दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास? हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2019 - 15:57

दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास?

हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

विकासाच्या नावाखाली आरे येथे मोठी वृक्षतोड होणार. मुंबईची फुंफ्फुसे निकामी करणार. त्याविरोधात चला पेटीशन साईन करूया म्हणून उत्साहात मी सुद्धा माझे वृक्षप्रेम आणि त्याहून कांकणभर जास्त असे मुंबईप्रेम दाखवत त्याला समर्थन दिले. माझ्यासोबत चार लोकांना जबरदस्ती द्यायला लावले.

पण आता आरेला कारे करत बातमीची दुसरी बाजू काही अभ्यासू लोकं समोर घेऊन येत आहेत. आरे वाचवा म्हणणारयांवर बेगडी पर्यावरणप्रेमीचा शिक्का मारला जात आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी वृक्षतोड किती गरजेची आहे हे सांगत आहेत.
त्यात आज सकाळीच एक बातमी कानावर आली की या विकांताला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबईतील उच्चशिक्षित विकासप्रिय नागरिक मेट्रो समर्थनासाठी जमणार आहेत.
बर्रं बातमीसोबत सोबत एक भावनिक आवाहन होते,
तुमचा एक तास वसई-कल्याण च्या लोकलमधून पडणाऱ्याचा जीव वाचवू शकतो.

एकंदरीत दोन्ही बाजूंनी मला भावनिक करून टाकले आहे.

यात माझे एक सूक्ष्म निरीक्षण असेही आहे की मित्रयादीतले भाजप समर्थक मेट्रो झिंदाबाद टीमकडून उतरले आहेत तर सरकार विरोधक आरे बचाव गटात सामील आहेत.
आणि जेव्हा असे एखाद्या विषयात राजकारण येते तेव्हा काय खरे आणि काय खोटे हे जाणून घेणे माझ्यासाठी अवघड होते.

मायबोलीचर्चेत नेहमीच चांगली आणि योग्य माहीती मिळते हा आजवरचा अनुभव म्हणून मुद्दाम ईथे हे विचारतोय.

माझे वैयक्तिक मत म्हणाल तर आपण विकासाच्या रस्त्याने विनाशाकडे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मी मेट्रोला वा विकासाला विरोध करतोय. विनाश असा ना तसा आज ना उद्या होणारच आहे. तर त्याआधी विकास उपभोगून घेतलेला काय वाईट Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकु, उप्रचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात प्रचाराला आलेत. इथल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कमळाचं बटण दाबलं की पाकिस्तानमध्ये अणुबॉंब पडणार.
कशाचा कशाला संबंध लागतोय का बघा.

एकंदरीत
पूर्ण महाराष्ट्र साठी ( त्यात <सर्व जातीय,सर्व धर्मीय,सर्व भाषिक ) आले .
एक विकासाचा प्लॅन बनवून तो केंद्र सरकारला सादर करावा .
आणि महाराष्ट्र च्या बाहेरून येणाऱ्या लोकांची मर्यादा ठरवून (मराठी असेल आणि बाहेर राहत असेल तरी)
फक्त तेवढ्याच लोकांना परवानगी दिली पाहिजे .
महाराष्ट्र नी देशातील सर्व राज्यांना दिशा दाखवावी .
बरीच राज्य महाराष्ट्र ल पाठिंबा देतील .
ह्या मध्ये देश विरोधी भावना नाही देश हिताचं आहे .
आरे चा प्रश्न निर्माण होण्यास प्रचंड लोकसंख्या च कारणीभूत आहे .
पण लोकसंख्येचा प्रश्न highlight केला तर विरोधी पक्षांना बरोबर सत्ता धारी पक्षाची सुद्धा गोची होईल

विरोधी पक्षांनी गोची का व्हावी ? नेहरूंना एकच मुलगी अन राहुल वायनाडला , वडराचे घर लंडनमध्ये आहे ,

ब्लॅक कॅट
तुम्ही वेड घेवून पेडगावला चालला आहात .
ह्यात सर्वात जास्त दोषी काँग्रेस च आहे .
आणि काँग्रेस ला महाराष्ट्र मधून तडीपार करावी ह्याच मताचा मी आहे .

>>>>>>>> हे सरकार जाऊन 'त्यांचं' आलं ...
कोणत्याही विषयाची गाडी इथे न्यायलाच हवी का ? मुळात गेली पाच वर्षे केंद्रात , महाराष्ट्रात, मुंबईत व सर्वात जास्त लोंढे जिथून येतात त्या यू पी मध्ये 'आपलेच' सरकार आहे. हे लोंढे थांबवयचा काही उपाय गेल्या पाच वर्षात केला आहे का? <<<<<<<<<<<<<
म्हण्जे पाच वर्षांत तुम्ही काय केलय अस हे विचारणार पण गेली ६५ वर्षे काय झक मारत होते हे कोणीही विचारु नये ? अजबच आहे न्याय ?

