ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत


-

-

Group content visibility: 
Use group defaults

तो लडाखी खाजदार म्हणतो , मोदींच्या प्रयत्नाने लडाखी प्रश्न युनोत गेला, याबद्दल आनंद की अभिमान कायतरी आहे म्हणून

>>>>>>कन्हैया कुमार हा भारताचा उगवता तेजस्वी तारा आहे. बेगुसराय लोकसभा निवडणूकीत हरला असेल, <<<<<<
कन्हैया कुमार " तेजस्वी तारा " व्वा व्वा !!!
"भारत तेरे तुकडे होंगे, ईंन्शा अल्ला, ईंन्शा अल्ला" म्हणणारा लोकसभा निवडणूकीत भाग घेउ शकतो तरी सुदधा लोकांना भाजपावरच खोटे आरोप करायचेत !!
कन्हैया कुमारची केस कोर्टात चालु आहेच, त्याच्यावरची केस भक्कम साक्षी , पुराव्यानीशी कोर्टात दाखल झालेली आहे !! आणी कोर्टाचा निकाल येईल तो सर्वमान्य असेल !!

रॉनी यांच्यासाठी पहिले पाढे पढ पंचावन
मी माझा -> तोन्डी तलाकमुळे मुस्लीम महिलान्चा आर्थीक आधार जातो व त्या देशोधडीला लागतात, हे तुम्हाला मान्य आहे की नाही?

यावर माझा प्रश्न - तोंडी तलाक देणार्‍या नवर्‍याला तुरुंगात पाठवल्याने त्या म हिलेला आर्थिक आधार कसा मिळणार?
आता या प्रश्नाचं उत्तर नसल्याने गाडी ४९८ अ मध्ये अडकलीय. ४९८

इथे तीन मुद्दे आहेत.
१. मेंटेनन्सचा प्रश्न घटस्फोटितेबाबत येतो. मुळात इन्स्टंट ट्रिपल तलाक बेकायदा झाल्याने ज्या बाईचा घटस्फोट झालाच नाहीए, तिच्या मेंटेनन्सची सोय कायदा करतो. ती जबाबदारी तिच्या नवर्‍यावर टाकतो आणि त्याच वेळी त्या नवर्‍याला तुरुंगातही टाकतो.
तुरुंगात जाऊन त्याने आपल्या बायकोला मेंटेनन्स कसा द्यायचा हे कोण सांगणार?
२. हा मुद्दा आधीही लिहिलाय. इन्स्टंट ट्रिपल तलाकमध्ये विवाह वाचवण्याची सोय नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने तो अवैध ठरवण्यामागे कारण होते. आता नवरा तुरुंगात गेल्याने विवाह वाचवायची सोय कशी उपलब्ध झाली?
३. ४९८ अ खाली तक्रार करणार्‍या स्त्रीला आपल्या लग्नानंतरच्या घरी राहण्याचा हक्क असतो. ती विवाहिताच असते.
४९८ अ खाली नवरा तुरुंगात गेलेल्या महिलेच्या आर्थिक आधाराचा प्रश्न ही व्हॉट अबाउट्री आहेच. शिवाय वडाची साल पिंपळालाही.

आर्थिक आधार जाईल म्हणून छळ करणार्‍या, क्रूरपणे वागवणार्‍या सा सरकडच्या लोकांना तुरुंगात जाउ देऊ नये?
त्यातलं दुसरं कलम तर आत्महत्येला उद्युक्त करणं हे आहे. जिवापेक्षा आर्थिक आधार महत्त्वाचा?

https://twitter.com/ANI/status/1162614523603357698
BJP MP from Ladakh, Jamyang Tsering Namgyal on UNSC discussion on Kashmir: I'm happy that due to the decision taken under Modi ji's leadership, Ladakh is being discussed in UN. Earlier when Congress was in power, Ladakh was not even discussed in Parliament let alone the UN.

याचं भाषण अनेकांना आवडलेलं दिसतंय. हा नवा पोस्टर बॉय इथे नक्की काय म्हणतोय ? काश्मीरचा प्रश्न यु एन कडे नेणं चुकीचं पण लडाखचा प्रश्न नेणं योग्य, असा अर्थ आहे का?

पोटगीसाठी घटस्फोट गरजेचा नाही, स्त्री व पुरुष वेगळे रहात असतील तरी बाई पोटगी मागू शकते,

एकाच घरात राहून नवरा पुरेसा पैसा देत नसेल तरीही कायदा किमान रक्कम पोटगी मंजूर करतो

काल पेपरात आले आहे, सैफ ने अमृता सिंगला 1 कोटी पोटगी दिली होती,

ह्रितीकची बायको मुस्लिम होती , तिलाही मिळाली 300 कोटी,
सगळेच स्त्री पुरुष कायद्याच्या कक्षेत आहेत

दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे खासदार हंस राज हंस त्यांच्या एका विधानामुळे चांगलेच चर्चेत आलेत. दिल्लीतील प्रख्यात जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीचं नाव बदलण्याबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. “जेएनयूचं नाव बदलून एमएनयू करावं…मोदींच्या नावावर देखील काहीतरी असावं” असं विधान हंस राज हंस यांनी केलं आहे.

