जोडीदार 'गेल्या'नंतर.....

Submitted by साद on 19 August, 2019 - 03:20

बहुसंख्य भारतीय लग्न करतात आणि वैवाहिक जीवन जगतात. आता लग्न म्हणजे तडजोड आलीच. प्रेम, संवाद, वाद, कलह हेही या जीवनाचे पैलू. जे लोक विवाह दीर्घकाळ यशस्वी करतात त्यांच्या बाबतीत एक बाब जाणवेल. ती म्हणजे - जोडीदाराच्या नसलेल्या पण स्वतःच्या असलेल्या एखाद्या आत्यंतिक आवडीला मुरड घालणे. हे पती-पत्नीत दोघांकडून होत असते. यात खाणे- 'पिणे', छंद, अस्तिकता- नास्तिकता, खर्च / काटकसर ….असे अनेक मुद्दे असू शकतात. पण आपले वैवाहिक जीवन यशस्वी करायचे या उद्देशाने असे लोक यांसारख्या छोट्यामोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कधीमधी जोडीदाराला न आवडणारी आपली एखादी आवड चोरून देखील पुरी करतात !

आपल्यापैकी बरेच जण विवाहित असतील. आपलीही अशा प्रकारे काही बाबतीत कुचंबणा होत असेल. आता एका अटळ सत्याला आपणा सर्वांनाच कधीतरी सामोरे जायचे आहे आणि ते म्हणजे मृत्यू. आता आपल्या बाबतीत दोन शक्यता संभवतात :
१. स्वतःचा मृत्यू प्रथम होणे, किंवा
२. आपल्या जोडीदाराचा मृत्यू आधी होणे .

आता वरील मुद्दा आपल्या संदर्भात पाहू. आपली एखादी अत्यंत आवडीची गोष्ट आपल्याला जोडीदाराच्या नावडीमुळे मुक्तपणे करता येत नसेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे कधीतरी आपल्या मनात असा विचार येऊ शकतो, " जर का आपला जोडीदार आपल्याआधी 'गेला', तर त्याच्यामागे आपण ती गोष्ट अगदी मुक्तपणे करू शकू !"
( मात्र जर का आपणच आधी मरण पावलो, तर हा प्रश्नच उद्भवत नाही.)

मला खात्री आहे की प्रत्येक विवाहिताच्या मनात अशी एखादी तरी इच्छा नक्की असते. फक्त आपण ती बोलून दाखवत नाही.
एव्हाना या धाग्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असावा. समजा, वर उल्लेखिलेल्या दोन शक्यतांपैकी दुसरी आपल्या बाबतीत खरी झाली, तर पुढे आपण अशा कुठल्या आवडी/इच्छा मनसोक्त पूर्ण करू, हे इथे लिहावे. केवळ स्वप्नरंजन म्हणून लिहा; कुठलाही अपराधी भाव मनात न आणता. भविष्यात पुढे काय होईल हा भाग वेगळा, पण आता तर थोडी गंमत म्हणून लिहा.

जे लोक इथे टोपण नावाने आहेत आणि ज्यांचा जोडीदार इथे फिरकतही नाही, त्यांनी तर बिनधास्त लिहावे !

जर तुमच्या सर्व इच्छा अगदी मनसोक्त पुऱ्या झाल्या असतील तर तसेही लिहा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

> अशा वर्गातल्या स्त्रिया मायबोलीवर येतात का? अशी चर्चा करतात का? > म्हणजे काय?
त्या इथे येत नाहीत म्हणून त्याबद्दल इथे बोलण्यात अर्थ नाही?
की हा विचार इथल्या स्त्रियांच्या मनात अजीबात येत नाही (याची तुम्हाला खात्री आहे) म्हणून त्याबद्दल इथे बोलण्यात अर्थ नाही?

एनिवे आर्थिकवर्ग आणि जेंडर हा निकष बाजूला ठेऊनदेखील, लग्नाला बरीच वर्ष झाली असली तरीही 'जोडीदार मेला तर जरा मोकळा श्वास घेता येईल' या विचारात न पटण्यासारखं किंवा थिल्लर वाटण्यासारखं काही नाही. असं वाटू शकत आणि असं वाटणं + ते बोलूनदेखील न दाखवता येण ही दुःखी अवस्था आहे.

अशी कुठली आवड/इच्छा आहे की जी मनसोक्त पूर्ण करण्यासाठी जोडीदाराच्या मरणाची वाट बघावी लागेल?>>>
जोडीदाराच्या थडग्यावर ढिन्च्यॅक ढिन्च्यॅक नाचणे / चितेवर बिडी पेटवणे
जोडीदाराची इस्टेट मिळाल्यावर आवडीच्या व्यक्तिबरोबर सुखाने नांदणे
मुलांचे आपल्या इच्छेप्रमाणे संगोपन करणे / कस्टडी मिळवणे
इ इ

अ‍ॅमी +१.

लेखात फक्त स्वतःच्या आणि जोडीदाराच्या परस्पर विरोधी आवडीनिवडींबद्दल म्हटलंय. पण जोडीदाराचा ( किंवा आणखी कोणी जवळ च्या व्यक्तीमुळे) त्रास असणं आणि वेगळं होणं शक्य नसल्याने त्याच्या मृत्यूची चक्क वाट पाहणं हे शक्यतेच्या परिघात मोडतंच.

मला चटकन नातीगोती हे नाटक आठवतंय.

प्रत्यक्ष अनुभव नसलेल्याने असले विचित्र काल्पनिक बाफ निघतात. वैधव्य आणि विधूर पण इतकी चॅलेंजिन्ग फेज आहे. असले मनाला येइल ते करायचे स्वातंत्र्य असले तरी तसे मौके मिळ्तीलच असे नाही. शिवाय जोडिदार असताना नात्याची प्रत काय होती त्यावरही असे वाटणे अवलंबून आहे. आहे ती फेज एंजॉय करावी , एकत्र अनुभव घ्यावेत. नंतर एकट्याने सुखी जगायचेच आहे. त्या साठी मानसिक स्ट्रेंगथ लागते मात्र. माझे या साइट वर अनेकाम्शी मतभेद झाले आहेत पण मी मनातही ही फेज कुणा व र यावी असे विश केलेले नाही. कारण ते किती अवघड असू शकते ह्याचा मला अनुभव आहे. कालपनिक आर्गुमेंट उभे करता ना पण थोडे भावनिक तारतम्य ठेवावे हे मा वै म.