सर्व भारतीय मुस्लिम पाकिस्तान मध्ये येण्यास तयार आहे .
असे जाहीर करा .
पाकिस्तान सांगेल तुम्ही भारतीय आहात इथे जागा नाही .
हे माहीत आहे म्हणून म्हणून आम्ही पाकिस्तान मध्ये जातो ही धमकी देण्याची धमक कोण्ही दाखवली नाही

मुंबई अन महाराष्ट्रात कित्येक वर्षे भाजप अन सेनेचेच सरकार आहे,

काँग्रेसला विचारू नका , असे आम्ही बोलत नाही, विचारा हवे ते

पण आता जे करायचे ते फडणवीस , मोदी , शहाच करणार.

>>> आणि काँग्रेस ला महाराष्ट्र मधून तडीपार करावी ह्याच मताचा मी आहे .>>>

२०१४ मध्ये कॉंग्रेसचा अंतारंभ झाला की.

आरेचे नंदनवन उभे केले नेहरूंनी अन तोडले फडनविसने

तरीही काँग्रेसच दोषी , हे वाचून गम्मत वाटली

>>>>>>>>>>>> इथल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कमळाचं बटण दाबलं की पाकिस्तानमध्ये अणुबॉंब पडणार. कशाचा कशाला संबंध लागतोय का बघा. <<<<<<<<<<<<<

चाळीस वर्षे लोकांना काँग्रेसच्या हाताचं बटण दाबलं की "गरीबी हटलीच " !! म्हणुन चुक्या बनवत होते !! आणी हे आता विचारणार कशाचा कशाला संबंध लागतोय का !!

नेहरू< नी nanadvan तयार केले की देशातील सर्व राज्यात वितुष्ट्ट येण्याची मुहूर्त मेढ उभारली

>>> नेहरू< नी nanadvan तयार केले की देशातील सर्व राज्यात वितुष्ट्ट येण्याची मुहूर्त मेढ उभारली >>>

नेहरूंनी देशांतर्गत नवीन देश निर्माण केला.

सर्व भारतीय मुस्लिम पाकिस्तान मध्ये येण्यास तयार आहे .
असे जाहीर करा .

त्याने काय होणार ? तुमच्या मोदींनी अखंड हिंदुस्तान निर्माण केला की पुन्हा सगळे भारतातच, रोहिनगेही भारतातच .

अरेरे , शहा , मोदी , सावरकर , गोडसे कुणावरच भरोसा नाही तुमचा

युनिस आजोबा, सारखे सारखे डोळे दिपवू नका. नाहीतर मायबोली वाचताना गॉगल लावावा लागेल. आता तर तुम्हांला जोडीदारपण आलेत.

सगळ्यात मोठा जोक म्हणजे जेव्हा झाडं तोडायचा निर्णय ऑगस्टमध्ये झाला तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीने जर त्या निर्णयाविरोधात मतदान केलं असतं तर ९-७ या फरकाने निर्णय फेटाळला गेला असता. पण यांनी आधी सपोर्ट केला आणि आता हेच लोक विरोध करतायत.
ट्विटरवर फिल्मसिटीने आरे फॉरेस्ट वर कसं अतिक्रमण केलं याचेही फोटो पाहिले. बराच भाग तिथे बिल्डर्सनीही ढापला आहे. आता मेट्रो झाली तर बिल्डर्स, फिल्मवाले आणि चर्च बिचारे कुठे जातील?

न्यायालय नी ह्या प्रकरणाची गंभीर दखल
घेतली आहे आणि
उद्याच सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे .
ह्या वरून विरोधी मत व्यक्त करणाऱ्या लोकांनी शाहणे झाले पाहिजे

>>> न्यायालय नी ह्या प्रकरणाची गंभीर दखल
घेतली आहे आणि
उद्याच सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे .>>>

खूप उशीर झाला आहे. सुनावणी सुरू होईल तेव्हा एकही झाड शिल्लक नसेल.

