एक ड्राइवर, सिंगापूर मधला !

Submitted by तृप्ती मेहता - ... on 2 August, 2019 - 23:50

परवा रविवारी सहकुटुंब एका restaurant मध्ये जेवायला गेलो होतो. टॅक्सिने परत आलो. चिनी वंशाचा टॅक्सी ड्रायव्हर. त्याचे payment करून उतरायला लागलो होतो.

तेवढ्यात, तो टॅक्सी ड्राइवर म्हणाला, " भगवान आपको और आपके परिवार को खुश रखें "!

ते अस्स्खलित हिंदी ऐकून आम्ही चाटच !!!

"विकेट पडणं, दांडी गूल " असले जे जे काही शब्दप्रयोग असतील त्याची प्रचितीच म्हणा ना !

अशा प्रसंगी त्या कर्त्यांची जी आश्चर्याच्या धक्क्याच्या मानसिक अवस्था असते तशीच आमची झाली.

Where did you learn hindi? माझा स्वाभाविक प्रश्न.

"From Indian passengers" त्याचे नम्र उत्तर.

मजाच वाटली त्या ड्रायव्हरची. आणि कौतुकही.

मग एकूण आमचा प्रतिसाद पाहता, त्यालाही त्याच्या हिंदीचा सराव करावासा वाटला बहुतेक.

कारण त्या नंतर त्याने , " भगवन आपको लम्बी उम्र दे" असा हिंदीत आशीर्वाद देऊन आमचे मन जिंकून घेतलं.

"आप इंडिया में कहाँसे है ?,

"मै बिहार गया था"

"मैं शाकाहारी हूँ "

असली एका पाठोपाठ प्रश्न, वाक्य हिंदीत सहजपणे जणू फेकत होता नुसती आमच्या अंगावर .

आता नुसतं हिंदी बोलून थांबावं ना बाबानी ! पण नाही !!

त्याने त्याच्या जवळचा फोटोचा अल्बम माझ्या हातात टेकवला. मग मी पण गाडीतुन उतरायला निघालेली थांबले. घेतला तो अल्बम हातात उत्सुकतेने. वरवर चाळला. फोटोत स्तूप दिसले. आणि तो ड्राइवर बुद्धिस्ट भिक्षुकाच्या वेशात ! (बिहार म्हटल्यावर बोधगया असणार) त्याचा अल्बम त्याला साभार परतवला. पण थांबा ! अजून एक गंमत त्याच्या पोतडीत होती.

"में आपको मंत्र में blessings देता हूँ " म्हणाला. आणि चक्क पाली भाषेत, मंत्राच्या विशिष्ट सुरावटीसह, जवळपास १ मिनिटे, न थांबता त्याने मंत्रोच्चरण करत आमची उरली सुरली विकेट, दांडी पण उडवून टाकली. आता त्याच्यापुढे हात जोडायचेच बाकी होतं.

त्याला धन्यवाद दिले. आणि मी पण त्याच्याशी चिनी भाषेत बोलून त्याला धक्का दिला.

सगळा प्रसंग ४ एक मिनिटांचा. पण खूप काही देऊन गेला. भरपेट खाऊन आलेल्या मनावरची सुस्ती उडवून गेला.

बीजिंग मध्ये असताना समर पॅलेस मधल्या अनुभवाची आठवण देऊन गेला. तिथेही असच अचानक कानावर , "आवारा हूँ ", गाणं कानावर पडलं होतं. त्या शब्दांच्या, त्या तल्लीनतेने गाणाऱ्याच्या आवाजाच्या ओढीने त्या गाणाऱ्या जवळ गेलो होतो.

आता हे लिहितानाही ते सगळं आठवून त्या अनुभवांची पुनरावृत्ती होतेय. छान वाटतयं.

रोजचं रहाटगाडगं विसरायला लावणारी अशी माणसं आयुष्यातले काही क्षण उजळवून टाकतात. बरंच काही सांगून जातात. "भेटगाठ" घडवून आणतात. भर दुपारच्या उन्हात चालताना कुठूनतरी अचानक भेटणारा मोगऱ्याचा गंध, अचानक आलेल्या पावसाने आसमंत भरून टाकणारा तो मृदगंध, हे असलं काहीतरी मानवी रूपात साकारल्या सारखं !

