सोळा आण्याच्या गोष्टी - दुरुस्ती - अमितव

Submitted by अमितव on 4 September, 2019 - 20:02

पहिलीचा वर्ग. राष्ट्रगीत संपवून बाई लहानग्याचे ग्रूप पाडताहेत.
शहरातली रात्र. क्लबबाहेर तरुणांची गर्दी. हास्यविनोद रंगलेत. आतून संगीताचे आवाज आणि आपल्याला कधी आत जायला मिळेल आणि कोण भेटेल अशी मनात हुरहुर.
मोठ्ठ्या मैदानात गाण्याचा कार्यक्रम चालू आहे, श्रोतृवृंद एका बहारदार क्षणी टाळ्यांचा कडकडाट करतोय.
वीकांताला समुद्रकिनार्‍यावर ब्लँकेटवर शांतपणे वाचत बसलोय, मुलं किल्ला करताहेत पाण्यात डुंबताहेत, बार्बेक्यू आणि भुट्ट्याचा वास नाकाला हुळहुळतोय.
ऑफिसातलं हॉलिडेज पॉटलक उरकलं की एअरपोर्टला कारपूल करायचं का असं तो तिला विचारतोय.
जुळ्यांना जन्म देऊन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर आई-बाबांच्या तोंडावरचं हसू लपत नाहीये, दोघे लहानग्यांना छातीशी घट्ट धरून बाथटब, डायपर घेऊन चेकाऊटला येताहेत.

आणि.... ठो! ठो! ठो! कानठळ्या बसवणारा आवाज!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
टीपः- संयोजकांनी कथेचे परिक्षण करणे मान्य नसल्याने जोवर सालाबादप्रमाणे लोकशाही पद्धतीने मतदान होत नाही तोवर कृपया ही कथा स्पर्धेतून बाद समजावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ते ठो ठो ठो वाचून .... जास्तीचे समोसे खाल्ल्याने पब्लिक प्लेसला आवाज आला जोरात असे वाटले Proud
ही शक्यता कोणीच कशी नाही विचारात घेतली अजुन

<<< अमेरिकेत स्थायिक लोकांनाच हा संदर्भ समजेल. आणि हा संदर्भ माहित असतानादेखिल ते पूर्णपणे रँडम प्रसंग वाचताना हा विषय असेल असे वाटेल असे मला वाटत नाही. मी काही अमेरिकेत राहात नाही त्यामुळे खात्री नाही. >>>

अमेरिकन लोकांच्या दृष्टीने अमेरिका हेच जग आहे, त्यामुळे इतरांना तो संदर्भ माहीत नसेल तर तो त्यांच्या बुद्धीचा दोष आहे असे समजावे. Wink

Pages