चित्रकाव्य - उपक्रम

Submitted by संयोजक on 31 August, 2019 - 00:57

चित्रकाराने कागदावर रेखाटले असले, तरी पाहणाऱ्याच्या मनावत मनात त्याचा कुंचला काही वेगळेच रंग भरत असतो.
ते रंग त्या चित्राहूनही जास्त गहिरे असतात..... तर कधी एखादा वेगळाच पैलू आपल्याला जाणवतो जो अजून अव्यक्तपणे चित्रांच्या वळणदार आकारांमध्ये लपून बसलेला असतो.
चित्र पाहून मनात येणाऱ्या भावनांचे रेखाटन आपण आपल्या चारोळीत मांडण्याचा प्रयत्न करूया का?
चला तर मग.....
आंतरजालावरून मिळालेल्या चित्रांकडे पाहून मनात उमलणारी फुले शब्दांत गुंफा. आणि करा सुंदर चारोळी!
नियम :-
१. संयोजक रोज एक चित्र देतील.
२.दिलेल्या चित्रावर समर्पक अशी चारोळी करायची आहे.

चित्र क्र. १ 0a1262cce25965a49c7f745f93e63a06.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. सोनसकाळी यमुना तटी गुंजती हरी पाव्याच्या लहरी
ऐकूनी तान पाव्याची ही राधा झाली बावरी
नादावली सृष्टी सारी हरी रंगी सर्व रंगली
हरपुन भान सारे हरीशी एकरूप जाहली

२. कृष्णा सोड्ना अबोला झाला उशीर थोडा
सख्यांनी घाताला मज भवती वेढा
चुकवूनी मग त्या नजरा इथवरी आणिले मी मजला
प्रेमरंगी तुजसवे रंगूनी जीव आता होऊ दे वेडा

३.ऐकून धून ही बासरीची यमुनेकाठी धरले ताल मज पावलांनी
कृष्णा थांबव तुझी बासरी नाच नाचूनी पावले ही थकली
ऐकून बासरीची अंगाई चांदण्यात सॄष्टी ही निजली
घेउनी तुझ्या कवेत मजला आता जाऊदे मम देह विसावुनी

मुरलीधर हा नटखट मोहन
निळे-जांभळे मोहक यौवन
असे जाहले हर्षित हे मन
नादखुळे हे अबोल बंधन

यमुना तट हा
जळी सावली
नटखट राधा
करी गुदगुली

यमुना तट हा
जळी सावली
नटखट राधा
करी गुदगुली>>>>>> वाह!!! Happy अगदीच समर्पक!

अशी सुरांची चढते गोडी
क्षणात होते राधा वेडी
हाती घेऊन पीस मखमली
निळ्या सावळ्या कृष्णा छेडी!

अशी सुरांची चढते गोडी
क्षणात होते राधा वेडी
हाती घेऊन पीस मखमली
निळ्या सावळ्या कृष्णा छेडी! >>>> अप्रतिम!!

कनुप्रिया ही बासरी कृष्ण हाती धरी
धरी अधरी हलकेच फुंकर मारी
झाडामागे राधा झाली बावरी
पाव्याचा धावा-राधेsराधे जाऊ नको दूरी

वा वा अप्रतिम लिहिलंय सर्वांनीच.

नको छेडूस राधा,
वाजवू दे पावा,
बघ त्या निनादासाठी आतुर झाडे पशु पक्षी,
आणि यमुनाही करतेय धावा.

नको छेडूस राधा,
वाजवू दे पावा,
बघ त्या निनादासाठी आतुर झाडे पशु पक्षी,
आणि यमुनाही करतेय धावा. >>> मस्त! Happy

प्रॉडक्शनची तिसरी शिफ्ट तिरके पाय माझे थकले गं
झोप डोळ्यात दाटली अन डिनर सुद्धा हुकले गं
'वेक अप कान्हा' तुझ्या मर्सिडीझचा हप्ता थकला रे
डायरेक्टरची मर्जी राख रिचव रेड-बुल चा प्याला रे.

सगळ्याच कल्पना मस्त! माझाही अल्पसा हातभार Happy
काढीशी खोडी जरी मागुती
राधे, ठावे मज तूच ती!
येई सन्मुख, बैस संगती, ऐक सुस्वर नादब्रह्म ते
वारा खेळे वेळूबनांतून आणि अगणित वेणू वाजती

धन्यवाद अंजू . मलाही नाही दिसलं नवं चित्र. मग वाटलं बाकीच्या उपक्रमांचे इतके भरभरून प्रतिसाद आहेत की मागच्या पानांवर कुठेतरी गेलं असेल.