ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - १

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.

फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.

उदाहरणार्थ:
images.jpeg

उत्तर: छोटीसी बात

आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:

ओळखा पाहू:
Gurss1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरो किस्मत मानत नसतो.. देव त्याला प्रत्यक्ष दर्शन देतोय आणि तो देवाला चॅलेंज ज करतो
नंतर गरीबीतून श्रीमंत होऊनही सर्व गमावतो

ये वादा रहा

नवीन Submitted by @Shraddha on 6 September, 2019 - 12:39 <<< बरोबर

यही है जिंदगी ?

संजीवकुमारचा.. ह्यात आहे कृष्ण दर्शन देतो...
ह्यातले एक आठवते .. कृष्ण त्याला म्हणतो ही औषधे सगळे तुझे पाप आहे तो विचारतो कसे.. बघ सगळ्यांच्या शेवटी मायसीन लिहलयं.

Correct
<बघ सगळ्यांच्या शेवटी मायसीन लिहलयं.>> अगदी.. योग्य वाटतं विश्लेषण

Scene :
हिरो राहायला आलेल्या भाड्याच्या खोलीत दिवा(bulb) लागत नाही म्हणून रिपेअर करायचे सर्व प्रयत्न करतोय. त्याची सर्व मज्जा बघुन झाल्यावर घरमालकाच्या मुली सांगतात कि आमच्याकडे बरीच वर्षे वीजचं नाहीए.

महल

गाणे : ये दुनियावाले पुछेंगे

Pages