स्ट्रीटलॅम्प

Submitted by प्रतिक सोमवंशी on 24 August, 2019 - 14:01

निरव रात्रीच्या शांत प्रहरी
स्ट्रीटलॅम्प च्या शांत, पिवळ्या प्रकाशात
तो रस्ता जणू शांतपणे वाहणाऱ्या नदीगत भासतो
त्या पाण्याच्या चादरीला विस्कटून,
त्याच्या शांततेला भंग करणाऱ्या
एका पाठोपाठ एक जाणाऱ्या गाड्यांच्या
इंजिनाची घरघर,
हॉर्नचे कर्कश आवाज
या सर्वांच्या मध्ये कधी ऐकू येते,
कधीतरी
कुणीतरी
कुठेतरी
शेजारच्या पायवाटेने
शिशिराची पानगळ तुडवत चाललेलं
मी खिडकीत उभा राहून
ते पानांचं साग्रसंगीत ऐकत असतो
समोरच्या चंद्राला बघून स्ट्रीटलॅम्प त्याचा हेवा होत असेल ना?
म्हणूनच काय स्वतः भोवती जमेल तेवढी जागा
प्रकाशमय करण्याचा अट्टहास असतो त्यांचा
सगळ्यांनाच नाही जमत चंद्र होयला
कधी कधी स्ट्रीटलॅम्प सारख वागावं लागत
कुणी नसल तरी
एखादा वेडा असा रात्री फिरत असतोच
पानगळ तुडवत...
रात्री दमून फिकट पडलेल्या या शहराला
माझ्या खिडकीतल्या नुकत्याच उमललेल्या गुलाबकडून नवसंजीवनी का नाही मिळत?
©प्रतिक सोमवंशी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Welcome Back!!! Happy
मुक्तछंद आवडला....