चित्रकाव्य - उपक्रम - चित्र क्र. २

Submitted by संयोजक on 5 September, 2019 - 00:33

चित्र क्रं २
---
FB_IMG_1566885402614.jpg
--
चित्र क्रेडिट -शशीकांत धोत्रे
आंतरजालावरुन साभार

उपक्रमाबद्दल अधिक माहिती:
https://www.maayboli.com/node/71289

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वलयांकित कचपाश हा अन्
शृंगारी तल्लीन तव हस्तलता
उन्मिलित नेत्र नि बिलोरी मन
देई दर्पणासही नवमुग्धता..

मज सखीचे लग्न आज मन माझे हर्षिले
अलंकारिक साज हा अंगावरी सजू दे
उभी नवतारूण्याच्या उंबरठ्यावर मी
आरश्या तुझ्यात माझे रूप न्याहाळू दे

दोघांच्याही चारोळी मस्त!

नटे नव्याने नाजूक नारी
रोज रुतावे रुप रुपेरी
हृदयावरती हर्षित हिरवे
दर्पणी दर्शन दाव दुपारी!

सुंदर चारोळ्या!!

साज करता
दर्पणात रुप न्याहाळले
त्याची ती हृद्यभेदक नजर आठवता
त्याच्याच स्वप्नांत हरवुन गेले

दिवस संपला रात्र उतरली
साजशृंगार उतरवू देत
मुखवट्याची गरज संपली
मीच मजला भेटू देत

दिवस संपला रात्र उतरली
साजशृंगार उतरवू देत
मुखवट्याची गरज संपली
मीच मजला भेटू देत
Submitted by अश्विनी के on 5 September, 2019 - 13:53
>>
छानच.

नटते सजते अशी विहरते,
सांग दर्पणा कशी मी दिसते ?
माझ्या बाह्य रूपासाठी डोकावते तुझ्यात,
अंतरंग माझे बघते मात्र मनातल्या आरशात.

तव नयनीच्या कौतुकापरि
नाही अमुल्य अन्य आभूषण
साज उतरला, साजण नाही
आरक्ती ती दावी दर्पण

सगळ्यांच्या चारोळ्या छान आहेत! अश्विनी के ह्यांची खासच!

ते शशिकांत धोत्रे यांनी काढलेले चित्र आहे ना? सुंदर चित्रे असतात त्यांची. प्लिज चित्रं क्रेडिट द्या.

नटता सजता कोणत्या विचारात गढलीस ग
कर्णफूल घालायचं की काढायचं विसरलीस ग
स्वत:शीच कां बोलत आहेस ग?
प्रतिमे समोर बसली आहेस की ग

सगळ्या कल्पना भारी. अश्विनी यांची लय भारी!

मुग्ध रूपगर्विता अशी तू
कशास हवा गे तुज शृंगार
एकच कटाक्ष तुझा
अन इतरेजन घायाळ !

सगळ्यात राईट्ट आणि करेक्ट आणि बरोबर अश्विनी के यांच्या ओळी आहेत. आरशातला चेहरा फ्रेश वाटतच नाही. मला तर उदास, थकलेला वाटला.

लालिमा पसरला,
गालही झाले लाल,
थकली ललना रंगमंची या,
दर्पणा आता न साहवे साज शाल.

ते शशिकांत धोत्रे यांनी काढलेले चित्र आहे ना? सुंदर चित्रे असतात त्यांची. प्लिज चित्रं क्रेडिट द्या. >>क्रेडिट दिले आहे. निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

जसा पडदा पडतो अन उतरत जाते रंगरंगोटी
ठळक होत जातात झाकून ठेवलेल्या उणीवा
विंगेपल्याडच जग विरत जाते मिटल्या डोळ्यात
तश्या जाग्या होतात अल्याडच्या खऱ्या जाणीवा

सर्वांचे कल्पना विलास फारच उत्कृष्ट

रुपगर्विता तू जरी
का उदासी चेहऱ्यावरी
ना भेटते प्रेम सखे
ना भेटता कृष्ण उरी

उतरवू नकोस शृंगार ग
मुग्ध ही नको राहूस ग
मिटल्या पापण्या खाली तुझ्या
स्वप्न संसार माझाच ग