Proud

नाव बदला अन पुतळ्याच्या शर्टचा रंग बदला, आले मूळ पदावर

कृतिका आणि BC , हा धागा काश्मीर व कलम 370 वर आहे. कृपया तलाकबाबतची चर्चा करण्यासाठी तुमच्यापैकी कुणीतरी एकाने वेगळा धागा काढा. आम्ही तिथे पालथ्या घड्यावर पाणी ओतू नक्की.

का , विषय अडचणीचा वाटतोय का? तुम्हाला नाही विचारणार, तुमचा राष्ट्रअब्बू अम्मीला किती पोटगी देतो,
डोन्ट वरी

काश्मीर विषयी जो काही निर्णय भारत सरकारने घेतला आहे तो भारताचा प्रश्न आहे .
काश्मीर हे विवादित क्षेत्र नाही आणि इथे पाकिस्तानचा संबंध नाही असे आतचे केंद्र सरकार आणि त्यांची पाठी राखी जनता समजते .
काँग्रेस आणि डाव्या विचार सरणीचे लोक नेहमीच काश्मीर हे विवादित क्षेत्र आहे असे समजतात
म्हणून काश्मीर प्रश्न वर चर्चा करण्यासाठी ह्यांना पाकिस्तानचा चर्चेत सहभाग असावा असे वाटते .
आता जी कलम रद्द केली आहेत ती रद्द करताना पाकिस्तान शी चर्चा केली नाही ह्याचे प्रचंड दुःख काँग्रेसी आणि डाव्यांना झाले आहे त्या मुळे
राज्य घटना धोक्यात आहे अशी बोंब मारायला survat केली आहे .
डावे आणि काँग्रेसी नेत्यांनी
पाकिस्तान सरकारला काश्मीर हे भारताचे आहे तुम्ही त्यात हस्तक्षेप करू नका असे ठणकावून सांगितले चे कुठे वाचनात आले नाही .
अंतर राष्ट्रीय स्तरावर प्रश्न घेवून गेला म्हणून पाकिस्तानचा निषेध सुधा ह्या लोकांनी केला नाही .
उलट जागतिक स्तरावर भारताची नाचक्की कशी होईल असेच ही लोक वागत आणि बोलत आहेत

जाहीर वक्तव्य करण्याची अपेक्षा होती
डावे आणि काँग्रेसी कडून .
त्यांनी जाहीर पने पाकिस्तानच्या भूमिकेचं निषेध केला असता .
आणि काही मतभेद असणाऱ्या प्रश्नावर नंतर सरकारशी चर्चा केली असती तर त्यांच्या मताचा नक्की विचार झाला असता शेवटी हे आपले सरकार आहे .
त्या मुळे दोन फायदे झाले असते काश्मीर प्रश्र्नी सर्व भारतीय एक आहेत हा संदेश जगाला गेला असता .
आणि भारतीय जनता दुभागली नसती

15 ऑगस्टच्या सोहळ्यात तर बोलले होते, राहुल गांधी हा अधिकृत विरीधी पक्षनेता नाही, काँग्रेसला तितक्या जागाही नाहीत , वगैरे वगैरे, मग राहुल गांधीला पहिल्या रांगेत खुर्ची का हवी वगैरे

आणि आता म्हणतात विरोधी पक्षाने म्हणे मत व्यक्त केले नाही. विरोधी पक्ष , विरोधी पक्षनेता वगैरे काही आहे तरी का ?

काँग्रेस सत्तेत नाही अन विरोधी पक्षही नाही, आम्ही त्यांना कशाला विचारायचे?

राजेश १८८, लडाखच्या भाजप खासदाराने लडाख, युनो, याबद्दल जे काही म्हटलंय त्याबद्दल आपलं बहुमोल मत मांडाल का?

का , विषय अडचणीचा वाटतोय का? >>>

अजिबात नाही, हिम्मत असेल तर धागा काढून बघ.

तुम्हाला नाही विचारणार, तुमचा राष्ट्रअब्बू अम्मीला किती पोटगी देतो, >>> मोहनदास करमचंद गांधी व कस्तुरबा गांधी यांचा घटस्फोट झाल्याचं मी तरी कुठे ऐकलं नाही.