एखाद्याशी पटले नाही तर कायदेशीर रित्या दूर होउन मनासारखे जगावे पण कोणाच्याच अकाली मृत्यु ची कल्पनेतही इच्छा का करायची. तो अधिकार आपला नसतो. मुळात नातीच अशी बांधावीत की मन मारून जगावे लागूच नये. ऑल द बेस्ट.

प्रतिकूल व अनुकूल अशा सर्व प्रतिसादांबद्दल आभार.
धाग्याचा उद्देश मी असा दिला होता:

…. केवळ स्वप्नरंजन म्हणून लिहा; कुठलाही अपराधी भाव मनात न आणता. भविष्यात पुढे काय होईल हा भाग वेगळा, पण आता तर थोडी गंमत म्हणून लिहा……

कधीतरी थोडी गम्मत म्हणून असे लिहावे असा हेतू होता. काही गमतीदार इच्छा लिहिल्या गेल्या असत्या तर थोडे मनोरंजन वाटले असते. पण काही जणांना ते गांभीर्याने घ्यावे वाटले. हरकत नाही. व्यक्ती तितके विचार. सर्वांच्या मतांबद्दल आदर आहे.
माझ्याकडून थांबतो.

>>>>>>>>>>>> जरूर गाठा ! त्यासाठी शंभर शुभेच्छा !!>>>>>>>>> साद आपले खूप आभार. Happy पटकन तोंडून चांगले निघायलाही पूर्वसुकृत लागतं अशी माझी श्रद्धा आहे. तेव्हा परत एकदा तुमचे आभार.
अजुन एक - आपला प्रश्न अनाठायी नाही. आई मुलाला म्हणते "मर मेल्या", रागात मीदेखील क्वचित नवर्‍याकरता, मनात उच्चारले आहेच की " Go to hell" पण मांजरिचे दात तिच्या पिल्लाला लागत नाहीत Happy
सांगायचा मुद्दा काही लोकांना वाटू शकते की जोडीदार गेला तर .... अजुन एक एका संशोधनामध्ये आढळले आहे की पुरुष हे पत्नीच्या मृत्युकरता प्रिपेअर्ड नसतात याउलट स्त्रिया कळत नकळत, "पतीच्या मृत्युपश्चातची स्वतःची सुरक्षितता कशी असेल/असावी" आदि विचार करत असतात.

माझ्या ओळखीच्या एका बाईंचा संसार अश्या गटात होता.

पतिचा जाच होता, त्यांना आणि त्यांच्या माहेरच्या बर्‍याच जणांना. त्या बाईंनी स्वतः कमावत असून देखील त्यांनी काय आणि कशासाठी खर्च करावा हे त्यांचे पति ठरवत असत. त्यांनी कुठे कुठची साडी नेसावी, काय दागिने घालावेत, (माहेरी किंवा मैत्रिणींना) कोणाला काय गिफ्ट करावे, (माहेरच्या) कोणाशी कसे आणि किती वेळ बोलावे हे सगळे पतिदेव ठरवत. प्रत्येक गोष्टीतुन फायदा कसा होईल हिच मनोवृत्ती. निव्वळ दिखाव्याची नाती जोडायची, निखळ नाती त्या माणसाला माहित होती की नाही कोणास ठाऊक? Angry

मागच्या पीढीतल्या असल्यामुळे आणि पदरी एक लेक आहे तिचे काय असा विचार करून त्या चार लोकांत कधी काही बोलल्या नाहीत. स्वतःच्या बहिणींना बोलल्या असतील कदाचित. त्यामुळे त्यांना काय वाटत असेल माहीत नाही, पण मलाच वाटायचं कधी मोकळा श्वास घेतील ह्या?

देवाने त्यांनाच लवकर नेलं. Angry

१) जोडीदाराचा अकाली मृत्यु झाला तर मुलं मूली असतील त्यांच्या संगोपनात वैयक्तिक आवड़ निवड दुय्यम ठरते

२) नैसर्गिक आणि वयोमानापरत्वे मृत्यु आला तर त्या वयात नातवंडात मन रमते / रमवले जाते त्यामुळे इथेही वैयक्तिक हौसमौज इच्छा आकांक्षा पुऱ्या करण्यास दुय्यम स्थान राहते.

३) काही जणांत तर पूर्ण विरक्ती येऊ शकते त्यामुळे अपूर्ण / आजवर दाबून ठेवलेल्या इच्छा वगैरे प्रकार अस्तित्वात राहतच नाही.

४) फारच क्वचित कोणी हा विचार करत / करू शकत असेल तर त्याची कारणे २ असू शकतात ―
एकत्र असताना कधी फारशी एटेचमेंट निर्माणच झाली नाही त्यामुळे एकाच्या गेल्यावर काही फरक पडलेला नाही. किंवा अतिशय सुंदर बॉन्डिंग असलेले कपल्स तितकेच प्रैक्टिकल विचारांचे असेल तर एकत्र असताना ज्या गोष्टी जमल्या नाहीत त्या पूर्ण करायचा विचार करेल.

मी विवाहित नाही आणि वयानेही लहान आहे त्यामुळे आपल्याला या धाग्यावर काही प्रतिसाद देण्याचा अधिकार आहे की नाही असं वाटत होतं .. तरी लहान तोंडी मोठा घास घेऊन जे वाटलं ते सांगत आहे , आवडलं नाही तर माफ करा .

तुम्हाला हा प्रश्न साधा वाटला , गमतीशीर प्रतिसाद लोक देऊ शकतील हे सहजशक्य वाटलं , ह्याची गंभीरता तुमच्या लक्षात येत नाही असं मला वाटतं . एखाद्या चांगल्या मध्यमवर्गीय / उच्चमध्यमवर्गीय / श्रीमंत घरातल्या मुलाची आई जन्मतः गेली असेल आणि नोकराचाकरांच्या साहाय्याने वाढवला असेल , कोणाचा धाक नाही - सगळं स्वातंत्र्य , आईविना म्हणून वडील अधिक लाड करणारे .. अभ्यासात हुशार , सुस्वभावी , मित्र - शिक्षक यांचा आवडता ... पण त्याला आईचं प्रेम म्हणजे काय याची कल्पनाच नाही .. त्याने मित्राला प्रश्न विचारला - अरे तुला नाही वाटत तुझी आई किती कटकट करते , परवा खेळायला पाठवलं नाही , आईला घाबरून असतोस तू ती मारेल / ओरडेल म्हणून , माझ्या घरी बघ , मला कुणीच ओरडत नाही , हवं तेवढा वेळ खेळू शकतो .. तुला नाही वाटत तुझी आई नसती तर बरं झालं असतं ?