अशी माणसं भेटत राहोत कायम. अजून काय मागणार ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सो क्युट. सिंगापूर मधले उबर टाइप ड्रायवर खरेच काही क्युट असतात. मला एक भेटलेला त्याने चुकून राँग टर्न घेतला तर स्वतःच कपाळावर हात मारून हसला आणि रिवर्स घेउन परत योग्य मार्गाला लागला. खूपच पोलाइ ट पण असतात. भाडे वाढीव लागेल टाइम स्लॉट नुसार हे सांग्ताना पण फार विनम्र पणे सांगितले. अर्थात मी ते दिलेच. फार फास्ट त्राफिक पण शिस्ती मुळे जाणवत नाही काही त्रास.

वॉव! मस्त लिहिलंय.
आणि मी पण त्याच्याशी चिनी भाषेत बोलून त्याला धक्का दिला. >>>> हे अजून मस्तच.
अशी माणसं भेटत राहोत कायम. अजून काय मागणार ?>>>> +१.

मस्त अनुभव.
एकदा केके ट्रॅव्हल ने येताना एक जर्मन बाई युनिव्हर्सिटी ला 'इथेच थांबवा, मी इथे उतरत्ये' असं ठळक मराठीत म्हणाली तेव्हा असाच धक्का बसला होता.

मस्तच, अनपेक्षितपणे असं कुणी भेटलं की नेहमी करता लक्षात राहतो, मागे एकदा तायवान मध्ये एका ओळखीच्यां ना आलेला अनुभव
टॅक्सी त बसल्यावर त्यांना वाटलं की तो चिनी ड्राइवर उगाचच फिरवतोय , त्या बरोबर ते आपसात हिंदी भाषेत चालकाला वाईट शिव्या देऊ लागले
त्या चालकाने रस्त्या च्या कडेला टॅक्सी थांबवली आणी चक्क हिंदी भाषेत खडसावले,, साब, हमें गालियाँ मत दो, विश्वास नहीं है तो यही पर उतर जाओ, मै कलकत्ता का चायनीज हूँ
हे ऐकताच ते दोघे खजिल होऊन निमूटपणे बसून राहिले

सुरेख Happy

सिंगापूरमधील ड्राईव्हरचा मलाही खूप छान अनुभव आहे. मला पहाटे 3:30 वाजता changi एअरपोर्ट ला जायला निघायचं होतं. मी कॅब बुक केल्यानंतर मला ड्राइव्हर डिटेल्स मिळाले. मग मी ड्राइव्हर ला कॉल केला तेव्हा मी त्याला विचारत होते पहाटे 3:30 ला निघायचंय वेळेत याल ना. तेव्हा त्याने यू don वरी... यू don वरी.. असं म्हणून मला खूप छान आश्वस्त केलं आणि पहाटे तो वेळेत हजर. वाटेत त्याने खूप गप्पा ही मारल्या आणि हॅपी जर्नी विश सुद्धा केलं.

छान अनुभव.
पण, भारत म्हणजे हिंदी नव्हे याची जागृती करण्याची किती आवश्यकता आहे हेच यातुन अधोरेखीत होते.
मराठी लोकांनी अशा प्रसंगात, India is Union of States and we belong to the State of Marhattas and speak Marahathi असे ठामपणे सांगावे.
हामको इंदी नाई असे दक्षिणी अक्सेंट मधे सांगावे.
पुढच्यावेळेला तुम्ही भारतात याल तेव्हा महाराष्ट्राला भेट द्या असे आमंत्रण द्यावे, ईथली पर्यटनस्थळे सांगावीत.

छान आठवण, आवडली.

हामको इंदी नाई असे दक्षिणी अक्सेंट मधे सांगावे>>>

आणि त्याच्याशी पुढे होऊ शकणारा संवाद तिथेच तोडून टाकावा?

आणि त्याच्याशी पुढे होऊ शकणारा संवाद तिथेच तोडून टाकावा?
>>
No. You should use English or local language of that place.
He can communicate how he likes India, its culture and how he can speak few words in Hindi - all this in English to you.
You can still listen to him and compliment in English. He will understand.

Here objection is not to Hindi Language, but objection is to the misconception of foreign people that Hindi = India and that you or other people of India, don't have their own identity besides Hindi.

If he has misconception about Hindi = India, you should not help strengthen that rumor.
You have a choice. Choice to share facts with other people who don't know much about India.

विषयांतर होतेय..

पण कोणी माझ्याशी इंग्रजी व हिंदी दोन्ही भाषांमध्ये बोलू शकत असेल तर मी हिंदी निवडेन.

