मायबोली गणेशोत्सव २०१९ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाश चित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे - "जुने ते सोने"
माणसाला जितके नाविन्याचे आकर्षण असते तितकीच पुरातनाची ओढ असते. घरात कितीही आधुनिक आणि स्मार्ट टीव्ही आला तरी घराच्या एका कोपऱ्यात का होईना आजोबांचा व्हॉल्वचा रेडिओ सांभाळलेला असतो. आज्जी पणजीची सुती साडी पिढ्यानपिढ्या गोधडीच्या रुपाने ऊब देत असते. कितीही महागड्या आणि चकाचक गाड्या घेउन फिरा पण एखाद्या जुनाट फाटकामागे उभी असलेली जुनीपुराणी व्हिंटेज कार आपल्याला अकारण खुणावून जाते. एखाद्या जुन्या कृष्णधवल चित्रपटात मोकळी ढाकळी मुंबई बघितली की आत कुठेतरी काहीतरी नकळत हलते.
थोडक्यात काय आपल्यात आणि या जुन्या (पण मनामनात चिरतरुण होवून राहिलेल्या) वस्तुंमध्ये एक गूढ अनामिक असे काहीतरी बंध असतात.
या प्रकाश चित्रांच्या खेळातून अश्याच काही आठवणी जागवुया!
आपल्या संग्रही असलेल्या किंवा संग्रहालयातून पाहिलेल्या, देशोदेशीच्या प्रवासात आढळलेल्या अश्या जुन्या आणि जतन करून ठेवलेल्या वस्तूंची मेजवानी लुटुया प्रकाश चित्रांच्या रुपाने.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.
अरे मस्त!
अरे मस्त!
मस्तच.
मस्तच.
अदीजो, मस्त.
अदीजो, मस्त.
सगळ्यांचे जुने फोटो अगदी सोन्यासारखे आहेत.
फिलिप्स रेकोर्ड ..मस्तच !
फिलिप्स रेकोर्ड ..मस्तच !
..................................
टाईम्स ऑफ इंडियाच्या १५० वर्षपूर्ती निमित्त त्यांनी काढलेली विशेष आवृती : उत्तरार्ध
(चित्रसौजन्य : श्री. सुधीर कांदळकर )
Lock and His Family
Lock and His Family

आदिजो, रेकॉर्ड प्लेअर मस्तच.
आदिजो, रेकॉर्ड प्लेअर मस्तच.
रेकॉर्ड प्लेयर मस्तच!
रेकॉर्ड प्लेयर मस्तच!
जुन्या वर्तमानपत्रातील जाहिराती वाचायला मजा येते!
भारी सगळंच
भारी सगळंच
आजीची रोवळी व बोगणी नि गडू
आजीची रोवळी व बोगणी नि गडू

सगळेच मस्त आहेत! जुने ते
सगळेच मस्त आहेत! जुने ते सोने!
प्राचीन,
प्राचीन,

रोवळी व बोगणी >>>> भारी नावे ! मस्तच.
हे घ्या तुमच्या संचात एक भर १९६० मधली :
माझा झब्बू मोदक पात्र
माझा झब्बू मोदक पात्र

माझ्या आजोबांचे आवडते :-
माझ्या आजोबांचे आवडते :-
मस्त फोटो सगळ्यांचेच!
मस्त फोटो सगळ्यांचेच!
Hand drill आता फारसे पहायला मिळत नाही!
रोवळी आणि बोगणी ही नावेही नवीन समजली!
ही पारंपारिक पंगत:

स्वरूप,
स्वरूप,
पंगत मस्त आहे. कधी बोलावताय पंगतीला ?
अदीजो भारी. सुधीर कांदळकरांनी
अदीजो भारी. सुधीर कांदळकरांनी कसला छान संग्रह केला आहे!
स्वरूप अशी पंगत विवाह या
स्वरूप अशी पंगत विवाह या हिंदी सिनेमात दाखवली आहे. ते दृश्य पाहून दरवेळेस मला अगदी हेवा वाटतो कलाकारांचा.
साद, तुमचा फोटो दिसत नाहीये
-
ती पंगत पुण्याजवळच्या
ती पंगत पुण्याजवळच्या ढेपेवाड्यातील आहे
सर्व फोटोज मस्त !
सर्व फोटोज मस्त !
भारीच, सर्व फोटोज.
भारीच, सर्व फोटोज.
कुलूप व फॅमिली मस्त
कुलूप व फॅमिली मस्त
पारंपारिक पंगतही.
जाई. ला झब्बू. हे बहुतेक '०३च
जाई. ला झब्बू. हे बहुतेक '००चं नोकिया मॉडेल...
आणि हा माझा पहिला सेल्फोन, सर्का '९५. त्यावेळेचा प्रोवायडर पॉवरटेल, जो नंतर नांव बदलुन टि-मोबाय्ल झाला...


राज, मस्त.
राज, मस्त.
शेंडीवाल्या फोनची वाट पाहत होतोच !
संयोजक, या खेळाला झब्बू का
संयोजक, या खेळाला झब्बू का म्हटले आहे ?
इथे प्रत्येकाने आपल्या पसंतीची चित्रे टाकली आहेत.
अपुनका भी एक फोन!
अपुनका भी एक फोन!
फोन पे फोन का झब्बू!
आजोबा चा टिफिन
आजोबा चा टिफिन
मातोश्री नी दिलेल्या माहिती
मातोश्री नी दिलेल्या माहिती नुसार वरील डब्बा आजोबा स्वतःसाठी वापरत असत. डब्ब्याचे आकारमान (आत्ताच्या आमच्या टिफिन च्या तुलनेत )प्रचंड आहे. या साइज मध्ये stainless steel चे डब्बे मिलतात पण no चटणी attachment like this one.
खरे आहे, चटणीचा पिल्लू डबा
खरे आहे, चटणीचा पिल्लू डबा त्याकालीच होता.
छान
स्टीलचा अन पितळीचा असा ४
स्टीलचा अन पितळीचा असा ४ डब्यांचा डबा आहे आमच्याकडे, पण चटणी साठी काहीच नाहीये त्यात
दोन्ही डबे इतके मोठे की २-३ माणसांचे भरपेट जेवण बसते.
Pages