तर त्याचा राग येण्यापेक्षा फार वाईट वाटेल कारण आईचं असणं काय असतं याचा त्याला अनुभवच नाही .. त्याचप्रमाणे जोडीदाराचा मृत्यू ही गोष्ट ज्यांचं शोषण होत आहे अशा लोकांना रिलीफ देणारी वाटू शकते .. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे निम्न वर्गातील स्त्रियांना असं वाटण्याचं प्रमाण नक्कीच जास्त असावं .. पण नवरा विक्षिप्त , रागीट , हेकट , आपलं तेच खरं करणारा , कटकट्या असेल तर हेच चांगल्या आर्थिक परिस्थितीतल्या कुटुंबांतील बायकांनाही लागू होऊ शकतं . हे वाईट गुण स्त्रियांमध्येही असू शकतात .. अशा परिस्थितीत नवऱ्याच्याही मनात तुम्ही म्हटलेला विचार येणं अशक्य नाही .

सुशिक्षित , आर्थिकदृष्ट्या चांगली स्थिती आणि सुसंस्कृत असलेल्या कुटुंबात दाम्पत्यजीवन प्रेमाचं , एकमेकांची काळजी करणारं असणं , दोघांची आयुष्यं एकरूप होणं निदान जोडीदाराच्या मृत्यूचा विचार अतिशय अप्रिय वाटण्याएवढा बंध दोघांत निर्माण होणं हे बहुसंख्य जोडप्यांच्या बाबतीत घडत असावं .. म्हणूनच इथे एवढ्या स्फोटक प्रतिक्रिया आल्या ... तुमच्या भाषेवरून तुम्ही सुशिक्षित आणि प्रश्न मांडण्याच्या पद्धतीवरून सुसंस्कृत सभ्य वर्गात मोडणारे आहात हे दिसून येतं .... हाच प्रश्न जर एखाद्या निम्नवर्गातील - अल्पशिक्षित - परिस्थितीशी झगडत जगणाऱ्या माणसाने विचारला असता तर तो एवढा धक्कादायक वाटला नसता .... कदाचित चांगल्या परिस्थितीतील माणसं अधिक संवेदनशील - मृदू हृदयाची असावीत अशीही लोकांची समजूत / अपेक्षा असू शकते ... त्यामुळे त्यांच्यात संवेदनशीलतेचा अभाव दिसून आल्यावर त्यांना ते आवडत नाही .

पण आई माहीतच नसलेल्या मुलाच्या प्रश्नावर रागावण्यात किंवा त्याला जज करण्यात अर्थ नाही तसाच जोडीदाराशी एकरूप होऊन जगण्याचा , जोडीदार खऱ्या अर्थाने सहचर झाला असण्याचा , त्या सहजीवनाच्या आनंदाचा , जोडीदार आयुष्याचा अविभाज्य घटक झाला असण्याचा अनुभवच ज्याला आलेला नाही त्याला जज करण्यात अर्थ नाही ...

याची कारणं वेगवेगळी असू शकतात ... स्वप्नातली परी किंवा स्वप्नातला राजकुमार सगळ्यांनाच मिळत असेल असं वाटत नाही , तडजोड करावी लागलेली असू शकते ... किंवा मुलीचं रूप - कुटुंब - मुलाची घरची , आर्थिक परिस्थिती पाहून पसंत तर केलं पण पुढे समजलं स्वभाव - आवडीनिवडी जुळत नाहीत .. त्यामुळे जे बंध निर्माण व्हायला हवेत ते झालेच नाहीत ... ( तरी संसार करायचे राहत नाहीत म्हणा - सगळा संसार करतात , मुलं जन्माला घालतात .... )

काहींचा स्वभावच स्वतःशिवाय दुसऱ्यावर एका मर्यादेपलीकडे जीव लावण्याचा / अटॅच होण्याचा नसतो , व्यक्ती म्हणून त्या जोडीदाराकडे पाहण्याऐवजी पती / पत्नी म्हणूनच पाहणं - म्हणजे माझ्या अमुक अपेक्षा इच्छा पूर्ण करण्यासाठी ही व्यक्ती आली आहे एवढ्याच नजरेने पाहणं - त्यात त्या व्यक्तीलाही स्वतःच्या इच्छा - अपेक्षा आहेत याचा विचारच वागताना न करणं , माझ्या अपेक्षा पूर्ण होत आहेत की नाही यावरच फक्त फोकस .. काहीजण याला स्वार्थीपणा म्हणतील पण नावं देऊन काय होणार आहे ... आपला स्वभाव / वागणं असं नाही ना ह्याची स्वतःला विचारून पडताळणी करून घ्यावी आणि ते बरोबर आहे का हेही विचारावं स्वतःला... स्वतःचं स्वतःला कळत नाही काही वेळा , दुसऱ्याच्या चुका लगेच दिसतात ; स्वतःच्या चुका ह्या चुका आहेत हेच मुळी ध्यानीमनी नसतं , अशावेळी एकदा मॅरेज काऊन्सिलरशी बोलून , आपल्या संसाराचा पाढा वाचून तुमच्या वागण्यात काही बदल आवश्यक आहेत का हे आधी पडताळून पाहावं , तुमच्या वागण्यात नसतील आणि जोडीदाराच्या वागण्यात असतील तर त्यांच्याशी कसं डील करावं - कसं रिऍक्ट व्हावं - नात्यातलं प्रेम वाढवण्यासाठी काय करावं याचा सल्ला चांगले काऊन्सिलर देऊ शकतील असं मला वाटतं ...

