ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत


-

-

Group content visibility: 
Use group defaults

इस्त्रायल ला नेहमी युरोपियन देश पाठिंबा देतात तिथे कोणती बाजारपेठ आहे . > तिथली बाजारपेठ यहुद्यांच्या ताब्यात आहे. Happy

बुऱ्हाणच्या नातेवाईकांना भाजपा भरपाई देणार,

त्या जीपला बांधलेल्याला पण 10 लाख दिले, अजून 5 लाख दिले असते तर निदान त्याचे 15 लाख पोचले असते

पुढेमागे रागाने आत्मचरित्र लिहिले तर .......... मी राफेल बिफेल बाबत गंमत करत होतो हे देखील लिहील वर डोळा मारल्याची स्मायली पण टाकेल
Rofl
भारी एकदम

युनोत भारताची बाजू मांडायला सैद अकबरुद्दीन आहेत म्हणे, अल्लाताला की दुवा से फतेह हासिल हो

Submitted by BLACKCAT on 17 August, 2019 - 14:14

बरं सय्यद अकबरुद्दीन आहेत , मग?

ब्लॅक कॅट चे विचार दूषित आहेत .
भारतात धर्माच्या नावावर भेदभाव केला जात नाही .
ज्यांचे कर्म चुकीचे आणि देश विरोधी आहे त्याचा तिरस्कार केला जातो .
Dr a.p.अब्दुल कलाम देशाची शान होते .
त्यांना सर्व देशप्रेमी जनता भारताचे hero मानते

ब्लॅक कॅट चे विचार दूषित आहेत .
नै कै !! हा अख्खाच दुषित आहे !! ईसका कुछ नही हो सकता !!
"आधिच मर्कट त्यात मद्य प्यायला" !! म्हणुन मर्कट लिला करत असतो !!

युनोतल्या चर्चेत काय झाले? सविस्तर बातमी कुणाला कळली आहे काय?

युनोतल्या चर्चेत पाकिस्तान व चीनने मांडलेल्या मुद्द्याला कोणीही भीक घातली नाही. त्यानी भारत व पाकीस्तानने ही समस्या आपापसांतील सामन्जस्याने सोडवावी असा सल्ला दिला.

त्यानन्तर भारताने पकिस्तान जोपर्यन्त दहशत्वादाला थारा देणे बन्द करत नाही तोपर्यन्त उभय देशान्मध्ये चर्चा होउ शकत नाही ही भुमिका स्पष्ट केली.

३७०वर ज्यांचं देशप्रेम उतू जातंय त्यांच्या माहितीसाठी

३७० बदलण्या आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याविरोधात व्हाईस मार्शल (नि.) कपिल काक आणि मेजर जनरल (नि.) अशोक कुमार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
(बातमी: https://www.livelaw.in/top-stories/article-370-former-bureaucrats-defenc...)

या लोकांनी पाकिस्तान विरुद्धच्या युद्धांत महत्त्वाची भूमिका बजावली होती. पैकी मेजर जनरल मेहता काश्मीरमधल्या पीरपंजालच्या दक्षिणेस राजोरी आणि उरी सेक्टरमध्ये १९६५ आणि १९७१च्या युद्धात तैनात होते. तसेच सियाचीनवर ताबा मिळवण्यातही त्यांची भूमिका होती.

आणि एअर व्हाईस मार्शल काक यांचे हे सर्व्हिस रेकॉर्ड
http://www.bharat-rakshak.com/IAF/Database/6784

विशेष म्हणजे काकसाहेब स्वतः काश्मिरी पंडित आहेत बरं का!

