प्रकाशचित्रांचा झब्बू १ - जुने ते सोने

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

मायबोली गणेशोत्सव २०१९ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाश चित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे - "जुने ते सोने"

माणसाला जितके नाविन्याचे आकर्षण असते तितकीच पुरातनाची ओढ असते. घरात कितीही आधुनिक आणि स्मार्ट टीव्ही आला तरी घराच्या एका कोपऱ्यात का होईना आजोबांचा व्हॉल्वचा रेडिओ सांभाळलेला असतो. आज्जी पणजीची सुती साडी पिढ्यानपिढ्या गोधडीच्या रुपाने ऊब देत असते. कितीही महागड्या आणि चकाचक गाड्या घेउन फिरा पण एखाद्या जुनाट फाटकामागे उभी असलेली जुनीपुराणी व्हिंटेज कार आपल्याला अकारण खुणावून जाते. एखाद्या जुन्या कृष्णधवल चित्रपटात मोकळी ढाकळी मुंबई बघितली की आत कुठेतरी काहीतरी नकळत हलते.
थोडक्यात काय आपल्यात आणि या जुन्या (पण मनामनात चिरतरुण होवून राहिलेल्या) वस्तुंमध्ये एक गूढ अनामिक असे काहीतरी बंध असतात.

या प्रकाश चित्रांच्या खेळातून अश्याच काही आठवणी जागवुया!
आपल्या संग्रही असलेल्या किंवा संग्रहालयातून पाहिलेल्या, देशोदेशीच्या प्रवासात आढळलेल्या अश्या जुन्या आणि जतन करून ठेवलेल्या वस्तूंची मेजवानी लुटुया प्रकाश चित्रांच्या रुपाने.

2015-09-19 15.25.19-1024x700_0.jpg

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त! टिफिनचा आजोबा दिसतोय वरील डब्बा.
येथे फोटो कसे टाकायचे हे मला माहीत नाही. गुगल फोटो वरून कसे टाकता येतील?

अरे कोई पुरखो की तलवार भी निकालो इधर ।
कोई सौ साल पुराना भाला बर्ची खंजर हो तो भी चल जायेगा अगर मुनासिफ लगे तो ।

साद , मस्त फोटो. टाईपरायटर बघून ऑफिस मधले जुने दिवस आठवले.

IMG_2019-09-11_16-40-55.JPG

हा माझा जुना लाकडी सोऱ्या. शेव चकली ह्या साठी मी हाच वापरते. अंजली चा वैगेरे नवा , मॉडर्न मी अजून घेतलेला नाही.

हल्ली नातीचं खेळणं झाला आहे. ह्यातून खोटी खोटी शेव करणे हा आवडता खेळ आहे तिचा.

वाह वाह ! काय एकसे एक सुंदर फोटोज आहेत. छान वाटलं पहायला.

माझ्याकडे अशा काही जुन्या भारतीय वस्तूंचं कलेक्शन नाही, त्यामुळे युरोपमधल्या म्युझियम्स मधल्या काही अप्रतिम वस्तूंचे फोटो टाकायचा मोह होत होता. पण नाहीच, हे फोटो पाहिल्यावर त्या फोटोज मुळे रसभंग होईल असं वाटलं.

उघडा उघडा आपले पेटारे आणि काढा फटाफट फोटो. अजून वस्तू बघायची उत्सुकता आहे.

ममो,

छान आहे सो-या, किती व्यवस्थित ठेवलाय तुम्ही त्याला.

यातून शेवया करता येतात का? माझा आजीचा लाकडी मोठा शेवगा ( मालवणी त शेवगा बोलतात पण याच नावाची भाजीसुद्धा असल्याने मी नेहमी confused. शेवई करण्यासाठी वापरतात त्याला नक्की काय बोलतात) खराब होऊ घातला व त्याचे पाय डुगडुगतात, म्हणून कीर्तीकर मार्केटमध्ये विचारपूस केली असता त्याने असाच दाखवला. जालीचा आकार existing जुन्या शेवगा पेक्षा मोठा वाटल्याने मी नाही घेतला. घेऊ का?

साद, मस्त फोटो.
टंकलेखन संस्था अजून बंद झालेल्या नाहीत. त्यांना परीक्षा घेण्याची मुभा शासनाने दिली आहे.

ममो, मस्त फोटो

स्निग्धां, नारळ खोवणी बघितली नव्हती. फोटोबद्दल धन्स

याला Over Head Projector म्हणतात. संगणकाचे पॉवर पॉईंट येण्यापूर्वी हे वापरले जायचे.

हो. Transparencies ठेऊन लेक्चर द्यायचे दहा -बारा वर्ष पूर्वी आमच्या काँलेज मध्ये. (12th and UG जुने प्रोफेसर. Microbiology च्या प्रोफेसरबाईंच्या लेक्चर पेक्षा त्यांची जुनाट presentation आठवली) .

PG मध्ये आम्ही लँपटाँपच वापरू लागलो.

माझ्या कडे बहिणीने वापरून उरलेल्या बिनकामाच्या transparency होत्या त्यावर मी ग्लास पेंटिंग केले.

त्या पारदर्शिका साठवण्यात बरीच जागा व्यापली जाई.
संगणकाने तो प्रश्न निकालात निघाला.
त्यावर दुरुस्ती करायची असल्यास लिहिलेले acetone वापरून खोडावे लागे.

Over Head Projector >>>
याप्रमाणे च पूर्वी 35 mm slides projector असायचा.

तसेच एक वेगळा मोठा प्रोजेक्टर असायचा त्यात एखादे मोठे पुस्तक मावायचे. पुस्तकातील चित्रे त्याने मोठ्या ग्रुपला थेट दाखवता यायची.

IMG_E3602.jpg

हे एक लाकडी कपाट - वय वर्षे ६९.

गावातल्या घरी राजस्थानातून दोन शिकाऊ सुतार मुले कामाच्या शोधात आली होती. त्यांना काही काम मिळेपर्यंत मदत म्हणून आजीने घरातील एक खोली राहायला दिली. त्याचवर्षी वीज पडून शेतातले आंब्याचे मोठे झाड अर्धवट जळाले - त्याच्या लाकडातून त्या सुतारांनी हे कपाट बनवले आहे. केलेल्या मदतीची थोडी परतफेड म्हणून.

शाळकरी वयाच्या बाबांची पुस्तके, घरातील ग्रंथसंपदा, कॅसेट-सीडीचा पसारा अशा अनेक वस्तू वागवणारे कपाट ते आता उंची मद्याचे चषक ठेवण्याचा मिनी बार असा थरारक प्रवास ह्या वस्तूने केला आहे :-))

किती सुंदर कपाट आहे हे अनिंद्य, त्यामागची कहाणी ऐकल्यावर अजूनच देखणे भासतंय

Pages