नवीन अरेंज्ड / तडजोडीने झालेलं लग्न टिकवून ठेवण्यात शारीरिक आकर्षण मदतीचा फॅक्टर ठरतं असावं पण एका पॉईंट नंतर तेही दोघांत काही बंध टिकवून ठेवण्यात अयशस्वी होऊ शकतं ... आणि तेही जर संपलंच असेल तर पटत नसताना एकत्र राहणं ही शिक्षा वाटू शकते .... दोघांपैकी एखाद्याचा स्वभाव हेकट - त्रासदायक असण्यामुळे नातं हे तुरुंग वाटू शकतं ... त्यात जोडीदार अनाकर्षक वाटू लागून दुसरं कुणी आवडू लागलं असेल तर फारच कठिण परिस्थिती ... अशा परिस्थितीत काहीही सल्ला देणं माझ्या कपॅसिटीच्या बाहेरचं आहे पण ही एक कथा आठवली , कदाचित काल्पनिकही असेल -
https://www.mailsandforwards.com/husband-wife-divorce-cancer-story

कधीकाळी तरी नात्यात प्रेम असेल आणि काळाबरोबर ते कमी झालं असेल तर नातं पूर्ववत करण्याचा थोडासा प्रयत्न नात्याला पुनर्जीवन देऊ शकतो . मुळातच मनाविरुद्ध लग्न केलेलं असेल तरी तुम्ही एका व्यक्तीला आयुष्यात साथ देण्याचं वचन देऊन आणलं आहे .. पसंत नव्हती म्हणून बायकोला कधीही स्पर्श केला नाही अशी स्थिती नक्कीच नसेल , संसार होऊन गेला असेल अर्धा .. आणि पसंत असेल आणि नंतर प्रेम विरत गेलं असेल तर 100 % चूक जोडीदाराचीच आहे का याचा किमान एकदातरी स्वतःशी विचार करावा - हा व्हिडीओ पाहा -

https://youtu.be/lNBkEBB9Qj4

आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणत असताना आपल्या जोडीदारही त्याच कारणाने असमाधानी नाही याची खात्री आहे का तुम्हाला ? माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे मध्यमवर्गीय 80 % विवाहित स्त्रियांच्या नवऱ्याकडून अपेक्षा या अवास्तव नक्कीच नसतात , अंथरुण पाहून पाय पसरावे ही वृत्ती असते .. नवऱ्याचं बजेट केरळ / उटी / गोव्याचं असेल तर बायको फॉरेन ट्रिपची अपेक्षा करत असेल असं वाटत नाही किंवा नवऱ्याचा पगार 50, 000 असेल तर कुठली बायको 40 , 000 ची साडी , 7000 चे पडदे आणि 4000 च्या बॉडी लोशनची अपेक्षा ठेवत नसेल .... साध्या अपेक्षा असतात हो बायकांच्या - नवऱ्याने 4 शब्द प्रेमाचे बोलावेत , त्या करत असलेल्या कष्टांची दखल घ्यावी , घरात तर असतेस असा दृष्टिकोन न ठेवता ती करत असलेल्या कामांना क्षुल्लक लेखू नये , कधी घरातल्या कामात - स्वयंपाकात स्वतःहून मदत ऑफर करावी , कधी एखादी साडी / ड्रेस स्वतःहून आणावा , कधी आठवणीने गजरा / फुलं तिच्यासाठी आणावीत , कधी म्हणावं किती दमतेस तू , आज मी करतो काहीतरी साधंसं .. साधी खिचडी पण गोड लागेल तिला ... किंवा चल आज बाहेरून मागवूया किंवा बाहेर जाऊया जेवायला , तुला आज सुट्टी ... ती सहचर म्हणून कमी पडली असं स्वतःशी म्हणत असताना नात्यात प्रेम निर्माण व्हावं / विरून गेलेलं परत यावं म्हणून तुम्ही काय कॉन्शस प्रयत्न करत आहात का / आजवर केले आहेत का ? हे स्वतःला विचारायला विसरू नये .

तुमच्या आजवरचे धागे नजरेखालून घातले त्यावरून तुम्ही सुसंस्कृत आहात असं वाटतं तेव्हा वर म्हटलेले प्रयत्न तुम्ही ऍक्चुली केलेलेही असतील .. जर नसतील तर विचार करा एकदा .... घटस्फोट परवडत नाही म्हणून लग्न रेटत आहोत म्हणण्याएवढी , जोडीदाराच्या मृत्यूचा विचार हा भयानक नाही तर साधाच आहे असं वाटण्याइतकी नात्याची अधोगती कशी झाली ? प्रोफेशनल काऊन्सिलिंग घेणं फायद्याचं ठरू शकतं .

तुमच्या या धाग्यावरून तरी दुसरी व्यक्ती आवडू लागल्यामुळे किंवा जोडीदार प्रचंड विक्षिप्त - हेकट - भांडखोर इत्यादी असल्यामुळे विसंवाद निर्माण झाला आहे असं वाटत नाही .... नात्यातलं प्रेम वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं तर आवश्यक आहेच .. मुळात प्रेम असतं तर हे विचार आलेच नसते असं मला वाटतं ... पण मानवी मन फार कॉम्प्लिकेटेड आहे - प्रेम असूनही एखाद्या व्यक्तीपासून सुटका हवीशी वाटणं हेही अशक्य नाही .... तसं जर असेल तर परिस्थिती खूप सोपी / साधी म्हणावी लागेल मुळातच जोडीदाराचा द्वेष किंवा चीड किंवा निष्प्रेम भाव मनात असण्याच्या तुलनेत .

तुम्ही आस्तिकता - नास्तिकता , खर्च - काटकसर , खाणे - पिणे ह्या बाबी नमूद केल्या आहेत ... माझं म्हणणं ऐका - पटलं नाही तर सोडून द्यालच . तुमच्यात आणि पत्नीत भांडणं - अबोला - विसंवाद यातलं काहीही नाही असं गृहीत धरून सांगत आहे ... एकदा तिच्याशी शांतपणे - मनमोकळेपणाने बोला . योग्य वेळ पाहून गंभीर आवाजात इकडे ये , तुझ्याशी थोडं बोलायचं आहे म्हटलं की ती बहुधा थोडी टेन्शनमध्ये येईल .. तिला म्हणावं आयुष्य एकदाच मिळतं असं धरून चालू , ते शक्य तेवढ्या आनंदात गेलं पाहिजे , संसार दोघांचा असतो .. पण मी काही पूर्ण सुखी आनंदी नाही .. मला " या - या " ( ज्या काही तुमच्या मनात असतील त्या ) गोष्टींमुळे मन मारून जगत असल्यासारखं वाटतं .. कधी बोललो नाही तुला पण किती दिवस मी असं कुढत जगायचं , तुला आवडेल का तुझा नवरा मन - इच्छा मारून जगत असलेलं ? .. या किंवा यापेक्षा चांगल्या प्रभावी शब्दात इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करून पाहा ... अहो तुम्ही कदाचित कधी बोलूनच दाखवलं नसेल आणि तिला बिचारीला साधी कल्पनाही नसेल अमुक गोष्टी तुम्ही मनाविरुद्ध करता आहात याची ...

