येईल ह्यांच्या. महाराष्ट्रात मोठा भाउ होण्याची स्वप्न बघणारे कसेबसे नाती टिकवुन आहेत

हे चर्च कुठून आले आता चर्चेत अचानक
सामान्य मुंबईकराने आरे जमिन वा कुठलीही जमिन कोणाच्या नावावर केली जातेय याची पाळत ठेवत बसायचे अशी अपेक्षा आहे का? जेव्हा झाडांवर कुर्हाड चालवायची वेळ येईल तेव्हा प्रकरणाला वाचा फुटेल तेव्हाच लोकं विरोधाला सरसावणार ना?
आणि लोकांनी आपले कामधंदे सोडून विरोध केला पाहिजे अन्यथा ते बेगडी ही अपेक्षा का केली जात आहे?
आणि हो काय ते सिलेक्टीव्ह विरोध.
जे सिलेक्टीव्ह विरोधाचा मुद्दा घेऊन आलेत त्यांनाही म्हणजे एकाअर्थी माहीत आहे हे घातक आहे.. फक्त जाओ पहिले उस आदमी की साईन लेके आओ.. विरोध करणारयांना हे सांगायचा अधिकार तुम्हाला तरी कोणी दिला? तुम्ही तर तेव्हाही डोळ्यावर पट्टी बांधलेली आणि आज जे उघडू पाहत आहेत त्यांनाही दमदाटी करत आहात.
सतीची तुलना आज हास्यास्पद वाटेलच. कारण आज ती बंद पडून फार काळ लोटला आहे. पण त्याकाळी जेव्हा पहिली स्त्री सती गेली तेव्हाच ही प्रथा बंद पाडायची होती, आता आधीच्या बायका गेल्या तर आताच्याही जाऊ द्या म्हणून जे होतेय ते चालू दिले असते किंवा बायकांवर् ईतरही अनेक अन्याय होतात ते आधी थांबवा मगच सतीच्या प्रथेला विरोध करा अन्यथा तुम्ही सिलेक्टीव्ह अश्या आरोपांना जुमानून गप्प बसले असते तर आजही बायका सती जातच असत्या आणि कोणाला त्यात काही हास्यास्पद वाटले नसते.

सोशलसाईटची जी ताकद जे स्वरूप आज आहे ते पंधरा वर्षांपूर्वी नव्हते. म्हणून आज प्रकरणे लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि केलेला विरोधही दिसत आहे.

मी कुठे लिहिलेय का की सरकार भाजपशिवसेनेचे आहे म्हणून सगळ्यांनी सपोर्ट करा?
>>>>

माझी पोस्ट आपल्या पोस्टला वैयक्तिक उत्तर नव्हती. तसे मी नमूदही केले आहे. पण काही लोकांना हे लागू होतेय. आधीच्या पोस्टमधील राजकीय चर्चा वाचल्यास लक्षात येईल. समर्थन विरोध दोन्हींमध्ये राजकीय अजेंडे असलेले लोकं आहेत. ते देखील सिलेक्टीव्ह विरोधाचा मुद्दा उचलत आहेत.

युनिस आजोबा, तुमच्या प्रखर बुद्धिमत्तेच्या उजेडाने डोळे दिपले.
-----
माझं स्वच्छ मत आहे, लवकरात लवकर प्रलय होऊन जगाचा अंत व्हावा आणि नवं जग निर्माण व्हावं.

Pages