काश्मीर प्रश्नाला हिंदू-मुस्लिम नजरेतून पाहणाऱ्यांसाठी एक सणसणीत चपराक: काश्मिरी पंडित, डोग्रा आणि शीख यांचा सहभाग असलेल्या एका गटाने सरकारच्या निर्णयाला विरोध करणारं पत्रक काढलं आहे. त्यात निवृत्त सेनाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी सामील आहेत.
https://www.telegraphindia.com/india/pandits-dogras-sikhs-underline-dive...

https://youtu.be/o7qSv5ZbdHo

अभिषेक शरद माळी

कान्हेया कुमार च नाव सुद्धा कानावर पडलं तरी संताप येतो .
देशद्रोही तुकडा तुकडा गॅंग चा सरदार.
बहुसंख्य जनता ,भारत सरकार ,भारताचे मित्र राष्ट्र ह्यांच्या मताला विरोध करणारे देशद्रोही आहे .
मग कधी पूर्वी काही चांगलं काम केले असले तरी .
आणि देशद्रोही लोकांच्या मताला जास्त किंमत कोण्ही देणार नाही .

<< कान्हेया कुमार च नाव सुद्धा कानावर पडलं तरी संताप येतो .
देशद्रोही तुकडा तुकडा गॅंग चा सरदार.
बहुसंख्य जनता ,भारत सरकार ,भारताचे मित्र राष्ट्र ह्यांच्या मताला विरोध करणारे देशद्रोही आहे .
मग कधी पूर्वी काही चांगलं काम केले असले तरी .
आणि देशद्रोही लोकांच्या मताला जास्त किंमत कोण्ही देणार नाही . >>

------ कन्हैया कुमार हा भारताचा उगवता तेजस्वी तारा आहे. बेगुसराय लोकसभा निवडणूकीत हरला असेल, पण लोकशाहीत निवडणूका म्हटल्यावर हार- जित होणारच. अटल बिहारी वाजपेयी, हेमवतीनंदन बहुगुणा सारख्या दिग्गज महारथींनापण मतदारांनी पराभवाची चव दिली होती.

अत्यंत शांत, अभ्यासू वृत्तीच्या आणि मुद्देसुद चर्चा करणार्‍या कन्हैया कुमार यांच्यामुळे लोकसभेत भाजापाची त्रेधातिरपीट उडाली असती, ते बघण्यासाठी काही वर्षे थांबावे लागेल. त्याच्या भाषणाचे व्हिडिओ अभ्यासणे म्हणजे एक मेजवानीच असते.

निवडणूका जिंकल्यावरही आपल्याच विजया बद्दल साशंक असणारे, स्वत:लाच चिमटे घेत "मी जे एकतो आहे ते खरे आहे का ?" असे एकमेकांना विचारणारे. भिती आहे पण कशाची? पायाखालची वाळू सरकल्याचे निव्वळ भास होणार्‍यांना त्याचे कुठलेही मुद्दे धड खोडता येत नाही.... मग त्याच्या विरुद्ध खोटा प्रचार, खोटे आरोप करतात. अरे तुमचेच सरकार होते आणि आहे आणि पुढची अनेक वर्षे रहाणार आहे (कृपया विश्वास ठेवा Happy )... देशद्रोहा सारख्या महाभयंकर आरोपासाठी तब्बल ३ वर्षे वाट पहावी लागते यातच आरोप किती बनावट होते हे दिसते. रोज दोन पाने लिहीली असती तरी आरोपपत्र याच्या अनेक महिने आधी तयार झाले असते. काही तरी नक्की चुकत आहे.

विरोधी विचाराच्या लोकांना सरसकट "देशद्रोही" असे संबोधणे हे ज्यांची देशभक्ती २०१४ मधे जन्मली (आणि २०१९ मधे फुलली) त्या ५+ नवदेशभक्तांनाच शोभते. कुमारांची राजकीय मते पटत नसतील तर ठिक आहे. पण म्हणून त्यांना देशद्रोही असे म्हणता येत नाही... मग त्याच न्यायाने भारतातले ६३+ % लोक देशद्रोही आहेत. सुदैवाने कुणाला देशद्रोही ठरवायचे याचे अधिकार अजुन तरी तुमच्याकडे नाही.

देशाच्या पवित्र घटनेप्रती आणि लोकशाही मुल्यांबद्दल नितांत आदर असणार्‍या आणि ते मुल्य जिवापाड जपणार्‍या कुमार यांचे नाव कानावर पडल्यावर संताप येत असेल तर अत्यंत गंभिर बाब आहे. तुम्हाला भडकावणार्‍या लोकापासून सावध रहा आणि लवकर बरे होण्यासाठी मनापासून शुभेच्छा.