घरात पत्नी एकटी शाकाहारी असेल , तुम्हाला मांसाहाराची इच्छा असेल आणि मांसाहार शिजवण्याचा तिला तिटकारा असेल तर सक्ती करणं पूर्ण अयोग्य पण मी तुला करायला सांगणार नाही पण घरात आणू तरी दे किंवा मला खायचं आहे ; मी बाहेर जाऊन खातो .. मला मन मारुन जगायचं नाही ... मरताना इच्छा अपूर्ण राहील माझी व्हेजची सक्ती केलीस तर .... असे योग्य ते शब्द वापरून तिला कनविन्स करता येतं का पहा ... लपवाछपवी करून खाण्याची इच्छा पूर्ण करणं हा मला बावळटपणा वाटतो ...

व्हेज - नॉनव्हेजचा इश्यू नसेल तर खाणे पिणे यात नावडीचे पदार्थ खाण्याची सक्ती नको आणि आवडीचे तिला करायचे नसतील तर माझे मला करू दे , कुक , बाहेरून ऑर्डर , बाहेरच रेस्टॉरंटमध्ये जेवणे वगैरे पर्याय करून हा प्रश्न मिटवणं कठीण वाटत नाही .... तुमच्या आवडीचं जेवण होत नाही हा प्रॉब्लेम असेल तर 15 दिवस 2 टाईम बाहेर जेवा , वर तुला करावंसं वाटत नाही नवऱ्याला हवं ते , तेव्हा मला बाहेरचं हॉटेलात कुठेतरी शिजवलेलं खाण्याशिवाय पर्याय नाही असं तीनचारदा बोलून दाखवा .... तुमच्या आवडीचं जेवण घरात होऊ लागेल ... ( जर घरात ऑलरेडी भांडणं वगैरे प्रकार नसतील , सगळं सुरळीत चालू असेल , बायको रागीट वगैरे नसेल तर ) आर्थिकदृष्ट्या शक्य असेल स्वयंपाकिण बाई किंवा पत्नीला स्वयंपाकात मदत करणारी वेगळी बाई ठेवा - 3-4 हजारात प्रश्न मिटेल , पत्नीला सगळ्यांच्या आवडीचा तऱ्हेतऱ्हेचा स्वयंपाक करणं किंवा मिनिमम नेहमीचा स्वयंपाकही झेपत नसेल , आवड संपली असेल , ती नाईलाज म्हणून स्वयंपाक उरकत असेल अशाही शक्यता असू शकतात ... स्वयंपाकीण किंवा मदतनीस बाई आली तर पत्नीवरचा भार कमी होऊन आवडीचे पदार्थ करण्याएवढा उत्साह ती एकवटू शकेल . पत्नी अर्थार्जन करणारी असेल तर तिच्यावरचं कामाचं प्रेशर खूपच कमी होईल ... आणि गृहिणी असूनही वर्षानुवर्षे तेच काम करून ते आता झेपत नसेल तर मदतनीस व्यक्तीच्या येण्याने तिला खूप रिलीफ मिळेल .

ब्राह्मण वगैरे असाल तर घरात नॉनव्हेज स्वतः करणं / करणारी स्वयंपाकीण आणणं किंवा ऑर्डर करून खाणं हेही वादळाला आमंत्रण देणारं ठरू शकतं - किंवा नाहीही .. ते पत्नीच्या समंजसपणावर - कर्मठपणावर अवलंबून आहे ... तेव्हा ते आऊट ऑफ ऑप्शन आहे . घरातील इतरही शाकाहारी असतील तर घरात ऑर्डर करून खाणं सगळ्यांनाच नाखूश करेल ... पण मुलं असतील , आणि त्यांचे खाण्याचे प्रेफरन्स अजून फिक्स झालेले नसतील तर त्यांना रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाऊन नॉनव्हेज खायला टेम्प्ट करा , तुम्ही खा त्यांच्यासमोर जेणेकरून त्यांची भीड चेपेल , कुतूहल - मोह वाटू शकेल , " अरे खा रे / अगं खा गं , you only live once / ह्याच्यावर अनेकांची घरं चालतात , हा मासेमाऱ्यांचा उपजीविकेचा उद्योग आहे इत्यादी तत्वज्ञान .... शेवटी वडीलांचा काहीतरी प्रभाव असतोच , वडील खात आहेत म्हणजे ते चूक / किळसवाणं न वाटणं उलट ऍपेटायझिंग वाटू शकतं .. सक्ती करू शकत नाही .. त्यांचे प्रेफरन्स फिक्स झालेले असतील तर मग याचा उपयोग नाही .. पण नसतील अजून - टीनेज / तरुण , लवचिक मनाची असतील तर तीही नॉनव्हेज सुरू करून तुमच्या टीममधले मेम्बर वाढू शकतात , पुढे नवरा आणि मुलं दोन्ही बाहेर जाऊन खात आहेत कारण आपण घरी करायला नाही म्हणतो असा विचार करून पत्नी घरात नॉनव्हेज बनवायला तरी अलाऊड करू शकते ... एकवेळ नवऱ्यासाठी नाही करणार ती मुलांसाठी करू शकते .... " पिणे " ही सुप्त / अतृप्त इच्छांपैकी एक नसेल अशी आशा आहे ...

खाणे - पिणे तुम्ही केवळ उदाहरण म्हणून दिलं असेल हा इश्यू नसेलही ...पण असेल तर माझ्या अल्पमतीला सुचलं ते सोल्युशन सांगितलं .

काटकसर - खर्च हा थोडा डेंजर विषय आहे . बायको काटकसरी असेल तर ते बदलणं सोपं आहे .. तुम्हाला हवा तसा , परवडेल तसा खर्च करा की खुशाल .. आर्थिक बाजू नीट सांभाळून - उधळपट्टी होत नाहीये - सेव्हिंग बिव्हिंग नीट होत आहे याची काळजी घेऊन .

पण बायकोने काटकसर करावी , ती फार खर्च करते असं वाटत असेल तर गृहयुद्धाला तोंड फुटण्याची चिन्हं ... फार उधळपट्टी होणार नाही यासाठी फिक्स डिपॉझिट / जागेत - प्रॉपर्टीत / पॉलिसीज / इतर गुंतवणूक मध्ये पैसे अडकवून घरी जरुरीपुरतेच पैसे दिले जातील अशी व्यवस्था करा ... गुंतवणूकीच्या फायद्यांची गोड शब्दात वर्णनं करून तिला कनविन्स करा .. काटकसर हळूहळू आपोआप होऊ लागेल .

