कविता: बिबट्याचे मनोगत

Submitted by भागवत on 13 August, 2019 - 09:34

सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस
भरपूर पर्यटनाची मज नाही सोस
माणसा सोबत संघर्षात नाही मौज
भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज

सोसायटीत ओळखीचे कुणीच नाही
म्हाडात तर घर सुद्धा घ्यायचे नाही
नाशिक पाहण्यात तर मला रस नाही
माणसं भेटण्याचा मला आनंद नाही

शोधतो व्यक्तीला, जो प्रश्न सोडवेल
शोधतो स्वतःला, जिथे आनंद पसरेल
शोधतो स्वप्नांना, तिथे आसरा भेटेल
शोधतो जागेला, जिथे भोजन मिळेल

हिंस्त्र तरी अन्न साखळीचा हिस्सा
जंगल हिरावून तुम्ही दिला घुस्सा
वनक्षेत्र खालावले साखळी तुटली
आत्ता मात्र भूख सुद्धा प्रखर वाढली

नोंद: बिबट्याचे जंगल सोडून अन्ना साठी शहरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट्याचे मनोगत आणि व्यथा मांडण्याचा कवितेच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

nice

माणसांची संख्या वाढली म्हणून एकावर एक घरं बांधली आणि बिबट्या संख्या वाढली पण जंगलं कमी झाले म्हणून गावा, शहरात घुसायला लागले.

धन्यवाद डॉ.विक्रांत प्र..., अमर ९९, मन्या !!!
बिबट्या संख्या वाढली पण जंगलं कमी झाले म्हणून गावा, शहरात घुसायला लागले. >> बिबट्या संख्या कमी झाली आहे.
भारतात २०१५च्या मोजणी नुसार फक्त 12,000 to 14,000 बिबट्या आहेत. आणि मागील ४ वर्षात 2018-460, 2017-431,2016-440, 2015-339 मारले गेले आहेत.

छान