खुद्द त्या लडाख खासदारांची बायको सांगते. कन्हैया निर्दोष होता म्हणून.

कम्युनिस्ट बायको अन संघी नवरा , त्यांचे तिकडे व्यवस्थित सुरू आहे, अन हे भांडत बसलेत

कन्हैया कुमार सारख्या लोकांचं भारतात काहीही चालणार नाही. उदय यांच्या म्हणण्यानुसार वाट पहायला हरकत नाही. भारतीय जनता देशप्रेमी आहे. सैनिकांना नावे ठेवणारे, भारताचे तुकडे व्हावे असे म्हणणाऱ्या लोकांना फक्त मारच मिळेल. जनतेच्या संयमाचा कोणी अंत पाहिला तर जनता त्यांचे नामोनिशाण मिटवून टाकेल. जयहिंद!

विरोधक हवेतच. या धाग्यावर उदय, भरत, blackcat व अजून दोघे तिघे विरोधी मते मांडत होते. पण काही प्रतिसाद केवळ विरोधासाठी विरोध म्हणून दिले आहेत. शेवटी विरोध करून दमले पण यांचे विचार मेजॉरिटीला पटलेले नाहीत.

<< कन्हैया कुमार सारख्या लोकांचं भारतात काहीही चालणार नाही. उदय यांच्या म्हणण्यानुसार वाट पहायला हरकत नाही. भारतीय जनता देशप्रेमी आहे. सैनिकांना नावे ठेवणारे, भारताचे तुकडे व्हावे असे म्हणणाऱ्या लोकांना फक्त मारच मिळेल. जनतेच्या संयमाचा कोणी अंत पाहिला तर जनता त्यांचे नामोनिशाण मिटवून टाकेल. जयहिंद! >>
-------- त्याला तब्बल दोन लाखापेक्षा जास्त मते मिळाली म्हणजे त्याला मत देणार्‍यांचे देशप्रेम कमी आहे का ?

भारताचे तुकडे व्हावे असे एखादा म्हणाला असेल तर जरुर खटला भरायला हवा, म्हणणारा मोकाट कसा आहे? अशा गंभिर (अर्थात खरा असला तर) आरोपपत्रासठी ३ वर्षे लावणे याला गलथानपणा किंवा अकार्यक्षमता म्हणावी लागेल.

<< जनतेच्या संयमाचा कोणी अंत पाहिला तर जनता त्यांचे नामोनिशाण मिटवून टाकेल. >>
-------- आधीच्या काळात राजकारणी (म्हणजे मोदींचे गुरु, पद्मविभूषण शरदचंद्ररावजी पवार साहेब यांचा काळ) लोक नामोनिशाण मिटवण्याची भाषा करायचे तेव्हा काही वाटायचे नाही. आताच्या काळात असे म्हणणे म्हणजे लिंचींग करु किंवा दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे जिवीत अस्तित्व कसे पुसले तशी गत करु असा धरायचा. मागच्या दशकांत, देशात जेव्हढ्या लिंचिंगच्या घटना घडल्या आहेत त्यातल्या ९० % घटना ह्या मागच्या ५.५ वर्षात घडल्या आहेत.

चांद्रयान, मंगलयान पाठवले - खूप आनंद वाटतो.
लिंचिंगची आणि हिंसाचाराच्या प्रत्येक घटना मानवतेसाठी लज्जास्पद आहे. देशाची मान शरमेने खाली जावी असेच हे कृत्य आहे.

वरील व्हिडिओ मी फक्त माहिती साठी दिला आहे. मनोरंजन म्हणूनही पहा किंवा त्यातील दावे सत्य माना . निर्णय सर्वस्वी आपला आहे.

खुद्द त्या लडाख खासदारांची बायको सांगते. कन्हैया निर्दोष होता म्हणून.
>>

ते न्यायालय ठरवेल!