आस्तिकता - नास्तिकता .. कठीण विषय आहे ... तुम्हाला धार्मिक कृत्यांत इंटरेस्ट नसेल , त्यांची कटकट वाटत असेल तर बायकोला जवळ बसवून एकदा शांतपणे सांगा ... धार्मिक स्थळांच्या ट्रीप कराव्या लागत असतील तर तिला म्हणावं मनाविरुद्ध देवदर्शन / पूजा केलेली तुझ्या देवाला आवडत असेल का ? मला कुठल्याही धार्मिक स्थळांना यायची अजिबात इच्छा नसते - तरी तुला माझ्या मनाविरुद्ध न्यायचंच असेल मला तर येत जाईन मी यापुढेही पण लक्षात ठेव यातलं काहीही मी माझ्या मर्जीने करत नाहीये ...

तसं काही नसेल आणि सणांचा कंटाळा येत असेल तर अमुक सणातही मला काडीचा इंटरेस्ट नाही ... तुला हे सगळं आवडतं तर तू जरूर कर पण मला त्यात कमीत कमी ओढ , माझ्यावर हे लादू नकोस .. मी तुझ्या समाधानासाठी पूजा करेन - आरतीला उभा राहीन पण बाकी सणांची ऍडिशनल कामं माझ्यावर लादू नको . उपवास व्रतं तुला करायची तर खुशाल कर , मला यापुढे करायची नाहीत .. तू अशीच माझ्यावर मला नको असलेल्या गोष्टी लादत राहणार आहेस का ? मला गुरुवारी किंवा मंगळवारी किंवा अंगारकी चतुर्थीला चिकन खावंसं वाटलं तर मी बाहेर जाऊन खाईन ... मी तुला नॉनव्हेज खायची / करायची सक्ती करत नाही तर माझ्यावर व्हेजच खाण्याची सक्ती का ? वगैरे बोलून तिला समजावू शकता .

कुठलीही थोडीशीही समंजस बायको चांगल्या प्रकारे समजवल्यावर या ऍडजस्टमेंट्स करायला तयार होईल .. तुम्हाला समजवायला / कनविन्स करायला जमेल असं वाटत नसेल तर दोघांनी प्रोफेशनल मॅरेज कौन्सिलरची मदत घ्या ... एवढ्या साध्या क्षुल्लक गोष्टींसाठी जोडीदाराच्या मृत्यूची इच्छा का करायची ..

बरं जर तुमची बायको भांडखोर , विक्षिप्त , हेकट , आपलं तेच खरं करणारी , तुमच्या सगळ्या इच्छा माहीत असूनही तुम्हाला तिच्या मर्जीनेच वागायला भाग पाडणारी असेल , घरात सतत भांडणं , वाद , अबोले होत असतील ( तुमच्या धाग्यावरून तरी एवढी गंभीर परिस्थिती असेल असं मुळीच वाटत नाही ) तर 15 दिवस कुणालाही न सांगता कुठेतरी लांब जाऊन राहा .. सगळ्यांना काळजीत पडू दे .. नंतर परत येऊन मुलांना , सगळ्या नातेवाईक - नातेवाईक नसतील तर शेजाऱ्यांना समोर गोळा करून सिन - तमाशा करा - ही बाई एक गोष्ट माझ्या मनासारखी होऊ देत नाही , मी जातो घर सोडून , नोकरी सोडून जातो , घर प्रॉपर्टी सगळं तू घे , मी संन्यास घेतो किंवा जीवच देतो ... हळूहळू शांत होण्याचं नाटक करून तिच्या तोंडून काऊन्सिलर कडे जाण्याचं वदवून घ्या ... जर एवढा टोकाचा स्वभाव नसेल तर असलं काही करायची गरज नाही , शांतपणे चर्चा करून आपल्याला काऊन्सिलरकडे जाण्याने काही फायदा होऊ शकतो का हा निर्णय घ्या ...

मला माहीत आहे हा फार बालिश आणि हास्यास्पद सल्ला आहे पण घटस्फोट घ्या ह्या मूर्ख सल्ल्यापेक्षा मला तरी चांगला वाटतो ... दोन्ही पालक चांगले असताना फक्त त्यांचं आपापसात पटत नाही म्हणून झालेला घटस्फोट मुलांसाठी वाईटच .. या लोकांना सांगायला काय जातं घटस्फोट घ्या नि वेगळे व्हा ..

जर तुमच्या पत्नीचा स्वभाव असा आक्रस्ताळा / वेगळ्या पद्धतीचा त्रासदायक असेल तर तिला काही इतर प्रॉब्लेम्सही असू शकतात ... ह्याच संस्थळावरची पोस्ट पार्टम कथा वाचलीत तर डिप्रेशन किंवा तत्सम मानसिक प्रॉब्लेम्स मुळे व्यक्ती त्रासदायक वागू शकते हे सहज लक्षात येईल , अशावेळी तिला योग्य उपचार मिळणं गरजेचं असू शकतं ... तुमच्या पत्नीबद्दल मला काही माहीत नाही , असं काही नसेलही .. पण तुम्ही सगळ्या शक्यता लक्षात घ्याव्यात म्हणून म्हणत आहे , रिसेंट भांडण किंवा विचित्र वागण्याने त्रासून गेला असाल तर ... मेनोपॉजचा वगैरे काळ चालू आहे का त्यामुळे चिडचिड होत नाही ना , त्यावर काही उपचार आहेत का याची चवकशी करता येईल ... तसं असेल तर तिच्यावरचा कामाचा भार हलका करून , प्रेमाने , समजुतीने वागून परिस्थिती सुधारता येऊ शकेल .