ब्लॅक कॅट
Bjp ,काँग्रस हे राजकीय पक्ष आहेत .
त्यांना निवडणूक जिंकणे महत्वाचे .
पण भविष्यात मानव जात संकटात सापडू नये म्हणून जागरूक ,विचारी लोक आता विरोध करू लागली आहेत .
संकट उंब्र्यापर्यंत आले आहे कधी ही कोणाच्या घरात घुसेल

>>> पण भविष्यात मानव जात संकटात सापडू नये म्हणून जागरूक ,विचारी लोक आता विरोध करू लागली आहेत >>>

मेट्रोसाठी हजारो झाडे तोडणे अत्यंत अयोग्य आहे.

बटण दाबलं की पाकिस्तानमध्ये अणुबॉंब पडणार.
कशाचा कशाला संबंध लागतोय का बघा.

अनु बॉम्ब चा जगाच्या कोणत्या ही कोपऱ्यात
स्फोट झाला तरी त्याचे परिणाम जगभर होतील हे न समजण्या एवढे जग भोळे आहे का

<< अनु बॉम्ब चा जगाच्या कोणत्या ही कोपऱ्यात
स्फोट झाला तरी त्याचे परिणाम जगभर होतील हे न समजण्या एवढे जग भोळे आहे का >>

-------
" ते नष्ट होतील यातच मोठा आनंद आहे. मग जग (आणि आपण) नष्ट झालो तरी चालेल." असा पणा अघोरी विचार करणारी लोक आहेत... त्याला भोळे म्हणायचे का अजुन काही हे ठरवा.

ज्यांना जाणीव नाही ते अशा वल्गना करतात .
अनु bomb चा वापर करणे हे विचारी नकरातील.
हिरोशिमा आणि नागासाकी हा प्रयोग होता जगाला विनाशाची माहिती नव्हती .
पण आता जगाला माहीत आहे .
कोणताच देश अनु bomb चा वापर करणार नाही.
ज्याच्या वर केला जाईल
तो संपेलच पण जो करेल तो शेजारचा देश सुधा संपेल .
आता खूप प्रचंड ताकत असलेले अणुबॉम्ब आहेत

शेवटी मेट्रो मागे पडली व मोदी, शहा, नेहरू, गांधी, सावरकर गोडसे वगैरे नेहमीच्या वळणावर गाडी येऊन ठेपली.

कुठलाही धागा असो, त्या धाग्याची कारशेड हीच.

पाककृतीचे धागेच राहिलेत, तेही याच कारशेडात जाताना पाहिले की सुडोमि.

रच्याकने, आरे-पर्यावरण प्रेमींसाठी अश्विनीताई भिडेंनी मौलिक सल्ला दिलाय, तो बघा जमतो का पाळायला.

अश्विनी भिडेही व्हॉटबाउट्री करायला लागल्या. आणि त्या स्वतःच कबूल करताहेत की याआधी दिलेल्या परवानग्या तर्कशुद्ध नव्हत्या आणि आताचीही नाही.

वृक्ष तोड होतेय हे कळताच ऐन रात्री तिथे लोक पोचलेत हे माहीत नसल्याप्रमाणे आंदोलकांना आधी फक्त स्वतःची सोय बघून नेटवरुन आंदोलन करतात असं म्हणणारे भर पावसात उभ्या राहिलेल्या मानवी साखळ्यांकडे दुर्लक्ष करत होते. त्यांना अटक झालीय हे कळल्यावरही सरकार हे सॉफ्ट टारगेट आहे असा शोध लागला. (शिफ्टिंग गोलपोस्ट्स)
--------
मुळात वृक्ष प्राधिकरणाची ती बैठकच गोलमाल हो ती असं त्या समितीवर नियुक्त दोघा तज्ञांनी सांगितलंय. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून कोणत्या नगरसेवकांनी काय केलं त्याभोवती झिम्मा खेळू.

>>>>>>>> हे सरकार जाऊन 'त्यांचं' आलं ...
कोणत्याही विषयाची गाडी इथे न्यायलाच हवी का ? मुळात गेली पाच वर्षे केंद्रात , महाराष्ट्रात, मुंबईत व सर्वात जास्त लोंढे जिथून येतात त्या यू पी मध्ये 'आपलेच' सरकार आहे. हे लोंढे थांबवयचा काही उपाय गेल्या पाच वर्षात केला आहे का? <<<<<<<<<<<<<

