कुणी आहे का नदी बनायला तयार?

Submitted by प्रतिक सोमवंशी on 25 August, 2019 - 01:04

नुकताच वाहून आलेला गाळाखाली
अन पाण्याखाली दबलेल्या असंख्य बाभळी
त्यांच्या नबुडालेल्या शेंड्यांवर आधार घेणाऱ्या
प्लास्टिकच्या पिशव्यांसारख
पाण्याला स्पर्श करत तग धरून राहण
जमत का कुणाला?
.
इतक्या दिवस कोरड्या बसलेल्या पात्रातून
काँक्रीटच्या बांधांना उखडून टाकणाऱ्या
मातीच्या घाटांना विरघळून पिणाऱ्या
नुकत्याच अंकुरलेल्या शेतांना संजीवनी देणाऱ्या जलप्रपातासारख
स्वतःला वाहून घेणं
जमत का कुणाला?
.
इथ सगळ सोसाव लागत
ना कोरडं राहता येत ना मोकळं वाहता येत
ना सीमा लांघता येतात, ना कुणाच्या दारात जाता येत
कुणाला मोक्ष देऊन चालत नाही
पण त्यांच्या अस्थी वाहून न्याव्या लागतात
नेमकं काय कराव कळतच नाही
कुणी आहे का नदी बनायला तयार?
©प्रतिक सोमवंशी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users