कम्युनिस्ट बायको अन संघी नवरा , त्यांचे तिकडे व्यवस्थित सुरू आहे
>>>

हे असंच सगळ्यांचच सुरू असत. अन आपण लोकं त्यांची धुनी धूत भांडत असतो. असो.

दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे जिवीत अस्तित्व कसे पुसले तशी गत करु असा धरायचा.
>> वरील लोकांच्या हत्यांचे समर्थन मुळीच करता येणार नाही. फक्त हिंदू धर्मावरच बोट ठेवल्याने व इतर धर्मातील चूकीच्या गोष्टींकडे कानाडोळा करून हिंदू धर्माची बदनामी अशी लोक करतात असा समज काही कट्टर हिंदू धर्म प्रेमी लोकांचा झाला असेल किंवा कुणी बाहेरील शक्तीने सुध्दा मुद्दाम असे हत्यासत्र घडवून आणलं असेल. याविषयी माझा अभ्यास नाही. क्षमस्व.

<< विरोधक हवेतच. या धाग्यावर उदय, भरत, blackcat व अजून दोघे तिघे विरोधी मते मांडत होते. पण काही प्रतिसाद केवळ विरोधासाठी विरोध म्हणून दिले आहेत. शेवटी विरोध करून दमले पण यांचे विचार मेजॉरिटीला पटलेले नाहीत. >>

------ माझा जिव भांड्यात पडला... नामोनिशाण मिटवण्याच्या भाषेने काही काळ घाबरलो होतो Happy
भरत, ब्लॅक-कॅट तसेच आरारा यांच्या पोस्टी मी आवर्जुन वाचतो. त्यांच्या विचारांचा आदर आहे.

मी विरोधी नाही आहे. मोदी यांनी चांगले काम केले, तसे दिसले तर मी पळत येऊन त्यांची (किंवा जे कुणी सत्तेवर असतील त्यांची) स्तुती करेल. देशाचा म्हणजे देशातल्या सर्व जनतेचा सर्वांगिण विकास व्हावा असे मला मनापासून वाटते. सोपे नाही आहे पण त्या दृष्टीने किमान प्रयत्न तर व्हायला हवेत ... १३५ कोटी जनसंख्या आहे, मोठी आव्हाने आहेत.

३७०, ३५अ रद्द केले त्याबद्दल इथे विरोध नाहीच आहे. असलेच तर कौतुक असेल... पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याच्या नादात आपण खूप काही मिस्लो. विरोधी विचारांना सोबत घेतल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. आता विरोधक त्या पात्रतेचेच नाही आहेत असे हिणवून तुम्ही त्यांना अलिप्त ठेवाल. विरोधक कमी आहेत.... तुमच्याकडे बहूमत आहे, प्रचंड मोठी शिस्तबद्ध स्व्यंसेवकांची सेना आहे - प्रचार कार्यात (बहुतेक वेळा खोट्याचे खरे) यांचा हात कुणी धरणार नाही, धडकी भरणारी जनतेची शक्ती... पण त्याच्यासोबत अत्यंत आवश्यक असणारी विनयता लयाला चालली आहे.

माझ्या देशातल्या समृद्धतेने आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन.... मागच्या काही वर्षातल्या घटना (आपला काळा कोळसाच हो :स्मित:) बघता अशा विविधतेने नटलेल्या परंपरांना दिवसाढवळ्या तिलांजली मिळते आहे आणि नवदेशभक्तीने ओतप्रोत भरलेले एकरुपतेचे (एक भाषा, एक धर्म, एक रंग.... ) नवे भिषण रसायन देशाला मिळते आहे. कुठे जाणार आहे मानवतेला शांततेचा संदेश देणारा माझा भारत देश?

ते न्यायालय ठरवेल

व्हिडीओ खरे हे कोणत्या न्यायालयाने सांगितले ?

भारत योग्य वाटेवरच आहे. भारताच्या संयमाचा अंत पाहणाऱ्या पाकिस्तान सारख्या उंदराला कॉंगींनी जे महत्त्व दिले ते अति झाल्यानेच जनतेनं कॉंग्रेसला नाकारले आहे.

Pages