भारतीय नवरा असल्याचा तुम्हाला केवढा ऍडव्हान्टेज आहे ... थोडंसं प्रेमाने वागणं , साधी भेटवस्तू आणणं , आठवणीत ठेवून तिच्या आवडीचं काहीतरी करणं , तिच्या कष्टांची नुसती तोंडीसुद्धा घेतलेली दखल भारतीय गृहिणींना आनंदाने संसार रेटायला बळ देते .. इमोशनल फुल्स असतात बायका ... नवऱ्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो समजल्यावर आपल्या आवडीनिवडींना मुरड घालताना , ऍडजेस्टमेंट करताना त्यांना फारसा त्रास होत नाही , उलट मनापासून करतात ... फूल्स नाहीतर काय ... उलट भारतीय नवरे .. बायको कितीही राबत असली , बायकोने चार तास खपून एखादा पदार्थ केला , बायकोने वर्षानुवर्षे घरातली असंख्य कंटाळवाणी कामं दररोज केली तरी त्यात कौतुक वाटण्यासारखं / करण्यासारखं काही आहे हे त्यांच्या ध्यानीमनीही नसतं ... गृहीत धरण्यात पुरुषांचा हात कुणी धरू शकत नाही , फक्त भारतीयच नाही , एकूणच जगातले बहुतेक पुरुष ...अगदी सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात वाढलेल्या पुरुषांमध्येही बाईच्या कष्ट / त्रासांबद्दल अज्ञान - बेफिकिरी - एम्पथीचा अभाव दिसून येऊ शकतो .... ज्यांना ही जाण असते त्यांच्या बायका खरंच लकी ...

एका पूर्ण अख्ख्या जिवंत माणसाचं आनंदी किंवा दुःखी असणं तुमच्या वागण्यावर अवलंबून आहे .. तुमच्या एका साध्या वाक्याने किंवा कृतीने त्या माणसाचा अख्खा दिवस आनंदाने भरलेला जाऊ शकतो किंवा एका कृतीने / शब्दाने तो पूर्ण खराब जाऊ शकतो .... जगात दुसऱ्या कुणालाही तुमच्या मतं - आवडीनिवडी यांनी एवढा फरक पडत नाही पण त्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य तुमच्या मतं - आवडीनिवडी - इच्छा यांच्याशी जोडलेलं असतं .... ज्यांच्या संसारात प्रेम असतं त्यात नवरा अपसेट असला की बायकोला घास गोड लागत नाही अँड व्हाईस वर्सा ... जगातल्या कुठल्या व्यक्तीला आनंदी करण्याची तुमची क्षमता असेल - नसेल पण या व्यक्तीला थोडंसं प्रेमाने वागून तुम्ही आनंदी ठेवू शकता .... केवढी पॉवर आहे ही .. आणि केवढी जबाबदारी सुद्धा ... नुसत्या कल्पनेनेही माझा जीव दडपून जातो .. पण ज्या लोकांना / बहुसंख्य पुरुषांना हे मिळालं आहे त्यांना त्याची किंमतच समजू नये हे केवढं दुर्दैवी आहे .... उलट ज्या एका व्यक्तीचं आयुष्य तुमच्या आयुष्याशी जोडलं गेलेलं असतं तिलाच लागेल असं काहीतरी बोलून , राग काढण्यात , तिला हिरमुसलं करण्यात कसला आनंद मिळत असेल ...... तुमच्याबद्दल नाही जनरल म्हणत आहे . घरातली कोणी व्यक्ती खूप अपसेट असेल तर घरातल्या इतरांच्या मूड वरही मळभ पसरतं .. उलट सगळे आनंदी प्रसन्न असतील तर घरातलं वातावरणही प्रसन्न राहतं . अशावेळी जाणीवपूर्वक प्रयत्न करून जोडीदाराला आनंदी ठेवलं तर घरातलं वातावरण आपोआप छान राहील आणि इन रिटर्न जोडीदार सुद्धा तुम्हाला आनंदी करण्याचा प्रयत्न करेल .. अशावेळी मन मारावं लागत असलेल्या इच्छा नुसत्या सांगितल्यात तरी तुम्हाला अपेक्षित स्वातंत्र्य अगदी आनंदाने दिलं जाईल ...

आणि ह्यातलंही काही उपयोगी ठरणार नसेल तर चार - सहा महिने वेगळं घर घेऊन राहा आणि वागून पहा मनसोक्त हवे तसे ... हल्ली 15 हजारापासून वेल फर्निश्ड फ्लॅट भाड्याने मिळतात .... त्यासाठी जोडीदार मरण्याची वाट पहायची काय गरज .... वेगळं राहणं बरं वाटलं तर वर्षातून 2 - 3 दा करता येईल तसं , काही इच्छा अपूर्ण राहणार नाहीत .

धाग्याचे स्पिरीट "मौजमजा" आहे तो उगाचच "कोणाशी तरी बोलायचे आहे" मध्ये पडलेला आहे. तेवढं बदला साद.
नाहीतर जितक्या वेळा धागा वरती येइल, तितक्या वेळा तुम्हाला नको जीव होणारे Happy

माझ्या एका 28 वर्षे वय असलेल्या मैत्रिणीने सांगितलेला तिच्याच घरातला किस्सा: ह्या मैत्रिणीला 1 लहान बहीण आणि भाऊ आहे. दोघे वय 20 च्या पुढे. बाप (mr joshi) बायकोपेक्षा (मैत्रिणीच्या आईपेक्षा - mrs. जोशी) 12 वर्षांनी मोठा. आजही रात्रीचे 11 वाजले की जोशीबुवा, जोशीबाईंना असेल तिथून बेडरूम मध्ये घेऊन जातात. शेजारपाजारच्या बाया तोंडावर हात ठेवून हसतात आणि मैत्रीण, तिचे भाऊ बहीण थोड्याच वेळात येणारे कन्हण्याचे येऊ नयेत म्हणून लवकरात लवकर झोपायचा प्रयत्न करतात. एके दिवशी न राहवून माझी मैत्रीण तिच्या आईला म्हटली, "शोभतं का हे?"

यावर mrs जोशी आधी रागावल्या, पोरीच्याच कानात मारली आणि साधारण अर्ध्या तासाने भिंतीला डोकं टेकून बोलल्या, "मला तरी कुठं पटतंय हे सारं, तुझा ऐतखाऊ बाप मरेल तेव्हाच सुटका होईल या नारकातून." हे ऐकून पोरगी हादरून गेली. Mrs जोशींनी मग पोरीला मैत्रीण मानून अंगभर असलेले विचित्र डाग- चावल्याचे दाखवले.