तुम्हाला हिंदीत बोलायचे नसेल तर माझा काहीही आग्रह नाही. इथे मराठीत लिहायबोलायची सोय असतानाही तुम्ही इंग्रजीत लिहिताय, आयडेंटिटी क्रायसिस नक्की कोणाला आणि कसला आहे हा प्रश्न पडला.

असो. मूळ विषय चांगला चाललाय, तो चालू द्या.

तुम्ही वेगळा धागा काढून तिथे तुमचा विषय चर्चेला घ्या.

पण कोणी माझ्याशी इंग्रजी व हिंदी दोन्ही भाषांमध्ये बोलू शकत असेल तर मी हिंदी निवडेन.
>>
आपली वयक्तीक आवड व भारताची जागतीक ओळख या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
परदेशात असतना, भारतबद्दल गैरसमज कसे दूर करावे, यावर मी मत मांडले आहे.

तुम्हाला हिंदीत बोलायचे नसेल तर माझा काहीही आग्रह नाही. इथे मराठीत लिहायबोलायची सोय असतानाही तुम्ही इंग्रजीत लिहिताय, आयडेंटिटी क्रायसिस नक्की कोणाला आणि कसला आहे हा प्रश्न पडला.
>>
ते तुमचा आधीच्या प्रश्नाचे प्रात्यक्षिक उत्तर आहे, की परदेशात असताना ईंग्लीशमधे बोलू शकता.

तुम्ही वेगळा धागा काढून तिथे तुमचा विषय चर्चेला घ्या.
>>
लेखकाचा अनुभव या धाग्यावर लिहिलेला आहे, त्यांच्या अनुभवाचा इथे संदर्भ आहे म्हणुन इथे लिहिले.

यात मधला पर्याय म्हणून हिंदीत बोलून माझी मातृभाषा मराठी आहे, भारतात अनेक प्रांतात अनेक भाषा आहेत आणि महाराष्ट्रात अवश्य या सांगायला हरकत नाही.
मला हिंदी बोलायला आवडते, चालते, जमल्यास 1-2 गुजराती वाक्य पण बोलता येतात.इंग्लिश त्या मानाने टेक्निकल भाषा म्हणूनच बोलता येते.त्यात भावना, राग, निराशा, आनंद नीट व्यक्त करता येत नाही.हिंदी राष्ट्रभाषा वगैरे समजानी झालेलं नुकसान वगैरे पार्श्वभूमी ची कल्पना आहे.पण त्याला केवळ भाषाच जबाबदार नाही.वृत्ती, लेबर कॉस्ट, स्ट्रीट स्मार्ट नेस असे अनेक मुद्दे आहेत.फक्त हिंदी प्रसार नाकारून ते नुकसान सुधारणार नाहीय.

आरे असं नाय ते. आपण हिंदी मराठी चालू केले तर तो मेंडेरिन केंटोनिज सिंगापुरीअन इंग्लीश, बहासा इंडोनेशिआ थाइ इतर कोणत्याही १५ २० डायलेक्ट आपल्यावर फेकू शकतो. आपल्या देशाचे प्रतिनिधी म्हणून आपण गोड बोलून आपली इमेज छान मेंटेन केली पाहिजे. एकतर फार इस्टचे लोक फार ओरडून बोलत नाहीत. व तो सर्विस इंडस्ट्रीमधला असल्याने विनम्र पणे व कस्टमर सर्विस रूल्स नुसार बोलत असेल. त्यात त्याने ओवर एक्स्टेंड करून हिंदी बोलला हे ग्रेटच.

आपण हिंदी मराठी चालू केले तर तो मेंडेरिन केंटोनिज सिंगापुरीअन इंग्लीश, बहासा इंडोनेशिआ थाइ इतर कोणत्याही १५ २० डायलेक्ट आपल्यावर फेकू शकतो.
>>
तो असे करणार नाही, कारण आपण त्याला सिंगापुरची एकच ओळख आहे ती म्हणजे चायनीज भाषा, असे काही बोलणार नाही.
पण कल्पना करुन बघा की, भारतात आलेल्या सिंगापुरी पर्यटकाला तुम्ही, "अहो तुमची राष्ट्रीय भाषा ती चायनीज ना ती आम्हालाही येते बरंका" असे म्हणून २-३ चायनीज वाक्य बोलून दाखवलेत तर, तो तुमचा गैरसमज नम्रपणेच पण दूर करेल की नाही?
मग आपणही तेच नम्रपणे करायला काय हरकत आहे?