हे अपरिहार्य आहे. कारण काँग्रेसनी अधिकृतपणे सांगितलंय आमचं सरकार आल्यावर रोहिंग्ये, बांगलादेशी , पाकिस्तानी मुस्लिम निर्वासितांना भारतात मानाचं पान देऊच. या अतिरिक्त लोकसंख्येची सोय कशी करणार? राहायला घरं, शाळा कॉलेज नोकर्‍या ट्रान्सपोर्ट हे सर्व निसर्गावर ताण न देता कसं जमवणार? रोहिंग्ये लोकांना १०-१० मुलं असतात. कोणत्याही प्रकारच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्यालाही काँग्रेस समर्थकांचा विरोध आहे. (साद यांचा धागा पहा!) .म्हण़जे लोकसंख्या वाढतच जाणार. आणि ऑफकोर्स तातडीने मुस्लिम आरक्षण लागू करणारच अशीही भूमिका आहे.
हे सर्व पैलू लोकांनी लक्षात ठेवावेत. विसरुन चालणार नाही.
सोशल मिडियावर काँग्रेस शासन काळात आरेमध्ये फिल्मसिटी व रॉयल पाम , रहेजा आदी टाऊनशिप कशा विस्तारत गेल्या ते लिहिलंय. ठाण्यात घोडबंदर रोड आणि तत्सम भागात काँग्रेस शासनकाळातच जंगलतोड झाली. पुण्यात रियल इस्टेट वाढवताना कोणी कशी झाडं तोडली?
या लोकांनी आरेमधील झाडासाठी चिंता व्यक्त करणं हे रोज हलाल चिकन मटण खाणार्‍याने व्हिगन ग्रुपचं अध्यक्षपद मागण्यासारखं विनोदी आहे.

लोंढे गेल्या ५ वर्षात आलेले नाहीत, खूप आधीपासून येत आहेत. काँग्रेसने त्यांना महाराष्ट्रात रेड कार्पेट ट्रीटमेंट दिलेली आहे. आता आदित्यनाथ व मोदी टीमचे प्रयत्न नक्कीच सुरु आहेत की डेव्हलपमेंट सगळीकडे व्हावी. निदान जे लोक येतात त्यांच्या मतांसाठी स्थानिकांवर अन्याय करण्याचा प्रकार तरी भाजपचे लोक करत नाहीत.

आता आदित्यनाथ व मोदी टीमचे प्रयत्न नक्कीच सुरु आहेत की डेव्हलपमेंट सगळीकडे व्हावी. निदान जे लोक येतात त्यांच्या मतांसाठी स्थानिकांवर अन्याय करण्याचा प्रकार तरी भाजपचे लोक करत नाहीत. >> Lol

कारण काँग्रेसनी अधिकृतपणे सांगितलंय आमचं सरकार आल्यावर रोहिंग्ये, बांगलादेशी , पाकिस्तानी मुस्लिम निर्वासितांना भारतात मानाचं पान देऊच.

कधी सांगितले ?

<. कारण काँग्रेसनी अधिकृतपणे सांगितलंय आमचं सरकार आल्यावर रोहिंग्ये, बांगलादेशी , पाकिस्तानी मुस्लिम निर्वासितांना भारतात मानाचं पान देऊच>
किती खोटं बोलाल? अर्थात तुम्ही ज्या पक्षाचं समर्थन करता त्या पक्षाच्या धोरणाशी हे सुसंगतच आहे.
Congress promises to pass a Law on Asylum con-sistent with international treaties and conventions असं जाहिरनाम्यात म्हटलं आहे. त्याचा अर्थ तुम्ही मुस्लिम असा लावलात.

तुमचा लोकसंख्येबद्दलचा संपूर्ण प्रतिसाद खोडसाळ आहे. अर्थात त्यात नवल वाटण्यासारखं काही नाही. काँग्रेसच्याच काळात लोकसंख्यावाढीचा दर कमी करत आणला गेला आहे. यात मुस्लिमांचाही समावेश आहे.

बरं तुम्ही स्वतः तुमच्या पक्षाच्या आणि संघटनेच्या नेत्यांचा सल्ला कधी अमलात आणताय?
Union Minister Giriraj Singh on Monday said Hindus should seriously think of increasing their population in the country by producing more children.
Union Minister Giriraj Singh urges Hindus should to increase their population

"There is a need to increase population of Hindus in the country. They should take this issue seriously as their population has been decreasing in eight states in the country," Singh told media in Patna.

He recalled that none other than RSS chief Mohan Bhagwat had advised Hindus in last August to produce more children and said no laws can prevent them from reproducing more children.

खरं म्हणजे तुमचे प्रतिसाद कधीपासून संबितपात्रीय आणि शेफालीवैद्यीय झालेले आहेत. ते इग्नोर करायच्याच लायकीचे आहेत. पण इथे वाचणार्‍या सो कॉल्ड तटस्थ लोकांसाठी त्याचं खंडन करणं आवश्यक आहे.

बरं. तुमच्या लाडक्या पक्षाचे नेते गिरिराज सिंग

Pages