Mr जोशी काहीही काम करीत नाहीत, चारदोन थातूर मातूर पूजा सांगणे, सोसायटीतील गणपतीच्या वेळचा सत्यनारायण, आणि संध्या वगैरे.. mrs जोशींच्या शिवणकाम, लग्नाच्या रुखवताच्या ऑर्डर्स, आणि इतर वेळी बाकी बारीक बारीक कामातून घर चालतं, धान्य वगैरे माहेरी असलेल्या शेतीतून..
समाज काय म्हणेल, 2 पोरींची राहिलेली लग्ने वगैरे कारणांनी घटस्फोट पण घेता येत नाही..
असला नवरा मरावा अशी इच्छा त्या बाईच्या मनात नक्कीच येऊ शकते, आणि मला तरी उचित वाटते.

आणि हो, mrs जोशी, तरुणपणी राज्यस्तरीय हॉकी आणि कबड्डीपटू होत्या, त्यांची काही पदके अजूनही घरात आहेत, जी मी स्वतः पाहिलेली आहेत.

समाज काय म्हणेल, 2 पोरींची राहिलेली लग्ने वगैरे कारणांनी घटस्फोट पण घेता येत नाही..>> पण ही सरळ सरळ अब्युज ची केस आहे. व ह्यात सेपरेशन व वेगळेच व्हायला हवे. व समाज मुलींची लग्ने हे सर्व एक्स्टर्नल बाबी आहेत. रिलेशन शिप मध्ये इतका छळ व अत्याचार सहन करायची गरज नसते. मुली अ‍ॅडल्ट आहेत त्यांनी तरी एच आर सी ची मदत घेउन किंवा सरळ एफ आय आर नोंदवून विभक्ति करणा ची प्रोसेस सुरू करायला हवी. आतून त्या बाईला पण तसे वाटायला हवे.

सुखाच्या चाललेल्या संसारात कोण जोडिदार मेला तर मी ह्याव करेन त्याव करेन असा मजेने विचार करेल.

> पण ही सरळ सरळ अब्युज ची केस आहे. व ह्यात सेपरेशन व वेगळेच व्हायला हवे. व समाज मुलींची लग्ने हे सर्व एक्स्टर्नल बाबी आहेत. रिलेशन शिप मध्ये इतका छळ व अत्याचार सहन करायची गरज नसते. मुली अॅडल्ट आहेत त्यांनी तरी एच आर सी ची मदत घेउन किंवा सरळ एफ आय आर नोंदवून विभक्ति करणा ची प्रोसेस सुरू करायला हवी. आतून त्या बाईला पण तसे वाटायला हवे. >
लैंगिक अत्याचार आहे, त्याला कायदा गुन्हा मानतच नाही. बाईने लग्न केले आहे म्हणजेच आयुष्यभराचा कन्सेन्ट देऊन टाकला आहे.
नंतर दाद मागता येत नाही कारण लग्नांतर्गत बलात्कार हा कायद्याने गुन्हा नाही.

शारीरिक मारहाण नाही, त्यामुळे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दाद मागता येणार नाही असे वाटते. अंगावर चावल्याच्या जखमा कितपत खोल आहेत माहीत नाही पण तरी FRI वगैरे होईल असे वाटत नाही.

वकिलाचा सल्ला आवश्यक आहे अश्या बाबतीत. इथे स्पेकुलेशन करून काही होणार नाही. तो मोठा प्रतिसाद लंच खाताना वाचयला ठेवला आहे.
गंमत म्हणून.

ॲमी , आता कायदा बदलला आहे, त्यांना हवे असेल तर त्या नक्कीच FIR नोंदवु शकतात. पोलीसांनी जर घरगुती प्रकरण म्हणुन समजावणीची भाषा केली तर त्यांना सांगायचे की मला गुन्हा नोंदवायचा आहेच असे केल्याने पोलिसांकडे देखिल गुन्हा नोंदवण्याशिवाय पर्याय नसतो. पण याकरता स्त्रिची मानसिक तयारी असायला हवी. रोज मरत जगण्यापेक्षा सरळ घटस्फोट घ्यावा. संघर्ष तर असाही आहे अन तसाही असेलच. फक्त योग्य पर्याय वेळीच निवडणे गरजेचा असतो अन सोबर त्याच्या चांगल्या वाईट परिणामांना सामोरे जायची हिम्मतही असायला हवी.

> वकिलाचा सल्ला आवश्यक आहे अश्या बाबतीत. इथे स्पेकुलेशन करून काही होणार नाही. > बरोबर आहे. पणतरी मला एक जुनी बातमी आठवली. एका बाईचा बलात्कार आणि खून झालेला. पण हे करणारा तिचा लॉन्ग टर्म प्रियकर होता (प्लिज नोट नवरा नाही, प्रियकर). त्यामुळे गुन्हा फक्त खुनाबद्दल दाखल झाला, बाकी सगळं रफसेक्स (शरीर आतील+बाहेरील जखमा) समजून सोडून देण्यात आलं होतं.

> तो मोठा प्रतिसाद लंच खाताना वाचयला ठेवला आहे.
गंमत म्हणून. > वाचला कि सांगा काय वाटलं ते Wink

> आता कायदा बदलला आहे, > कधी बदलला कायदा? बातमीची लिंक मिळेल का? मी गुगल केलं तर असं काहीच सापडलं नाही. ह्या इतर बातम्यामात्र सापडल्या

Marital rape needn’t be an offence: Ex-Chief Justice of India Dipak Misra
Updated: Apr 9, 2019, 12:40 IST
https://m.timesofindia.com/articleshow/68785604.cms

SC refuses to entertain PIL seeking law against marital rape
Updated: Jul 1, 2019, 16:55 IST
https://m.timesofindia.com/india/sc-refuses-to-entertain-pil-seeking-law...

मोठा प्रतिसाद छान आहे पण कन्सल्टंट टाइप आहे. शॉप फ्लोअर वाले लोक कसे आया बडा एक्स्प्रेशन देतात तसे वाट्ते. पहले जोडिदार आने तो दो फिर बि छडने तो दो. फिर इन्हे क्या कर्ती देकते क्या की.

माझ्याकडे लिंक नाही आहे, पण माझ्या एका वकील मित्राने सांगीतले होते, तसेच एकदा मटावर सुद्धा एका केस संदर्भात वाचले होते त्यात त्या बाईने तिच्या नवर्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.

अमा Lol

VB, ते 'अनैसर्गिक' शरीरसंबंधबद्दल असेल. पेनोव्हजायनल (नैसर्गिक) सेक्स गुन्हा नाहीय. इतर प्रकार जर फोर्स केले (गुद, मुख) तर तो गुन्हा होता, आहे.

Pages