किंबहुना, समजा मी इथे, मला सिंगापुरला फिरायला जायचे आहे तर चायनीजमधील कोणती वाक्य शिकुन घेऊ, अस माहिती हवी धागा काढला आता, तर कदाचीत तुम्हीच तिथे पहिल्या आला असता सांगायला की सिंगापुरमधे चायनीज ही एकच अधिकृत भाषा नाही. ईंग्रजी मधे काम होते.
---
आपल्या देशाचे प्रतिनिधी म्हणून आपण गोड बोलून आपली इमेज छान मेंटेन केली पाहिजे.
>>
एकतर मी कुठेही नम्रपणा सोडून काही उद्धट बोला असे लिहिलेले नाही. जगात आपल्या देशाबद्दल चुकीची माहिती पसरवलेली असताना, निव्वळ स्वतःच्या वयक्तीक इमेजपायी त्याबद्दला काहीच न करणे हे काही योग्य नाही. नम्रपणे बोलून पण गैरसमज दूर करता येतो की. आता या वरच्या प्रतिसादातच तुम्ही मला शांतपणे चांगले सांगीतलेच की. तसेच शांतपणे नम्रपणे त्यांनाही भारताबद्दल सांगायचे.

एकतर फार इस्टचे लोक फार ओरडून बोलत नाहीत.
>>
याचा मी मांडलेल्या मुद्द्याशी काय संबंध ते कळले नाही. सर्व प्रकारचे लोक सर्व देशात असतात.

तो सर्विस इंडस्ट्रीमधला असल्याने विनम्र पणे व कस्टमर सर्विस रूल्स नुसार बोलत असेल. त्यात त्याने ओवर एक्स्टेंड करून हिंदी बोलला हे ग्रेटच.
>>
त्याला हिंदी येते याचे कौतुका कारण्याबद्दल मी सहमतीच दर्शवलेली आहे. पण त्यासाठी तुम्ही इंग्लीश सोडण्याची गरज नाही असे मी म्हणतो आहे. त्यासोबतच त्याने तुमचा वेळ घेऊन नम्रपणे जसे त्याच्या कलेबद्दल सांगितले तसे तुम्ही त्याचा वेळ घेऊन नम्रपणे भारताबद्दल सांगावे. हे समजने एवढे कठीन आहे का?

अभि_नव, तुमचा मुद्दा नेमका काय आहे कळत नाही. तुमचा वरचा प्रतिसाद वाचून मूळ लेख परत वाचला. त्या टॅक्सीवाल्याचा तोंडी 'हिंदी तुमची राष्ट्रभाषा आहे म्हणून मी तुमच्याशी त्या भाषेत बोलतोय' हे वाक्य आले का हे तपासून पाहिले. हिंदी तो पॅसेंजर्सकडून शिकला, अर्थात हे पॅसेंजर्स आपापसात हिंदीत बोलत असताना त्याने ऐकून तो शिकला असणार. इथे राष्ट्रभाषेचा प्रश्न कुठून आला? त्याला मराठी पॅसेंजर्स लाभले असते तर त्याने मराठीत गप्पा मारल्या असत्या. नंतर त्याने पालीत मंत्र म्हणून दाखवला. लेखिकेनेही तिला जमतंय तितके चिनी बोलून दाखवले. तुम्ही जे मुद्दे मांडताय ते वरच्या लेखात कुठे फिट्ट होताहेत हे लक्षात येत नाही. मुळात मुद्दा काय आहे हेच कळत नाहीय. असो, माझें मत be Roman when you are in Rome या विचाराला आहे

जगात आपल्या देशाबद्दल चुकीची माहिती पसरवलेली असताना, निव्वळ स्वतःच्या वयक्तीक इमेजपायी त्याबद्दला काहीच न करणे हे काही योग्य नाही.>>>>>

कुठली चुकीची माहिती? जगात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी चौथ्या क्रमांकावर आहे. एखाद्या परदेशी टुरिस्ट स्पॉटवर मी भारतीय आहे हे ओळखून आवर्जून हिंदी बोलणारा कोणी अभारतीय सेवादेता भेटला तर मला माझ्या भाषेचा अभिमान वाटेल. मला हिंदी येत असतानाही त्याच्याशी इंग्रजीत बोलायचा शहाणपणा मी करणार नाही.

Pages