मोदीद्वेषामुळे ते काळ्या पैशाबाबत काय बोलतात ते कुणी ऐकून घ्यायला तयार नव्हते. पण काळा पैसा आहे हे सिद्ध झाले. केजरीवाल यांनीच ते मान्य केले. पण बिकाऊ मीडीयाने हे आपल्याला कधी दाखवले नाही.
https://www.youtube.com/watch?v=J0XlIIfwCUU

आता सगळी वटवाघळं या धाग्याला आपापला अजेन्डा घेउन लटकायला लागलीत. धागालेखकाने या धाग्यच्या प्रतिसाद सेक्शन ला कुलुप लावावे अशी विनन्ती प्रशसकांना केली होती, ती अजुन मान्य का झाली नाही काही कळत नाही.

https://www.facebook.com/cpimlliberation/videos/2056387797793076/

आज जर मोदीजी देशाचे प्रधानसेवक असते तर खोटे आरोप करणा-यांना काळकोठडीची हवा खायला पाठवले असते. अजून ही बाई बाहेर का ?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद मध्ये जी गुप्त चर्चा चीन आणि पाकिस्तानच्या मागणी मुळे झाली त्याचा संदर्भ आहे लडाख च्या bjp लोकप्रतिनिधी च्या स्टेटमेंट शी .
मोदी सरकारनी दोन्ही कलम रद्द केली म्हणून लडाख विषयी चर्चा झाली हे उपरोध नी बोलले गेले आहे .
त्याच्या पुढे ते असेही म्हणतात लडाख हे भारताचे रत्न आहे .
त्याचा विकास कसा करायचा हे भारत आणि भारत सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे .
शेजाऱ्यांना त्याची अडचण वाटत असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही असे ते बोलले आहेत .
त्यांच्या स्टेटमेंट चा चुकीचा अर्थ काढून आपल्याला हवं तसे समजणे हे कोणत्या मनोवृत्तीचे लक्षण आहे

https://www.facebook.com/cpimlliberation/videos/2056387797793076/

आज जर मोदीजी देशाचे प्रधानसेवक असते तर खोटे आरोप करणा-यांना काळकोठडीची हवा खायला पाठवले असते.
डाव्या पक्ष आणि तथाकथित धर्म निरपेक्ष लोकांच्या fb वॉल भेट दिली तर लक्षात येईल ह्यांनी स्वतःचा एक कंपू बनवला आहे तिथे दुसऱ्यांना मत व्यक्त करायला दिले जाणार नाही .
देश विरोधी मत,भारतीय राज्य घटने विषयी सुद्धा कसलेच प्रेम नसणारे विचार ,अगदी सर्वोच्य न्यायालय,निवडणूक. आयोग ह्यांच्या वर शंका घेतल्या जातात .
आणि अंगलट आले की आंबेडकरी जनतेचा वापर करून त्यांच्या पाठी लपतात .
अशी ह्यांची काम करायची पद्धत आहे

शबरीमलावर कोर्टाने लक्ष घालू नये असे शहा बोलले होते ना?

अडवाणींनी 2009 मध्ये इ व्ही एम वर शनका घेतली होती ना ?

आणि त्या फेसबुक व्हॉल्वर मी आताच लिहहून आलो, कसली बंदी नाही

ब्लॅक कॅट
कंपू आहे तिथे ठराविक विचारांच्या लोकांचा .
तेच विचार व्यक्त करतात आणि तेच वाहवा करतात ..
तुम्हाला तिथे कशी बंदी असेल आपली माणसं ओळखतात ते .
पण आमच्या सारख्या लोकांनी मत व्यक्त केले तर शिवराल भाषा वापरून धावून येतील नाहीतर ब्लॉक करतील .
त्यांच्या कडे लोकशाही नाही .
लोकशाही खरी उजव्या विचारांच्या लोक मध्येच आहे

कृतिका धन्यवाद उत्तम समजावलेत. तरीही 498 मधील स्त्री जर आर्थिकदृष्टया सक्षम नसेल तर तीच ती बघून घेऊ शकेल असं कायदा मानत असेल तर ओकी!

तर तुमच्या मताप्रमाणे, जर ट्रिपल तलाक हा गुन्हा असेल तर त्याला शिक्षा कशी असावी?

ब्लॅकॅट अति झालं हसू आलं.

कृपया तलाकबाबतची चर्चा करण्यासाठी तुमच्यापैकी कुणीतरी एकाने वेगळा धागा काढा
>>
शुक शुक मायबोलीवरच्या राजकीय धाग्यांवर जे कधीच झालेलं नाही ते कृप्या सुचवी नये!!

आज जर देशाचे प्रधानसेवक मोदीजी असते तर त्यांनी या महिलेला तिचे हक्क नक्कीच मिळवून दिले असते. तिचे निवेदन नक्की ऐका. मोदीभक्त या महीलेचे निवेदन मोदीजींपर्यंत नक्की पोहोचवतील ही अपेक्षा आहे.
https://www.facebook.com/mail.deepakpawar/videos/10219708558453694/

Pages